व्याकरणाच्या
अभ्यासाचे महत्त्व :
आपले विचार, भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून
सांगतो किंवा लिहून कळवतो. आपले विचार जसे इतरांना कळले पाहिजेत, तसे इतरांचेही
विचार आपल्याला कळले पाहिजेत. त्यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली गेली पाहिजे, तशीच ती लिहिली
गेली पाहिजे. त्यासाठीच भाषेचा
उपयोग बिनचूक होणे आवश्यक आहे.
'मराठी
- घटना, रचना, परंपरा' या ग्रंथात भाषेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, 'भाषा ही मानवाची
निर्मिती आहे. माती निर्मिली देवाने; पण तीतून घडा निर्मिला तो मानवाने. कापूस ही दैवी
सृष्टी; पण कापड ही मानवी सृष्टी होय. शिला ही निसर्गाची करणी; पण मूर्ती ही मानवाची, तद्वत निसर्गदत्त ध्वनीला
स्वरेंद्रियांच्या विविध संयोगांनी व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरुप देऊन
मानवाने प्रथम वर्णमय रचनासामग्री मांडिली, आणि शतकानुशतकांच्या प्रयत्नांनी तितून
भाषेचे मंदिर उभारिले. मनातील भाव मुखावाटे प्रकट करण्याचे भाषा हे अत्यंत प्रभावी
साधन होय. ते हाती येतात मानवी जीवन इतर प्राणी
वर्गांच्या अपेक्षेने कमालीचे सुधारले, पुढारले, परिणत झाले वैचित्र्याने विनटले, समृद्ध
झाले.भाषा ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली.
व्याकरण संकल्पना
व स्वरूप :
व्याकरण म्हणजे : -
भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा, यासाठी काही
नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात.
संकल्पना व
स्वरूप :-
आपल्याला जे विचार व्यक्त करावयाचे आहेत, ते नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास
आवश्यक आहे. सामान्यपणे, नियम, व्याख्या, उदाहरणे, स्षष्टीकरण इत्यादी भाग आपल्याला
कंटाळवाणा वाटतो,
नकोसा वाटतो. तरीही व्याकरणाचा अभ्यास
हा आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या भाषेचा
अभ्यास असतो. आपल्याला दुसरी भाषा शिकवायची असेल, तर आपली भाषा म्हणजे
मातृभाषा चांगली यावी लागते. आपल्या भाषेचे व्याकरण व आपली भाषा चांगली असली की
दुसरी भाषा समजून घेणे सोपे जाते.
आपल्या भाषेवर जसे आपले प्रेम असावे, तसेच आपल्या
भाषेच्या व्याकरणावर ही आपले प्रेम असावे.
व्याकरणाचा अभ्यास म्हणजे 'लेखी भाषेचा' किंवा
'लेखन - स्वरुपातील भाषेचा' व त्या भाषेच्या नियमांचा अभ्यास नाही; तर आपले बोलणे,
आपले स्पष्टीकरण कौशल्य, भाषण कौशल्य यासाठीही व्याकरण आपल्याला उपयुक्त ठरते. उच्चारातील बिनचूकपणा, नेमकेपणा, वाक्यातील शब्दांचा
बिनचूक क्रम हे व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येऊ लागतात. म्हणून 'व्याकरण' हा
विषय विद्यार्थीदशेतच नव्हे, तर जीवन आपल्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होणे आवश्यक
आहे.
भाषा व व्याकरण परस्परसंबंध :
भाषा ही प्रथम
माणसांच्या बोलण्यातून, व्यवहारातून विकसित झाली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास
झाला. शब्दसंपत्ती भर पडत गेली. अनेक
वर्षांच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित
रुप प्राप्त झाले. व्याकरण हे भाषेच्या विकासानंतर
साकार होत गेले.
व्याकरणकारांनी शब्दांची रुपे
पाहिली.
त्या शब्दांची वाक्यातील बदलती रुपे पाहिली. शब्दांची वर्गीकरणे केली. अनेक वाक्यांच्या
निरीक्षणांतून काही महत्त्वपूर्ण नियम निर्माण केले. व्याकरणकारांनी
नियमांनी युक्त अशा व्यवस्थेचे स्वरुप भाषेला प्राप्त करुन दिले. त्या नियमांची शास्त्रीयदृष्ट्या सुव्यवस्थित मांडणी केली. भाषा विकसित होत असताना व्याकरण विकसित होत; हे लक्षात घेऊन
भाषेच्या नियमांची रचना केली. महर्षी पतंजलींनी व्याकरणाला 'शब्दानुशाषन' असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे नियमन, शिस्त. आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण, त्यांचे उच्चार,
शब्दसिध्दी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचे - शब्दांचे परस्परसंबंध
इत्यादी बाबतींत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण.
भाषा आधी आणि व्याकरण नंतर
असा याचा अर्थ नाही. कारण भाषा ही तिच्या नियमांसह निर्माण होते, विकसित होत
असते. त्या नियमांना
व्यवस्थेचे स्वरूप व्याकरणाने प्राप्त होते.
भाषा आणि व्याकरण
हे परस्परांपासूनवेगळे करता येतच नाहीत. ते 'परस्परांमध्ये' व 'परस्परांवर अवलंबून असणारे असतात.
भाषा एखाद्या
नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो. नदी ज्या प्रमाणे अनेक वळणांनी वाहत असते, त्याप्रमाणे
भाषेच्या प्रवाहातही अशी वळणे असतात. भाषेमध्ये बदल होत जातात. भाषास्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण
असते.भाषा ही स्थळकालानुरूप बदलत जाते. त्यातुनच भाषेच्या विकासाचे टप्पे किंवा प्रदेशानुसार बोलींचे स्वरुप
प्रकट होत जाते.
वर्णविचार :
1) मराठीची वर्णमाला :
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.
शाशननिर्णय २००९ नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला.
स्वर :- अ आ
इ ई उ ऊ ऋ लृ
ए अँ ऐ ओ आँ औ
स्वरादी
:- _. ( अनुस्वार) : (विसर्ग)
व्यंजने
:- क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ट ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श ष स
ह ळ
विशेष
संयुक्त व्यंजने :-
क्ष ज्ञ
वर्णाचे प्रकार :-
1. स्वर - स्वृ
-
म्हणजे उचलणार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या चौदा वर्णांना स्वर म्हणतात.
स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण -
ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील
कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात , त्यांना 'स्वर' असे
म्हणतात.
2. स्वरादी :- (अं) व (अ:) ही अनुक्रमे शिरोबिंदू
आणि विसर्ग यांची चिन्हे आहेत. या दोन वर्णना स्वरादी असे म्हणतात.
अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर
स्वर येतो, म्हणून त्यांना
स्वरादी असे म्हणतात.
● स्वरादी म्हणजे 'स्वर आहे आदी
म्हणजे आरंभी ज्याचा असा' वर्ण
उदा. - अंगण या शब्दात अ + अनुस्वार = अं
◆ 'शंकर'
या शब्दात श
+ अ + अनुस्वार = शं
◆ 'किंकर'
या शब्दात क + इ + अनुस्वार = किं
◆ 'मन:स्थिती' या
शब्दात न + अ
+ विसर्ग = न:
स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात, तर
ओझरत्या, अन् अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.
विसर्ग - विसर्ग यांचा अर्थ श्र्वास सोडणे होय.
३. व्यंजन - मराठी
वर्णमालेतील ' क,
ख.... पासून ह, ळ' पर्यतचे
वर्ण व्यंजने आहेत.
ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही,
त्यांना व्यंजने म्हणतात.
● व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत,
हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.
● आपण जेव्हा क, ख, ग, असा
उच्चार करतो, तेव्हा त्यात 'अ' हा स्वर मिसळून आपण त्यांचा उच्चार करतो.
उदा. क+ अ
= क
● याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साह्यवाचून पूर्ण होत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात.
स्वरांचे
प्रकार :-
१) -हस्व स्वर व दीर्घ स्वर -
स्वरांचा उच्चार करताना
लक्षात येते की, अ,
इ, उ, ऋ, लृ या स्वरांचा उच्चार
आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो,म्हणून त्यांना
-हस्व स्वर असे म्हणतात.
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
२.
संयुक्त स्वर-
दोन स्वर एकत्र
येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
ए, ऐ,ओ, औ हे हे संयुक्त सर्वर आहेत. ते पुढीलप्रमाणे
तयार झाले आहेत -
ए = अ + इ किंवा ई. ऐ = आ + इ किंवा ई
ओ = अ + उ किंवा ऊ. औ = आ + उ किंवा ऊ
उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधी वरून एखादा स्वर हा हस्व स्वर आहे
की दीर्घ स्वर आहे हे ठरवितात, त्यांना मात्र असे
म्हणतात.
-हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो
वेळ लागतो, त्याला एक मात्रा मानतात.दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात.
३.
सजातीय स्वर व विजातीय स्वर
एकाच उच्चारस्थानातून निघणा-या
स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ -
आ. इ - ई. उ - ऊ
भिन्न उच्चारस्थानांतून निघणा-या
स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ -
इ. अ - उ. इ - ए
उ - ए. अ - ऋ
व्यंजनांचे प्रकार
१.
स्पर्श व्यंजने -
•
'क, ख' पासून ' भ, म' पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे
म्हणतात.
•
फुफ्फुसांतील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, ताल, दात ओठ या अवयवांना स्पर्श
करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात.
२.
अनुनासिक / पर - सवर्ण -
•
ङ, ञ, ण, न, म,
या वर्णाचा उचलणार त्या - त्या त्या-त्या वर्णांच्या उच्चारस्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो, म्हणून
त्यांना 'अनुनासिक' वर्ण असे म्हणतात.
•
अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात, म्हणून त्यांना पर - सवर्ण असे म्हणतात.
३.
कठोर व मृदू व्यंजने -
● ज्या व्यंजनांत उच्चाराची तीव्रता दिसून येते, ती कठोर व्यंजने समजली जातात.
● तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य, कोमल
किंवा मृदू होतो, त्यांना मृदू व्यंजने म्हणतात.
कठोर व्यंजने, मृदू व्यंजने व अनुनासिके यांचा तक्ता पुढीलप्रमाणे
देता येईल.
|
वर्ग
|
कठोर व्यंजने
|
मृदू व्यंजने
|
अनुनसिके/ पर- सवर्ण
|
|
'क' वर्ग
|
क्, ख्
|
ग्, घ्
|
ङ्
|
|
'च' वर्ग
|
च्, छ्
|
ज्, झ्
|
ञ्
|
|
'ट' वर्ग
|
ट्, ठ्
|
ड्, ढ्
|
ण्
|
|
'त' वर्ग
|
त्, थ्
|
द्, ध्
|
न्
|
|
'प' वर्ग
|
प्, फ्
|
ब्, भ्
|
म्
|
४.अर्धस्वर
● य्, र्, ल्, व् यांची
उच्चारस्थाने अनुक्रमे इ,
ऋ, लृ,
उ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखीच आहेत.
● संधी
होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात.
१)
इ + अ = य् + अ - (उदा. अति + अंत = अंत्यत)
२)
ऋ + अ = र् +
अ - (उदा. पितृ
+ अर्थ = पित्रर्थ)