Wednesday, August 09, 2023

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 || Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi


तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद
 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
भाग 4 

2023 Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi


प्रश्न 1. मार्च 2023 मध्ये साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर >>> माधव कौशिक (हिंदी साहित्यिक)

***त्यांच्या आधी चंद्रशेखर कंबार अध्यक्ष होते.

प्रथम अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते.
स्थापना - 12 मार्च 1954

 

 

प्रश्न 2. मराठी भाषेतील 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

उत्तर >>> प्रवीण दशरथ बांदेकर

(कादंबरी - उजव्या सोंडेच्या बाहुल्या)

 

 

प्रश्न 3. फेब्रुवारी 2023 मध्ये नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्विकारला ?

उत्तर >>> बी. व्ही. आर. सुब्रमण्यम

 

 

प्रश्न 4. 2023 वर्ल्ड एयर क्वालिटी रिपोर्ट नुसार सर्वाधिक प्रदूषित देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर >>> आठव्या

***सर्वाधिक प्रदूषित देश अनुक्रमे चाड, इराक व पाकिस्तान

पाकिस्तानचे लाहोर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे

 

 

प्रश्न 5. तुर्की आणि सिरीयातील भूकंपग्रस्तांना मदत कार्य म्हणून भारताने ऑपरेशन _____ राबवले.

उत्तर >>> ऑपरेशन दोस्त

 




प्रश्न 6. भारताने  कधी पर्यंत वार्षिक 50 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता निर्माण करण्याचे लक्ष ठेवले आहे

उत्तर >>> 2030

विजेता संघ - अर्जेंटिना

उपविजेता संघ - फ्रान्स

 

 

प्रश्न 7. जागतिक पाणथळ दिन दरवर्षी केव्हा साजराकेला जातो?

उत्तर >>> 2 फेब्रुवारी

 

 

प्रश्न 8. उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे ?

उत्तर >>> हरियाणा

 

 

प्रश्न 9. दरवर्षी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणारा भारतीय लष्कराचा सर्वात प्रतिष्ठित सोहळा 'आर्मी डे परेड'(2023) प्रथमच कोठे आयोजित करण्यात आला ?

उत्तर >>> बंगळुरू

 

 

प्रश्न 10. दरवर्षी लष्कर दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर >>> 15 जानेवारी

 

 

प्रश्न 11. वीर गार्डियन 2023 हवाईदल सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला ?

उत्तर >>> भारत व जपान

 


***तर्कश सराव - भारत अमेरिका दरम्यान संयुक्त दहशतवाद विरोधी सराव

 

 

प्रश्न 12. मार्च 2023 मध्ये सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर >>> रश्मी शुक्ला

 

  

प्रश्न 13. श्री __________ यांनी रेल्वेमंडळाचे(रेल्वे मंत्रालय) नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO),म्हणून पदभार स्वीकारला आहे. 

उत्तर >>> अनिल कुमार लाहोटी 

 

 

प्रश्न 14. देशातील सर्वात मोठे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर >>> रूरकेला ओरिसा

 

 

प्रश्न 15. वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023 चे कोणी विजेतेपद मिळवले ?

उत्तर >>> नोवाक जोकोवीच (सर्बिया)

 

 

प्रश्न 16. पहिल्या 19 वर्षाखालील ICC महिला T 20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद कोणत्या संघाने मिळवले ?

उत्तर >>> भारत (कॅप्टन शेफाली वर्मा)

उपविजेता संघ - इंग्लंड




Friday, August 04, 2023

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3 || Chalu Ghadamodi

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc 
 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
भाग 3 

Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi

प्रश्न 1. भारतीय ऑलंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर >>> पी. टी. उषा

 

 

प्रश्न 2. भारताने ‘मोचा चक्रीवादळाने’ प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले ?

उत्तर >>> ऑपरेशन करुणा

 

 

प्रश्न 3. 2023 मध्ये भारताने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी बचाव कार्य म्हणून ऑपरेशन __________ राबवले.

उत्तर >>> ऑपरेशन कावेरी

 

 

***ऑपरेशन गंगा(2022) - रशिया व युक्रेन युद्धात युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवले.

 

***ऑपरेशन देवी शक्ती(2021) - हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या बचाव मोहिमेला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव देण्यात आले होते.

 

 

प्रश्न 4. मे 2023 CBI संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर >>> प्रवीण सूद (कर्नाटकचे पोलीस महासंचालक)

 

 

प्रश्न 5. जून 2023 मध्ये जागतिक बँकेच्या गट अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर >>> अजय बंगा (14 वे अध्यक्ष) (कार्यकाळ 5 वर्षे असणार आहे)


जागतिक बँकेचे मुख्यालय - वॉशिंग्टन डीसी.
जागतिक बँक स्थापना - 1944

 

 

प्रश्न 6. ‘फिफा विश्वचषक 2022’ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर >>> कतार

विजेता संघ - अर्जेंटिना
उपविजेता संघ - फ्रान्स


 

प्रश्न 7. ‘ICC  T20 विश्वचषक 2022’ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर >>> ऑस्ट्रेलिया (स्टेडियम - MCG)

विजेता संघ - इंग्लंड
उपविजेता संघ - पाकिस्तान

 

 

प्रश्न 8. ‘ICC अंध T20 विश्वचषक 2022’ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर >>> भारत (स्टेडियम - एम. चिन्नास्वामी, बेंगळूरु)

विजेता संघ - भारत (2012, 2017, 2022)

उपविजेता संघ - बांग्लादेश

 

 

प्रश्न 9. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अम्बेसेडर) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (मे 2023)

उत्तर >>> मकरंद अनासपुरे

***याआधी 2003 मध्ये महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे सदिच्छा दूत म्हणून ‘विक्रम गोखले’ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

 

प्रश्न 10. निखत झरिन व लव्हलीना बरगोहाय कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर >>> बॉक्सिंग (महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2023)

***महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2023 सुवर्णपदक - निखत झरिन(50 किलो वजनी गट), लव्हलीना बरगोहाय(75 किलो वजनी गट)

 

 

प्रश्न 11. RRR मूळ चित्रपट कोणत्या भाषेतील आहे?

उत्तर >>> तेलगु

 

 

प्रश्न 12. 2021 मधील भारताच्या प्रस्तावा नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर >>> बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (IYM) 2023 (International MILLET Year 2023)

 

 

प्रश्न 13. 15 व्या हॉकी विश्वचषक 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर >>> ओरिसा, भारत

विजेता संघ - जर्मनी
उपविजेता संघ - बेल्जियम

 

 

प्रश्न 14. राज्य फुलपाखरू घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर >>> महाराष्ट्र (2015)

*** महाराष्ट्र राज्य फुलपाखरू - ब्ल्यु मॉरमॉन

 

 

प्रश्न 15. नामांकित सोशल मिडीया कंपनी  ‘ट्विटर’ कोणी खरेदी केली?

उत्तर >>> एलन मस्क

 

 

प्रश्न 16. 2023 15 वे ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर >>> दक्षिण आफ्रिका (डरबन)

***14 वी ब्रिक्स शिखर परिषद (चीन), 13 वी ब्रिक्स शिखर परिषद (भारत)

 

 

प्रश्न 17. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त (आजादी के अमृत महोत्सव 2023) राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नाव बदलून __________ करण्यात आले.

उत्तर >>> अमृत उद्यान

 

 

प्रश्न 18. आसियान ही आग्नेय आशियातील ________ देशांची संघटना आहे.

उत्तर >>> 10 देश

***(ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हियेतनाम)

स्थापना - 8 ऑगस्ट 1967 ‘बॅंकॉक घोषणा’



    प्रश्न 19. 2022 मध्ये नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते.

    उत्तर >>> 8 चित्ते (5 मादी 3 नर) ( कुनो राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश)

     

     

    प्रश्न 20. केंद्र सरकार द्वारे दुसरा ‘सुशासन साप्ताह 2022’ केव्हा साजरा करण्यात आला?

    उत्तर >>> 19 ते 25 डिसेंबर

     

     

    प्रश्न 21. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

    उत्तर >>> 11 एप्रिल (कस्तुरबा गांधी जयंतीनिमित्त )

     

     

    प्रश्न 22. आंतरराष्ट्रीय कामगार दिन ________?

    उत्तर >>> 1 मे

     

     

    प्रश्न 23. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

    उत्तर >>> राजीव लक्ष्मण करंदीकर

     

     

    प्रश्न 24. 2022 पासून दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस _________________ म्हणून साजरा करण्यात येतो.

    उत्तर >>> राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 

     


    प्रश्न 25. 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याची वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

    उत्तर >>> रविना टंडन

     

     

    प्रश्न 26. भारतात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत ?

    उत्तर >>> महाराष्ट्र








    मागे>>>>>>>              <<<<<<<पुढे

    Thursday, August 03, 2023

    16 महाजनपदे || 16 Mahajanpadas In Marathi mpsc prachin bharat


    16 महाजनपदे
    16 Mahajanpadas In Marathi


    मगध
    (दक्षिण बिहार)

    राजधानी
    गिरीव्रज/राजगृह

    प्रसिद्ध राजे – बिंबिसार, अजातशत्रु, शिशुनाग

    बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग. राजगृह(राजगीर) ही राजधानी. पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरीव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते. 

    महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता.

    बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रुने राजगृह या ठिकाणी भरवली होती.

    शिशुनाग याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये मगधला जोडली.



    अंग
    (चंपा-पूर्व बिहार)

    राजधानी
    चंपा

    अंग हे सागरी व्यापाराच्या केंद्रपैकी एक होते. 

    बिंबिसारने अंग महाजनपदाचा पराभव करून मगध साम्राज्यात विलीन केले.




    वृज्जी/वज्जी
    (उत्तर बिहार)

    राजधानी
    वैशाली

    वृज्जी हा आठ कुळांचा संघ(महाअठ्ठकुल). 

    विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इ. कुळांचा समावेश.

    एकपण्ण जातककथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते. तसेच नगराला तीन प्रवेशद्वारे आणि बुरूज होते. अजातशत्रु ने कोसल राज्य मगध राज्यात विलीन केले.



    गांधार
    (पेशावर)

    राजधानी
    तक्षशिला

    विस्तार – काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये.

    राजा – पुक्कुसाती किंवा पुष्कसारीन हा बिंबिसारच्या समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्युश पहिला याने जिंकून घेतले. इराणमधील बेहिस्तुन येथील

    शिलालेखात (इसवी सनापूर्वी ५१६) गांधाराचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे.



    कुरू
    (दिल्ली)

    राजधानी
    इंद्रप्रस्थ/इंद्रपट्टण

    विस्तार – दिल्ली व आसपासचा प्रदेश ,

    जातककथांमधील उल्लेखानुसार येथील राजे ‘उदधिठ्ठिल’ गोत्राचे होते.



    वंश/वत्स
    (अलाहाबाद)

    राजधानी
    कौशांबी

    प्रसिद्ध राजा – उदयन

    पांडवांचा वंशज निचक्षु या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलविली होती.

    कवी भास लिखित ‘स्वप्नवासवदत्त’ या नाटकाचा नायक, वत्स महाजनपदाचा राजा “उदयन” हा राजा बिंबिसार याच्या समकालीन होता.

    या राज्यात तयार होणारे तलम कापड प्रसिद्ध होते.



    अवंती
    (उज्जैन)

    राजधानी
    उज्जयिनी/महिष्मती

    राजा – प्रद्योत

    विस्तार – मध्य प्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश.

    दोन भाग उत्तर अवंती – उज्जयिनी  (उज्जैन) (राजधानी)

          दक्षिण अवंती – महिष्मती (राजधानी) (मांधाता, जिल्हा खांडवा)  

    अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.

    इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात मगध साम्राज्यात विलीन झाले.



    मत्स्य
    (बैराट, जयपूर)

    राजधानी
    विराटनगर

    विराट नगर ही राजधानी आजच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती.

    पुढे जाऊन मगध मध्ये विलीन झाले.

    बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत.



    अश्मक/अस्सक
    (महाराष्ट्र-औरंगाबाद)

    राजधानी
    पोटली/पोतन/पोदन/पौडण्य

    विस्तार – गोदावरी व त्याच्या आसपासचा प्रदेश

    एकमेव दक्षिणेकडील महाजनपद.

    बाकीची १५ महाजनपदे ही उत्तर भारतात होती. ‘सूत्तनिपात’ या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानुसार दक्षिणापथ हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.

    ‘महागोविंद सूत्तांत’ या बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा ‘ब्रह्मदत्त’ नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव ‘पोतन’ होते, असा उल्लेख आहे. हे पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील ‘नांदुरा’ होय असे मानले जाते.



    शूरसेन
    (मथुरा)

    राजधानी
    मथुरा

    हे शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. 

    ग्रीक इतिहासकारांकडून त्याचा उल्लेख ‘शूरसेनॉय’ व मथुरेचा ‘मेथोरा’ असा केलेला आढळतो. 

    पुढे जाऊन मोर्य साम्राज्यात विलीन झाले.



    पांचाल
    (रोहिलखंड)

    राजधानी
    उ.पांचाल- अहिच्छत्र,
    द.पांचाल- कांपिल्य

    पांचाल राज्याचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते. भागीरथी नदी त्या दोहोंना विभागणारी नैसर्गिक सीमा रेषा होती.



    चेदी
    (कानपुर)

    राजधानी
    शुक्तिमती/सोथ्थिवती

    विस्तार – आत्ताचे बुंदेलखंड आणि आसपासचा प्रदेश.



    मल्ल/मालव
    (गोरखपुर)

    राजधानी
    कुशीनार/कुशीनगर

    गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.

    मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर महत्वात्ची नागरे होती.

    पुढे जाऊन मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात विलीन झाले.



    कोसल
    (लखनौ)

    राजधानी
    श्रावस्ती

    प्रमुख शासक – प्रसेनजित (पसेनदी) हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता.

    भारतातील उत्तर प्रदेश ते नेपाळ मधील लुंबिनी पर्यंत विस्तार.

    अजातशत्रु ने कोसल राज्य मगध राज्यात विलीन केले.



    कंबोज
    (गांधारजवळ)

    राजधानी
    राजपूर (राजौरी)

    उत्तम घोडे आणि घोडयावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांसाठी येथील योद्धे प्रसिद्ध.

    ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले अॅस्पासिओय(अश्वायन) हे कंबोज महाजनपदाचा भाग होत.

    सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्यांचा उल्लेख ‘अराज’ म्हणजे राजा नसलेले, म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा केलेला आहे.



    काशी
    (बनारस)

    राजधानी
    वाराणसी

    सोळा महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळातले अधिक बलशाली महाजनपद.

    या महाजनपदाचे राजे अधिक महत्वाकांशी होते. त्यातील अनेकांना सर्व राजांमधील प्रमुख राजा (‘सब्बराजुनाम अग्गराजा‘) बनण्याची इच्छा होती असा उल्लेख जातककथांमध्ये आढळतो.

    मगधचा राजा अजातशत्रु याने काशी राज्य मगधमध्ये विलीन केले.



    source - ११ वी इतिहास महाराष्ट्र राज्य