सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग 2
प्रश्न १. अयोग्य पर्याय निवडा.
अ) हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
ब) नील क्रांती - मत्स्य उत्पादन
क) करडी क्रांती - पेट्रोलियम उत्पादने
ड) गोल क्रांती - बटाटे
प्रश्न 2 . आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणास म्हणतात ?
अ) ह. ना. आपटे
ब) केशवसुत
क) गो. ब. देवल
ड) भालचंद्र नेमाडे
प्रश्न 3 . काँग्रेसमधील कोणत्या गटावर 'संधिसाधू', ब्रिटीश धार्जिणे', 'राजकीय भिकारी' अशी टीका केली जात असे?
अ) जहाल
ब) मवाळ
क) स्वराज्य पक्ष
ड) बंगाली
प्रश्न 4. १८५७ च्याउठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला?
अ) ओट्रम
ब) हॅवलॉक
क) हेनरी लॉरेन्स
ड) कँपबेल
प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ?
अ) नागालँड
ब) अरुणाचलप्रदेश
क) लक्षद्वीप
ड) मिझोराम
प्रश्न 6. ‘अभोर’ व ‘अप्तानी’ या जमाती भारतातल्या कोणत्या राज्यात आढळतात?
अ) सिक्कीम
ब) मेघालय
क) झारखंड
ड) नागालँड
प्रश्न 7. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो ?
अ) लक्ष्मी
ब) पार्वती
क) सरस्वती
ड) दुर्गा
प्रश्न 8. भारतातील उपराष्ट्रपती पद हे कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे ?
अ) अमेरिका
ब) कॅनडा
क) जपान
ड) जर्मनी
प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते ?
अ) कलम 352
ब) कलम 356
क) कलम 360
ड) कलम 368
प्रश्न 10. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते ?
अ) कर्नाटक
ब) आंध्रप्रदेश
क) उत्तरप्रदेश
ड) झारखंड
प्रश्न 11. जम्मू व काश्मीर मधील ‘सालाल जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर आहे ?
अ) रावी
ब) बियास
क) चिनाब
ड) व्यास
प्रश्न 12. ________ राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
अ) महाराष्ट्र
ब) केरळ
क) कर्नाटक
ड) तामिळनाडू
प्रश्न 13. 1789 मध्ये सुरु झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
अ) बॉम्बे गॅझेट
ब) बॉम्बे कुरियर
क) दर्पण
ड) बॉम्बे हेरॉल्ड
प्रश्न 14. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली ?
अ) टिळक आणि आगरकर
ब) टिळक आणि चिपळूणकर
क) चिपळूणकर आणि आगरकर
ड) वरीलपैकी कोणीही नाही
प्रश्न 15. सध्यस्थितीत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या _____ किती आहे.
अ) 34
ब) 35
क) 36
ड) 32