Monday, October 30, 2023

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC Geography MCQ In Marathi || mpsc pyq

 

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8
MPSC Geography MCQ In Marathi

mpsc previous year questions || mpsc pyq || mpsc maharashtracha bhugol || mpsc bhartacha bhugol || geography questions in marathi



प्रश्न 1. खालील कोणती तापीची उपनदी नाही ? (ASO 2016)

अ) पूर्णा

ब) पांझरा

क) दुधना

ड) गिरणा

  • क) दुधना




  • प्रश्न 2. खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ?

    अ) पंचगंगा

    ब) वेदगंगा

    क) कृष्णा

    ड) प्राणहिता

  • अ) पंचगंगा




  • प्रश्न 3. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात ?

    अ) इंदिरा गोदी

    ब) ससून गोदी

    क) माझगाव गोदी

    ड) प्रिन्सेस गोदी

  • क) माझगाव गोदी




  • प्रश्न 4.  खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही ? (PSI 2011)

    अ) नागपूर

    ब) भिवंडी

    क) पुणे

    ड) बुलढाणा

  • ड) बुलढाणा




  • प्रश्न 5. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? (ASO 2012)

    अ) मुंबई उपनगर

    ब) कोल्हापूर

    क) अमरावती

    ड) छत्रपती संभाजीनगर

  • अ) मुंबई उपनगर




  • प्रश्न 6. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात ? (PSI 2013)

    अ) बागर

    ब) घग्गर

    क) बांगर

    ड) खादर

  • अ) बागर





  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे ? (STI 2012)

    अ) कोकण किनारा 

    ब) मलबार किनारा

    क) कोरोमंडल किनारा

    ड) दक्षिण किनारा

  • क) कोरोमंडल किनारा




  • प्रश्न 8. महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______ किमी आहे. (ASO 2011)

    अ) 600 किमी

    ब) 700 किमी

    क) 720 किमी

    ड) 800 किमी

  • ड) 800 किमी




  • प्रश्न 9. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम कोणता. योग्य पर्याय निवडा.

    1)पुणे      2)छत्रपती संभाजीनगर 3)नाशिक 4)नागपूर      5)अमरावती       6)कोकण 

    अ) 2, 3, 4, 1, 5 आणि 6

    ब) 6, 2, 3, 4, 1 आणि 5

    क) 2, 3, 1, 4, 5 आणि 6

    ड) 2, 3, 5, 4, 6 आणि 1

  • क) 2, 3, 1, 4, 5 आणि 6




  • प्रश्न 10. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान _______ खिंड आहे. (combine B 2017)

    अ) थळघाट

    ब) फोंडाघाट

    क) पालघाट

    ड) कुंभार्लीघाट

  • क) पालघाट




  • प्रश्न 11. काजळी नदीवर ________ ची खाडी आहे. 

    अ) भाट्ये

    ब) तेरेखोल

    क) जैतापूर

    ड) वसई

  • अ) भाट्ये




  • प्रश्न 12. भारतातील सर्वात प्राचीन लेणी ‘पितळखोरे लेणी’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    अ) बुलढाणा

    ब) नाशिक

    क) ठाणे

    ड) छत्रपती संभाजीनगर

  • ड) छत्रपती संभाजीनगर







  • पुढे >>>>>>                    <<<<<< मागे
     
     
     


    Wednesday, October 25, 2023

    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC History MCQ In Marathi

    mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi ||

    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 8
    MPSC History MCQ In Marathi





    प्रश्न १. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ______ आणि ________ यांच्या प्रयत्नांनी झाली. (combine c 2018)

    अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार

    ब) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी

    क) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे

    ड) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी

  • अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार




  • प्रश्न 2. ‘डेक्कन रयत समाज’ ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ? (STI 2015)

    a)आण्णासाहेब लठ्ठे      b)वालचंद कोठारी     c)मुकुंदराव पाटील     d)दिनकरराव जवळकर

    अ) a, b आणि c फक्त

    ब) b, b आणि d फक्त

    क) a, c आणि d फक्त

    ड) a आणि d फक्त

  • अ) a, b आणि c फक्त





  • प्रश्न 3. कुलकर्णी लीलामृत हे काव्य कोणी लिहिले ?

    अ) रामचंद्र बंडेकर

    ब) विठ्ठल रामजी शिंदे

    क) मुकुंदराव पाटील

    ड) कविवर्य नारायण टिळक

  • क) मुकुंदराव पाटील




  • प्रश्न 4.  महात्मा गांधींनी ‘अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन’ची स्थापना कधी केली ?

    अ) 1936

    ब) 1928

    क) 1920

    ड) 1918

  • ड) 1918




  • प्रश्न 5भिल्लांचा उठाव _______ येथे झाला. (ASI 2011)

    अ) पुणे

    ब) खान्देश

    क) मुंबई

    ड) कोकण

  • ब) खान्देश




  • प्रश्न 6वासुदेव बळवंत फडके सुरुवातीला कोणत्या खात्यात लिपिक म्हणून कार्यरत होते ?

    अ) लष्कर

    ब) रेल्वे

    क) टपाल

    ड) संरक्षण

  • ब) रेल्वे




  • प्रश्न 7वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? (PSI 2016)

    अ) कराड

    ब) दापोली

    क) दौंड

    ड) धामारी

  • ड) धामारी




  • प्रश्न ८. पांडूरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? (combine c 2018)

    अ) कृष्णराव भालेकर

    ब) दिनकरराव जवळकर

    क) तात्यासाहेब करंदीकर

    ड) श्रीपतराव शिंदे

  • क) तात्यासाहेब करंदीकर




  • प्रश्न 9. ‘मी कधीही माफी मागणार नाही’ चरित्र कोणाचे ?

    अ) लक्ष्मण सुखनंदन शर्मा

    ब) गजानन रघुनाथ पाठक

    क) पांडुरंग सदाशिव खानखोजे

    ड) लोकमान्य टिळक

  • क) पांडुरंग सदाशिव खानखोजे




  • प्रश्न 10. 18 जानेवारी 1842 ला महादेव गोविंद रानडे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?

    अ) ठाणे

    ब) नाशिक

    क) नागपूर

    ड) पुणे

  • ब) नाशिक 
  • 18 जानेवारी 1842 निफाड (जि. नाशिक)




  • प्रश्न 11. रंगो बापुजी गुप्ते’ यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले ?

    अ) कृष्णाजी सदाशिव सिंदकर

    ब) रामजी मिसाळ

    क) बाबासाहेब शिर्के

    ड) यापैकी नाही

  • अ) कृष्णाजी सदाशिव सिंदकर




  • प्रश्न 12. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ? (STI 2013)

    अ) ठाणे

    ब) अंदमान

    क) मंडाले

    ड) एडन

  • ड) एडन




  • पुढे >>>>>>>                      <<<<<<< मागे


    mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi ||

    Saturday, October 21, 2023

    भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 11


    भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 11
    MPSC Indian Polity MCQ In Marathi




    प्रश्न 1. धनविधेयक _______ प्रस्तुत केले जाते. (STI 2012)

    अ) दोन्ही सभागृहात

    ब) फक्त लोकसभेत

    क) फक्त राज्यसभेत

    ड) फक्त राष्ट्रपतींकडून

  • ब) फक्त लोकसभेत



  • प्रश्न 2 . खालील विधाने पहा: (ASO 2013)

      1) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.

     2) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते.

    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

    अ) फक्त 1

    ब) फक्त 2

    क) 1 आणि 2

    ड) दोन्हीही नाही

  • अ) फक्त 1



  • प्रश्न 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ? (combine c 2018)

    अ) अनुच्छेद 75

    ब) अनुच्छेद 74

    क) अनुच्छेद 73

    ड) अनुच्छेद 76

  • अ) अनुच्छेद 75



  • प्रश्न 4.  लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती ?

    अ) 1758 चा कायदा

    ब) 1909 चा कायदा

    क) 1919 चा कायदा

    ड) 1935 चा कायदा

  • क) 1919 चा कायदा



  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ? (combine c 2018)

    अ) बिहार

    ब) ओडिशा

    क) तामिळनाडू

    ड) उत्तरप्रदेश

  • ब) ओडिशा



  • प्रश्न 6. _______ अनुच्छेदानुसार संसद आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी राज्यसुचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते.

    अ) अनुच्छेद 368

    ब) अनुच्छेद 124

    क) अनुच्छेद 343

    ड) अनुच्छेद 253

  • ड) अनुच्छेद 253



  • प्रश्न 7. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे _______ होय. (PSI 2011)

    अ) राज्य विधिमंडळ

    ब) कार्यकारी मंडळ

    क) संसद

    ड) न्यायमंडळ

  • क) संसद



  • प्रश्न 8. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते ? (ASO 2011)

    अ) 7

    ब) 15

    क) 16

    ड) 14

  • ड) 14



  • प्रश्न 9. संसद राज्यातील विधान परिषद _______ च्या शिफारशीवरून रद्द करू शकते. (ASO 2016)

    अ) राष्ट्रपती

    ब) राज्यपाल

    क) राज्य मंत्रीमंडळ

    ड) राज्य विधानसभा

  • क) कलम 182



  • प्रश्न 10. राज्यपाल अनुच्छेद ______ अनुसार विधानसभेत अँग्लो - इंडियन जमातीच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतात.

    अ) अनुच्छेद 331

    ब) अनुच्छेद 333

    क) अनुच्छेद 213

    ड) अनुच्छेद 72

  • ब) अनुच्छेद 333



  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? (PSI 2013)

    अ) राष्ट्रपती

    ब) राज्यपाल

    क) मुख्य निवडणूक आयुक्त

    ड) सरवोच न्यायालयाचे न्यायाधीश

  • ब) राज्यपाल



  • प्रश्न 12. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ? (STI 2011)

    अ) मुख्यमंत्री

    ब) राज्यपाल

    क) स्पीकर

    ड) उपमुख्यमंत्री

  • क) स्पीकर



  • पुढे >>>>>>                  <<<<<< मागे




    mpsc polity pyq ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi ||mpsc polity questions in marathi 

    Tuesday, October 10, 2023

    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 7 || MPSC History MCQ In Marathi

    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 7
    MPSC History MCQ In Marathi



    प्रश्न १. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते _______.(STI 2011)

    अ) अ‍ॅनी बेझंट

    ब) लोकमान्य टिळक

    क) बॅरि. खापर्डे

    ड) डॉ. बी. एस. मुंजे

  • ब) लोकमान्य टिळक





  • प्रश्न 2 . ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन’चे संस्थापक कोण होते ? (ASO 2013)

    a)के. टी. तेलंग     b)फिरोजशहा मेहता     c)बद्रुद्दीन तय्यबजी     d)म. गो. रानडे

    अ) a, b, d

    ब) b, c, d

    क) a, b, c

    ड) c, d, a

  • क) a, b, c




  • प्रश्न 3. इ. स. 1875 मध्ये _______ यांनी इंडियन लीगची स्थापना केली.

    अ) आनंद मोहन बोस

    ब) शिशिर कुमार घोष

    क) मनमोहन बोस

    ड) व्योमेशचंद्र बॅनर्जी

  • ब) शिशिर कुमार घोष 
  • संस्थापक : शिशिर कुमार घोष, शंभूचंद्र मुखर्जी, जोगेशचंद्र दत्त, कालीमोहन दास. 
  • स्थापना : 25 सप्टेंबर 1875 कलकत्ता.




  • प्रश्न 4.  ‘ज्ञानप्रसारक मंडळी’  ची स्थापना कोणी केली ?

    अ) देवेंद्रनाथ टागोर

    ब) जगन्नाथ शंकरशेठ

    क) दादाभाई नौरोजी

    ड) गोपाळ कृष्ण गोखले

  • क) दादाभाई नौरोजी




  • प्रश्न 5. ________ हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. (PSI 2016)

    अ) के. टी. तेलंग

    ब) एस. एम. परांजपे

    क) विश्वनाथ मंडलिक

    ड) जी. व्ही. जोशी

  • ड) जी. व्ही. जोशी




  • प्रश्न 6. रवींद्रनाथ टागोरांनी ‘नव्या युगाचे अग्रेसर’ कुणाला म्हटले आहे ? (STI 2011)

    अ) स्वामी विवेकानंद

    ब) राजा राममोहन रॉय

    क) स्वामी दयानंद सरस्वती

    ड) महात्मा ज्योतिबा फुले

  • ब) राजा राममोहन रॉय




  • प्रश्न 7. ______ हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. (combine B 2020)

    अ) पटना

    ब) दिल्ली

    क) फिरोजपूर

    ड) अलिगढ

  • अ) पटना




  • प्रश्न ८. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? (combine c 2019)

    अ) डी. पी. तर्खडकर

    ब) व्ही. डी. सावरकर

    क) विनायक

    ड) एच. व्ही. डेरॉझीयो

  • ड) एच. व्ही. डेरॉझीयो




  • प्रश्न 9. भारतातील पहिल्या ‘महिला संपादक’ कोण ?

    अ) रमाबाई रानडे

    ब) ताराबाई शिंदे

    क) तानुबाई बिर्जे

    ड) विजयालक्ष्मी पंडित

  • क) तानुबाई बिर्जे 
  • कृष्णाजी भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 मध्ये सुरु केलेल्या ‘दीनबंधू’ वृत्तपत्राचे संपादक पद 1906 ते 1912.




  • प्रश्न 10. ‘स्त्री शिक्षणाची दिशा’ हा स्त्री शिक्षणावरील लेख ______ या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता ? (combine b 2019)

    अ) केसरी

    ब) दर्पण

    क) धूमकेतू

    ड) राष्ट्रवीर

  • अ) केसरी




  • प्रश्न 11. ________ ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली ? (STI 2016)

    अ) अटल बिहारी वाजपेयी

    ब) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

    क) डॉ. जगजीवन राम

    ड) डॉ. नीलम संजीव रेड्डी

  • ब) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी




  • प्रश्न 12. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण दि. 6 जाने 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी ______ येथे सुरु केले ?

    अ) मद्रास

    ब) नागपूर

    क) मुंबई

    ड) पुणे

  • क) मुंबई








  • पुढे >>>>>>>                 <<<<<<< मागे


    mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc 

    Friday, October 06, 2023

    भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 10 || MPSC Indian Polity MCQ In Marathi

    Indian Polity MCQ Quiz in मराठी || mpsc polity pyq || polity previous year questions || mpsc polity questions in marathi

    भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 10
    MPSC Indian Polity MCQ In Marathi


    प्रश्न १. कलम ______ अनुसार सदसदविवेकबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे ?

    अ) कलम 26

    ब) कलम 25

    क) कलम 21

    ड) कलम 356

  • ब) कलम 25




  • प्रश्न २. योग्य पर्याय निवडा

      1) परिशिष्ट 11 - नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत

      2) परिशिष्ट 12 - पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत.

    अ) फक्त 1 योग्य, 2 अयोग्य

    ब) फक्त 2 योग्य, 1 अयोग्य

    क) दोन्ही योग्य

    ड) दोन्ही अयोग्य

  • ड) दोन्ही अयोग्य




  • प्रश्न ३. खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती 1966 मध्ये 17 वे राज्य दर्जा म्हणून करण्यात आली ?

    अ) गोवा

    ब) झारखंड

    क) हरियाणा

    ड) महाराष्ट्र

  • क) हरियाणा




  • प्रश्न ४.  कायद्यापुढे समानताही संकल्पना ______ च्या राज्यघटनेतून घेतली आहे .

    अ) ब्रिटीश

    ब) अमेरिका

    क) जर्मनी

    ड) जपान

  • अ) ब्रिटीश




  • प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश 71 वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये आठव्या परिशिष्टात करण्यात आला ?

    अ) कोकणी     ब) मणिपुरी    क) नेपाळी


    अ) फक्त अ आणि ब

    ब) फक्त ब आणि क

    क) फक्त क

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व




  • प्रश्न ६. खालीलपैकी कोणती एक घटनात्मक संस्था नाही ?

    अ) निवडणूक आयोग

    ब) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग

    क) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग

    ड) राज्य लोकसेवा आयोग

  • क) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग




  • प्रश्न ७. ____________ विभागीय परिषदेत महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो.

    अ) पूर्व विभागीय परिषद

    ब) पश्चिम विभागीय परिषद

    क) मध्य विभागीय परिषद

    ड) उत्तर विभागीय परिषद

  • ब) पश्चिम विभागीय परिषद




  • प्रश्न ८. भाग 8 मधील कलम _______ ते कलम ______ हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.

    अ) कलम 239 ते कलम 242

    ब) कलम 239 ते कलम 245

    क) कलम 243 ते कलम 243 ओ

    ड) कलम 324 ते कलम 329 ए

  • अ) कलम 239 ते कलम 242




  • प्रश्न 9. विधान परिषदेच्या ‘अध्यक्ष व उपाध्यक्ष’ यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार करण्यात येते ?

    अ) कलम 178

    ब) कलम 93

    क) कलम 182

    ड) कलम 89

  • क) कलम 182




  • प्रश्न 10. उपराष्ट्रपती पद हे देशातील कितव्या क्रमांकाचे पद आहे ?

    अ) पहिल्या

    ब) दुसऱ्या

    क) तिसऱ्या

    ड) चौथ्या

  • ब) दुसऱ्या



  • प्रश्न 11. कोणते कलम राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे ?

    अ) कलम 56

    ब) कलम 67

    क) कलम 52

    ड) कलम 63

  • अ) कलम 56




  • प्रश्न 12. भारतात पंचायत निवडणुका लढवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?

    अ) 21 वर्षे

    ब) 18 वर्षे

    क) 25 वर्षे

    ड) 23 वर्षे

  • अ) 21 वर्षे




  • प्रश्न 13. उच्च न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक कोण करतो ?

    अ) राष्ट्रपती

    ब) राज्यपाल

    क) उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश

    ड) राज्याचे मुख्यमंत्री

  • क) उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश




  • प्रश्न 14. राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतो ?

    अ) राष्ट्रपती

    ब) पंतप्रधान

    क) राज्यपाल

    ड) मुख्यमंत्री

  • क) राज्यपाल




  • प्रश्न 15. राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष व सदस्य यांना कमी करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

    अ) राज्यपाल

    ब) संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष

    क) राष्ट्रपती

    ड) सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश

  • क) राष्ट्रपती



  • पुढे >>>>>>>                      <<<<<<< मागे