Friday, December 08, 2023

SET NET Marathi Paper 2 || भाग 14

 

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 14
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq



प्रश्न 1. ‘कंपॅरेटीव्ह लिटरेचर : थिअरी अँड प्रॅक्टिस’ या ग्रंथाचे संपादन कोणी केले ? (SET 2021)

अ) स्वपन मजुमदार आणि अमिय देव

ब) वसंत बापट आणि चंद्रकांत बांदिवडेकर

क) भालचंद्र नेमाडे आणि शिशिरकुमार दास

ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास

  • ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास





प्रश्न 2. "भटो : तुम्ही निरंतर काइसयाचें मनन करीत असा :" असा प्रश्न नागदेवाचार्यांना कोणी विचारला ? (NET Nov 2017)

अ) महदाइसा

ब) म्हाइंभट

क) लक्ष्मींद्रभट

ड) केशिराजव्यास

  • ब) म्हाइंभट





प्रश्न 3. अंबरहुसेनी ही कोणत्या ग्रंथावरील टीका होय ? (NET Nov 2017)

अ) अमृतानुभव

ब) चतु:श्लोकी भागवत

क) गीता

ड) आर्याभारत

  • क) गीता





प्रश्न 4. 'ऐतिह्य प्रतिभेचा कवी' म्हणून मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला ? (NET Nov 2017)

अ) कृष्णशास्त्री चिपळूणकर

ब) वि. ल. भावे

क) वि. का. राजवाडे

ड) बा. अ. भिडे

  • क) वि. का. राजवाडे





प्रश्न 5. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कोणत्या नाटकाच्या पुस्तकात इंग्रजी आशावादी कवी रॉबर्ट ब्राऊनिंग यांचा संदर्भ घेतला ? (NET Nov 2017)

अ) तुझे आहे तुजपाशी

ब) सुंदर मी होणार

क) तीन पैशांचा तमाशा

ड) ती फुलराणी

  • ब) सुंदर मी होणार




प्रश्न 6. पुढीलपैकी कोणत्या भाषांतरित नाटकावर मराठी लोककलांचा प्रभाव दिसून येतो ? (SET 2021)

अ) अजब न्याय वर्तुळाचा - चि. त्र्यं. खानोलकर

ब) झुंझारराव - गो. ब. देवल

क) विकारविलसित - गो. ग. आगरकर

ड) ती फुलराणी - पु. ल. देशपांडे

  • अ) अजब न्याय वर्तुळाचा - चि. त्र्यं. खानोलकर





प्रश्न 7. लोककथेच्या अभ्यासातील संप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गाता कोण ? (SET 2021)

अ) अँड्र्यू लँग

ब) एडवर्ड टायलर

क) थिओडोर बेनफे

ड) जेम्स फ्रेझर

  • क) थिओडोर बेनफे





प्रश्न 8. ‘यमुना पर्यटन’ ही पहिली भारतीय कादंबरी असली तरी ‘पहिली मराठी प्रगल्भ कादंबरी’ असे कोणत्या कादंबरीस म्हणता येईल ? (SET 2021)

अ) मंजुघोषा

ब) मुक्तामाला

क) पण लक्ष्यात कोण घेतो ?

ड) शिरस्तेदार

  • क) पण लक्ष्यात कोण घेतो ?





प्रश्न 9. ‘नारायणराव पेशवे वध’ हे काव्य कोणाचे ? (net Jan 2017)

अ) गोविंद वासुदेव कानिटकर

ब) मोरो गणेश लेंढे

क) पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी

ड) गंगाधर रामचंद्र मोगरे

  • अ) गोविंद वासुदेव कानिटकर





प्रश्न 10. ‘मॉरफोलॉजी ऑफ द फोकटेल’ हा ग्रंथ कोणाचा ? (SET 2021)

अ) फँज बोआस

ब) व्लादिमिर प्रॉप

क) अँटी  अर्ने

ड) जेकब ग्रीम

  • ब) व्लादिमिर प्रॉप





प्रश्न 11. बोलीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वांशिक अर्थमीमांसा करावी लागते तसेच सामाजिक परिमाणांच्या ऐवजी भौगोलिक सीमारेषा निश्चित कराव्या लागतात. (NET Nov 2017)

अ) संपूर्ण विधान चूक

ब) संपूर्ण विधान बरोबर

क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

ड) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

  • क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर





प्रश्न 12. प्लेटोने कोणत्या ग्रंथात कवी व काव्य विषयक भूमिका मांडली आहे ? (NET Nov 2017)

अ) सिंपोझियम

ब) रिपब्लिक

क) फेड्रस

ड) पॉलाजी

  • ब) रिपब्लिक





प्रश्न 13. ‘राजाराम विठ्ठल सौंदणीकर’ हा कोणत्या कादंबरीचा नायक आहे ? (SET 2021)

अ) गावगुंड

ब) बनगरवाडी

क) टारफुला

ड) आई आहे शेतात

  • ब) बनगरवाडी





प्रश्न 14. ‘रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजे काव्य’ - ही व्याख्या कोणाची ? (NET Nov 2017)

अ) भामह

ब) दण्डी

क) कुंतक

ड) जगन्नाथ

  • ड) जगन्नाथ





प्रश्न 15. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाने मार्क्सवादी समीक्षा विचार महाराष्ट्राला प्रथम परिचय करून दिला ? (NET Nov 2017)

अ) साहित्य आणि समाजजीवन

ब) महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य

क) नवी मूल्ये

ड) संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती

  • अ) साहित्य आणि समाजजीवन





प्रश्न 16. ल. रा. पांगारकर यांच्या वाद्मयेतिहासात पुढीलपैकी कोणता दृष्टीकोन स्विकारलेला आहे ? (SET 2021)

अ) व्यक्तिकेंद्री

ब) राजवटकेंद्री

क) साहित्यप्रकारकेंद्री

ड) कलाकृतीकेंद्री

  • अ) व्यक्तिकेंद्री








 

 

 

 

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 





ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

Thursday, December 07, 2023

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 13

 

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 13
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq || 



प्रश्न 1. भाषेची द्विस्तरीय रचना, निर्मितीशीलता, यादृच्छिकता, विनियमपद्धती, विशिष्टता, स्थलकालातीतता व सांस्कृतिक संक्रमण ही भाषेची सात लक्षणे कोणी सांगितली ? (NET Nov 2017)

अ) लेनर्ड ब्लूमफिल्ड

ब) चार्ल्स हॉकेट

क) एडवर्ड सपीर 

ड) रॉबर्ट हॉल

  • ब) चार्ल्स हॉकेट





प्रश्न 2. प्रतिनिधी या कादंबरीचे लेखक कोण ? (net Jan 2017)

अ) विश्राम बेडेकर

ब) वसंत वरखेडकर

क) जयवंत दळवी

ड) उद्धव शेळके

  • ब) वसंत वरखेडकर





प्रश्न 3. पुढीलपैकी कोणता अभ्यासक वर्णनात्मक भाषाभ्यासाशी संबंधित नाही ? (Set 2020)

अ) लबव

ब) ब्लूमफिल्ड

क) सोस्यूर

ड) चॉम्स्की

  • अ) लबव





प्रश्न 4. झुंज हे गॉल्सवर्दी यांच्या ‘स्ट्राइफ’चे भाषांतर कोणी केले ? (net Jan 2017)

अ) अरुण नाईक

ब) अनंत काणेकर

क) वि. वा. शिरवाडकर

ड) म. ना. लोही

  • ब) अनंत काणेकर





प्रश्न 5. “नच सुंदरी करू कोपा | मजवरी धरि अनुकंपा ||” हे नाट्यपद कोणत्या पात्राच्या मुखी आहे ? (net Jan 2017)

अ) धैर्यधर

ब) आश्विन शेठ

क) श्रीकृष्ण

ड) नारद

  • क) श्रीकृष्ण





प्रश्न 6. पुणे येथे संपन्न झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष कोण होते ? (SET 2020)

अ) मधु मंगेश कर्णिक

ब) आनंद यादव

क) ग. ल. ठोकळ

ड) प्राचार्य देवदत्त दाभोळकर

  • ड) प्राचार्य देवदत्त दाभोळकर





प्रश्न 7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाविना कुठे पार पडले ? (SET 2020)

अ) वर्धा

ब) प्रवरानगर

क) वाई

ड) महाबळेश्वर

  • ड) महाबळेश्वर





प्रश्न 8. संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ’ कोणी लिहिला आहे ? (SET 2020)

अ) शाहीर आत्माराम पाटील

ब) शाहीर गोपाळराव सुर्वे

क) शाहीर भिका पाटील

ड) शाहीर करीम शेख

  • अ) शाहीर आत्माराम पाटील





प्रश्न 9. पुढीलपैकी अमृता प्रीतम ह्यांच्या कोणत्या कादंबरीचा मराठी अनुवाद हेमा जावडेकर यांनी केला आहे ? (NET Nov 2017)

अ) बंद दरवाजा

ब) ना राधा, ना रुक्मिणी

क) कोरे कागद

ड) तेरावा सूर्य

  • ब) ना राधा, ना रुक्मिणी





प्रश्न 10. लौकिक विषय काव्याच्या क्षेत्रात येताच अलौकिक बनतात ते कशाने ? (NET Nov 2017)

अ) अभ्यास

ब) चिकाटी

क) प्रज्ञा

ड) प्रतिभा

  • ड) प्रतिभा





प्रश्न 11. समधाततेचा सिद्धांत कोणी मांडला ? (NET Nov 2017)

अ) मॅथ्यू अर्नोल्ड

ब) टी. एस. एलियट

क) आय. ए. रिचर्डस्

ड) मार्टिन हायडेगर

  • क) आय. ए. रिचर्डस्





प्रश्न 12. मम्मटाने मानलेल्या साहित्यप्रयोजनात पुढीलपैकी कोणते प्रयोजन आढळत नाही ? (net Jan 2017)

अ) यश

ब) अर्थप्राप्ती

क) आत्माविकार

ड) व्यवहार

  • क) आत्माविकार





प्रश्न 13. भाषेत उपलब्द असणारे शब्द पुरेसे न वाटल्याने नवे शब्द घडविणे वा उपलब्द शब्दांना नवे रूप देणे, अशा भाषिक प्रवृत्तीला काय म्हणतात ? (net Jan 2017)

अ) भाषिक व्यवस्था

ब) संकेतोल्लंघन

क) शब्दक्रमघटीत

ड) संरचनावादी

  • ब) संकेतोल्लंघन





प्रश्न 14. पासंग हा समीक्षा ग्रंथ कोणाचा ? (NET Nov 2017)

अ) द. ग. गोडसे

ब) माधव आचवल

क) कुसुमावती देशपांडे

ड) पु. शि. रेगे

  • क) कुसुमावती देशपांडे





प्रश्न 15. ‘शेक्सपिरीअन सॉनेट’ मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ? (SET 2020)

अ) नऊ आणि पाच

ब) दहा आणि चार

क) बारा आणि दोन

ड) आठ आणि सहा

  • क) बारा आणि दोन





प्रश्न 16. अनुकरणशीलता, पारंपरिकता आणि प्रमाणबद्धता ही साहित्यातील कोणत्या संप्रदायाची वैशिष्ट्ये होत ? (NET Nov 2017)

अ) स्वच्छंदतावाद

ब) अभिजातवाद

क) वास्तववाद 

ड) अस्तित्ववाद

  • ब) अभिजातवाद







पुढे >>>>>>>                     <<<<<<< मागे

 

 

 

 

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 


ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 12

 

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 12
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq



प्रश्न 1. मूकनायक हे नाटक कोणी लिहिले ? (net Jan 2017)

अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

ब) मामा वरेरकर

क) प्रल्हाद केशव अत्रे

ड) मो. ग. रांगणेकर

  • अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर





प्रश्न 2. आद्य लघुकथाकार म्हणून कोण प्रसिद्धीस आले ? (NET Nov 2017)

अ) वामन चोरघडे

ब) आनंद यादव

क) कॅ. गो. गं. लिमये

ड) जी. ए. कुलकर्णी

  • अ) वामन चोरघडे





प्रश्न 3. सुत्रपाठ या ग्रंथाचे विदेशी अभ्यासक कोण ? (net Jan 2017)

अ) गुंथर सोंथायमर

ब) आय. एम. पी. रेसाइड

क) एलिनॉर झेलियट

ड) अ‍ॅन फेल्डहाउस

  • ड) अ‍ॅन फेल्डहाउस





प्रश्न 4. 'हं हं आणि हंहंहं' या बालनाटकाचे लेखक कोण ? (NET Nov 2017)

अ) भालबा केळकर

ब) दिनकर देशपांडे

क) युधिष्ठिर जोशी

ड) विजय तेंडुलकर

  • ब) दिनकर देशपांडे





प्रश्न 5. 'अख्येर अधिकार' या मुळ बंगाली भाषेतील पण मराठीत अनुवादित झालेल्या कादंबरीचे अनुवादक कोण ? (NET Nov 2017)

अ) मृणालिनी केळकर

ब) सरोजिनी कमतनूरकर

क) इंदुमती शेवडे

ड) प्रभा श्रीनिवास

  • ड) प्रभा श्रीनिवास





प्रश्न 6. मराठी भाषेच्या उपपत्तीच्या निमित्ताने 1922त ‘विविधज्ञानविस्तारा’त लिहिलेल्या लेखाच्या आधारे मराठीतील गाजलेला कोणता वाद निर्माण झाला होता ? (net Jan 2017)

अ) राजवाडे - गुणे वाद

ब) वैद्य - गुणे वाद

क) आगरकर - टिळक वाद

ड) केतकर - प्रियोळकर वाद

  • ब) वैद्य - गुणे वाद





प्रश्न 7. साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहारभाषेपेक्षा मुख्यत्वे कोणते वेगळेपण असते ? (SET 2020)

अ) शब्दसंग्रहाचा वापर

ब) व्याकरणिक रचना

क) ध्वनींची योजना

ड) अर्थांची प्रसरणशीलता

  • ड) अर्थांची प्रसरणशीलता





प्रश्न 8. “दावलमलका पूजिती गदा | वर्षा फकीर होती एकदा |”

          - हे चरण कोणाच्या काव्यातील आहे ? (net Jan 2017)


अ) समर्थ रामदासांनी ‘शिवाजी महाराजांना पाठविलेल्या पत्रातील’

ब) संत एकनाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील

क) शेख महंमदाच्या ‘योगसंग्रामा’तील

ड) शहामुनीच्या ‘सिद्धांतबोधा’तील

  • ब) संत एकनाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील





प्रश्न 9. विशेष्याच्या नंतर येणाऱ्या विशेषणास काय म्हणतात ? (SET 2020)

अ) गुणविशेषण

ब) सिद्धविशेषण

क) अधिविशेषण

ड) विधीविशेषण

  • ड) विधीविशेषण





प्रश्न 10. समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिल्यांदा सिद्धांतन कोणी केले ? (net Jan 2017)

अ) कार्ल मार्क्स

ब) प्लेटो

क) व्हीको

ड) हिपोलीन तेन

  • ड) हिपोलीन तेन





प्रश्न 11. कला किंवा सौंदर्य ही स्वभावतःच एक वादग्रस्त संकल्पना आहे. ही भुमिका कोणाची ? (net Jan 2017)

अ) होरेस

ब) कांट

क) हेगेल

ड) गॅली

  • ड) गॅली





प्रश्न 12. शत जन्म शोधताना” या नाट्यपदाचा कर्ता कोण ? (NET Nov 2017)

अ) शंकर बाळाजी शास्त्री

ब) विनायक दामोदर सावरकर

क) गोविंद बल्लाळ देवल

ड) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

  • अ) शंकर बाळाजी शास्त्री





प्रश्न 13. समीक्षक व त्यांचे समीक्षा ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा. (net Jan 2017)

i) परंपरा आणि नवता        1) के. रं. शिरवाडकर

ii) शक्तिसौष्ठव                 2) गो. म. कुलकर्णी

iii) साद - पडसाद             3) गो. वि. करंदीकर

vi) किमया                       4) द. ग. गोडसे

                                      5) माधव आचवल


अ) i – 4,  ii – 2,  iii – 5,  vi - 1

ब) i – 3,  ii – 4,  iii – 2,  vi - 5

क) i – 1,  ii – 3,  iii – 4,  vi - 2

ड) i – 4,  ii – 5,  iii – 2,  vi - 1  

  • ब) i – 3, ii – 4, iii – 2, vi - 5





प्रश्न 14. संस्कृत भाषेतील ‘सिंहासनबत्तिशी’ मराठीत कोणी अनुवादित केली ? (NET Nov 2017)

अ) श्रीपाद जोशी

ब) का. अ. जोशी

क) स. आ. जोगळेकर

ड) गं. ना. जोगळेकर

  • क) स. आ. जोगळेकर





प्रश्न 15. मर्ढेकर हे मराठीतील महत्त्वाचे कलावादी समीक्षक असले, तरी ललित लेखक म्हणून मर्ढेकर जीवनवादीच ठरतात. (NET Nov 2017)

अ) संपूर्ण विधान बरोबर

ब) संपूर्ण विधान चूक

क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

  • अ) संपूर्ण विधान बरोबर





प्रश्न 16. मराठी वाड्मयीन संस्कृतीत कोणत्या दोन प्रक्रियांची सरमिसळ होत गेली ? (SET 2020)

अ) भाषांतर आणि टीका

ब) टीका आणि भाष्य

क) पाश्चात्यीकरण आणि संस्कृतीकरण

ड) प्रभाव आणि प्रभव

  • क) पाश्चात्यीकरण आणि संस्कृतीकरण







पुढे >>>>>>>                <<<<<<< मागे

 

 

 

 


SET/NET मराठी

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी(Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 





ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

Sunday, December 03, 2023

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11


सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq || net set question papers marathi || set net exam information in marathi 



प्रश्न 1. भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018)

अ) आचार्य अत्रे

ब) माधवराव पटवर्धन

क) का. र. मित्र

ड) पु. भा. भावे

  • ब) माधवराव पटवर्धन




  • प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018)

    अ) ग्रीम

    ब) ग्रिअर्सन

    क) चॉम्स्की

    ड) हॉकेट

  • ब) ग्रीअर्सन




  • प्रश्न 3. भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? (April 2017)

    अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती

    ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती

    क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती

    ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती

  • ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती




  • प्रश्न 4. मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018)

    अ) सिनो - तिबेटीयन

    ब) ऑस्ट्रो - आशियायी

    क) द्राविडी

    ड) इंडो - युरोपियन

  • ड) इंडो - युरोपियन




  • प्रश्न 5. ‘लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया’, हे भाषाविषयक कार्य कोणी केले आहे ? (Aug 2015)

    अ) हॉकेट

    ब) विल्यम जोन्स

    क) ग्रियर्सन

    ड) मेजर कॅन्डी

  • क) ग्रियर्सन


  • प्रश्न 6. ‘संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग’, हे विधान कोणत्या ग्रंथात आहे ? (SET Aug 2015)

    अ) सप्तप्रकरणात्मक चरित्र

    ब) भाऊसाहेबांची बखर

    क) राजव्यवहारकोष

    ड) आज्ञापत्र

  • ड) आज्ञापत्र 
  • आज्ञापत्र ग्रंथ - रामचंद्र पंत अमात्य




  • प्रश्न 7. मराठीतील पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला ? (Aug 2015)

    अ) बाळशास्त्री जांभेकर

    ब) रा. भि. गुंजीकर

    क) का. र. मित्र

    ड) वि. सि. गुर्जर

  • क) का. र. मित्र 
  • मराठीत 1909 साली पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता. प्रकाशक - का. र. मित्र अर्थात काशिनाथ रघुनाथ आजगावकर.




  • प्रश्न 8. महानुभावांनी आपले वाड्मय कोणत्या सांकेतिक लिपीत लिहिले आहे ? (Aug 2015)

    अ) ब्राह्मी लिपी

    ब) खरोष्टी लिपी

    क) सकळ लिपी

    ड) मोडी लिपी

  • क) सकळ लिपी




  • प्रश्न 9. ‘गौडी’ रितीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते ? (May 2016)

    अ) श्लेष

    ब) ओज

    क) प्रसाद

    ड) सौकुमार्य

  • ब) ओज




  • प्रश्न 10. वैद्य - गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्यांच्या विचारास चालना मिळाली ? (May 2016)

    अ) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण

    ब) शिलालेखांचे पौर्वापर्य

    क) ताम्रपटांची सत्यासत्यता

    ड) शंकराचार्यांचा काळ

  • अ) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण



  • प्रश्न 11. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित घटक कोणता ? (May 2016)

    अ) शब्द आणि वाक्य

    ब) भाषण आणि लेखन

    क) मुलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना

    ड) भाषा आणि भाषण

  • क) मुलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना




  • प्रश्न 12. तेलंगणमधील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ? (May 2016)

    अ) सु. बा. कुलकर्णी

    ब) श्री. रं. कुलकर्णी

    क) विजया चिटणीस

    ड) ना. गो. कालेलकर

  • ब) श्री. रं. कुलकर्णी







  • पुढे >>>>>>>                     <<<<<<< मागे

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.