SET/NET Marathi Paper 23
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. रत्नाकर मतकरी यांचे 'आरण्यक' हे नाटक आणि धर्मवीर भारती यांचे 'अंधा युग' हे नाटक यांच्या तुलनेचा आधारतळ कोणता ? (SET 2019)
अ) समान तत्त्वप्रणाली
ब) समान आधारसामग्री
क) समान प्रेरणास्थान
ड) प्रभाव
प्रश्न 2. 'अभंग' या रचना प्रकाराला काही अन्य प्रयोजनासाठी पुढीलपैकी कोणत्या कवीने नवीन रूप दिलेले नाही ? (SET 2019)
अ) बा. सी. मर्ढेकर
ब) विंदा करंदीकर
क) अरुण कोलटकर
ड) मधुकर केचे
प्रश्न 3. 'अपौरुषेय वाङमय' हा ग्रंथ कोणाचा आहे ? (SET 2019)
अ) ना. रा. शेंडे
ब) अंबूबाई गोखले
क) कमलाबाई देशपांडे
ड) सुशिलाबाई नवरे
प्रश्न 4. 'हुंकार वेदनेचे' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ? (SET 2019)
अ) उषा भालेराव
ब) ज्योती लांजेवार
क) उषा अंभोरे
ड) हिरा बनसोड
प्रश्न 5. "ना. सी. फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब ग. ल. ठोकळ यांच्या कथेत दिसते"
- हे विधान कोणाचे ? (SET 2019)
अ) नागनाथ कोत्तापल्ले
ब) इंदुमती शेवडे
क) वासुदेव मुलाटे
ड) भालचंद्र फडके
प्रश्न 6. शेतकरी चळवळीत सक्रिय राहून ग्रामीण साहित्य निर्मिती करणारे लेखक कोण ? (SET 2019)
अ) बी. रघुनाथ
ब) सदानंद देशमुख
क) रा. .रं. बोराडे
ड) भास्कर चंदनशिव
प्रश्न 7. संधी विचारात समास विचारापेक्षा कोणता निराळा घटक प्रस्तुत असतो ? (SET 2020)
अ) अर्थान्वय
ब) शब्दान्वय
क) ध्वनिप्रक्रिया
ड) प्रत्ययलोप
प्रश्न 8. पुढीलपैकी कोणता गट आशयबोधक पदिमांचा आहे ? (SET 2020)
अ) नदी, देवालय, राजवाडा
ब) टेबल, झाड, माणूस
क) अनु, प्रति, बे
ड) ने, ला, चा
प्रश्न 9. 'मॅकबेथ' या शेक्सपिअरच्या नाटकांचा मराठीत अनुवाद कोणी केला ? (SET 2020)
अ) राम गणेश गडकरी
ब) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
क) गोविंद बल्लाळ देवल
ड) वि. वा. शिरवाडकर
प्रश्न 10. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीवर दिसून येतो ? (SET 2020)
अ) मर्ढेकरांची कविता
ब) वि. वा. शिरवाडकर यांची कादंबरी 'वैष्णव'
क) पु. शि. रेगे यांची कविता
ड) बाबुराव बागुल यांची लघुकादंबरी 'सूड'
प्रश्न 11. लोकसाहित्यविषयक अभ्यासातील 'भारतमूलक' सिद्धान्त कोणी मांडला ? (SET 2020)
अ) जेम्स फॅरेर
ब) ज्युलियस क्रोन
क) ए. बी. टायलर
ड) थिओडोर बेनफे
प्रश्न 12. लोक सांस्कृतिक दृष्टीकोणातून दैवतकथांचा अभ्यास करणारा मराठीतील अभ्यासक कोण ? (SET 2020)
अ) ग. ह. खरे
ब) रा. चिं. ढेरे
क) द. वा. पोतदार
ड) वि. का. राजवाडे
प्रश्न 13. 'दोन क्रांतिवीर' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? (SET 2019)
अ) व्यंकटेश आत्राम
ब) एकनाथ साळवे
क) माधव सरकुंडे
ड) गोविंद गारे
प्रश्न 14. दुसरे आदिवासी साहित्य संमेलन कुठे पार पडले ? (SET 2019)
अ) यवतमाळ
ब) वणी
क) चंद्रपूर
ड) भद्रावती
प्रश्न 15. 'केसाळ काळंभोर पिल्लू', 'शामा' आणि 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या साहित्य कृतीसंबंधी निर्माण झालेल्या वादळामागील समान कारण कोणते ? (SET 2019)
अ) दुर्बोधता
ब) श्लील - अश्लीलते संबंधीची भूमिका
क) वेगवेगळ्या संघटनांचा विरोधी दृष्टिकोन
ड) तत्कालीन शासनाची भूमिका
प्रश्न 16. 'राष्ट्रवादाचे स्वच्छंदतावादी स्वरूप आणि वाङ्मयेतिहासातील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला' हे मत कुणाचे ? (SET 2019)
अ) रॉय पास्कल
ब) एम. एस. प्रावर
क) रेने वेलेक
ड) वसंत बापट
प्रश्न 17. 'मिलटॉनिक सॉनेट' मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ? (SET 2019)
अ) दहा आणि चार
ब) आठ आणि सहा
क) बारा आणि दोन
ड) नऊ आणि पाच
प्रश्न 18. लोककथांचा तौलनिक अभ्यास करून त्याची सूची तयार करणारा फिनलँडचा अभ्यास कोण ? (SET 2019)
अ) जेम्स फॅरेर
ब) सी. एस. बर्न
क) अँटी अर्ने
ड) फँज बोआस
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 SET NET History PYQ 17 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 7 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.