Sunday, March 31, 2024

SET/NET Marathi 29

  

SET/NET Marathi Paper 29

Share करायला विसरू नका.......................

Prvious Year Questions................



प्रश्न 1. भाषिक नियमोल्लंघन हे साहित्याच्या भाषेचे एक वैशिष्ट्य मानले जाते; मात्र त्यामुळे अभिव्यक्तीत अडथळा येण्याऐवजी सूक्ष्मता व वेगळेपणाच येतो. (SET 2019)

अ) संपूर्ण विधान बरोबर

ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 2. ऐतिहासिक भाषाभ्यासपद्धतीचे उद्दिष्ट काय असते (SET 2019)

    अ) भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना

    ब) मानवी भाषेच्या उगमाविषयीचे सिद्धांतन

    क) भाषांच्या इतिहासाच्या आधारे भविष्याबाबतचा अंदाज बांधणे

    ड) भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे

  • अ) भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना






  • प्रश्न 3. विविध प्रादेशिक बोलींमध्ये भौगोलिक अंतरामुळे परस्पर आकलनक्षमता नसली, तरी एक स्थानिक बोली आणि प्रमाणभाषा यांच्यात परस्परांमध्ये आकलनक्षमता असते(SET 2019)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क)पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 4. "ज्यात भारलेले गूढ व्यक्त झाले आहे ते भारूड." अशी भारूडाची व्याख्या कोणी केली (SET 2019)

    अ) ल. रा. पांगारकर

    ब) विनोबा भावे

    क) वि. ल. भावे

    ड) ल. रा. नसिराबादकर

  • ब) विनोबा भावे






  • प्रश्न 5. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवले जाते (SET 2019)

    अ) दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका

    ब) मुक्तशब्द

    क) पंचधारा

    ड) अक्षरवाङमय

  • क) पंचधारा




  • प्रश्न 6.  कोणत्या कीर्तन प्रकारांत आख्यान नसते (SET 2019)

    अ) कोणत्याच कीर्तनात आख्यान नसते

    ब) वारकरी कीर्तन

    क) समर्थ कीर्तन

    ड) नारदीय कीर्तन

  • ब) वारकरी कीर्तन






  • प्रश्न 7. "व्हा, व्हा सावध, उठा बंधुनो, सूर्य उदय झाला । सुधारणेची प्रभा फाकली भारत खंडाला ।।"

    - हि रचना कोणाची आहे (SET 2019)

    अ) हरिभाऊ तोरणे

    ब) भीमराव कर्डक

    क) किसन फागूजी बनसोडे

    ड) गणेश आकाजी गवई

  • अ) हरिभाऊ तोरणे





  • प्रश्न 8. "भारतीय साहित्य एकच आहे. परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते" हे कोणाचे वचन आहे (SET 2019)

    अ) बुद्धदेव भट्टाचार्य

    ब) शिशिरकुमार दास

    क) अमिय देव

    ड) डॉ. राधाकृष्णन

  • ड) डॉ. राधाकृष्णन






  • प्रश्न 9. एकोणिसाव्या शतकात 'भारतीय साहित्य' या संकल्पनेची अर्थव्याप्ती किती होती ? (SET 2021) 

    अ) केवळ तत्वचिंतनात्मक व धार्मिक साहित्य

    ब) भारतातील सर्व भाषांमधील सर्व साहित्य

    क) बहुभाषिक भारतीयांचे साहित्य

    ड) संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांतील साहित्य

  • ड) संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांतील साहित्य






  • प्रश्न 10.  उडिया साहित्यावरील मराठीचा प्रभाव हे पुढीलपैकी कोणत्या प्रभावघटकाचे उदाहरण मानता येईल ? (SET 2021) 

    अ) सामाजिक व राजकीय घटिते

    ब) भाषांतर

    क) आदर्श सर्जनशीलता

    ड) नावीन्याचे आकर्षण

  • अ) सामाजिक व राजकीय घटीते






  • प्रश्न 11. वाड्मयीन आदान - प्रदानाचा सर्वात प्रमुख आविष्कार कोणता ? (SET 2021) 

    अ) वाड्मयचौर्य

    ब) वाङमयीन प्रभाव

    क) भाषांतर

    ड) रूपांतर

  • ड) रूपांतर






  • प्रश्न 12. केशवसुतांच्या काव्यावर पुढीलपैकी कशाचा प्रभाव असल्याचे जाणवते ? (SET 2021) 

    अ) शेक्सपिअरची कविता

    ब) 'गोल्डन ट्रेझरी' या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमँटिक कवी

    क) संत नामदेवांचे अभंग

    ड) कोंकणी लोकगीते

  • ब) 'गोल्डन ट्रेझरी' या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमँटिक कवी






  • प्रश्न 13.  'ऑथेल्लो' ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठीमधील रूपांतर कोणते ? (SET 2021) 

    अ) 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री'

    ब) 'विकारविलसित'

    क) 'झुंझारराव'

    ड) 'राजमुकुट'

  • क) 'झुंझारराव'






  • प्रश्न 14.  'थोर (ग्रेट) सांस्कृतिक परंपरेचे समर्थन मठ मंदिरे यांच्या आश्रयाने होते, तर लहान (लिटल) सांस्कृतिक परंपरेचे भरणपोषण ग्रामीण समुदायात होते' असे कोणी म्हटले आहे ? (SET 2021) 

    अ) सी. जी. युंग

    ब) वॉन फ्रान्स

    क) आर. आर. मेरट 

    ड) रॉबर्ट रेडफिल्ड

  • ड) रॉबर्ट रेडफिल्ड






  • प्रश्न 15. हात नको पायाजवळ 

    खांद्याबरोबर उभी राहा 

    समतेसाठी लढू आपण 

    होऊन गेलो 

    जरी स्वाहा"

    या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ? (SET 2021) 

    अ) शरणकुमार लिंबाळे

    ब) अरुण काळे

    क) भुजंग मेश्राम

    ड) राम  दोतोंडे

  • ड) राम दोतोंडे






  • प्रश्न 16. "दलित आत्मकथने सामाजिक - सांस्कृतिक संघर्षाचे दस्तावेज होत तथापि रूढ मराठी आत्मचरित्राचे आवर्तन भेदण्याचे कार्य दलित आत्मकथनांनी केले आहे." (SET 2019)

    अ) संपूर्ण विधान चूक आहे

    ब) संपूर्ण विधान बरोबर आहे

    क) विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ड) विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

  • ब) संपूर्ण विधान बरोबर आहे






  • प्रश्न 17. "विचारांचं वावडं नसलं तरी माझा पिंड वैचारिक नाही. सृजनशील लेखनाला वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे असं मला कधीच वाटलं नाही" हे विधान कोणाचे ? (SET 2019)

    अ) व्यंकटेश माडगूळकर

    ब) रा. रं. बोराडे

    क) उद्धव शेळके

    ड) प्रतिभा इंगोले

  • ब) रा. रं. बोराडे






  • प्रश्न 18. पुढीलपैकी कोणी 'संतकवी - काव्य - सूची' सिद्ध केली ? (SET 2021)

    अ) ज. र. आजगावकर

    ब) ल. रा. पांगारकर

    क) गो. का. चांदोरकर

    ड) ल. रा. नसिराबादकर

  • क) गो. का. चांदोरकर (गोविंद काशिनाथ चांदोरकर)






  • प्रश्न 19. मराठीतून रशियाची माहिती पुरवणारे 'रशियाचे संक्षिप्त दर्शन' हे पुस्तक कोणी लिहिले ? (SET 2021)

    अ) अनंत काणेकर

    ब) श्री. अ. डांगे

    क) लालजी पेंडसे

    ड) न. र. फाटक

  • ड) न. र. फाटक (नरहर रघुनाथ फाटक)






  • प्रश्न 20. पुढीलपैकी कोणती कादंबरी चिं. त्र्यं. खानोलकर यांची नाही ? (SET 2021)

    अ) स्वगत

    ब) अज्ञात कबुतरे

    क) त्रिशंकू

    ड) भागधेय

  • अ) स्वगत







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे


     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 


    SET/NET मराठी


    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result |

    Wednesday, March 27, 2024

    SET/NET Marathi 28

      

    SET/NET Marathi Paper 28

    Share करायला विसरू नका.......................

    Prvious Year Questions................



    प्रश्न 1. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' हि रचना पुढीलपैकी कोणत्या वृत्तात आहे (SET 2020)

    अ) शार्दूलविक्रीडित

    ब) भुजंगप्रयात

    क) आर्या

    ड) अनुष्टुभ

  • ब) भुजंगप्रयात







  • प्रश्न 2. एखादी बोली प्रमाणभाषा म्हणून मान्यता पावण्यास ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती कारणीभूत असते; एरवी भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अन्य बोलींपेक्षा ती वेगळी नसते (SET 2020)

    अ) संपूर्ण विधान बरोबर 

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 3. जगातल्या महत्वाच्या ग्रंथालयांपैकी एक असणारे आणि मराठी भाषेतील विपुल ग्रंथांनी सजलेले 'सरस्वती महाल' ह्या नावाचे ग्रंथालय कोठे आहे (SET 2020)

    अ) कलकत्ता

    ब) मुंबई

    क) तंजावर

    ड) नवी दिल्ली

  • क) तंजावर






  • प्रश्न 4. गो. ब. देवल यांच्या 'शारदा' नाटकाच्या शेवटी शंकराचार्याच्या आगमनाचा आणि निवाडा करण्याचा प्रसंग घालण्यातून लेखकाचा कोणता हेतू दिसतो (SET 2020)

    अ) ती नाटकाची गरज होती

    ब) नाट्यसंकेताचा अनुसरणाचा हेतू

    क) प्रेक्षकानुन याचा हेतू 

    ड) तत्कालीन सांस्कृतिक दडपणाचा परिणाम

  • ड) तत्कालीन सांस्कृतिक दडपणाचा परिणाम






  • प्रश्न 5. "सत्यशोधकी जलशांचीच एक विकसित अवस्था आंबेडकरी जलशांच्या रूपाने कार्यान्वित झाली आणि त्यामुळे नवे तरुण आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले." (SET 2020)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) संपूर्ण विधान चूक

    क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

  • अ) संपूर्ण विधान बरोबर





  • प्रश्न 6.  संपूर्ण भारतीय साहित्याच्या इतिहासात प्रथमपुरुषी निवेदनपद्धती पहिल्यांदा मोरोपंतांनी तीन रामायणांमध्ये समर्पक रीतीने वापरली, ती तीन रामायणे कोणती (SET 2020)

    अ) 'सीता रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'

    ब) 'सीता रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'मंत्र रामायण'

    क) 'दाम रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'

    ड) 'सीता रामायण', 'निरोष्ठ रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'

  • अ) 'सीता रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'






  • प्रश्न 7. नॅशनल बुक ट्रस्टने भारतीय भाषांमधील साहित्य कृतींची भाषांतरे प्रकाशित करण्याच्या उपक्रमास काय नाव दिले आहे  (SET 2020)

    अ) भाषांतरमाला

    ब) आदानप्रदान

    क) रुपांतरमाला

    ड) आंतरभारती

  • ब) आदानप्रदान





  • प्रश्न 8. तौलनिक साहित्य या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक कोणते (SET 2020)

    अ) वसंत बापट : 'तौलनिक साहित्याभ्यास'

    ब) चंद्रशेखर जहागीरदार : 'तौलनिक साहित्याभ्यास तत्वे आणि दिशा'

    क) आनंद पाटील : 'मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव'

    ड) आनंद पाटील : 'तौलनिक साहित्य : नवे सिद्धांत आणि उपयोजन'

  • अ) वसंत बापट : 'तौलनिक साहित्याभ्यास'






  • प्रश्न 9. वागींद्रियाद्वारे निर्माण झालेले व भाषेत वापरलेले ध्वनी म्हणजे काय ? (SET 2018) 

    अ) पद

    ब) रुपिका

    क) स्वन

    ड) रुपिम

  • क) स्वन






  • प्रश्न 10. भाषिक संज्ञापन प्रक्रियेतील पुढील घटकांचा योग्य क्रम लावा :             (SET 2018) 

    1. संकेतीकरण         2. आशय          3. ध्वनिग्रहण         4. ध्वनिनिर्मिती          5. विसंकेतीकरण


    अ) 2, 1, 4, 3, 5

    ब) 1, 2, 3, 4, 5

    क) 2, 4, 1, 3, 5

    ड) 1, 3, 5, 4, 2

  • अ) 2, 1, 3, 4, 5






  • प्रश्न 11. पुढीलपैकी कोणती मराठीची बोली नाही ? (SET 2018) 

    अ) अहिराणी

    ब) वऱ्हाडी

    क) माळवी

    ड) हळबी

  • क) माळवी






  • प्रश्न 12. 'मानवी वागिंद्रियाद्वारे स्वनांची निर्मिती कशी होते' याचा विचार पुढीलपैकी कोणत्या अभ्यासशाखेत होतो ? (SET 2018) 

    अ) श्रव्य स्वनविज्ञान

    ब) औच्चरिक  स्वनविज्ञान

    क) व्याकरण

    ड) सांचारिक स्वनविज्ञान

  • ब) औच्चरिक स्वनविज्ञान






  • प्रश्न 13. 'पोटासाठी जरी करी हरिकथा । जन रंजविता फिरतसे ।। तेणे घात केला एकोत्तरशतकुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ।।' 

    हि रचना पुढीलपैकी कोणत्या संताची आहे ? (SET 2018)

    अ) संत तुकाराम

    ब) संत नामदेव

    क) संत चोखामेळा

    ड) संत कर्ममेळा

  • ब) संत नामदेव






  • प्रश्न 14. 'महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण' हा ग्रंथ कोणी लिहिला ? (SET 2018) 

    अ) वि. का. राजवाडे

    ब) व. दि. कुलकर्णी

    क) वि. ल. भावे

    ड) श्रीधर व्यंकटेश केतकर

  • ड) श्रीधर व्यंकटेश केतकर






  • प्रश्न 15. भाऊसाहेब, गोविंदपंत बुंदेले, बळवंतराव मेहंदळे, जनकोजी शिंदे, समशेरबहादूर, इब्राहिमखान, विश्वासराव या सर्वांचा निर्देश असणारा पानपतावरील अतिशय विश्वसनीय पोवाडा कोणत्या शाहिराचा आहे ? (SET 2018) 

    अ) अनंत फंदी

    ब) रामा सटवा 

    क) प्रभाकर

    ड) सगनभाऊ 

  • ब) रामा सटवा 






  • प्रश्न 16. पुढीलपैकी कोणती नाटके अजित दळवी यांनी लिहिली आहेत ? (SET 2020)

    अ) प्रतिबिंब, वासांसि जीर्णानी, क्षितिजापर्यंत समुद्र, आत्मकथा

    ब) मामका : पांडवाश्चैव, अंधारयात्रा, विष्णूगुप्त चाणक्य, रस्ते

    क) पाहुणा, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, स्थळ : स्नेहमंदिर

    ड) मुक्तिधाम, शतखंड, संघर्ष, देहधून

  • ड) मुक्तिधाम, शतखंड, संघर्ष, देहधून






  • प्रश्न 17. 'सानिया' यांचे खरे नाव कोणते आहे ? (SET 2020)

    अ) सुनंदा कुलकर्णी

    ब) आशालता कुलकर्णी

    क) पूजा कुलकर्णी

    ड) स्नेहल कुलकर्णी

  • अ) सुनंदा कुलकर्णी






  • प्रश्न 18. साहित्य प्रकाराविषयीची एकसत्ववादी भूमिका पाश्चात्य साहित्य परंपरेतील कोणत्या वैचारिक संकल्पनेत स्पष्टपणे दिसून येते ? (SET 2018 P3)

    अ) लेखनातील अस्थिरता व परिवर्तनीयता

    ब) लेखनातील विशुद्धता व श्रेणिबद्धता

    क) लेखनविषयक क्षमता

    ड) लेखनातील अनुभवाची जात

  • ब) लेखनातील विशुद्धता व श्रेणिबद्धता






  • प्रश्न 19. साहित्य प्रकारांविषयीच्या एकसत्ववादी भूमिकेचा एक विशेष म्हणजे :    (SET 2018 P3)

    अ) साहित्य प्रकारांची तरतमव्यवस्था (श्रेणिव्यवस्था) असते

    ब) कलासाहित्याच्या क्षेत्रात वर्गीकरण, प्रकारव्यवस्था संभवत नाही

    क) साहित्यकृतीतील निवेदनात जो काळ वापरला जातो, तो त्या त्या प्रकारचे स्वरूप निश्चित करतो

    ड) मानवी जीवनचित्रणातील जन्म - तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व व मरण या चार जीवनव्यवस्था अनुक्रमे वसंतकाल, ग्रीष्मकाल, शरद व हिवाळा या चार ऋतूंच्या मिथ्समधून व्यक्त झालेल्या दिसून येतात

  • अ) साहित्य प्रकारांची तरतमव्यवस्था (श्रेणिव्यवस्था) असते






  • प्रश्न 20. ताराबाई शिंदे यांचा 'स्त्रीपुरुष तुलना' हा ग्रंथ कोणत्या समाजस्तरांमधील स्त्रियांच्या दुर्दशेसंबंधी लिहिलेला आहे ? (SET 2018 P3)

    अ) सर्व समाजस्तरांमधील

    ब) उच्च्वर्णीय

    क) दलित

    ड) गोरगरीब

  • अ) सर्व समाजस्तरांमधील






  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     


    SET NET


    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set/net paper 1 pyq

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    Tuesday, March 26, 2024

    SET/NET Marathi 27

      

    SET/NET Marathi Paper 27

    Share करायला विसरू नका.......................

    Prvious Year Questions................



    प्रश्न 1. ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून तो समास भिन्न अशा नामाचे विशेषण असतो, त्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे ? (SET 2023)

    अ) मध्यमपदलोपी

    ब) बहुब्रीही

    क) द्वंद्व

    ड) तत्पुरुष

  • ब) बहुब्रीही







  • प्रश्न 2. पुढीलपैकी कोणता अलंकार उपमा अलंकारातून रचनाभेदाने उत्पन्न झालेला नाही (SET 2023)

    अ) उत्प्रेक्षा

    ब) रूपक

    क) भ्रांतीमान

    ड) श्लेष

  • ड) श्लेष






  • प्रश्न 3. भाषाविज्ञानाच्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित असते (SET 2023)

    अ) भाषेतील ध्वनी व शब्दांचे

    ब) विविध स्तरांवरील भाषिक संरचनेचे 

    क) भाषेतील शब्दसंग्रहाचे

    ड) भाषिक वर्तनाचे

  • ब) विविध स्तरांवरील भाषिक संरचनेचे






  • प्रश्न 4. 'भवाडा' हा बोहाडा या शब्दाचा अपभ्रंश असून, तो जव्हार वाडा, मोखाडा या आदिवासी बहुल भागात सादर होतो. (SET 2023)

    अ) संपुर्ण विधान बरोबर

    ब) संपूर्ण विधान चूक

    क) पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक

    ड) उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 5. धार्मिक वाङमयाकडे लोकांचा ओढा वाढला आहे, कारण :               (SET 2023)

    अ) सुलभ व अद्ययावत मुद्रणव्यवस्थेमुळे

    ब) अर्थव्यवहार सुलभ झाल्यामुळे

    क) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे

    ड) शिक्षणसंस्थांच्या वाढत्या प्रसारामुळे

  • क) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे





  • प्रश्न 6. कोणतीही चळवळ दीर्घकाळ टिकून राहायची असेल तर आवश्यक असणारा महत्वाचा घटक कोणता (SET 2023)

    अ) आर्थिक स्थैर्य

    ब) वैचारिक भूमिका मांडणारे मुखपत्र

    क) जनतेचा पाठिंबा

    ड) संस्थेचे कार्यालय

  • ब) वैचारिक भूमिका मांडणारे मुखपत्र






  • प्रश्न 7. 'टोवर्डस ए लिटररी हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण (SET 2023)

    अ) नगेंद्र

    ब) शिशिरकुमार दास

    क) सुजित मुखर्जी

    ड) निरंजन रे

  • क) सुजित मुखर्जी





  • प्रश्न 8. "वाङमय प्रकाराभ्यास हा तौलनिक साहित्याचाच विषय आहे. त्याला सर्वसाधारण साहित्याच्या प्रमेयात समाविष्ट करणे म्हणजे शास्त्रच नाकारणे होय." असे मत कोणी मांडले (SET 2023)

    अ) शिशिरकुमार दास 

    ब) स्वपन मजुमदार

    क) अमिय देव

    ड) नगेंद्र

  • क) अमिय देव






  • प्रश्न 9. ग्रिअर्सनच्या भारतीय भाषांच्या सर्वेक्षणाच्या कोणत्या खंडात मराठीच्या बोलींसंबंधी माहिती ग्रथित केली आहे ? (SET 2017) 

    अ) तिसऱ्या

    ब) पाचव्या

    क) सहाव्या

    ड) सातव्या

  • ड) सातव्या






  • प्रश्न 10. संयुक्त क्रियापदे अपभ्रंशात नाहीत, मराठीने ती स्वतंत्रपणे बनवलेली आहेत. (SET 2017)

    अ) हे विधान बरोबर आहे

    ब) हे विधान चूक आहे

    क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ड) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

  • अ) हे विधान बरोबर आहे





  • प्रश्न 11. 'संस्कृत, ग्रीक व लॅटीन या भाषांमध्ये खोलवर रुजलेले व घनिष्ठ साम्य आहे' असे म्हणून त्याचा खुलासा सर विल्यम जोन्स यांनी कोणत्या वर्षी केला ? (SET 2017)

    अ) 1786

    ब) 1876

    क) 1768

    ड) 1678

  • अ) 1786






  • प्रश्न 12. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे. (SET 2017)

    अ) नि:सर्गतच

    ब) निसर्गताच

    क) निसर्गतःच 

    ड) निर्सगत:च 

  • क) निसर्गतःच






  • प्रश्न 13. 'पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी' हि रचना कोणत्या संताची आहे ? (SET 2017)

    अ) संत नामदेव

    ब) संत एकनाथ

    क) संत जनाबाई

    ड) संत तुकाराम







    प्रश्न 14. 'बदलत्या काळाप्रमाणे शास्त्रालाही चालत राहिले पाहिजे' हे मत कोणी मांडले ? (SET 2017)

    अ) लोकहितवादी

    ब) विष्णुशास्त्री पंडित

    क) गोपाळ गणेश आगरकर

    ड) न्यायमूर्ती रानडे

  • अ) लोकहितवादी






  • प्रश्न 15. ह. ना. आपटे  यांच्या कोणत्या कादंबरीत इंग्रजी चालीरीतींचे मध्यमवर्गीयांवर झालेल्या परिणामांचे चित्रण झालेले आहे  ? (SET 2017)

    अ) ' मी '

    ब) ' मधली स्थिती '

    क) ' सूर्योदय '

    ड) ' पण लक्षात कोण घेतो ? '

  • ब) ' मधली स्थिती '






  • प्रश्न 16. पुढील ग्रंथ कालानुक्रमे लिहा :        (SET 2023)

    परमामृत, श्रीसमर्थप्रताप, नित्यानंदैक्यदीपिका, भावार्थरामायन

    अ) श्रीसमर्थप्रताप, परमामृत, नित्यानंदैक्यदीपिका, भावार्थरामायन

    ब) भावार्थरामायन, परमामृत, नित्यानंदैक्यदीपिका, श्रीसमर्थप्रताप

    क) परमामृत, भावार्थरामायन, नित्यानंदैक्यदीपिका, श्रीसमर्थप्रताप

    ड) नित्यानंदैक्यदीपिका, परमामृत, श्रीसमर्थप्रताप, भावार्थरामायन,

  • क) परमामृत, भावार्थरामायन, नित्यानंदैक्यदीपिका, श्रीसमर्थप्रताप






  • प्रश्न 17. नसता कवीचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार ।

    म्हणोनि कवी हे आधार । सकल सृष्टीसी ।। 

    हा कविगौरव कोणी केला ? (SET 2023)

    अ) ज्ञानेश्वर

    ब) नामदेव

    क) तुकाराम

    ड) रामदास

  • ड) रामदास






  • प्रश्न 18. मिलिंद मालशे यांनी पुढीलपैकी कोणते मत मांडले ? (SET 2017 P3)

    अ) प्रत्येक साहित्यिकाचे एक सत्व असून ते सार्वत्रिक व अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते

    ब) एक साहित्यिक करार दुसऱ्या साहित्यिक करारापेक्षा श्रेष्ठ असतो असे मानता येत नाही

    क) निर्मितीप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया यांमध्ये साहित्यप्रकार नसतात

    ड) प्रत्येक संस्कृतीचे उणे - अधिक स्वरूपातील वेगळे साहित्यप्रकार असतात

  • ब) एक साहित्यिक करार दुसऱ्या साहित्यिक करारापेक्षा श्रेष्ठ असतो असे मानता येत नाही






  • प्रश्न 19. आधुनिक काळात पुढीलपैकी कोणते साहित्यप्रकार मराठीत नव्याने निर्माण झाले आहेत ? (SET 2017 P3)

    अ) विषण्ण सुखात्मिका (black comedy) आणि निरर्थवादी नाट्य (absured play)

    ब) रोमँटिक शोकांतिका आणि कादंबरी

    क) सुनित आणि विलापिका

    ड) चरित्र आणि आत्मचरित्र

  • अ) विषण्ण सुखात्मिका (black comedy) आणि निरर्थवादी नाट्य (absured play)






  • प्रश्न 20. पाटउं साउला नसली असे : पाटाउं चोळी : कांकणें : कळाविया : सोनयांची तानवडें : भवंरिया भांगु : टीळ : नाकी मोती : जी : जी : ऐसी देखिली : जी : 

    हे लीळेतील वर्णन कोणाचे आहे ? (SET 2017 P3)

    अ) रुक्मिणी

    ब) म्हाळसा

    क) साधे

    ड) बाईइसा

  • ब) म्हाळसा









  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     


    SET/NET मराठी Notes


    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.