📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer):
या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
प्रश्न 1. ------------------ हा महापाषाणीय प्रकार नाही.(SET 2023)
अ) मेनहीर
ब) डोलमेन
क) टोपी - कुंड
ड) शिळावर्तुळ
क) टोपी - कुंड
प्रश्न 2. प्राचीन स्थळाचा सांस्कृतिक कालक्रम जाणून घेण्यासाठी ----------- उत्खनन पद्धतीचा अवलंब करणे क्रम प्राप्त ठरते.(SET 2023)
अ) चाचणी उत्खनन
ब) उत्सेध उत्खनन
क) चतुर्थक उत्खनन
ड) पुरातत्वीय नमुना - चाचणी
ब) उत्सेध उत्खनन
प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरून तलावासहित अद्वितीय जलव्यवस्थापन पद्धतीचे अवशेष सापडले आहेत ?(SET 2023)
अ) बनावली
ब) धोलावीरा
क) सुरकोटदा
ड) कुंतासी
ब) धोलावीरा
प्रश्न 4. हडप्पाकालीन ताम्र वस्तूंच्या उत्पादनाच्या कार्यशाळेचे अवशेष -------------- या स्थळावरून सापडले आहेत. (SET 2023)
अ) लोथल
ब) कुंतासी
क) सुरकोटदा
ड) मदिना
अ) लोथल
प्रश्न 5. -------------- पूर्वेकडे सिंधू संस्कृतीची सीमा होती.(SET 2023)
अ) बनावली
ब) आलमगीरपूर
क) रोपड
ड) चिरंड
ब) आलमगीरपूर
प्रश्न 6. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सीचा लेखक पुढीलपैकी कोणत्या बंदरास पोदुके म्हणतो?(SET 2023)
अ) अरिकमेडू
ब) पातला
क) बारबारीकाम
ड) सोपारा
अ) अरिकमेडू
प्रश्न 7. मुझरीस हे एक ------------- होय.(SET 2023)
अ) कापड उत्पादनाचे प्राचीन तंत्रज्ञान
ब) प्राचीन तंतुवाद्य
क) प्राचीन बंदर
ड) मिश्र धातूचे प्राचीन नाव
क) प्राचीन बंदर
प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या वैदिक अभ्यासकाने ॠग्वेदाची तारीख १५०० इ.स. पूर्व ते १००० इ. स. पूर्व निश्चित केली ?(SET 2023)
अ) ओल्डेनबर्ग
ब) मॅक्स म्युलर
क) जॅकोबी
ड) विंटर्निट्झ
ब) मॅक्स म्युलर
प्रश्न 9. खालीलपैकी कोणती कालमापन पद्धती निरपेक्ष कालमापन पद्धती नाही ?(SET 2020)
अ) पुराचुंबकीय पद्धती
ब) कार्बन - १४ पद्धती
क) तप्तदीपन पद्धती
ड) स्तरविज्ञान
ड) स्तरविज्ञान
प्रश्न 10. 'पॅलिओबॉटनी -------------- चा अभ्यास आहे.(SET 2020)
अ) प्राचीन स्मारकांचा
ब) प्राचीन वनस्पतीचे अवशेष
क) प्राचीन नाणे
ड) प्राचीन लिखाण
ब) प्राचीन वनस्पतीचे अवशेष
प्रश्न 11. --------------- हे स्थळ महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या महत्वपूर्ण पुरातत्वीय स्थळांपैकी एक स्थळ आहे.(SET 2020)
अ) पाटणे
ब) इनामगाव
क) मोरगाव
ड) नगरधन
ब) इनामगाव
प्रश्न 12. --------------- या हडप्पाकालीन स्थळावर सापडलेल्या अग्निकुंडाचे सामुदायिक कार्यक्रमांशी निगडित विशेष महत्व आहे.(SET 2020)
अ) कुंतासी
ब) कालीबंगन
क) सुरकोटडा
ड) मदिना
ब) कालीबंगन
प्रश्न 13.ॠग्वेद संहितामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यवसायाचा उल्लेख केलेला नाही.(SET 2020)
अ) विणकाम
ब) कुंभार
क) सोनार
ड) लोहार
ड) लोहार
प्रश्न 14. -------------- हे दोन महत्वाचे हडप्पन पीक होते.(SET 2020)
अ) गहू आणि जव
ब) तीळ आणि मोहरी
क) तांदूळ आणि मटर
ड) कापूस आणि ऊस
अ) गहू आणि जव
प्रश्न 15. उत्तरवैदिक काळात ज्या राजाचे साम्राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत विस्तार पावलेले होते त्यास ------------- असे संबोधले जात होते.(SET 2020)
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer):
या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
- यातील अधोरिखित क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?(SET 2023)
अ) शक्य
ब) प्रयोजक
क) सिद्ध
ड) अकर्मक
अ) शक्य
प्रश्न 2. प्रत्येक भाषक समाजाचे भाषाबाह्य सृष्टीचे ज्ञान त्या समाजाच्या भाषेने नियंत्रित केलेले असते, असा विचार कोणी मांडला आहे ?(SET 2023)
अ) मॅलिनोव्हस्की व फर्थ
ब) सपीर आणि व्होर्फ
क) यूल आणि बर्नेल
ड) बॅसिल बर्नस्टाईन
ब) सपीर आणि व्होर्फ
प्रश्न 3. मूळ साहित्यकृतीला न्याय देण्याच्या दृष्टीने भाषांतरकर्त्याकडून मूळ आशयापासून हेतुतः अपसरण घडते, त्याला काय नाव आहे ?(SET 2023)
अ) सांस्कृतिक प्रभाव (Cultural influence)
ब) नवनिर्मिती (Creation)
क) रूपांतर (Adaptation)
ड) मध्यस्थ भाषांतर (Interventionist translation)
ड) मध्यस्थ भाषांतर (Interventionist translation)
प्रश्न 4. 'लिखित साहित्याचा अभ्यास करताना लोकतत्वीय अध्ययनदृष्टीचा अंगीकार केल्यास लिखित साहित्याच्या आकलनाची एक वेगळी दिशा स्पष्ट होऊ शकते' असे मराठीत सर्वप्रथम कोणी सांगितले ?(SET 2023)
अ) गंगाधर मोरजे
ब) शैला लोहिया
क) रा. चिं. ढेरे
ड) प्रभाकर मांडे
क) रा. चिं. ढेरे (रामचंद्र चिंतामण ढेरे)
प्रश्न 5. 'दैवतकथेत ऐतिहासिक सत्य लपलेले असते.' हि भूमिका कोणत्या अभ्यास संप्रदायाची आहे ?(SET 2023)
अ) निसर्गरूपवादी
ब) भ्रांतकल्पनावादी
क) भाषाशात्रीय
ड) संप्रसारणवादी
ब) भ्रांतकल्पनावादी
प्रश्न 6. 'बन्याची दिंडी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?(SET 2023)
अ) शंकरराव खरात
ब) सुखराम हिवराळे
क) केशव मेश्राम
ड) अमिताभ
अ) शंकरराव खरात
प्रश्न 7. 'दस्तखत' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?(SET 2023)
अ) भीमसेन देठे
ब) प्रकाश जाधव
क) बबन चहांदे
ड) मीना गजभिये
ब) प्रकाश जाधव
प्रश्न 8. शेतकरी संघटनेच्या वैचारिकतेशी आणि कृतिशीलतेशी नाते असणारे लेखक कोण आहेत ?(SET 2023)
अ) बाबा पाटील
ब) शंकर पाटील
क) भास्कर चंदनशिव
ड) वासुदेव मुलाटे
क) भास्कर चंदनशिव
प्रश्न 9. भारतात लोकसाहित्याच्या अभ्यासाला केव्हा गती मिळाली ?(SET 2020)
अ) शिवाजी महाराजांच्या काळात
ब) इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर
क) संत साहित्य प्रसूत झाल्यानंतर
ड) भाषाविचारांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर
ब) इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर
प्रश्न 10. 'उद्धव शेळके कथेतून व्यक्तिचित्रे रेखाटताना त्यांच्या बाह्यांगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन घडवतात तथापि त्यांचे हे वैशिष्ट्य कथेला वाङमयीनदृष्ट्या कमकुवत करते."(SET 2020)
अ) पूर्ण विधान बरोबर आहे
ब) पूर्ण विधान चूक आहे
क) विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर
ड) विधानाचा फक्त उत्तरार्ध बरोबर
क) विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर
प्रश्न 11. 'कडुनिंबाची सावली' हा कथासंग्रह कोणाचा आहे ?(SET 2020)
अ) शंकर पाटील
ब) उद्धव शेळके
क) रा. रं. बोराडे
ड) प्रतिमा इंगोले
ब) उद्धव शेळके
प्रश्न 12. घटना आणि घटनाशोधाची सामग्री म्हणजे इतिहास नव्हे, हि जाणीव कोणी करून दिली ?(SET 2020)
अ) इ. एच. कार
ब) तेन
क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
ड) वि. का. राजवाडे
अ) इ. एच. कार
प्रश्न 13. पुढीलपैकी माणिक वर्मा यांचे आत्मकथन कोणते ?(SET 2020)
प्रश्न 15. मराठी - स्त्री लेखकांची सूची (1873 - 1920) कोणी सिद्ध केली ?(SET 2020)
अ) पुष्पा भावे
ब) सरोजिनी वैद्य
क) ग. र. दंडवते
ड) दु. का. संत
क) ग. र. दंडवते
प्रश्न 16. वाड्मयेतिहासकाराला यथायोग्य अशी समीक्षादृष्टी असावीच लागते, मात्र समीक्षकांवर इतिहासाचा संदर्भ लक्षात घेणे बंधनकारक नसते.(SET 2023)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
अ) संपूर्ण विधान बरोबर
प्रश्न 17. साहित्याचा इतिहास म्हणजे साहित्यातील रुपबंधांच्या स्वायत्त विकासाचा इतिहास, अशी भूमिका कोणी मांडली ?(SET 2023)
अ) रेने वेलक
ब) आर. एस. क्रेन
क) टी. एस. इलियट
ड) फ्रीड्रिख नीत्शे
ब) आर. एस. क्रेन
प्रश्न 18. 'नगरातल्या उद्यानातील आम्रवृक्ष फळांनी लगडले होते.' - या वाक्यातील कर्ता पुढीलपैकी कोणता ?(SET 2020)
अ) नगर
ब) उद्यान
क) आम्रवृक्ष
ड) फळे
क) आम्रवृक्ष
प्रश्न 19. ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उत्कापात आकाशाहून झाला. श्रीशंभूमहादेवीं तळ्याचे उदक रक्तांबर झाले. असे शिवाजी महाराजांच्या मृत्युप्रसंगीचे वर्णन कोठे आले आहे ?(SET 2020)
अ) सभासदाच्या बखरीत
ब) एक्याण्णव कलमी बखरीत
क) सप्तप्रकरणात्मक चरित्रात
ड) भोसले वंश चरित्रात
अ) सभासदाच्या बखरीत
प्रश्न 20. आधुनिक भारत हा ग्रंथ कोणी लिहीला ?(SET 2020)
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer):
या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
प्रश्न 1. "महाराष्ट्रातील केवळ सगुणप्रेमी 'भक्त' नामदेव उत्तर हिंदुस्थानात जाऊन आपल्या आध्यात्मिक साधनेत आणखी विकसित झाले आणि 'संत' नामदेव बनून निर्गुणाची अनुभूती घेऊ लागले." (SET 2021)
अ) वरील विधान पूर्णतः बरोबर आहे
ब) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे; परंतु उत्तरार्ध चूक आहे.
क) वरील विधानातील पूर्वार्ध चुकीचा असला तरी उत्तरार्ध बरोबर आहे.
ड) वरील विधान पूर्णतः चुकीचे आहे
अ) वरील विधान पूर्णतः बरोबर आहे
प्रश्न 2. 'रूप पाहता लोचनी', 'सुंदर ते ध्यान' हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे ?(SET 2021)
अ) राष्ट्रीय कीर्तन
ब) नारदीय कीर्तन
क) वारकरी कीर्तन
ड) रामदासी कीर्तन
क) वारकरी कीर्तन
प्रश्न 3. 'महासंगर' या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ?(SET 2021)
अ) योगीराज वाघमारे
ब) अर्जुन डांगळे
क) अविनाश डोळस
ड) योगेंद्र मेश्राम
क) अविनाश डोळस
प्रश्न 4. "दलित आत्मकथन म्हणजे दलित आत्म्याचे कथन नव्हे, ती स्वतः च्या जीवनाची कहाणी होय म्हणूनच आत्मकथनात आत्मा आहे अशी मांडणी करणे संभ्रमाचेच ठरेल."(SET 2021)
अ) संपूर्ण विधान चूक आहे
ब) संपूर्ण विधान बरोबर आहे
क) विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक आहे
ड) विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक आहे
ब) संपूर्ण विधान बरोबर आहे.
प्रश्न 5. "ग्रामीण कथेचा सगळा जिवंतपणा तिच्या बोलीशी निगडित असतो" हे विधान कोणाचे आहे ?(SET 2021)
अ) नरहर कुरुंदकर
ब) वा. ल. कुलकर्णी
क) रा. रं. बोराडे
ड) ग. ल. ठोकळ
अ) नरहर कुरुंदकर
प्रश्न 6. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर 'साहेबराव पाटील' हि कविता कोणत्या कवीने लिहिली आहे ?(SET 2021)
प्रश्न 7. साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्यनिर्मिती, सौंदर्यग्रहण व अर्थग्रहण यांची एक प्रवाही प्रक्रिया असते, हा विचार कोणी मांडला?(SET 2021)
अ) गो. म. कुलकर्णी
ब) अशोक केळकर
क) गंगाधर पाटील
ड) दि. के. बेडेकर
क) गंगाधर पाटील
प्रश्न 8. "वाराणसी भागीरथी । पांडुरंगीं भीमरथी" या काव्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरीक्षेत्र या अर्थाने कोणी वापरला आहे ?(SET 2021)
अ) निळोबा
ब) सावता माळी
क) तुकाराम
ड) नामदेव
ड) नामदेव
प्रश्न 9. 'वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान पुरस्कार दिला.'
- या वाक्यातील अधोरेखित काय आहे ? (SET 2019)
अ) कर्ता
ब) प्रत्यक्ष कर्म
क) अप्रत्यक्ष कर्म
ड) विशेषण
क) अप्रत्यक्ष कर्म
प्रश्न 10. "भोळ्या भाबड्या, श्रद्धाळू, गतानुगतिक व अज्ञ सामान्य जनांना ज्ञानाचा नवा प्रकाश देण्याऐवजी त्यांची पारंपरिक श्रध्दास्थानेच बळकट करण्याचा प्रयत्न श्रीधर कवीने केला." हे मत कोणाचे आहे ? (SET 2019)
अ) यु. म. पठाण
ब) गं. बा. सरदार
क) भगवंतराव देशमुख
ड) श्री. ना. बनहट्टी
क) भगवंतराव देशमुख
प्रश्न 11. भक्तिप्रधान साहित्याची लोकप्रियता का वाढते आहे ? (SET 2019)
अ) शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे
ब) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे
क) तंत्रज्ञानाचे लोकमानसावर झालेले आक्रमण
ड) सुलभ व जलद मुद्रणव्यवस्थेमुळे
ब) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे
प्रश्न 12. "एस. एम. जोशींसारखा साऱ्या देशावर प्रेम करणारा, लोकशाहीवर शंभर टक्के विश्वास असणारा, अहिंसा आणि सत्याग्रह ह्याविषयी आग्रही असणारा नेता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला मिळाला, हे मराठी व भारतीय लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे."
- हे विधान कोणाचे आहे ? (SET 2019)
अ) शाहीर लीलाधर हेगडे
ब) शाहीर इमाम शेख
क) शाहीर कृष्णकांत जाधव
ड) शाहीर किसनराव हिंगे
अ) शाहीर लीलाधर हेगडे
प्रश्न 13. 'यमुनापर्यटन' या पहिल्या भारतीय कादंबरीचा गौरव करतांना भालचंद्र नेमाडे यांनी तिच्या कोणत्या गुणवैशिष्ट्यावर भर दिला आहे ? (SET 2019)
अ) समकालीन समाजचित्रण
ब) नायिकेची कृतिशीलता
क) संवादांतील भाषा
ड) चित्रमय वर्णन
ब) नायिकेची कृतिशीलता
प्रश्न 14. भाषांतर करतांना प्रादेशिक संदर्भ कसे अडचणीचे ठरतात याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते ? (SET 2019)
अ) केशवसुतांची 'नैॠत्येकडील वारा' हि कविता
ब) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक 'किचकवध'
क) हरी नारायण आपटे यांची कथा 'काळ तर मोठा कठीण आला'
ड) बाबा पदमनजी यांची कादंबरी 'यमुना पर्यटन'
अ) केशवसुतांची 'नैॠत्येकडील वारा' हि कविता
प्रश्न 15. कार्ल मार्क्स यांची तत्त्वप्रणाली हि पुढीलपैकी कोणत्या साहित्याचे प्रेरणास्थान नाही ? (SET 2019)
अ) ग्रेसची कविता
ब) विंदा करंदीकर यांची कविता
क) डोटोव्हस्कीच्या कादंबऱ्या
ड) अरुंधती रॉय यांची कादंबरी 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'
अ) ग्रेसची कविता
प्रश्न 16. पुढीलपैकी कोणती रचना मोरोपंतांची नाही ?(SET 2021)
अ) सुभद्राचंपू
ब) सावित्रीगीत
क) सीतागीत
ड) रुक्मिणीगीत
अ) सुभद्राचंपू
प्रश्न 17. 'कुंजकूजन' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?(SET 2021)
अ) कुंजबिहारी
ब) काव्यबिहारी
क) दत्त
ड) चंद्रशेखर
ड) चंद्रशेखर
प्रश्न 18. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा :(SET 2019)
सूची I
i) लोकसाहित्य कि भूमिका
ii) लोकसाहित्य का अध्ययन iii) लोकसाहित्य iv) लोकसाहित्यविज्ञान
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer):
या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.