Friday, October 17, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 9

प्रश्न 1. 'नॅशनल ई - विधान ऍप्लिकेशन (NeVA)' लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर➣ नागालँड(#2022)

*** Notes -

"नॅशनल ई-विधान एप्लिकेशन (NeVA)" हे 'एक राष्ट्र - एक एप्लिकेशन' या संकल्पनेवर विकसित करण्यात आले आहे .

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत , भारत सरकारने देशातील सर्व विधानसभांना कागदविरहित स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित करण्यासाठी केंद्र प्रायोजित 'राष्ट्रीय ई-विधान अर्ज' योजना सुरू केली आहे.

प्रश्न 2. हरित कर्जरोखे(bonds) जारी करणारी पहिली महानगरपालिका कोणती ?

उत्तर➣ पिंपरी चिंचवड

*** Notes -

पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.

प्रश्न 3. अरण्यऋषी म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर➣ मारुती चितमपल्ली

*** Notes -

मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रश्न 4. अलीकडे कोणत्या शहराला बिबट्यांची राजधानी म्हणून ओळख मिळाली आहे ? (#2025)

उत्तर➣ बेंगळुरू

प्रश्न 5. 'सिफत कौर समरा' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर➣ नेमबाजी

*** Notes -

नुकतीच कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे झालेल्या १६ व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ऑलिंपियन सिफत कौर समराने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. (#ऑगस्ट 2025)

प्रश्न 6. अर्जुन इरिगेसी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर➣ बुद्धिबळ

प्रश्न 7. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 अनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर➣ 131

*** Notes -

भारत Gender Parity Score 2025 - 64.1% आहे

2025 पहिल्या स्थानी - आइसलँड(16 वर्षांपासून पहिल्या स्थानी)

2025 नुसार बांग्लादेश - 24, भूतान - 119, नेपाळ - 125, श्रीलंका - 130, मालदीव -138 आणि पाकिस्तान -148

2025 यावर्षीची हि 19 वी आवृत्ती आहे.

2024 भारत - 129 वा क्रमांक

अहवाल 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' तर्फे जाहीर करण्यात येतो.

चार प्रमुख आयामांमध्ये लिंग समानतेची सद्यस्थिती आणि उत्क्रांती यांचे बेंचमार्क करण्यासाठी २००६ मध्ये प्रथम हे सादर करण्यात आले :
1.आर्थिक सहभाग आणि संधी
2.शैक्षणिक उपलब्धी
3.आरोग्य आणि जगणे
4.राजकीय सक्षमीकरण

हा निर्देशांक ० आणि १ च्या दरम्यान आहे, १ हा पूर्ण समता दर्शवितो. लिंग अंतर म्हणजे पूर्ण समतेपासूनचे अंतर.

प्रश्न 8. पुरुष IPL 2025 चा विजेता संघ कोणता ?

उत्तर➣ रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू(कॅ. रजत पाटीदार) वि. (पंजाब किंग्स)

*** Notes -

IPL 2025 Season 18

IPL 2025 - (759) धावांसह सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून साई सुदर्शनने ऑरेंज कॅप जिंकली आणि सर्वाधिक विकेट्स (25) घेतल्याबद्दल प्रसिद्ध कृष्णाने पर्पल कॅप जिंकली.

मुंबई इंडियन्स - 5, चेन्नई सुपरकिंगस - 5, कोलकाता नाईट रायडर्स - 3, सनराइजर्स हैदराबाद - 1, डेक्कन चार्जर्स - 1, राजस्थान रॉयल्स - 1, गुजरात टाइटन्स - 1, रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू - 1

प्रश्न 9. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?(#sep2025)

उत्तर➣ सी. पी. राधाकृष्णन(12 सप्टेंबर 2015 पासून)

*** Notes -

पूर्ण नाव - चंद्रपुरम पोन्नूसामी राधाकृष्णन

उपराष्ट्रपती पदी निवडून येण्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.

14 वे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड़(11 ऑगस्ट 2022 - 21 जुलै 2025)

.

13 वे उपराष्ट्रपती - व्यंकय्या नायडू(11 ऑगस्ट 2017 - 11 ऑगस्ट 2022)

प्रश्न 10. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा 'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025' कोणाला देण्यात आला आहे ?

उत्तर➣ पद्मश्री अशोक सराफ

*** Notes -

2024 - डॉ. शरद भुताडिया

प्रश्न 11. दरवर्षी 'मराठवाडा मुक्ति संग्राम दिन' केव्हा साजरा करण्यात येतो ?

उत्तर➣ 17 सप्टेंबर

प्रश्न 12. मालदीवच्या कितव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले होते ? (26 जुलै 2025)

उत्तर➣ 60 व्या

*** Notes -

मालदीवने 26 जुलै 1965 रोजी ब्रिटीश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले.

मालदीवचे राष्ट्रपती - डॉ. मोहम्मद मुइझ्झू

रिपब्लिक स्क्वेअरवर स्वातंत्र्य दिनाच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय पंतप्रधानांनी मालदीवच्या स्वातंत्र्य दिन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची पहिलीच वेळ होती.

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 13. 'मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025' हा किताब कोणी जिंकला आहे ?

उत्तर➣ विधू इशिका

प्रश्न 14. 'निसार' उपग्रह हि ______ आणि इस्रो यांची संयुक्त मोहीम आहे.

उत्तर➣ नासा

प्रश्न 15. ग्लोबल फायनान्सने 2025 साठी 'जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक' म्हणून कोणती बँक निवडली आहे ?

उत्तर➣ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI).

*** Notes -

ग्लोबल फायनान्स (2025)अनुसार - जगातील सर्वोत्तम बँक - सोसायटी जनरल,
जगातील सर्वोत्तम कॉर्पोरेट बँक - बीबीव्हीए,
जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक - स्टेट बँक ऑफ इंडिया,
जगातील सर्वोत्तम उदयोन्मुख बाजारपेठ बँक - जेपी मॉर्गन,
जगातील सर्वोत्तम फ्रंटियर मार्केट बँक - सोसायटी जनरल आणि
जगातील सर्वोत्तम सब-कस्टोडियन बँक - सीआयबीसी मेलॉन.

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 16. 43वा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025' कोणाला मिळाला आहे ? (aug 2025)

उत्तर➣ नितीन गडकरी

*** Notes -

पुरस्काराची सुरुवात - 1 ऑगस्ट 1983

हा पुरस्कार पुण्यातल्या लो. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येतो.

पहिले मानकरी - गोदावरी परूळेकर

2024 (42वा) - सुधा मूर्ती

2023 (41वा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रश्न 17. कोणत्या देशाने मतदानाचे वय 18 वरून 16 करण्याचा निर्णय घेतला आहे ? (#2025)

उत्तर➣ ब्रिटन

प्रश्न 18. 'ग्रीन हायड्रोजन समिट 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?

उत्तर➣ अमरावती (आंध्रप्रदेश)

*** Notes -

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन: राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हे भारताचे हरित हायड्रोजन वाढवण्याचे प्रमुख धोरण आहे , ज्याचे लक्ष्य २०३० पर्यंत ५ दशलक्ष टन वार्षिक हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता स्थापित करणे आहे.

या मोहिमेचा पहिला टप्पा २०२२-२३ ते २०२५-२६ पर्यंत असेल , त्यानंतर दुसरा टप्पा २०२६-२७ ते २०२९-३० पर्यंत असेल .

प्रश्न 19. 2025 ची 'जागतिक हायड्रोजन शिखर परिषद' कुठे भरविण्यात आली होती ? (#2025)

उत्तर➣ रॉटरडॅम (नेदरलँड)

प्रश्न 20. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

उत्तर➣ 2026

*** Notes -

अधिक माहितीसाठी 👉 आंतरराष्ट्रीय वर्षे

प्रश्न 21. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2025 पासून दरवर्षी 21 मार्च हा दिवस काय साजरा करण्याचे ठरविले आहे ?

उत्तर➣ जागतिक हिमनदी दिन (World Day for Glaciers)

*** Notes -

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 22. 'आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस' कधी साजरा केला जातो ?

उत्तर➣ 30 जून (International Asteroid Day)

*** Notes -

डिसेंबर 2016 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 30 जून हा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला

7 8 9 10 11

 

 

 



Tuesday, October 14, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 8

प्रश्न 1. 'Ragasa चक्रीवादळ' याला 'Ragasa' हे नाव कोणत्या देशाने दिले होते ?

उत्तर➣ फिलिपिन्स

*** Notes -

हे चक्रीवादळ पॅसिफिक(प्रशांत) महासागरात तयार झाले होते.

याला 'सुपर टायफून' म्हणूनही ओळखले जाते.

फिलीपाईन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन या देशांमध्ये मोठे नुकसान.

शक्ती चक्रीवादळ(Oct 2025) - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाला नाव 'श्रीलंकेने' दिले आहे.

प्रश्न 2. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल ________ धबधब्यावर उभारण्यात आला आहे.

उत्तर➣ नापणे धबधबा (वैभववाडी जि. सिंधुदूर्ग)

*** Notes -

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळखले जाते. 1997 साली महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले.

प्रश्न 3. भारतातील पहिली AI अंगणवाडी कुठे सुरु करण्यात आली ? (#जुलै 2025)

उत्तर➣ वडधामणा (जि. नागपूर)

प्रश्न 4. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संलग्न असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने _________ ला कर्करोगजन्य विषाणू म्हणून घोषित केले आहे.

उत्तर➣ हेपेटायटीस डी

*** Notes -

यापूर्वी, WHO ने देखील हेपेटायटीस बी आणि सी ला कर्करोगजन्य विषाणू म्हणून घोषित केले आहे.

प्रश्न 5. दाक्षिणात्य अभिनेता विजय यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय आहे ?

उत्तर➣ तमिलागा वेत्री कळघम

प्रश्न 6. 'मिस युनिवर्स इंडिया 2024' चा खिताब कोणी पटकावला ?

उत्तर➣ रिया सिंघा (Miss Universe India 2024)

प्रश्न 7. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी कोणती चळवळ सुरु करण्यात आली आहे ? (#एप्रिल 2025)

उत्तर➣ AI किरण

*** Notes -

भारत सरकार आणि जागतिक संघटनांच्या सहकार्याने कीर्तिगा रेड्डी यांनी सुरू केलेल्या एआय किरणचे उद्दिष्ट भारतातील महिलांना एआयमध्ये सक्षम बनवणे आहे.

प्रश्न 8. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे ?

उत्तर➣ स्म्रिती मंधाना

प्रश्न 9. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

उत्तर➣ भारत आणि श्रीलंका

प्रश्न 10. अलीकडे ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ने कोणत्या देशाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे ? (#sep 2025)

उत्तर➣ अमेरिका

प्रश्न 11. दरवर्षी RBI कडून 'वित्तीय साक्षरता सप्ताह' कधी आयोजित करण्यात येतो ?

उत्तर➣ 24 ते 28 फेब्रुवारी, 2025

*** Notes -

सुरुवात - 2016

या वर्षीच्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम 'आर्थिक साक्षरता - महिलांची समृद्धी'(‘Financial Literacy - Women’s Prosperity’)

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 12. '38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 (38th National Games 2025)' कुठे पार पडल्या ? (Feb 2025)

उत्तर➣ हल्द्वानी (उत्तराखंड)

*** Notes -

Services Sports Control Board - पहिल्या स्थानी (68 + 26 + 27 = 121)

महाराष्ट्र - दुसऱ्या स्थानी (55 + 70 + 76 = 201)

हरियाणा - तिसऱ्या स्थानी (48 + 47 + 59 = 154)

अधिक माहितीसाठी 👉 Medal Tally Link

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 13. 2027 च्या 39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद कोणत्या राज्याकडे नियोजित आहे ?

उत्तर➣ मेघालय

प्रश्न 14. जानेवारी 2025 नुसार जगातील सर्वात महागडा पासपोर्ट कोणता होता ?

उत्तर➣ ऑस्ट्रेलिया

*** Notes -

2024 - मेक्सिको

प्रश्न 15. 'साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025' मराठी कोणाला मिळाला ?

उत्तर➣ सुरेश सावंत - आभाळमाया (कविता)

*** Notes -

2024 - समशेर आणि भूतबंगला (कादंबरी) - भारत सासणे

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 16. डॉ. सुधीर रसाळ यांच्या कोणत्या समीक्षा ग्रंथाला 'साहित्य अकादमी पुरस्कार 2024' मिळाला आहे ?

उत्तर➣ विंदांचे गद्यरूप (समीक्षा ग्रंथ)

*** Notes -

2023 - रिंगाण (कादंबरी) - कृष्णात खोत

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 17. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा मोहीम काय आहे, ज्याचा उद्देश सूर्याचा अभ्यास करणे असा आहे ?

उत्तर➣ आदित्य L1

*** Notes -

2 सप्टेंबर 2023 रोजी या यानानं श्रीहरीकोटा इथून उड्डाण केलं होतं.

L1 म्हणजे Lagrange Point One

प्रश्न 18. HSRP म्हणजे ______ ?

उत्तर➣ High Security Registration Plate

प्रश्न 19. नाटो संघटनेचा 32 वा सदस्य देश कोणता ? (#2024)

उत्तर➣ स्वीडन

*** Notes -

NATO - North Atlantic Treaty Organization

४ एप्रिल १९४९ रोजी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील १२ देशांनी मिळून नाटोची स्थापना केली.

तेव्हापासून, आणखी २० देशांनी नाटोमध्ये १० फेऱ्यांच्या विस्ताराद्वारे (१९५२, १९५५, १९८२, १९९९, २००४, २००९, २०१७, २०२०, २०२३ आणि २०२४ मध्ये) सामील झाले आहेत.

उत्तर अटलांटिक कराराच्या कलम १० मध्ये देश युतीमध्ये कसे सामील होऊ शकतात हे स्पष्ट केले आहे. त्यात असे म्हटले आहे की "या कराराची तत्त्वे पुढे नेण्याच्या आणि उत्तर अटलांटिक क्षेत्राच्या सुरक्षेत योगदान देण्याच्या स्थितीत असलेल्या कोणत्याही युरोपियन राज्यासाठी" सदस्यत्व खुले आहे.

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 20. '37 व्या कथक महोत्सव 2025' चे आयोजन _________ येथे 21-26 मार्च, 2025 यादरम्यान करण्यात आले होते ?

उत्तर➣ नवी दिल्ली

प्रश्न 21. राज्य शासनाचा पहिला 'महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार' कोणाला मिळाला आहे ? (#2024)

उत्तर➣ चैत्राम पवार (बारीपाडा, धुळे)

प्रश्न 22. राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2024' कोणाला देण्यात आला आहे ? (#March 2025)

उत्तर➣ राम सुतार

6 7 8 9 10 11

 

 

 



Saturday, October 11, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 7

प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये 17 वी ब्रिक्स परिषद (17th BRICS SUMMIT) कोठे आयोजित करण्यात आली होती ?

उत्तर➣ रियो डी जानेरियो ( Rio de Janeiro ब्राझील)

*** Notes -

थीम - Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance

सुरुवातीला 5 सदस्य होते ब्राझील, रुस, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 2024 मध्ये ईरान, संयुक्त अरब अमीरात(UAE), इजिप्त(मिस्र) आणि इथियोपिया सहभागी झाले, इंडोनेशिया 2025 मध्ये सहभागी झाला.

बेलारूस, बोलीविया, क्यूबा, कजाकिस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, वियतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान यांना 2025 मध्ये ‘पार्टनर देश’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे देश मतदान करू शकत नाहीत, पण परिषदांमध्ये सहभागी होऊन BRICS च्या धोरणात्मक निर्णयांवर आपली मते मांडू शकतात.

स्थापनेच्या वेळेस ब्राझील, रुस, भारत, चीन हे चार सदस्य होते, तेव्हा BRIC असे नाव होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यावर 5 सदस्य व BRICS असे नामांतर.

पाहिलं संमेलन - रुस(2009)

14 वे संमेलन - चीन(2022)

15 वे संमेलन - दक्षिण आफ्रिका(2023)

16 वे संमेलन - रुस(2024)

18 वे संमेलन - भारत(2026 निजोजित)

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 2. 'आदी महोत्सव 2025' कोठे आयोजित करण्यात आला होता ?

उत्तर➣ नवी दिल्ली (मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम मध्ये 16 से 24 फरवरी 2025)

प्रश्न 3. भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day [NSpD]) साजरा केला जातो ?

उत्तर➣ 23 ऑगस्ट

*** Notes -

सुरुवात - 23 ऑगस्ट 2024 रोजी आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर, 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली

23 ऑगस्ट 2023 रोजी, भारताने चंद्रावर चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी लँडिंग करून अवकाश इतिहासात आपले नाव कोरले. प्रज्ञान रोव्हरसह विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले, ज्यामुळे भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरणारा पहिला देश बनला. लँडिंग साइटला 'शिवशक्ती' पॉइंट (स्टेटिओ शिवशक्ती) असे नाव देण्यात आले

August 23, 2024 [NSpD-2024] theme - "Touching Lives while Touching the Moon: India's Space Saga.

August 23, 2025 [NSpD-2025] theme - Aryabhatta to Gaganyaan: Ancient Wisdom to Infinite Possibilities

प्रश्न 4. SAAB ने भारतात इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर लेजर वॉर्निंग सिस्टम - 310 (LWS-310) तयार करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे ? (#2025)

उत्तर➣HAL

*** Notes -

Swedish Aerospace and Defense Company (SAAB)

Hindustan Aeronautics Limited (HAL)

प्रश्न 5. UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ भुवनेश कुमार

प्रश्न 6. 2025-26 साठी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर➣ सीए चरणजोत सिंग नंदा (73 वे अध्यक्ष)

*** Notes -

स्थापना - 1 जुलै 1949

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ही भारतातील चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसायाचे नियमन करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 अंतर्गत स्थापन झालेली एक वैधानिक संस्था आहे.

2024-25 साठी 72 वे अध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल

प्रश्न 7. AI धोरण ठरवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? (#2025)

उत्तर➣ महाराष्ट्र

प्रश्न 8. भारताचा पहिला खाजगी (सैटेलाइट कन्स्टेलेशन (Satellite Constellation)) उपग्रह 'फायरफ्लाय' (Firefly) ________ या कंपनीने लॉन्च केला आहे.

उत्तर➣ Pixel (बेंगलुरु)

प्रश्न 9. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे स्थापन करण्यात आली आहे ?

उत्तर➣ चेन्नई

*** Notes -

ही बायोबँक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन (MDRF) यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे.

प्रश्न 10. _______ येथे देशातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले.

उत्तर➣ नागपूर

*** Notes -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

या ट्रेनचे डिझाइन व्होल्वो ट्रक्सने केले आहे

प्रश्न 11. भारतात व्याघ्र जनगणना दर किती वर्षांनी होते ?

उत्तर➣ चार

*** Notes -

देशात पहिली व्याघ्रगणना 2006 मध्ये झाली

2022 च्या गणनेनुसार भारतात सुमारे 3167 वाघ आहेत ज्याचा उच्च अंदाज सुमारे 3682 आहे

प्रश्न 21. 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला भारताचा 58 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 12. जागतिक पाणथळ दिवस(World Wetlands Day) दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो ?

उत्तर➣ 2 फेब्रुवारी

*** Notes -

2025 थीम - Protecting Wetlands for Our Common Future

प्रश्न 13. जानेवारी 2025 मध्ये BCCI च्या लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर➣ न्यायमूर्ती अरुण मिश्रा (सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश)

प्रश्न 14. महिला क्रिकेट IPL 2025 चा विजेता संघ कोणता ?

उत्तर➣ मुंबई इंडियन्स(कॅ. हरमनप्रीत कौर) (वि. दिल्ली कॅपिटल्स)

*** Notes -

2023 - मुंबई इंडियन्स (वि. दिल्ली कॅपिटल्स)

2024 - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(वि. दिल्ली कॅपिटल्स)

प्रश्न 15. ________ येथे भारतातील पहिले भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) भूविज्ञान संग्रहालय उदघाटन करण्यात आले आहे.

उत्तर➣ ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)

GSI - Geological Survey of India

डिसेंबर 2024 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उदघाटन केले.

प्रश्न 16. पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टीव्हल 2025 (KIWSF) कुठे आयोजित करण्यात आला होता ?

उत्तर➣ श्रीनगर

*** Notes -

21 ते 23 अगस्त 2025 दल सरोवर, श्रीनगर

शुभंकर: हिमालयन किंगफिशर

स्पर्धा प्रकार - रोइंग, कैनोइंग आणि कयाकिंग

प्रश्न 17. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन कोणती कलाकृती भेट म्हणून दिली ? (#2025)

उत्तर➣ डोकरा (धातूचे शिल्प)

*** Notes -

Dokra Art -- A renowned metal-casting tradition from Chhattisgarh.

प्रश्न 18. दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो ?

उत्तर➣ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (01 ते 07)

प्रश्न 19. सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या वस्तूवरील 11% आयात शुल्क तात्पुरते माफ केले होते ?

उत्तर➣ कच्चा कापूस

प्रश्न 20. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले ?

उत्तर➣ नेपाळ

*** Notes -

World Health Organization (WHO)

प्रश्न 21. पश्चिम बंगाल सरकारने बंगाली स्थलांतरीत कामगारांसाठी कोणती योजना सुरु केली ? (#2025)

उत्तर➣ श्रमश्री

प्रश्न 22. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल विधानसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात ?

उत्तर➣ 5

*** Notes -

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश असून त्याचे उपराज्यपाल - मनोज सिन्हा

5 6 7 8 9 10

 

 

 

 

 



Tuesday, September 09, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 6

प्रश्न 1. 11 व्या 'आंतरराष्ट्र्रीय योग दिवस 2025'ची थीम काय होती ?

➣ 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' (Yoga For One Earth, One Health)

*** Notes -

11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ठराव 69/131 द्वारे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला.

प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 थीम: सौहार्द आणि शांतीसाठी योग

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम: महिला सक्षमीकरणासाठी योग

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 थीम: वसुधैव कुटुंबकमसाठी योग

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 थीम: मानवतेसाठी योग

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे.

➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा)

*** Notes -

ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते
मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई

साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी)

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला

साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी)

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 3. ________ या पंचायतीला देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे.

➣ पुल्लमपारा (केरळ)

प्रश्न 4. बंगळुरू स्थित QpiAI ने भारतातील पहिला फुल - स्टॅक क्वांटम संगणक सुरु केला त्याचे नाव काय ?

QpiAI - Indus (25 सुपरकंडक्टिंग क्यूबिट्स)

*** Notes -

राष्ट्रीय क्वांटम मिशन (NQM) अंतर्गत

जागतिक क्वांटम दिवस - 14 एप्रिल

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 5. 26 वे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

➣ ज्ञानेश कुमार (IAS 1988 बॅच केरळ कॅडर)

*** Notes -

प्रथम - सुकुमार सेन (21 March 1950 - 19 Dec 1958)

द्वितीय - कल्याण सुंदरम (20 Dec 1958 - 30 Sep 1967)

24 वे - सुशील चंद्रा (13 April 2021 - 14 May 2022)

25 वे - राजीव कुमार (15 May 2022 - 18 Feb 2025)

व्ही. एस. रमादेवी(9 व्या) या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आतापर्यंतच्या एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त.

सर्वाधिक काळ मुख्य निवडणूक आयुक्त कल्याण सुंदरम 8 वर्षे 284  दिवस

व्ही. एस. रमादेवी मुख्य निवडणूक आयुक्त १६ दिवस (26 Nov 1990 - 11 Dec 1990)

प्रश्न 6.'समान नागरी कायदा' (Uniform Civil Code) लागू करणारे पहिले राज्य कोणते ?

➣ उत्तराखंड (Uttarakhand Uniform Civil Code 2024)

प्रश्न 7. 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?

➣ दिल्ली (98 वे)

*** Notes -

अमळनेर (97 वे, अध्यक्ष: प्रा. डॉ. रवींद्र शोभणे)

वर्धा (96 वे, संमेलनाध्यक्ष: नरेंद्र चपळगावकर)

उदगीर (95 वे, संमेलनाध्यक्ष: भारत सासणे)

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 8. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनासाठी (25 - 26 जानेवारी 2025) प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते ?

➣ राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो (इंडोनेशिया)

प्रश्न 9. 2024 - 2025 चा रणजी करंडक (Ranji Trophy) कोणी पटकावला ?

➣ विदर्भ

*** Notes -

अंतिम सामना विदर्भ vs केरळ

प्रश्न 10. 2025 मध्ये कॅनडाच्या पंतप्रधानपदी कोण निवडून आले ?

➣ मार्क कार्नी (24 वे पंतप्रधान, लिबरल पक्ष)

प्रश्न 11. जगभरात जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Rights Day) कधी साजरा केला जातो ?

➣ 15 मार्च

प्रश्न 12. अमेरिकेला मागे टाकत भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G बाजारपेठ बनला आहे ?

➣ दुसऱ्या

*** Notes -

पहिल्या क्रमांकावर चीन (32%), दुसऱ्या भारत (13%), आणि अमेरिका (10%)

👉 Source Link

प्रश्न 13. जागतिक वन दिन (World Forest Day) दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?

➣ 21 मार्च

*** Notes -

संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012 ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला.

प्रश्न 14. 2025 मध्ये भारताने म्यानमार मधील भूकंप ग्रस्तांच्या मदतीसाठी कोणते अभियान राबविले ?

➣ ऑपरेशन ब्रह्मा (Operation Brahma)

*** Notes -

ऑपरेशन दोस्त (Operation Dost) 2023 - तुर्की - सिरिया भूकंप

ऑपरेशन देवी शक्ति 2021 - हिंसाग्रस्त अफगाणिस्तानमधून भारतीयांची सुटका.

ऑपरेशन मैत्री 2015 - नेपाळ, भूकंप

ऑपरेशन करुणा 2023 - मोका चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत.

ऑपरेशन राहत 2015 - येमेन, युद्धकाळात भारतीय व परदेशी नागरिकांसाठी बचाव कार्य.

ऑपरेशन सिंधू (June 2025) - इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण/इस्त्रायलमधून भारतीयांची एव्हॅक्युएशन

ऑपरेशन इंद्रवती (2024) - हैती येथून भारतीयांची वापसी.

ऑपरेशन कावेरी (2023) - सुदानमधून भारतीयांची वापसी.

ऑपरेशन अजय (2023) - इस्त्रायलमधून भारतीयांची वापसी.

ऑपरेशन गंगा (2022) - युक्रेनहून विद्यार्थी व भारतीयांची सुटका.

ऑपरेशन संकट मोचन (2016, दक्षिण सुदान) - दक्षिण सुदान मधील गृहयुद्धादरम्यान अडकलेल्या भारतीयांची सुटका. भारतीय हवाई दलाच्या C - 17 विमानाचा वापर.

ऑपरेशन सुकून (2006, लेबनॉन) - लेबनॉनमधील युद्धादरम्यान भारतीय, नेपाळी आणि श्रीलंकन नागरिकांसाठी बचाव कार्य मोहीम. (भारतीय नौदलाचे नेतृत्व)

प्रश्न 15. सेंट्रल बँकिंग लंडन (UK) मार्फत Digital Transformation Award 2025 कोणाला मिळाला ?

➣ RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

*** Notes -

हा पुरस्कार RBI ला त्यांच्या सारथी आणि प्रवाह नावाच्या डिजिटल उपक्रमांसाठी देण्यात आला.

सारथी (2023) - RBI मध्ये चालू असलेल्या अंतर्गत प्रक्रिया डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे.

प्रवाह (2024) - हे व्यक्ती आणि संस्थांना RBI कडून विविध नियामक परवानग्यांसाठी अर्ज करण्यासाठी एक केंद्रीकृत प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. हे पोर्टल ऑनलाइन अर्ज सबमिशन, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि अर्जदार आणि RBI मधील सुव्यवस्थित संवाद यासारख्या वैशिष्ट्यांसह येते.

प्रश्न 16. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला ?

➣ गझलसम्राट भीमराव पांचाळे

*** Notes -

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यामार्फत देण्यात येतो. सुरुवात - 1992

1992 - माणिक वर्मा (गायक)

1993 - श्रीनिवास खळे (संगीत दिग्दर्शक)

2023 - सुरेश वाडकर (गायक)

2024 - अनुराधा पौडवाल (गायिका)

प्रश्न 17. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला ?

➣ कुमार मंगलम बिरला (अध्यक्ष - आदित्य बिरला समूह)

*** Notes -

संस्था : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान (Mangeshkar family trust).

दरवर्षी 24 एप्रिल रोजी (पंडित दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी) हा पुरस्कार दिला जातो.

पहिला 2022 - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दुसरा 2023 - आशा भोसले

तिसरा 2024 - अमिताभ बच्चन

प्रश्न 18. 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे ?

➣ 12 (11 महाराष्ट्र, 1 तामिळनाडू)

*** Notes -

महाराष्ट्रातील - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी.

तामिळनाडूतील - जिंजी.

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 19. (2024) 59 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

➣ विनोद कुमार शुक्ला (भाषा हिंदी)

*** Notes -

58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023
1. रामभद्राचार्य (संस्कृत भाषा)
2. गुलजार (उर्दू भाषा)

57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022
दामोदर मौजो (कोंकणी भाषा)

प्रश्न 20. दरवर्षी 'जागतिक जल दिवस (World Water Day)' केव्हा साजरा करण्यात येतो ?

➣ 22 मार्च

*** Notes -

2025 जागतिक जल दिवस थीम - हिमनदी संवर्धन (Glacier Preservation)

2024 थीम - Water For Peace

2023 थीम - Accelerating Change

प्रश्न 21. 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला भारताचा 58 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

➣ माधव राष्ट्रीय उद्यान, मध्यप्रदेश.

*** Notes -

रतापानी व्याघ्र प्रकल्प (मध्यप्रदेश) (57वा)

गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प (छत्तीसगढ) (56 वा)

धौलपूर-करौली व्याघ्र प्रकल्प (राजस्थान) (55 वा)

वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प (मध्यप्रदेश) (54 वा)

आंध्रप्रदेश - तेलंगणा मधील नागार्जुनसागर - श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प (क्षेत्रफळ - 3728 km)

मध्यप्रदेश - 9, महाराष्ट्र - 6,

प्रश्न 22.

4 5 6 7 8 9

 

 

 



Saturday, August 23, 2025

P82. राज्यपाल अनुच्छेद 164 अंतर्गत विशेष आदिवासी कल्याणासाठी मंत्री (Tribal Welfare Minister) यांची नेमणूक करू शकतात, हे अधिकार खालीलपैकी कोणत्या राज्यांसाठी / राज्यांच्या राज्यपालांना आहेत ?

अ) सिक्कीम, मध्यप्रदेश,महाराष्ट्र, झारखंड

ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा

क) छत्तीसगढ, ओडिशा, अरुणाचलप्रदेश, हिमालय

ड) मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचलप्रदेश, असम

  • ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा
  •  

     

     

     

     




    mpsc, Policebharti

    Thursday, June 19, 2025

    प्रश्न 106. नुकताच (2025) कोणत्या देशाला ब्रिक्समध्ये 'भागीदार देश' म्हणून सामील करण्यात आले ?


    अ) सुडान

    ब) तुर्की

    क) व्हिएतनाम

    ड) बांग्लादेश

  • ब) व्हिएतनाम


  • Monday, March 24, 2025

    One Liner SET/NET Marathi

    One Liner SET/NET Marathi


    प्रश्न 1. 'झुलवा' या कादंबरीमुळे __________ यांना झुलवाकार म्हणून ओळख प्राप्त झाली.

    ➣ उत्तम बंडू तुपे



    प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे.

    ➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा)

    *** Notes -

    • ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते  
    • मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई

    • साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी)
    • साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला
    • साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी)
    • अधिक माहितीसाठी 👉Source




    प्रश्न 3.'धुमसणारं शहर', 'अस्पृश्य सूर्य', 'कार्यकर्ती', 'दुबई दुबई' या कादंबऱ्या आणि 'किलावेनमानीची रात्र' हि दिर्घ कविता कोणाची ?

     राजाराम प्रभाकर राजवाडे



    प्रश्न 4. 'साहित्य संस्कृती मंडळा'चे प्रथम अध्यक्ष कोण होते.

    ➣ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

    ***Notes - 

  • स्थापना - 19 नोव्हेंबर 1960
  • प्रथम अध्यक्ष - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • सध्याचे अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे (26 डिसेंबर 2018 पासून)
  • अधिक माहितीसाठी 👉 Source Link


  • प्रश्न 5. 'निशिगंध' या टोपणनावाने कोणी लेखन केले आहे ?

    ➣ रामचंद्र श्रीपाद जोग



    प्रश्न 6.'प्रेमगानमूलक सिद्धांत' कोणत्या भाषाशास्त्रज्ञाने मांडला ?

    ➣➣➣ ऑटो जेस्परसन



    प्रश्न 7. 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?

    ➣ दिल्ली



    प्रश्न 8.'पानीपतची बखर' व 'भाऊसाहेबांची कैफियत' चे बखरकार कोण ?

    ➣ रघुनाथ यादव चित्रगुप्त व त्रिंबक सदाशिव पुरंदरे



    प्रश्न 9. कोणी त्यांच्या 'संसार - सोपान (1931)' ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणाची सुरुवात "गृहिणी गृहाची शोभा । गृहिणी सुखाचा गाभा । गृहिणी आनंदाचा ठेवा । ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा ।।" अशी केली आहे ?

    ➣ गिरीजाबाई केळकर 

    ***Notes 

  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष (1928)
  • 👉 Source Link


  • प्रश्न 10. आसाराम लोमटे यांच्या कोणत्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

    ➣ आलोक (साहित्य अकादमी पुरस्कार 2016)



    प्रश्न 11. गो. नि. दांडेकर (गोपाळ निळकंठ दांडेकर) लिखित 'शितू (1853)' कादंबरी _________ च्या पार्श्वभूमीवरची आहे.

    ➣ कोकण



    प्रश्न 12. नवीन कवितेचे प्रतीनिधी म्हणून गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी केशवसुत, टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांचा __________ असा उल्लेख केलेला आहे.

    ➣ आधुनिक कविपंचक

    ***Notes 

    • टिळक - नारायण वामन टिळक
    • केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
    • विनायक - विनायक जनार्दन करंदीकर
    • गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी
    • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
    • 👉 Source Link



    प्रश्न 13. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या 'आधुनिक कविपंचक' पुस्तकास कोणी प्रस्तावना लिहिली आहे ?

    ➣ नरसिंह चिंतामण केळकर (न. चि. केळकर)



    प्रश्न 14. 'विश्व मराठी संमेलन' कोणामार्फत आयोजित केले जाते ?

    ➣ महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत

    ***Notes 

    • 1 ले विश्व मराठी संमेलन 2023 - वरळी, मुंबई. 
    • 2 रे विश्व मराठी संमेलन 2024 - नवी मुंबई. 
    • 3 रे विश्व मराठी संमेलन 2025 - फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे. 


    प्रश्न 15. 13 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते ?

     शिर्डी (मार्च 2025)

    ***संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. संजय महाराज देहुकर



    प्रश्न 16. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोणामार्फत आयोजित केले जाते ?

    ➣ वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र.



    प्रश्न 17. मोरोपंतांच्या 'श्लोक केकावली' वर ___________ यांनी 'यशोदा पांडुरंगी' हि टिका लिहिली, हि टीका म्हणजे समीक्षात्मक लेख होय.

    ➣ दादोबा पांडुरंग तर्खडकर



    प्रश्न 18. गोपाळ हरी देशमुखांनी भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' साप्ताहिकातून जी 108 पत्रे लिहिली,  त्यांना  __________ म्हटली जातात.

    ➣ शतपत्रे



    प्रश्न 19. (2024) 59 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

    ➣ विनोद कुमार शुक्ला (भाषा हिंदी)

    ***Notes 

    58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 
    1. रामभद्राचार्य (संस्कृत भाषा)
    2. गुलजार (उर्दू भाषा)

    57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022
    दामोदर मौजो (कोंकणी भाषा)



    प्रश्न 20. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?

    ➣ चरित्रचन्द्र (1938)



    प्रश्न 21. पोवारी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ?

    ➣ सु. बा. कुलकर्णी

    👉 Source Link


    प्रश्न 22. डॉ. विजया चिटणीस यांनी कोणत्या बोलीचा अभ्यास केला ?

    ➣ खानदेशी बोली