Wednesday, January 29, 2025

SET/NET History 27 PYQ

ही पोस्ट सध्या अपडेट होत आहे. लवकरच परत येईल.

SET/NET History 27

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. निझामशाही राजघराणे आणि मलिक अंबर यांच्या अभ्यासासाठी पुढीलपैकी कोणते संदर्भ साधन उपयुक्त ठरते ?   (SET 2020)

अ) आईन - ए - अकबरी

ब) फ़ुतूहात - ए - सलातीन

क) बुऱ्हान - ए - मासीर

ड) तुझूक - ए - बाबरी

  • क) बुऱ्हान - ए - मासीर







प्रश्न 2. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुढीलपैकी कोणते प्रमुख नायक राज्यांचा उदय झाला ?   (SET 2020)

अ) मदुराई, जिंजी, तंजावर

ब) जिंजी, म्हैसूर, मदुराई, तंजावर

क) मदुराई, जिंजी, तंजावर, म्हैसूर

ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी

  • ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी








प्रश्न 3. दौलताबादचा चारमिनार हा जाफरखान याने उभारला. त्याला ________ म्हणून ओळखले जाते.   (SET 2020)

अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह

ब) फिरोझ शाह तुघलक

क) फिरोझ बहमन शाह

ड) उलुघ खान

  • अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह








प्रश्न 4. मराठ्यांनी गोव्यावर ___________ मध्ये हल्ला केला.     (SET 2020)

अ) 1677

ब) 1689

क) 1730

ड) 1756

  • क) 1730







प्रश्न 5. विजयनगर साम्राज्यातील प्रशासन व्यवस्थेत आमरा, भंदारवाडा आणि मान्य या संज्ञा कोणत्या संदर्भात वापरले जातात ?  (SET 2020)

अ) जमीन अनुदानाचे प्रकार

ब) करांचे प्रकार

क) वाहतुकीच्या पद्धती

ड) कृष्णपट्टम बंदरात गोळा केला जाणारा सीमा शुल्क

  • अ) जमीन अनुदानाचे प्रकार







प्रश्न 6. खुर्दा हा _________ ला (दिले जाणारे) एका प्रकारचे देणे होते.  (SET 2020)

अ) वस्तू रूपात, कुलकर्णी

ब) वस्तू रूपात, पाटील

क) रोख, कुलकर्णी

ड) रोख, पाटील

  • ड) रोख, पाटील








प्रश्न 7. मुघल प्रशासनात बंदराच्या गव्हर्नरला _________ वर सीमा शुल्क गोळा करणाऱ्या प्रमुख अधिकारी ________ म्हटले जाते.   (SET 2020)

अ) कोतवाल, मुत्सद्दी

ब) मुत्सद्दी, शाहबंदर

क) शाहबंदर, मुत्सद्दी

ड) मुत्सद्दी, कोतवाल

  • ब) मुत्सद्दी, शाहबंदर






प्रश्न 8.  महसूल मूल्य निर्धारण आणि गोळा करण्यासाठी नजर पाहणीच्या पद्धतीची सुरुवात _________ च्या काळात करण्यात आली.   (SET 2020)

अ) महमूद गवन

ब) राजा तोडरमल

क) मलिक अंबर

ड) मलिक कफूर

  • क) मलिक अंबर








प्रश्न 9. जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात _______ वर उत्तर भारतात ________ वापरले जात असे.  (SET 2020)

अ) गज, इलाही

ब) काठी, जरीब

क) बिघा, बिसवा

ड) तनसू, जितल

  • ब) काठी, जरीब








प्रश्न 10. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांसोबत पहिले युद्ध _________ मध्ये झाले. (SET 2020)

अ) 1655

ब) 1657

क) 1659

ड) 1661

  • ब) 1657







प्रश्न 11. भारतातील पहिली खरी कमान ________ इथे सापडते.  (SET 2023)

अ) इल्तुतमिशची कबर

ब) बल्बनची कबर

क) घियासउद्दीन तुघलकची कबर

ड) अजमेर मधील दरगाह शरीफ

  • ब) बल्बनची कबर








प्रश्न 12. बिजापूर आणि गोलकोंडा यांनी _________ वर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष केला.  (SET 2023)

अ) खंबाट

ब) नलदुर्ग

क) अहमदाबाद

ड) कोचीन

  • ब) नलदुर्ग








प्रश्न 13. मुघल प्रशासनात दिवान - इ - बयूतात कोण होता ?  (SET 2023)

अ) मनसबदारांचे खर्च बघणारा प्रभारी अधिकारी

ब) खालिसा जमिनीमधून येणाऱ्या उत्पन्नाचा प्रभारी अधिकारी

क) रोख पगारीचा प्रभारी अधिकारी

ड) राजघराण्यात आणि कारखान्यांत वित्त बघणारा अधिकारी

  • ड) राजघराण्यात आणि कारखान्यांत वित्त बघणारा अधिकारी







प्रश्न 14. आर. पी. त्रिपाठी यांनी मुघल राजपद सिध्दांताचे वर्णन _______ यात केले आहे. (SET 2023)

अ) तुर्की - मंगोल राजपदाचे सिद्धांत

ब) मंगोल राजपदाचे सिद्धांत

क) दैव नियुक्त राजपद

ड) हुकूमशाही राजपद

  • अ) तुर्की - मंगोल राजपदाचे सिद्धांत







प्रश्न 15. मराठ्या विरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे मराठा चळवळीचे स्वरूप समजून घेण्यात औरंगजेबाची अक्षमता होती असे विधान कोणत्या इतिहासकाराने केले आहे ? (SET 2023)

अ) जदुनाथ सरकार

ब) गो. स. सरदेसाई

क) सतीश चंद्र

ड) आंद्रे विंक

  • क) सतीश चंद्र






प्रश्न 16. जहांदर शाह याने _________ येथे राज्यारोहण केले.  (SET 2023)

अ) दिल्ली

ब) मुलतान

क) लाहोर

ड) आग्रा

  • क) लाहोर






प्रश्न 17. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिले पद्धतशीर चरित्र _________ याने लिहिले.  (SET 2023)

अ) कॉस्मो द गारदा

ब) कृष्णाजी आनंत सभासद

क) कवी परमानंद

ड) ज्ञानबटीस्टा कॅरेरी

  • अ) कॉस्मो द गारदा






प्रश्न 18. खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय ?  (SET 2023)

अ) ते विस्तारीत वसाहत आणि मूळ गाव संदर्भात अनुक्रमे वापरला जातो

ब) ते मूळ गाव आणि विस्तारीत वसाहत संदर्भात अनुक्रमे वापरला जातो

क) ते मालमत्ता धारण प्रकारांच्या संदर्भात वापरला जातो

ड) ते महसूल गोळा करण्याच्या पद्धतीशी संदर्भात आहे

  • ब) ते मूळ गाव आणि विस्तारीत वसाहत संदर्भात अनुक्रमे वापरला जातो






प्रश्न 19. कारुक हा कर _________ लागू होता.   (SET 2023)

अ) तेली

ब) गावातील कारागीर

क) गावातील याजक

ड) व्यापारी

  • ब) गावातील कारागीर





प्रश्न 20. हुंडी एक ________ होता. (SET 2023)

अ) देवाणघेवाणचा देयक

ब) वचनीय चिठ्ठी

क) खाणीतून बाजारपेठेत पाठवण्याची पद्धत

ड) सोने - चांदी लगदीच्या वाहतुकीचे माध्यम 

  • अ) देवाणघेवाणचा देयक









पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 



 

 

 

 



ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

Tuesday, January 28, 2025

SET/NET History 26 PYQ

ही पोस्ट सध्या अपडेट होत आहे. लवकरच परत येईल.

SET/NET History 26

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोणता प्रशासकीय पद नव्हता ?   (SET 2017 P3)

अ) पेशवा

ब) सुमंत

क) पंडितराव

ड) पंत - प्रतिनिधी

  • ड) पंत - प्रतिनिधी






  • प्रश्न 2. राज बल्लभ, घसिटी बेगम, शौकत जंग हे कोणाचे वैरी होते ?   (SET 2017 P3)

    अ) अलिवर्दी खान

    ब) सिराज - उद् - दौला

    क) मीर कासीम

    ड) नंद कुमार

  • ब) सिराज - उद् - दौला







  • प्रश्न 3. काव्येतिहास संग्रह, किताबखाना व चित्रशाळा यासारख्या प्रादेशिक भाषाविषयक कार्यांमध्ये कोणत्या महाराष्ट्रीय विचारवंताने कळीची भूमिका बजावली ?   (SET 2017 P3)

    अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर

    ब) कृष्णशास्त्री चिपळूणकर

    क) बाळशास्त्री जांभेकर

    ड) अहिताग्नी राजवाडे

  • अ) विष्णुशास्त्री चिपळूणकर







  • प्रश्न 4. खुस्रो नौरोजी काबराजी यांनी 1870 मध्ये मुंबईत ज्ञान प्रसारक मंडळी आणि ज्ञानोत्तेजक मंडळी यांची स्थापना केली. त्यांचे धोरण काय होते ?     (SET 2017 P3)

    अ) चित्रकलेत अभिरुची तयार करणे

    ब) संगीत कलेला प्रोत्साहन देणे

    क) वैज्ञानिक पुस्तकांचे प्रकाशन करणे

    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

  • ब) संगीत कलेला प्रोत्साहन देणे






  • प्रश्न 5. मराठा ऐक्येच्छु सभेचे संस्थापक कोण होते ?  (SET 2017 P3)

    अ) सीताराम केशव बोले

    ब) श्रीपतराव शिंदे

    क) नारायण मेघाजी लोखंडे

    ड) दिनकरराव जवळकर

  • क) नारायण मेघाजी लोखंडे






  • प्रश्न 6. पुढीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते ?  (SET 2017 P3)

    अ) ए. ओ. ह्यूम

    ब) जॉर्ज यूल

    क) विलियम वेडरबर्न

    ड) सर हेनरी कॉटन

  • अ) ए. ओ. ह्यूम







  • प्रश्न 7. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय नेत्याने 1935 मध्ये 'द इंडियन स्ट्रगल, 1920 - 34' हा ग्रंथ लिहिला ?   (SET 2017 P3)

    अ) पंडित जवाहरलाल नेहरू

    ब) पंडित मदन मोहन मालवीय

    क) नेताजी सुभाष चंद्र बोस

    ड) सी. राजगोपालाचारी

  • क) नेताजी सुभाष चंद्र बोस





  • प्रश्न 8.  या कवीने भगतसिंगाच्या हौतात्म्यावरून प्रेरणा घेऊन रचलेल्या 'मारे प्रपंचम' या काव्यात तेलुगू बोली भाषेचा सर्वप्रथम वापर केला.   (SET 2017 P3)

    अ) श्री श्री

    ब) आंदे श्री

    क) पिंगली नागेंद्रराव

    ड) मुहम्मद इस्माइल

  • अ) श्री श्री







  • प्रश्न 9. लेखक व साहित्यीक कृतींच्या जोड्या जुळवा :    (SET 2017 P3)

    यादी I

    (i) मुन्शी प्रेमचंद
    (ii) रवींद्रनाथ टागोर
    (iii) साळूबाई तांबवेकर
    (iv) कुंजविहारी

    यादी II 

    (a) मुलशीचा पाळणा
    (b) महाजनी सभ्यता
    (c) चार अध्याय
    (d) चंद्रप्रभा विरहवर्णन


    अ) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (b), (iv) - (a)

    ब) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (a), (iv) - (b)

    क) (i) - (b), (ii) - (c), (iii) - (d), (iv) - (a)

    ड) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (d), (iv) - (c)

  • क) (i) - (b), (ii) - (c), (iii) - (d), (iv) - (a)







  • प्रश्न 10. 1947 पर्यंत पायदळामध्ये कोणत्याही भारतीयाला ________ पेक्षा वरच्या हुद्यावर बढती मिळत नसे. ? (SET 2017 P3)

    अ) सुभेदार

    ब) मेजर

    क) ब्रिगेडिअर

    ड) कॅप्टन

  • अ) सुभेदार






  • प्रश्न 11. 'शिवराज्यभिषेक कल्पतरू' चा रचनाकार कोण होता ?  (SET 2018 P3)

    अ) गागा भट्ट

    ब) निश्चल पुरी

    क) अनिरुद्ध सरस्वती

    ड) कवी कलश

  • क) अनिरुद्ध सरस्वती







  • प्रश्न 12. भक्ती चळवळीतल्या संतांबद्दल खालील कोणते विधान चुकीचे आहे  ? (SET 2018 P3)

    अ) एक पत्नित्व, कुटुंबाची जबाबदारी सर्वांबरोबर प्रेम आणि करुणा सारखा चांगल्या वर्तनाबद्दल सर्व संतांनी विचार मांडले आहेत

    ब) सर्व संतांनी कोणालाही वैराग्य घ्यायला उत्तेजन दिले नाही

    क) योग्य आणि ज्ञान मार्गापेक्षा भक्तिमार्ग उत्तम आहे असे त्यांनी सांगितले

    ड) सर्व संतांचा चातुर्वर्णावर विश्वास नव्हता

  • ड) सर्व संतांचा चातुर्वर्णावर विश्वास नव्हता







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या विजयानंतर कृष्णदेवरायाने यवनराज्य स्थापनाचार्य हि पदवी धारण केली ?  (SET 2018 P3)

    अ) गुलबर्गा

    ब) बिदर

    क) बिजापूर

    ड) उमत्तुर

  • ब) बिदर






  • प्रश्न 14. 'आमुक्त माल्यद' हा तेलुगू भाषेतील ग्रंथ कोणी लिहिला ? (SET 2018 P3)

    अ) बुक

    ब) पहिला हरिहर

    क) देवराय दुसरा

    ड) कृष्णदेवराया

  • ड) कृष्णदेवराया






  • प्रश्न 15. 91 कलमी बखरीचे रचनाकार कोण होते ? (SET 2018 P3)

    अ) कृष्णाजी अनंत सभासद

    ब) रघुनाथ यादव चित्रगुप्त

    क) बाळाजी आवजी (छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस)

    ड) दत्ताजी त्रिमळ वाकनीस

  • ड) दत्ताजी त्रिमळ वाकनीस





  • प्रश्न 16. छत्रपती शिवाजी महाराजांचे महसूल धोरण खालीलपैकी कोणाच्या महसूल पद्धतीवर आधारित होते ?  (SET 2018 P3)

    अ) शेरशाह सूरी

    ब) मलिक काफूर

    क) मलिक अंबर

    ड) राजा मानसिंग

  • क) मलिक अंबर





  • प्रश्न 17. डच ईस्ट इंडिया कंपनीला _________ यावर्षी सनद मिळाली.  (SET 2018 P3)

    अ) 1601

    ब) 1602

    क) 1603

    ड) 1604

  • ब) 1602





  • प्रश्न 18. 'दस्तक' म्हणजे काय ?  (SET 2018 P3)

    अ) दंगल

    ब) करमुक्त व्यापार

    क) टपाल

    ड) बाजार

  • ब) करमुक्त व्यापार





  • प्रश्न 19. हा फ्रेंच लष्करी अधिकारी महादजी शिंदेच्या सैन्यात होता :   (SET 2018 P3)

    अ) डी बॉई (De Boigne)

    ब) ड्युप्लेक्स

    क) फ्रेयर

    ड) ब्राऊटन

  • अ) डी बॉई (De Boigne)




  • प्रश्न 20. मोरो विठ्ठल वाळवेकारांनी मराठीत भाषांतरीत केलेले 'निलदर्पण' (1860) चे मूळ लेखक कोण होते ?  (SET 2018 P3)

    अ) दीनबंधू मित्र

    ब) बंकिमचंद्र चॅटर्जी

    क) विष्णुदास भावे

    ड) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

  • अ) दीनबंधू मित्र








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Monday, January 27, 2025

    SET/NET History 25 PYQ

    SET/NET History 25

    Share करायला विसरू नका.......................




    प्रश्न 1. कोणत्या सत्याग्रहात सरदार वल्लभभाई पटेलांनी मुख्य भूमिका बजावली ?   (SET 2016 P2)

    अ) खेडा

    ब) बार्डोली

    क) खिलाफत

    ड) सविनय कायदाभंगाची चळवळ

  • ब) बार्डोली






  • प्रश्न 2. मार्च 1946 या वर्षी आलेल्या कॅबिनेट मिशनचे खालीलपैकी कोण सदस्य होते  ?  (SET 2016 P2)

    अ) ए. व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड अॅटली

    ब) लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, लॉर्ड अॅटली

    क) लॉर्ड अॅटली, ए. व्ही. अलेक्झांडर, सर स्टॅफोर्ड क्रिप्स

    ड) ए. व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स

  • ड) ए. व्ही. अलेक्झांडर, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स







  • प्रश्न 3. पंचशील तत्वे भारत आणि चीनमध्ये जाहीर करण्यात आली, यावर्षी :  (SET 2016 P2)

    अ) 1947

    ब) 1954

    क) 1950

    ड) 1955

  • ब) 1954







  • प्रश्न 4. व्यापारवादाचा संबंध याच्याशी येतो :   (SET 2016 P2)

    अ) निर्यातीस उत्तेजन आणि आयातीवर बंधने घालणे

    ब) धार्मिक विचारांचा प्रसार करणे

    क) अॅडम स्मिथच्या विचारांचा प्रसार करणे

    ड) राजकीय विचारांचा प्रचार करणे

  • अ) निर्यातीस उत्तेजन आणि आयातीवर बंधने घालणे






  • प्रश्न 5. कामागाता मारू या जहाजाचे प्रमुख अधिकारी हे होते :  (SET 2016 P2)

    अ) गुरुदित सिंग

    ब) भगत सिंग

    क) सरदार उद्धम सिंग

    ड) करण सिंग

  • अ) गुरुदित सिंग






  • प्रश्न 6. भारतात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कर्नल लुई ए. जॉन्सन यांनी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले ? (SET 2016 P2)

    अ) इंग्लंड

    ब) अमेरिका

    क) फ्रान्स

    ड) सोव्हिएत रशिया

  • ब) अमेरिका







  • प्रश्न 7. अलिप्ततावादी चळवळीची पहिली परिषद या ठिकाणी पार पडली :  (SET 2016 P2)

    अ) कैरो

    ब) बेलग्रेड

    क) नवी दिल्ली

    ड) जकार्ता

  • ब) बेलग्रेड





  • प्रश्न 8. मोझांबीक आणि अंगोला यांना कोणाकडून व कधी स्वातंत्र्य प्राप्त झाले ?  (SET 2016 P2)

    अ) पोर्तुगाल इ. स. 1968

    ब) स्पेन इ. स. 1976

    क) स्पेन इ. स. 1997

    ड) पोर्तुगाल इ. स. 1975

  • ड) पोर्तुगाल इ. स. 1975







  • प्रश्न 9. या दिवशी झोकोस्लोव्हाकीया या राष्ट्राची झेक आणि स्लोव्हॅक गणराज्य म्हणून विभागणी करण्यात आली :   (SET 2016 P2)

    अ) 1 जानेवारी 1993

    ब) 22 डिसेंबर 1990

    क) 14 एप्रिल 1997

    ड) 2 ऑक्टोबर 1989

  • अ) 1 जानेवारी 1993







  • प्रश्न 10. खंडीत - राज्य सिद्धांत (Segmentary State Theory) कोणी मांडला ? (SET 2016 P2)

    अ) कार्ल मार्क्स

    ब) लॉर्ड कॉर्नवालीस

    क) बर्टन स्टाईन

    ड) हेगेल

  • क) बर्टन स्टाईन






  • प्रश्न 11. वांदीवॉशची लढाई यांच्यात झाली होती :  (SET 2016 P3)

    अ) इंग्रज व फ्रेंच

    ब) इंग्रज व मराठे

    क) इंग्रज व हैदरअली

    ड) इंग्रज व कर्नाटकी नवाब

  • अ) इंग्रज व फ्रेंच







  • प्रश्न 12. 1784 ला बंगालच्या एशियाटीक सोसायटीची स्थापना कोणी केली ? (SET 2016 P3)

    अ) वॉरन हेस्टिंग्ज

    ब) विलियम जोन्स

    क) हेनरी प्रिन्सेप

    ड) डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर

  • ब) विलियम जोन्स







  • प्रश्न 13. जोड्या लावा आणि खालील संकेतांकातून योग्य पर्याय निवडा :   (SET 2016 P3)

    (I) वेदांकडे परत चला            (a) कवी इक्बाल

    (II) आपल्या तत्वज्ञान व        (b) स्वामी विवेकानंद
    अधिकभौतिकतेने आपण
    जग जिंकले पाहिजे

    (III) नियतीशी करार            (c) स्वामी दयानंद

    (IV) इन्किलाब जिंदाबाद        (d) जवाहरलाल नेहरू

                                            (e) महात्मा गांधी


    अ) (I) - (c), (II) - (b), (III) - (d), (IV) - (a)

    ब) (I) - (a), (II) - (c), (III) - (b), (IV) - (e)

    क) (I) - (e), (II) - (d), (III) - (b), (IV) - (c)

    ड) (I) - (b), (II) - (d), (III) - (c), (IV) - (e)

  • अ) (I) - (c), (II) - (b), (III) - (d), (IV) - (a)






  • प्रश्न 14. 'देशभक्ती हाच धर्म आहे आणि धर्म म्हणजे भारताबद्दलचे प्रेम' असे कोणी म्हटले ? (SET 2016 P3)

    अ) बंकिमचंद्र चॅटर्जी

    ब) बाळ गंगाधर टिळक

    क) विवेकानंद

    ड) एम. जी. रानडे

  • अ) बंकिमचंद्र चॅटर्जी






  • प्रश्न 15. शेतीच्या व्यापारीकरणासाठी खेळत्या भांडवलाच्या उपलब्धीची आवश्यकता असण्याचे खालीलपैकी कोणते कारण नव्हते ? (SET 2016 P3)

    अ) व्यापारी कृषी उत्पादनाला जास्तीच्या भांडवलाची गरज होती

    ब) वस्तुरूपाने कर देण्याची सोय होती

    क) शेती करण्याआधी धान्यखरेदी करीता शेतकऱ्याला कर्जावू रक्कमा घ्याव्या लागत

    ड) नगदी पिकांचा व्यापार दूरदेशी होत असल्याकारणाने पैश्याच्या उपलब्धीची निकड होती

  • ब) वस्तुरूपाने कर देण्याची सोय होती





  • प्रश्न 16. गांधीजींची चंपारण्य चळवळ कश्यासाठी सुरु झाली होती ?  (SET 2016 P3)

    अ) हरिजनांच्या हक्क संरक्षणासाठी

    ब) महिलांच्या हक्क संरक्षणासाठी

    क) कामगारांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी

    ड) नीळ कामगारांच्या समस्यापुर्तीसाठी 

  • ड) नीळ कामगारांच्या समस्यापूर्तीसाठी





  • प्रश्न 17. सन्मानदर्शक सर हि पदवी रबिन्द्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांना परत केली कारण :   (SET 2016 P3)

    अ) वंगभंग

    ब) असहकार चळवळ

    क) जालियनवाला बाग हत्याकांड

    ड) सविनय कायदेभंगाची चळवळ

  • क) जालियनवाला बाग हत्याकांड





  • प्रश्न 18. 'पूर्ण स्वराज्य' हे आपले उद्दिष्ट्य आहे असे जाहीर करणारा ठराव काँग्रेसने पास केला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?  (SET 2016 P3)

    अ) मोतीलाल नेहरू

    ब) बाळ गंगाधर टिळक

    क) जवाहरलाल नेहरू

    ड) अरबिंद घोष

  • क) जवाहरलाल नेहरू





  • प्रश्न 19. कोणाच्या अध्यक्षतेखाली 1920 ला बॉम्बे येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले ?  (SET 2016 P3)

    अ) व्ही. व्ही. गिरी

    ब) लाला लाजपत राय

    क) जवाहरलाल नेहरू

    ड) न. मा. जोशी

  • ब) लाला लाजपत राय




  • प्रश्न 20. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते नव्हते ?  (SET 2016 P3)

    अ) लाला लाजपत राय

    ब) बाळ गंगाधर टिळक

    क) गोपाळ कृष्ण गोखले

    ड) बिपीनचंद्र पाल

  • क) गोपाळ कृष्ण गोखले








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus | #mpsc