Monday, March 24, 2025

One Liner SET/NET Marathi

One Liner SET/NET Marathi


प्रश्न 1. 'झुलवा' या कादंबरीमुळे __________ यांना झुलवाकार म्हणून ओळख प्राप्त झाली.

➣ उत्तम बंडू तुपे



प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे.

➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा)

*** Notes -

  • ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते  
  • मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई

  • साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी)
  • साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला
  • साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी)
  • अधिक माहितीसाठी 👉Source




प्रश्न 3.'धुमसणारं शहर', 'अस्पृश्य सूर्य', 'कार्यकर्ती', 'दुबई दुबई' या कादंबऱ्या आणि 'किलावेनमानीची रात्र' हि दिर्घ कविता कोणाची ?

 राजाराम प्रभाकर राजवाडे



प्रश्न 4. 'साहित्य संस्कृती मंडळा'चे प्रथम अध्यक्ष कोण होते.

➣ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

***Notes - 

  • स्थापना - 19 नोव्हेंबर 1960
  • प्रथम अध्यक्ष - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • सध्याचे अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे (26 डिसेंबर 2018 पासून)
  • अधिक माहितीसाठी 👉 Source Link


  • प्रश्न 5. 'निशिगंध' या टोपणनावाने कोणी लेखन केले आहे ?

    ➣ रामचंद्र श्रीपाद जोग



    प्रश्न 6.'प्रेमगानमूलक सिद्धांत' कोणत्या भाषाशास्त्रज्ञाने मांडला ?

    ➣➣➣ ऑटो जेस्परसन



    प्रश्न 7. 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?

    ➣ दिल्ली



    प्रश्न 8.'पानीपतची बखर' व 'भाऊसाहेबांची कैफियत' चे बखरकार कोण ?

    ➣ रघुनाथ यादव चित्रगुप्त व त्रिंबक सदाशिव पुरंदरे



    प्रश्न 9. कोणी त्यांच्या 'संसार - सोपान (1931)' ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणाची सुरुवात "गृहिणी गृहाची शोभा । गृहिणी सुखाचा गाभा । गृहिणी आनंदाचा ठेवा । ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा ।।" अशी केली आहे ?

    ➣ गिरीजाबाई केळकर 

    ***Notes 

  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष (1928)
  • 👉 Source Link


  • प्रश्न 10. आसाराम लोमटे यांच्या कोणत्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

    ➣ आलोक (साहित्य अकादमी पुरस्कार 2016)



    प्रश्न 11. गो. नि. दांडेकर (गोपाळ निळकंठ दांडेकर) लिखित 'शितू (1853)' कादंबरी _________ च्या पार्श्वभूमीवरची आहे.

    ➣ कोकण



    प्रश्न 12. नवीन कवितेचे प्रतीनिधी म्हणून गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी केशवसुत, टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांचा __________ असा उल्लेख केलेला आहे.

    ➣ आधुनिक कविपंचक

    ***Notes 

    • टिळक - नारायण वामन टिळक
    • केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
    • विनायक - विनायक जनार्दन करंदीकर
    • गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी
    • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
    • 👉 Source Link



    प्रश्न 13. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या 'आधुनिक कविपंचक' पुस्तकास कोणी प्रस्तावना लिहिली आहे ?

    ➣ नरसिंह चिंतामण केळकर (न. चि. केळकर)



    प्रश्न 14. 'विश्व मराठी संमेलन' कोणामार्फत आयोजित केले जाते ?

    ➣ महाराष्ट्र राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत

    ***Notes 

    • 1 ले विश्व मराठी संमेलन 2023 - वरळी, मुंबई. 
    • 2 रे विश्व मराठी संमेलन 2024 - नवी मुंबई. 
    • 3 रे विश्व मराठी संमेलन 2025 - फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे. 


    प्रश्न 15. 13 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते ?

     शिर्डी (मार्च 2025)

    ***संमेलनाध्यक्ष - ह. भ. प. संजय महाराज देहुकर



    प्रश्न 16. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोणामार्फत आयोजित केले जाते ?

    ➣ वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र.



    प्रश्न 17. मोरोपंतांच्या 'श्लोक केकावली' वर ___________ यांनी 'यशोदा पांडुरंगी' हि टिका लिहिली, हि टीका म्हणजे समीक्षात्मक लेख होय.

    ➣ दादोबा पांडुरंग तर्खडकर



    प्रश्न 18. गोपाळ हरी देशमुखांनी भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' साप्ताहिकातून जी 108 पत्रे लिहिली,  त्यांना  __________ म्हटली जातात.

    ➣ शतपत्रे



    प्रश्न 19. (2024) 59 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

    ➣ विनोद कुमार शुक्ला (भाषा हिंदी)

    ***Notes 

    58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 
    1. रामभद्राचार्य (संस्कृत भाषा)
    2. गुलजार (उर्दू भाषा)

    57 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022
    दामोदर मौजो (कोंकणी भाषा)



    प्रश्न 20. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?

    ➣ चरित्रचन्द्र (1938)



    प्रश्न 21. पोवारी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ?

    ➣ सु. बा. कुलकर्णी

    👉 Source Link


    प्रश्न 22. डॉ. विजया चिटणीस यांनी कोणत्या बोलीचा अभ्यास केला ?

    ➣ खानदेशी बोली










    1 comment: