सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 12
SET NET Marathi Paper 2
set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq
प्रश्न 1. मूकनायक हे नाटक कोणी लिहिले ? (net Jan 2017)
अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
ब) मामा वरेरकर
क) प्रल्हाद केशव अत्रे
ड) मो. ग. रांगणेकर
- अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
प्रश्न 2. आद्य लघुकथाकार म्हणून कोण प्रसिद्धीस आले ? (NET Nov 2017)
अ) वामन चोरघडे
ब) आनंद यादव
क) कॅ. गो. गं. लिमये
ड) जी. ए. कुलकर्णी
- अ) वामन चोरघडे
प्रश्न 3. सुत्रपाठ या ग्रंथाचे विदेशी अभ्यासक कोण ? (net Jan 2017)
अ) गुंथर सोंथायमर
ब) आय. एम. पी. रेसाइड
क) एलिनॉर झेलियट
ड) अॅन फेल्डहाउस
- ड) अॅन फेल्डहाउस
प्रश्न 4. 'हं हं आणि हंहंहं' या बालनाटकाचे लेखक कोण ? (NET Nov 2017)
अ) भालबा केळकर
ब) दिनकर देशपांडे
क) युधिष्ठिर जोशी
ड) विजय तेंडुलकर
- ब) दिनकर देशपांडे
प्रश्न 5. 'अख्येर अधिकार' या मुळ बंगाली भाषेतील पण मराठीत अनुवादित झालेल्या कादंबरीचे अनुवादक कोण ? (NET Nov 2017)
अ) मृणालिनी केळकर
ब) सरोजिनी कमतनूरकर
क) इंदुमती शेवडे
ड) प्रभा श्रीनिवास
- ड) प्रभा श्रीनिवास
प्रश्न 6. मराठी भाषेच्या उपपत्तीच्या निमित्ताने 1922त ‘विविधज्ञानविस्तारा’त लिहिलेल्या लेखाच्या आधारे मराठीतील गाजलेला कोणता वाद निर्माण झाला होता ? (net Jan 2017)
अ) राजवाडे - गुणे वाद
ब) वैद्य - गुणे वाद
क) आगरकर - टिळक वाद
ड) केतकर - प्रियोळकर वाद
- ब) वैद्य - गुणे वाद
प्रश्न 7. साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहारभाषेपेक्षा मुख्यत्वे कोणते वेगळेपण असते ? (SET 2020)
अ) शब्दसंग्रहाचा वापर
ब) व्याकरणिक रचना
क) ध्वनींची योजना
ड) अर्थांची प्रसरणशीलता
- ड) अर्थांची प्रसरणशीलता
प्रश्न 8. “दावलमलका पूजिती गदा | वर्षा फकीर होती एकदा |”
- हे चरण कोणाच्या काव्यातील आहे ? (net Jan 2017)
अ) समर्थ रामदासांनी ‘शिवाजी महाराजांना पाठविलेल्या पत्रातील’
ब) संत एकनाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील
क) शेख महंमदाच्या ‘योगसंग्रामा’तील
ड) शहामुनीच्या ‘सिद्धांतबोधा’तील
- ब) संत एकनाथांच्या ‘हिंदुतुर्कसंवादा’तील
प्रश्न 9. विशेष्याच्या नंतर येणाऱ्या विशेषणास काय म्हणतात ? (SET 2020)
अ) गुणविशेषण
ब) सिद्धविशेषण
क) अधिविशेषण
ड) विधीविशेषण
- ड) विधीविशेषण
प्रश्न 10. समाजशास्त्रीय समीक्षेचे पहिल्यांदा सिद्धांतन कोणी केले ? (net Jan 2017)
अ) कार्ल मार्क्स
ब) प्लेटो
क) व्हीको
ड) हिपोलीन तेन
- ड) हिपोलीन तेन
प्रश्न 11. कला किंवा सौंदर्य ही स्वभावतःच एक वादग्रस्त संकल्पना आहे. ही भुमिका कोणाची ? (net Jan 2017)
अ) होरेस
ब) कांट
क) हेगेल
ड) गॅली
- ड) गॅली
प्रश्न 12. “शत जन्म शोधताना” या नाट्यपदाचा कर्ता कोण ? (NET Nov 2017)
अ) शंकर बाळाजी शास्त्री
ब) विनायक दामोदर सावरकर
क) गोविंद बल्लाळ देवल
ड) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
- अ) शंकर बाळाजी शास्त्री
प्रश्न 13. समीक्षक व त्यांचे समीक्षा ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा. (net Jan 2017)
i) परंपरा आणि नवता 1) के. रं. शिरवाडकर
ii) शक्तिसौष्ठव 2) गो. म. कुलकर्णी
iii) साद - पडसाद 3) गो. वि. करंदीकर
vi) किमया 4) द. ग. गोडसे
5) माधव आचवल
अ) i – 4, ii – 2, iii – 5, vi - 1
ब) i – 3, ii – 4, iii – 2, vi - 5
क) i – 1, ii – 3, iii – 4, vi - 2
ड) i – 4, ii – 5, iii – 2, vi - 1
- ब) i – 3, ii – 4, iii – 2, vi - 5
प्रश्न 14. संस्कृत भाषेतील ‘सिंहासनबत्तिशी’ मराठीत कोणी अनुवादित केली ? (NET Nov 2017)
अ) श्रीपाद जोशी
ब) का. अ. जोशी
क) स. आ. जोगळेकर
ड) गं. ना. जोगळेकर
- क) स. आ. जोगळेकर
प्रश्न 15. मर्ढेकर हे मराठीतील महत्त्वाचे कलावादी समीक्षक असले, तरी ललित लेखक म्हणून मर्ढेकर जीवनवादीच ठरतात. (NET Nov 2017)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
- अ) संपूर्ण विधान बरोबर
प्रश्न 16. मराठी वाड्मयीन संस्कृतीत कोणत्या दोन प्रक्रियांची सरमिसळ होत गेली ? (SET 2020)
अ) भाषांतर आणि टीका
ब) टीका आणि भाष्य
क) पाश्चात्यीकरण आणि संस्कृतीकरण
ड) प्रभाव आणि प्रभव
- क) पाश्चात्यीकरण आणि संस्कृतीकरण
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 1 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 10 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी(Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment