सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 14
SET NET Marathi Paper 2
set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq
प्रश्न 1. ‘कंपॅरेटीव्ह लिटरेचर : थिअरी अँड प्रॅक्टिस’ या ग्रंथाचे संपादन कोणी केले ? (SET 2021)
अ) स्वपन मजुमदार आणि अमिय देव
ब) वसंत बापट आणि चंद्रकांत बांदिवडेकर
क) भालचंद्र नेमाडे आणि शिशिरकुमार दास
ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास
- ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास
प्रश्न 2. "भटो : तुम्ही निरंतर काइसयाचें मनन करीत असा :" असा प्रश्न नागदेवाचार्यांना कोणी विचारला ? (NET Nov 2017)
अ) महदाइसा
ब) म्हाइंभट
क) लक्ष्मींद्रभट
ड) केशिराजव्यास
- ब) म्हाइंभट
प्रश्न 3. अंबरहुसेनी ही कोणत्या ग्रंथावरील टीका होय ? (NET Nov 2017)
अ) अमृतानुभव
ब) चतु:श्लोकी भागवत
क) गीता
ड) आर्याभारत
- क) गीता
प्रश्न 4. 'ऐतिह्य प्रतिभेचा कवी' म्हणून मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला ? (NET Nov 2017)
अ) कृष्णशास्त्री चिपळूणकर
ब) वि. ल. भावे
क) वि. का. राजवाडे
ड) बा. अ. भिडे
- क) वि. का. राजवाडे
प्रश्न 5. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कोणत्या नाटकाच्या पुस्तकात इंग्रजी आशावादी कवी रॉबर्ट ब्राऊनिंग यांचा संदर्भ घेतला ? (NET Nov 2017)
अ) तुझे आहे तुजपाशी
ब) सुंदर मी होणार
क) तीन पैशांचा तमाशा
ड) ती फुलराणी
- ब) सुंदर मी होणार
प्रश्न 6. पुढीलपैकी कोणत्या भाषांतरित नाटकावर मराठी लोककलांचा प्रभाव दिसून येतो ? (SET 2021)
अ) अजब न्याय वर्तुळाचा - चि. त्र्यं. खानोलकर
ब) झुंझारराव - गो. ब. देवल
क) विकारविलसित - गो. ग. आगरकर
ड) ती फुलराणी - पु. ल. देशपांडे
- अ) अजब न्याय वर्तुळाचा - चि. त्र्यं. खानोलकर
प्रश्न 7. लोककथेच्या अभ्यासातील संप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गाता कोण ? (SET 2021)
अ) अँड्र्यू लँग
ब) एडवर्ड टायलर
क) थिओडोर बेनफे
ड) जेम्स फ्रेझर
- क) थिओडोर बेनफे
प्रश्न 8. ‘यमुना पर्यटन’ ही पहिली भारतीय कादंबरी असली तरी ‘पहिली मराठी प्रगल्भ कादंबरी’ असे कोणत्या कादंबरीस म्हणता येईल ? (SET 2021)
अ) मंजुघोषा
ब) मुक्तामाला
क) पण लक्ष्यात कोण घेतो ?
ड) शिरस्तेदार
- क) पण लक्ष्यात कोण घेतो ?
प्रश्न 9. ‘नारायणराव पेशवे वध’ हे काव्य कोणाचे ? (net Jan 2017)
अ) गोविंद वासुदेव कानिटकर
ब) मोरो गणेश लेंढे
क) पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी
ड) गंगाधर रामचंद्र मोगरे
- अ) गोविंद वासुदेव कानिटकर
प्रश्न 10. ‘मॉरफोलॉजी ऑफ द फोकटेल’ हा ग्रंथ कोणाचा ? (SET 2021)
अ) फँज बोआस
ब) व्लादिमिर प्रॉप
क) अँटी अर्ने
ड) जेकब ग्रीम
- ब) व्लादिमिर प्रॉप
प्रश्न 11. बोलीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वांशिक अर्थमीमांसा करावी लागते तसेच सामाजिक परिमाणांच्या ऐवजी भौगोलिक सीमारेषा निश्चित कराव्या लागतात. (NET Nov 2017)
अ) संपूर्ण विधान चूक
ब) संपूर्ण विधान बरोबर
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
- क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 12. प्लेटोने कोणत्या ग्रंथात कवी व काव्य विषयक भूमिका मांडली आहे ? (NET Nov 2017)
अ) सिंपोझियम
ब) रिपब्लिक
क) फेड्रस
ड) ॲपॉलाजी
- ब) रिपब्लिक
प्रश्न 13. ‘राजाराम विठ्ठल सौंदणीकर’ हा कोणत्या कादंबरीचा नायक आहे ? (SET 2021)
अ) गावगुंड
ब) बनगरवाडी
क) टारफुला
ड) आई आहे शेतात
- ब) बनगरवाडी
प्रश्न 14. ‘रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्दार्थ म्हणजे काव्य’ - ही व्याख्या कोणाची ? (NET Nov 2017)
अ) भामह
ब) दण्डी
क) कुंतक
ड) जगन्नाथ
- ड) जगन्नाथ
प्रश्न 15. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाने मार्क्सवादी समीक्षा विचार महाराष्ट्राला प्रथम परिचय करून दिला ? (NET Nov 2017)
अ) साहित्य आणि समाजजीवन
ब) महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य
क) नवी मूल्ये
ड) संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती
- अ) साहित्य आणि समाजजीवन
प्रश्न 16. ल. रा. पांगारकर यांच्या वाद्मयेतिहासात पुढीलपैकी कोणता दृष्टीकोन स्विकारलेला आहे ? (SET 2021)
अ) व्यक्तिकेंद्री
ब) राजवटकेंद्री
क) साहित्यप्रकारकेंद्री
ड) कलाकृतीकेंद्री
- अ) व्यक्तिकेंद्री
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 3 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 SET NET History PYQ 26 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment