प्रश्न १. ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने लेखन कोणी केले ?
उत्तर >>> दिनकर गंगाधर केळकर
प्रश्न २. इंग्रज कवी सर वॉल्टर स्कॉट ह्याच्या ‘लेडी ऑफ द लेक’ ह्या काव्याच्या आधारे रचिलेले ‘दैवसेनी’ या खंडकाव्याचे रचनाकार कोण?
उत्तर >>> बजाबा रामचंद्र प्रधान
प्रश्न ३. नाट्यछटाकार ‘दिवाकर’ यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर >>> शंकर काशिनाथ गर्गे
प्रश्न ४. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा ‘सॉनेट’ काव्यप्रकार हा _____ या नावाने मराठीत लोकप्रिय आहे.
उत्तर >>> सुनीत
प्रश्न ५. ‘आधुनिक मराठी काव्याचे जनक’ म्हणून कोणास संबोधले जाते?
उत्तर >>> केशवसुत(कृष्णाजी केशव दामले)
प्रश्न ६. ‘काव्यप्रकाश’ ग्रंथाचा कर्ता कोण?
उत्तर >>> मम्मट
प्रश्न ७. ‘अपौरुषेय वाग्द्मय’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर >>> कमलाबाई देशपांडे
प्रश्न ८. ‘सामूहिक नेणीव’ ही संकल्पना कोणी मांडली आहे?
उत्तर >>> कार्ल युंग
प्रश्न ९. ‘कुसुमांजली’ काव्यसंग्रहाचे रचेते कोण?
उत्तर >>> विष्णू मोरेश्वर महाजनी
प्रश्न १०. ‘धनुर्धारी’ टोपणनावाने लेखन कोणी केले?
उत्तर >>> रा.वि. टिकेकर
प्रश्न ११. ‘काव्यस्य आत्मा ध्वनी:|’ हा विचार कोणी सांगितला आहे?
उत्तर >>> आनंदवर्धन
प्रश्न १२. मराठीतील मानले जाणारे पहिले स्वतंत्र ऐतिहासिक नाटक ‘थोरले माधवराव पेशवे(1861)’ कोणी लिहिले आहे?
उत्तर >>> वि.ज. किर्तने(विनायक जनार्दन किर्तने)
प्रश्न १३. ‘बाळकराम’ या टोपणनावाने विनोदीलेखन कोणी केले ?
उत्तर >>> राम गणेश गडकरी
प्रश्न १४. 1851 मध्ये प्रसिद्ध झालेले मराठीतील पहिले भाषांतरीत नाटक म्हणून कोणते नाटक मानले जाते?
उत्तर >>> प्रबोध चंद्रोदय
प्रश्न १५. छंदशास्त्रावरील ‘वृत्तावतंस’ व ‘वृत्त मुक्तावली’ ग्रंथकार ______ ?
उत्तर >>> निरंजनमाधव
प्रश्न १६. ‘दुर्गा’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मृच्छकटिक’, ‘झुंझारराव’, ‘संगीत शारदा’ नाटककार कोण?
उत्तर >>> गोविंद बल्लाळ देवल
प्रश्न १७. ‘मराठी नवकवितेचे जनक’ म्हणून कोण ओळखले जाते?
उत्तर >>> बा.सी.मर्ढेकर(बाळ सिताराम मर्ढेकर)
प्रश्न १८.भिन्न भिन्न वृत्तांमधील ‘ज्ञानेश्वरविजय’ आणि ‘चिदबोध रामायण’ या ग्रंथांची रचना कोणी केली आहे?
उत्तर >>> निरंजनमाधव
प्रश्न १९. ‘रसगंगाधर’ ग्रंथाचा कर्ता कोण?
उत्तर >>> जगन्नाथ
प्रश्न २०. काव्यशास्त्राचे जुने नाव काय?
उत्तर >>> अलंकारशास्त्र
प्रश्न २१. ‘तन्मयानंद बोध’, ‘विचारचंद्रिका’, ‘चिन्मयानंद बोध’ रचनाकार कोण?
उत्तर >>> कृष्णदयार्णव
प्रश्न २२. ‘वाक्यं रसात्मकं काव्यम् |’ असे काव्य लक्षण कोणी सांगितले?
उत्तर >>> विश्वनाथ
प्रश्न २३. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात किती रसांचा उल्लेख केला आहे?
उत्तर >>> आठ
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 SET NET मराठी PYQ 23 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 20 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 4

No comments:
Post a Comment