चालू घडामोडी / Current Affairs marathi 14

प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये चेन्नईत आयोजित करण्यात आलेला 'जा माता (Ja Maata)'कोणत्या दोन देशांचा संयुक्त सागरी सराव आहे ? (#2025)

उत्तर➣ भारत आणि जपान

*** Notes -

जपानी भाषेमध्ये 'जा माता'चा अर्थ आहे “पुन्हा भेटू”

संयुक्त सागरी सरावातील जपानी जहाजाचे नाव: JCGS इत्सुकुशिमा

प्रश्न 2. RAW च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#jun2025)

उत्तर➣ IPS पराग जैन

प्रश्न 3. जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) गुंतवणुकीत भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025)

उत्तर➣ 10 वा

*** Notes -

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये ११,९४३ कोटी रुपयांच्या (US$ १.४ अब्ज) खाजगी गुंतवणुकीसह भारत १० व्या क्रमांकावर आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 4. 'NATO शिखर परिषद 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#jun2025)

उत्तर➣ द हेग, नेदरलँड

*** Notes -

NATO - North Atlantic Treaty Organization

4 एप्रिल 1949 रोजी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील 12 देशांनी मिळून नाटोची स्थापना केली.

👉 प्रश्न 19. नाटो संघटनेचा 32 वा सदस्य देश कोणता ?

प्रश्न 5. भारतातील पहिला Sic सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट _________ मध्ये उभारला जाणार आहे. (#nov2025)

उत्तर➣ भुवनेश्वर, ओडिशा

*** Notes -

नोव्हेंबर २०२५ मध्ये, ओडिशाचे मुख्यमंत्री (मुख्यमंत्री) मोहनचरण माझी यांनी ओडिशातील भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली येथे भारतातील पहिल्या एंड-टू-एंड सिलिकॉन कार्बाइड ( SiC) सेमीकंडक्टरचे उद्घाटन केले

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 6. सातही खंडांवरील सर्वोच्च शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण ठरला आहे ?

उत्तर➣ विश्वनाथ कार्तिकेय पदकांती (वय 16 वर्षे)

*** Notes -

त्यांच्या आधी, काम्या कार्तिकेयन ही वयाच्या 17 व्या वर्षी सात शिखरे सर करणारी सर्वात तरुण भारतीय होती. सर्व सात शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती अमेरिकन गिर्यारोहक जॉर्डन रोमेरो आहे, ज्याने वयाच्या 15 व्या वर्षी हा टप्पा गाठला.

प्रश्न 7. जगातील पहिला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्तरावरील ई-मिथेनॉल प्लांट कुठे सुरु करण्यात आला आहे? (#2025)

उत्तर➣ कॅसॉ, डेन्मार्क (Kassø, Denmark)

प्रश्न 8. 'हरमनप्रीत सिंग आणि सविता पुनिया' यांना कोणत्या खेळासाठी सर्वोत्त्तम खेळाडू म्हणून 'बलबीर सिंग पुरस्काराने' गौरविण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ हॉकी

*** Notes -

नवी दिल्ली येथे झालेल्या 'हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024' मध्ये हरमनप्रीत सिंग आणि सविता पुनिया यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा बलबीर सिंग सीनियर पुरस्कार जिंकला.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 9. A23a हा जगातील सर्वात मोठा हिमखंड सध्या कोणत्या महासागरात आहे ? (#2025)

उत्तर➣ दक्षिण महासागर

प्रश्न 10. 'भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 (Corruption Perceptions Index - CPI)' नुसार 180 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025)

उत्तर➣ 96

*** Notes -

भारताचा क्रमांक 2023 - 93, 2022 - 85

2024 मध्ये भारताचा स्कोअर 38 पर्यंत घसरला, जो 2023 मध्ये 39 आणि 2022 मध्ये 40 होता.

निर्देशांक 0 ते 100 पर्यंतच्या स्केलचा वापर करतो, जिथे: 0 हा अत्यंत भ्रष्ट असल्याचे दर्शवितो, 100 हा भ्रष्टाचारमुक्त दर्शवतो.

शेजाऱ्यांशी तुलना : क्रमांक अनुक्रमे, 76 - चीन, 121 - श्रीलंका, 135 - पाकिस्तान, 149 - बांगलादेश

प्रश्न 11. देशातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ? (#jun2025)

उत्तर➣ मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गोविंदगड येथे

*** Notes -

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA) मध्य प्रदेशातील रेवा येथे देशातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र स्थापन करण्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे .

प्रश्न 12. 'स्पोर्टस्टार एसेस पुरस्कार 2025 (Sportstar Aces Awards 2025)' या सोहळ्यात 'स्पोर्टसस्टार ऑफ द इयर (पुरुष)' ____________ आणि स्पोर्टसस्टार ऑफ द इयर (महिला)' __________ यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. (#2025)

उत्तर➣ स्पोर्ट्सस्टार ऑफ द इयर (पुरुष): पीआर श्रीजेश (हॉकी)

स्पोर्ट्सस्टार ऑफ द इयर (महिला): मनू भाकर (नेमबाजी)

प्रश्न 13. राजस्थानमधील अजमेर येथील कोणत्या तलावाचे नाव बदलून आता 'वरूण सागर' असे ठेवण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ फॉय सागर (Foy Sagar)

*** Notes -

ब्रिटिश अभियंता श्री. फॉय यांच्या नावावरून या प्रकल्पाचे मूळ नाव ठेवण्यात आले होते. ब्रिटिश काळात 1892 साली दुष्काळ निवारण प्रकल्प म्हणून याची उभारणी करण्यात आली.

प्रश्न 14. राजस्थानमधील अजमेर येथील 113 वर्षे जुन्या 'किंग एडवर्ड मेमोरियल (रेस्ट हाऊस)'चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ महर्षी दयानंद विश्रांत गृह

*** Notes -

ब्रिटिश राजवटीतील 'राजा एडवर्ड सातवा' याच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आले होते. आता आर्य समाजाचे संस्थापक 'महर्षी दयानंद सरस्वती' यांच्या स्मरणार्थ, ज्यांची अजमेर येथे समाधी आहे, या ठिकाणाचे नाव बदलण्यात आले.

प्रश्न 15. भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित 'जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प (Indigenous Automated Bio-Medical Waste Treatment Plant)' कोठे सुरु करण्यात आला आहे ? (#2025)

उत्तर➣ एम्स (AIIMS) नवी दिल्ली

*** Notes -

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील एम्स येथे भारतातील पहिल्या स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले.

याचे नाव 'सृजनम' (Sṛjanam) असे ठेवण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 16. 2025 मध्ये झालेल्या 48 व्या 'मिसेस युनिव्हर्स (Mrs. Universe) 2025' स्पर्धेचा खिताब कोणी जिंकला आहे ? (#2025)

उत्तर➣ शेरी सिंग (भारतीय)

*** Notes -

फिलिपीन्सची राजधानी मनिला येथील 'ओकाडा' येथे 'मिसेस युनिव्हर्स'ची 48 वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मिसेस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी शेरी सिंग ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.

प्रश्न 17. 2025 मध्ये झालेली 'मिस युनिवर्स इंडिया (Miss. Universe India) 2025' स्पर्धा कोणी जिंकली आहे ? (#2025)

उत्तर➣ मणिका विश्वकर्मा

*** Notes -

ठिकाण - जयपूर, राजस्थान.

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रिया सिंघा

प्रश्न 18. 78 व्या 'ब्रिटिश अकादमी फिल्म अवार्ड्स (बाफ्टा) 2025 (BAFTA Awards 2025)' मध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ? (#2025)

उत्तर➣ कॉनक्लेव्ह (Conclave)

प्रश्न 19. पहिल्या 'हॉकी इंडिया मास्टर्स चषक 2025'चे विजेतेपद अनुक्रमे महिला व पुरुष गटात कोणी पटकावले आहे ? (#2025)

उत्तर➣ हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा (महिला) आणि हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू (पुरुष)

*** Notes -

ठिकाण - चेन्नई (तामिळनाडू)

उपविजेता संघ महिला गटात - पंजाब व पुरुष गटात - महाराष्ट्र

प्रश्न 20. टेनिस मधील 'ऑस्ट्रेलियन ओपन 2025' चा खिताब अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटात कोणी पटकावला होता ? (#2025)

उत्तर➣ जैनिक सिन्नर (पुरुष) आणि मैडिसन कीज़ (महिला)

*** Notes -

जैनिक सिन्नर (इटली) वि. अलेक्झांडर झ्वेरेवला (जर्मनी)

मैडिसन कीज़ (अमेरिका) वि. अरिना सबालेंका (बेलारूस)

प्रश्न 21. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत देशातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर आधारीत हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे ?

उत्तर➣ इंदोर, मध्यप्रदेश

*** Notes -

PPP - Public-Private Partnership

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 22. 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिवस कधी साजरा करण्यात आला होता ? (#2025)

उत्तर➣ 14 ते 28 जानेवारी 2025

 

 

 



चालू घडामोडी / Current Affairs marathi 13

प्रश्न 1. भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ न्यायमूर्ती सूर्यकांत

*** Notes -

कार्यकाळ - 24 नोव्हेंबर 2025 - 9 फेब्रुवारी 2027

52 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई - 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025

51 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना - 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025

प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे ? (#2025)

उत्तर➣ गोवा (मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत)

प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#Aug2025)

उत्तर➣ डॉ. उर्जित पटेल

*** Notes -

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर (2016 - 2018, 24 वे) डॉ. उर्जित पटेल पुढील 3 वर्षांसाठी हे पद भूषवतील.

डॉ. उर्जित पटेल यांनी यापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये आयएमएफसाठी काम केले आहे आणि 1992 मध्ये ते भारतात आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी देखील होते.

प्रश्न 4. 'AERO India 2025' ची 15 आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती ? (#2025)

उत्तर➣ बेंगळुरू, कर्नाटक

*** Notes -

ठिकाण: येलाहंका एअर फोर्स स्टेशन, बेंगळुरू, कर्नाटक. 10 ते 14 February 2025

‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ ही यंदाच्या वर्षांची व्यापक संकल्पना आहे

एरो इंडिया 2023ची 14वी आवृत्ती बंगळुरू, कर्नाटक येथे दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती

प्रश्न 5. '34 व्या सरस्वती सन्मान 2024' ने कोणाला सन्मानित करण्यात आले होते ? (#2025)

उत्तर➣ संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास

*** Notes -

‘स्वामी नारायण सिद्धांत सुधा’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, १५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 6. '34 वा व्यास सन्मान 2024' कोणाच्या कादंबरीला मिळाला होता ?

उत्तर➣ सूर्यबाला (हिंदी लेखिका)

*** Notes -

कादंबरी - “कौन देस को वासी: वेणु की विचार”

प्रश्न 7. 51 व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#2025)

उत्तर➣ कनानास्किस, कॅनडा

*** Notes -

52 वी 2026 - फ्रान्स (नियोजित)

50 वे 2024 - इटली

49 वे 2023 - हिरोशिमा, जपान

48 वे 2022 - श्लॉस एल्मौ (जर्मनी)

सात प्रमुख औद्योगिक लोकशाही असलेल्या देशांचा समूह, किंवा G7 हा एक अनौपचारिक मंच आहे: अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंग्डम.

स्थापना - 1975. तेल संकट आणि त्या काळातील आर्थिक आव्हानांना प्रतिसाद म्हणून G7 ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सहा गैर-कम्युनिस्ट औद्योगिक राष्ट्रांनी ‘गट सहा’ (G6) म्हणून हा गट स्थापन केला होता. 1976 मध्ये कॅनडा सामील झाल्याने हा गट G7 म्हणून ओळखला जाऊ लागला.

1978 मध्ये रशिया सामील झाल्यामुळे G7 चे रूपांतर G8 मध्ये झाले; परंतु 2014 मध्ये रशियाला वगळल्यामुळे पुन्हा G7 अस्तित्वात आली

प्रश्न 8. 'UEFA नेशन्स लीग 2025' चा विजेता संघ कोणता ? (#2025)

उत्तर➣ पोर्तुगाल (वि. स्पेन)

*** Notes -

नेशन्स लीगचा अंतिम सामना जर्मनीतील म्युनिकमधील अलियान्झ अरेनात खेळवला गेला.

प्रश्न 9. 'ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 (Energy Transition Index 2025)' नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ? (#2025)

उत्तर➣ 71 (118 देशांच्या यादीत)

*** Notes -

1- स्वीडन, 2 - फिनलँड, 3 - डेनमार्क.

2024 भारत - 63 वा

जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ऊर्जा संक्रमण निर्देशांकात (ETI) भारताने 118 देशांपैकी 71वे स्थान मिळवले आहे.

प्रश्न 10. 'जागतिक शांतता निर्देशांक 2025 (Global Peace Index 2025) 19 वी आवृत्ती' नुसार 163 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025)

उत्तर➣ 115 (GPI स्कोर 2.229)

*** Notes -

भारताचा क्रमांक 2024 - 116, 2023 - 126

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने 2025 चा ग्लोबल पीस इंडेक्स (जागतिक शांतता निर्देशांक) जाहीर केला आहे.

1 - आइसलँड, 2 - आयर्लंड, 3 - न्यूझीलंड ... 6 - सिंगापूर, 123 - बांग्लादेश, 144 - पाकिस्तान, 158 - अफगाणिस्थान, 163 - रशिया

2008 पासून आइसलँड हा देश जागतिक शांतता निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे.

जागतिक शांतता निर्देशांक 2025 चे मूल्यांकन तीन मुख्य बाबींवर आधारित आहे: सामाजिक सुरक्षा, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्ष, आणि लष्करी क्षमता/खर्च.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 11. 'खिचन आणि मेनार' या दोन पाणथळ जागांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला त्या कोणत्या राज्यात आहेत ? (#jun2025)

उत्तर➣ राजस्थान

*** Notes -

1981 - केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान (भरतपूर)
1990 - सांभर तलाव (सांभर, जयपूर)
2025 - खिचन (फलोदी) आणि मेनार (उदयपूर)

या दोन नवीन स्थळांसह, राजस्थानमध्ये एकूण 4 आणि देशात 91 रामसर स्थळे झाली आहेत. #jun2025

जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी, 2025 थीम - Protecting Wetlands for Our Common Future

देशभरातील पाणथळ जागांचे शाश्वत संवर्धन आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्गत पाणथळ (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, 2010 आणि 2017 जारी केले आहेत.

रामसर कन्व्हेन्शन हा पाणथळ जागांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी स्वीकारलेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे. हा करार 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे स्वीकारण्यात आला आणि 1975 मध्ये अंमलात आला. या कराराचा मुख्य उद्देश जगभरातील पाणथळ जागांचे होणारे नुकसान थांबवणे तसेच स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवरील कृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून त्यांचा सुज्ञ वापर सुनिश्चित करणे हा आहे. या कन्व्हेन्शनअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पाणथळ जागांना “रामसर स्थळे” असे म्हणतात. ही स्थळे त्यांच्या पर्यावरणीय, वनस्पतिशास्त्रीय, प्राणीशास्त्रीय, जीवशास्त्रीय किंवा जलशास्त्रीय महत्त्वासाठी ओळखली जातात. भारत 1982 मध्ये रामसर कन्व्हेन्शनचा करार करणारा देश बनला.

प्रश्न 12. कोणत्या राज्याने भारतात मोबाइल अॅपद्वारे ई-मतदान सुरू करण्याची घोषणा केली आहे ? (#2025)

उत्तर➣ बिहार

प्रश्न 13. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस कधी मान्यता दिली ? (#2025)

उत्तर➣ 16 जुलै 2025

*** Notes -

ही योजना 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केली होती.

ही योजना 2025-26 पासून सुरू होईल. 16 जुलै 2025 रोजी मंजूर झालेल्या या योजनेत कमी कामगिरी करणाऱ्या 100 कृषी जिल्ह्यांसाठी दरवर्षी ₹24,000 कोटींच्या खर्चासह 6 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 14. INS गुलदार या निवृत्त नौकेभोवती भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम कोठे बांधण्यात येत आहे ?

उत्तर➣ सिंधुदुर्ग, महाराष्ट्र [वेंगुर्लाजवळील निवती खडकाजवळ (Nivati Rocks)]

प्रश्न 15. भारतातील पहिले 'डिजिटल नोमॅड व्हिलेज' कोणत्या राज्यात उघडण्यात आले ? (#2025)

उत्तर➣ सिक्कीम (पाक्योंग जिल्ह्यातील यक्तेन या गावी)

प्रश्न 16. कोणत्या सालापर्यंत सिकलसेलचे उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ?

उत्तर➣ 2047

*** Notes -

जागतिक सिकलसेल दिन - 19 जून,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून, आयसीएमआर-सीआरएमसीएचचे उद्घाटन केले होते. 2047 साला पर्यंत या आजाराचे उच्चाटन करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 17. 'Why The Constitution Matters' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? (#2025)

उत्तर➣ न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड

*** Notes -

प्रकाशक - पेंग्विन रँडम हाऊस

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड - देशाचे 50 वे सरन्यायाधीश

कार्यकाळ - 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024

प्रश्न 18. भारताचा 91 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण आहे ? (#2025)

उत्तर➣ व्ही.एस. राहुल

*** Notes -

चेन्नईचे इलामपार्थी एआर (Ilamparthi AR) हे 90 वे ग्रँडमास्टर (#oct2025)

रोहित कृष्णा एस हे 89 वे ग्रँडमास्टर (#aug2025)

दिव्या देशमुख हि 88 वी ग्रँडमास्टर (#july2025)

हरिकृष्णन ए. रा. (Harikrishnan A. Ra) हे 87 वे ग्रँडमास्टर (#july2025)

प्रश्न 19. कोणता देश हा 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA)' चा 107 वा सदस्य बनला आहे ? (#2025)

उत्तर➣ मोल्दोव्हा

*** Notes -

“ISA (आंतरराष्ट्रीय सौर आघाडी) ची स्थापना 2015 मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पॅरिस येथे झालेल्या COP21 परिषदेदरम्यान करण्यात आली. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, ऊर्जेपर्यंत सर्वसामान्यांचा प्रवेश सुनिश्चित करणे आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

ISA चे मुख्यालय भारतातील गुरुग्राम येथे स्थित आहे.

प्रश्न 20. 'ड्युरांड कप 2025' चा विजेता संघ कोणता ?

उत्तर➣ नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (NorthEast United FC) (वि. डायमंड हार्बर एफसी)

*** Notes -

2024 - नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (Northeast United FC) वि. मोहन बागान सुपर जायंट

2023 - मोहन बागान सुपर जायंट वि. ईस्ट बंगाल

प्रश्न 21. दरवर्षी 'जागतिक क्षयरोग दिन' कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर➣ 24 मार्च

*** Notes -

डॉ. रॉबर्ट कोच यांनी 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस चा शोध जाहीर केल्यानंतर शंभर वर्षांनी, आंतरराष्ट्रीय क्षय आणि फुफ्फुसीय रोग संघटनेने (IUATLD) 1982 मध्ये पहिला जागतिक क्षयरोग दिन सुरू करण्याची कल्पना मांडली, ज्याला नंतर WHO ने अधिकृत पाठिंबा दिला.

प्रश्न 22. 2025 च्या 16 व्या 'आशियाई नेमबाजी' स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके पटकावली ? (#2025)

उत्तर➣ भारत

*** Notes -

ठिकाण - शिम्केंट, कझाकस्तान

एकूण 99 पदके जिंकली त्यात (50 सुवर्ण, 26 रौप्य, 23 कांस्य)

2 - कझाकिस्तान: 21 सुवर्ण, 24 रौप्य, 25 कांस्य (एकूण 70)

3 - चीन: 15 सुवर्ण, 17 रौप्य, 5 कांस्य (एकूण 37)

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 23. दरवर्षी 'जागतिक मधुमेह दिन' केव्हा साजरा करण्यात येतो ? (#2025)

उत्तर➣ 14 नोव्हेंबर

*** Notes -

1991 मध्ये आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दिवस सुरू केला.

1922 मध्ये चार्ल्स बेस्टसह सर फ्रेडरिक बँटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला, हि तारीख सर फ्रेड्रिक बॅंटिंग यांच्या जन्मदिनानुसार निवडली गेली.

2025 ची थीम "Diabetes and Well-being"

1923 मध्ये इन्सुलिनच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (Physiology or Medicine) सर फ्रेड्रिक बॅंटिंग आणि जॉन मॅक्लिओड यांना मिळाले.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक