भाषा आणि भाषण यामधील भेद

भाषा आणि भाषण यामधील भेद

1) भाषा एक व्यवस्था :

आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक सोस्यूर याने भाषेच्या स्वरूपाचे वर्णन दोन पातळ्यांवर केले. त्याच्यामध्ये भाषा ही एक ध्वनिरूप व अक्षररूप चिन्हांची व्यवस्था असते. यालाच त्याने 'भाषिक व्यवस्था' अशी संज्ञा वापरली आहे. तर या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर यास त्याने 'भाषिक वर्तन' किंवा 'भाषिक उच्चारण' अशी संज्ञा वापरली आहे. या दोन संज्ञांमधूनच भाषा आणि भाषण यांचे स्वरूप स्पष्ट करता येते. भाषेच्या अमूर्त स्वरूपाला त्याने 'लांग' असे म्हटले आहे. या 'लांग' संकल्पनेस कोणतेही अस्तित्व नसते. भाषाही एक अव्यक्त स्वरूपाची व्यवस्था असते असे त्याचे मत होते. यालाच त्याने भाषा किंवा भाषिक व्यवस्था असे म्हटले आहे. या व्यवस्थेला सामाजिक संदर्भ असतात असे मत त्याने मांडले आहे; परंतु सामाजिक संदर्भापेक्षा भाषिक चिन्हांना किंवा संरचनेला त्याने अधिक महत्त्व दिले आहे. भाषा अभ्यासकांनी भाषा व्यवस्थेचा अभ्यास करावा असे त्याचे मत होते. सोस्यूर कडून प्रेरणा घेऊन नॉम चॉम्स्की याने रचनांतरणाचा सिद्धांत मांडला; परंतु भाषेच्या सामाजिक अंगाकडे त्यानेही दुर्लक्ष केले. उलट भाषिक संरचनेचा अधिक सखोल अभ्यास केला व त्याने भाषिक क्षमता असा शब्दप्रयोग वापरला. त्याच्या मतेही भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या नियम व्यवस्थेचा अभ्यास होय असे म्हणता येईल.


2) भाषण-भाषेचे व्यवहारातील उपयोजन (भाषा व्यवहार)

भाषेचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोजन म्हणजे भाषण होय. यालाच त्याने 'परोल' ही भाषिक संज्ञा वापरली आहे. त्यास भाषिक वर्तन असे म्हणता येईल. भाषेचा समाज जीवनामधील वैयक्तिक अविष्कार म्हणजे भाषण होय. यालाच चॉम्स्कीने 'प्रयोग' अशी संज्ञा वापरली आहे. यामध्ये व्यक्तिगत कौशल्य व्यक्तिगत आवाज यांचा समावेश भाषणामध्ये होतो. भाषेला मुर्त स्वरूप लाभते ते भाषणामुळेच. असे असले तरीही त्याने भाषेच्या या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष केलेले दिसते. परोल ही व्यक्तिगत स्वरूपाची बोली असते असे त्याचे मत आहे. वक्त्याने स्वतः केलेले उच्चारण म्हणजेच भाषण होय. एकूणच परोल या संकल्पनेलाच त्याने भाषण, भाषिक वर्तन किंवा भाषिक व्यवहार असे म्हटले आहे. एकूणच सोस्यूर व नोम चॉम्स्की यांच्या विवेचनाच्या आधारे आपणास असे म्हणता येईल की भाषा म्हणजे भाषा व्यवस्था होय. ही भाषा व्यवस्था अव्यक्त स्वरूपाची असते तर भाषण म्हणजे प्रत्यक्ष भाषा व्यवहार होय. भाषण हा अमृर्त अशा भाषाव्यवस्थेचा प्रत्यक्षातील उद्गार असतो.


3) भाषा व भाषण साम्य - भेद :

वरिल विवेचनाच्या आधारे भाषा व भाषण यामधील साम्य - भेद पुढील प्रकारे स्पष्ट करता येतील :

१) भाषा ही एक चिन्हव्यवस्था किंवा संकेतपद्धती असून भाषण हे तात्कालिक स्वरूपाचे असते. त्याला उपयोजन ठरते

2)भाषा ही अमूर्त स्वरुपात असते. ती एक संभाव्य अशी अवस्था आहे असे म्हणता येईल. ती एक चिन्हव्यवस्था असते तिचे जेव्हा ध्वनिरुपांतर होते तेव्हा ती भाषा न राहता भाषणाचे स्वरूप धारण करते.

3)भाषा ही व्यक्तीने समाजात आत्मसात केलेल्या भाषिक सवयींची गोळाबेरीज असते. त्यामुळे संदेशवहन, संपर्क किंवा संवाद सहजपणे साधणे शक्य होते तर भाषण म्हणजेच व्यक्तीने भाषेचा व संकेतांचा प्रत्यक्षात केलेला वापर होय.

4)व्यक्तीला भाषेच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य नसते. काही भाषिक संकेत ठरलेले असतात. समाजाचे भाषेवर नियंत्रण असते तर भाषण ही व्यक्तिगत स्वरुपाची क्रिया असून भाषणाच्या बाबतीत व्यक्ती पूर्णतः स्वतंत्र असते.

5)भाषा ही एकच असली तरी तिच्या उपयोजनानुसार व्यक्तिपरत्वे भाषणाचे स्वरूप बदलत असते. त्यामुळे संदेशवहन, संपर्क किंवा संवाद सहजपणे साधणे शक्य होते तर भाषण म्हणजेच व्यक्तीने भाषेचा व संकेतांचा प्रत्यक्षात केलेला वापर होय.

6)भाषा ही एक सामाजिक संस्था असते. तिच्यावर संपूर्ण समाजाची मालकी असते. तिला समाजमान्यता असते. याउलट भाषण ही व्यक्तिगत स्वरुपाची बाब आहे.

7)भाषा ही चिरकाल व चिरंतन टिकणारी असते तर भाषण हे तात्कालिक स्वरूपाचे असते. त्याला विशिष्ट समयसीमा असते.


    भाषेच्या आभ्यासाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये तुलनात्मक भाषाभ्यास ही एक महत्वपूर्ण पद्धत आहे. यामध्ये भाषेतील महत्वाच्या घटकांची साम्य – भेदांच्या आधारे तुलना केली जाते. तुलनात्मक विचार म्हणजे दोन भाषा घटकांची तुलना करणे होय. अलीकडच्या काळात मराठी भाषेमध्ये तौलनिक अभ्यासास खूप महत्व प्राप्त झाले आहे. तुलनात्मक विचारांद्वारे साम्य – भेद तसेच भाषेतील विविध घटकांचा सूक्ष्मपणे अभ्यास करता येतो.


महाराष्ट्राचा भूगोल भाग 8 || Maharashtracha Bhugol

 

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद
महाराष्ट्राचा  भूगोल

भाग 8

Talathi Bharti Maharashtracha Bhugol || talathi bharti previous year question papers


प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या अभयारण्यास ढाकणा - कोलकाझ अभयारण्यम्हणूनही ओळखतात ?

अ) मेळघाट अभयारण्य

ब) नरनाळा अभयारण्य

क) अंधारी अभयारण्य

ड) चपराळा अभयारण्य

  • अ) मेळघाट अभयारण्य


प्रश्न २ . महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ________ चौ. कि. मी. इतके आहे ?

अ) 3, 07, 713

ब) 3, 08, 313

क) 3, 42, 239

ड) 3, 06, 713

  • अ) 3, 07, 713


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4


प्रश्न ३ . महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे ?

अ) 14

ब) 16

क) 20

ड) 22

  • क) 20


प्रश्न ४. महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या कोणत्या राज्यासोबत लागून आहे ?

अ) गोवा

ब) मध्यप्रदेश

क) कर्नाटक

ड) छत्तीसगड

  • ब) मध्यप्रदेश


प्रश्न ५. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अ) पुणे

ब) नाशिक

क) छत्रपती संभाजीनगर

ड) अहमदनगर

  • ड) अहमदनगर


प्रश्न ६. _______ डोंगर रांगेने तापीगोदावरी नदीची खोरी वेगळी केली आहेत.

अ) शंभू महादेव डोंगररांग

ब) हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग

क) सातमाळा अजिंठा डोंगररांग

ड) यापैकी नाही

  • क) सातमाळा अजिंठा डोंगररांग


प्रश्न ७. कोकण भागात _______ या प्रकारची मृदा आढळते.

अ) रेगुर

ब) जांभी

क) तांबडी

ड) वालुकामय

  • ब) जांभी


प्रश्न ८. _______ नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचा जलाशय लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो.

अ) वेण्णा

ब) भोगावती

क) कोयना

ड) कृष्णा

  • ब) भोगावती


प्रश्न ९. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्रया प्रादेशिक विभागात सहभाग होत नाही ?

अ) पुणे

ब) नाशिक

क) सातारा

ड) धाराशिव

  • ड) धाराशिव


प्रश्न १०. कोणत्या खनिजापासून अ‍ॅल्युमिनियम मिळते.

अ) क्रोमाईट

ब) बॉक्साईट

क) मॅंगनीज

ड) यापैकी नाही

  • ब) बॉक्साईट


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 9


प्रश्न ११. गुगामलराष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) नागपूर

ब) यवतमाळ

क) अमरावती

ड) सांगली

  • क) अमरावती


प्रश्न १२. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

अ) तानाजीसागर

ब) नाथसागर

क) मुक्ताईसागर

ड) लक्ष्मीसागर

  • क) मुक्ताईसागर


प्रश्न १३. खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक महानगरपालिका आहेत ?

अ) पुणे विभाग

ब) छत्रपती संभाजीनगर विभाग

क) नागपूर विभाग

ड) कोकण विभाग

  • ड) कोकण विभाग


प्रश्न १४. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती ?

अ) 34

ब) 35

क) 36

ड) 37

  • क) 36


प्रश्न १५. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती ?

अ) वर्धा

ब) प्राणहिता

क) गोदावरी

ड) तापी

  • अ) वर्धा


प्रश्न १६. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणतात ?

अ) कृष्णा

ब) वारणा

क) पंचगंगा

ड) वेदगंगा

  • क) पंचगंगा


प्रश्न १७. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

अ) नागपूर 

ब) चंद्रपूर

क) अमरावती

ड) गडचिरोली

  • ब) चंद्रपूर


प्रश्न १८. सध्यस्थितीत महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत ?

अ) 3 

ब) 4

क) 6

ड) 7

  • क) 6


प्रश्न १९. दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

अ) नागपूर  

ब) गोंदिया

क) ठाणे

ड) भंडारा    

  • ब) गोंदिया


प्रश्न २०. आचार्य विनोबा भावे यांचा ‘पवनार आश्रम’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) नागपूर 

ब) अकोला

क) नांदेड

ड) वर्धा

  • ड) वर्धा


प्रश्न २१ . प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) नागपूर 

ब) कोल्हापूर

क) पुणे

ड) सोलापूर

  • अ) नागपूर


प्रश्न २२ . यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे ?

अ) छत्रपती संभाजीनगर 

ब) जळगाव

क) पुणे

ड) नाशिक   

  • ड) नाशिक


प्रश्न २३. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात ?

अ) नाथसागर

ब) शिवसागर

क) इंदिरासागर

ड) गोविंदसागर   

  • अ) नाथसागर


प्रश्न २४. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत आहे ?

अ) सातपुडा 

ब) सह्याद्री

क) अजिंठा

ड) बालाघाट   

  • ब) सह्याद्री


प्रश्न २५. महाराष्ट्र पठार _______ खडकापासून बनलेले आहे.

अ) अग्निजन्य

ब) बेसॉल्ट

क) ग्रॅनाईट

ड) कठीण   

  • ब) बेसॉल्ट



पुढे >>>>>>>                           <<<<<<< मागे







इतिहास, भूगोल व राज्यघटना सराव प्रश्नसंच || Questions In Marathi



तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद

 इतिहास, भूगोल व राज्यघटना सराव प्रश्नसंच

भाग 7

Talathi Bharti 2023 Questions In Marathi

प्रश्न १. राज्यघटनेतील कितव्या भागाचे वर्णन भारताचा मॅग्ना कार्टाअसे केले जाते ?

अ) भाग 4 ए

ब) भाग 4

क) भाग 12

ड) भाग 3

  • ड) भाग 3


प्रश्न २ . सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श हे कोणत्या देशाच्या क्रांतीतून घेतले आहेत ?

अ) रशिया

ब) फ्रांस

क) अमेरिका

ड) जपान

  • अ) रशिया


प्रश्न ३ . सरनाम्यास राज्यघटनेचे ओळखपत्र कोणी म्हटले आहे ?

अ) एन.ए. पालखीवाला

ब) एन. माधव राव

क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ड) एन. गोपालस्वामी अय्यंगार

  • अ) एन.ए. पालखीवाला


प्रश्न ४. परराष्ट्रात राजदूतांची नियुक्ती कोण करतो ?

अ) पंतप्रधान

ब) उपराष्ट्रपती

क) केंद्रीय गृहमंत्री

ड) राष्ट्रपती

  • ड) राष्ट्रपती


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4


तलाठी भरती 2023 महाराष्ट्राचा भूगोल भाग 8


प्रश्न ५. खालीलपैकी महाराष्ट्रातील _________ प्रादेशिक विभागात प्रामुख्याने बाजरी पिकाचे उत्पादन केले जाते.

अ) खानदेश

ब) कोकण

क) विदर्भ

ड) मराठवाडा

  • अ) खानदेश


प्रश्न ६. रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जातांना _______ घाटातून जावे लागते.

अ) दिवे घाट

ब) चंदनापुरी घाट

क) माळशेज घाट

ड) आंबा घाट

  • ड) आंबा घाट


प्रश्न ७. भारतीय राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीचे स्थान ________ राज्यघटनेतील राजासारखे आहे.

अ) अमेरिका

ब) कॅनडा

क) ब्रिटिश

ड) जपान

  • क) ब्रिटिश


प्रश्न ८. योग्य पर्याय निवडा.(प्रशासकीय विभाग - एकूण जिल्हे)

1) नाशिक     -        5 जिल्हे

2) नागपूर     -        6 जिल्हे

3) पुणे          -        5 जिल्हे

अ) फक्त 1

ब) फक्त 2

क) 1 आणि 3 फक्त

ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व


प्रश्न 9. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने उत्तरेकडील गोदावरी व दक्षिणेकडील ________ या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत.

अ) कृष्णा

ब) नर्मदा

क) भीमा

ड) यापैकी नाही

  • क) भीमा


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3



प्रश्न 10. स्वर्णसिंग समितीने _____ मुलभूत कर्तव्यांचा घटनेत समावेश करण्यासाठी शिफारस केली होती.

अ) आठ

ब) दहा

क) बारा

ड) अकरा

  • अ) आठ

                           

प्रश्न ११. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी विल्यम हंटर याच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचे नाव काय होते?

अ) हार्टोग आयोग

ब) डिसऑर्डर चौकशी समिती

क) रॅली आयोग

ड) यापैकी नाही

  • ब) डिसऑर्डर चौकशी समिती


प्रश्न १२ . कलम 1 मध्ये भारताला ‘_________’ असे संबोधले आहे.

अ) संघराज्य

ब) राज्यांचा संघ

क) सहकारी संघराज्य

ड) केंद्रीय संघराज्य

  • ब) राज्यांचा संघ


प्रश्न १३ . _______ रोजी घटना समितीतील सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षर्‍या केल्या.

अ) 26 जानेवारी 1950

ब) 26 जानेवारी 1949

क) 22 जुलै 1947

ड) 24 जानेवारी 1950

  • ड) 24 जानेवारी 1950


प्रश्न १४. खालीलपैकी कोणी रामकृष्ण मठाचीस्थापना केली ?

अ) स्वामी विवेकानंद

ब) केशवचंद्र सेन

क) स्वामी रामकृष्ण परमहंस

ड) स्वामी दयानंद सरस्वती

  • अ) स्वामी विवेकानंद


प्रश्न १५. _________ हे वृत्तपत्रांना बृहत जिव्हाअसे म्हणत.

अ) लोकहीतवादी

ब) महात्मा गांधी

क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ड) महात्मा फुले

  • अ) लोकहीतवादी


प्रश्न १६. इंग्लंडचे पंतप्रधान _____ यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला ? (STI 2016)

अ) रॅम्से मॅकडोनाल्ड

ब) विन्स्टन चर्चील

क) क्लेमेंट अॅटली

ड) यापैकी नाही

  • अ) रॅम्से मॅकडोनाल्ड


प्रश्न १७. ______ येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनातील अध्यक्ष बद्रूद्दीन तैय्यबजी हे कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते.

अ) मद्रास

ब) कलकत्ता

क) मुंबई

ड) लाहोर  

  • अ) मद्रास


प्रश्न १८. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?

अ) महात्मा ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज

ब) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज

क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग

ड) स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज

  • क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग


प्रश्न १9. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुट गार्ड शहरातील इंटरनॅशनल सोशिओलॉजिस्ट कॉन्फरन्सया परिषदेत _______ यांनी प्रथमच भारताचा ध्वज फडकविला.

अ) मादाम कामा

ब) यशपालसिंग

क) उधमसिंग

ड) रासबिहारी बोस     

  • अ) मादाम कामा


प्रश्न २0. कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?

अ) परभणी

ब) अकोला

क) चंद्रपूर

ड) नांदेड     

  • ब) अकोला


प्रश्न २१. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे ?

अ) कोराडी

ब) खापरखेडा

क) उमरेड

ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व




पुढे  >>>>>>>        <<<<<<< मागे