SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 10

 

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 10
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq || MH set exam



प्रश्न 1. एतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा व स्वायत्तता ही कोणत्या भाषेची सारतत्वे आहेत ? (April 2017)

अ) संगणकीय भाषा

ब) बोली भाषा

क) प्रमाण भाषा

ड) एस.एम.एस.ची भाषा

  • क) प्रमाण भाषा





  • प्रश्न 2. संदेशनावर परीणाम करणारा भाषेतर घटक पुढीलपैकी कोणता ? (Sep 2021)

    अ) वाक्याची सुरावली

    ब) शब्दांचा क्रम

    क) संदेशनाचा आशय

    ड) संदेशनाचे उद्धिष्ट

  • ड) संदेशनाचे उद्धिष्ट




  • प्रश्न 3. ‘महाप्राण मराठीत अर्थनिर्णायक आहे, इंग्रजीत नाही.’ (April 2017)

    अ) हे विधान बरोबर आहे

    ब) हे विधान चूक आहे

    क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ड) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

  • अ) हे विधान बरोबर आहे



  • प्रश्न 4. मराठी भाषेच्या निर्मितीचा विचार करतांना ‘क्रिओलाइड प्राकृत’ असा मराठीचा निर्देश कोणी केला आहे ? (April 2017)

    अ) साउथवर्थ

    ब) अ. म. घाटगे

    क) चिं. वि. वैद्य

    ड) व्हेर्नर

  • अ) साउथवर्थ




  • प्रश्न 5. ‘लेखनप्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते.’ हे मत कुणी मांडले आहे ? (Sep 2021)

    अ) भालचंद्र नेमाडे

    ब) अशोक केळकर

    क) रमेश धोंगडे

    ड) मिलिंद मालशे

  • अ) भालचंद्र नेमाडे




  • प्रश्न 6. एका भाषाकुलामध्ये कोणत्या भाषा समाविष्ट केल्या जातात ? (Sep 2021)

    अ) एका भौगोलिक परिसरातील

    ब) परस्परांशी दीर्घकाळ देवाणघेवाण असणाऱ्या

    क) 70 % पेक्षा अधिक शब्दसाम्य असणाऱ्या

    ड) एका भाषेमधून उद्भवणाऱ्या

  • ड) एका भाषेमधून उद्भवणाऱ्या



  • प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास समाजभाषाविज्ञानात येत नाही ? (Sep 2021)

    अ) भाषा आणि सामाजिक भेद

    ब) भाषेची व्याकरणिक व्यवस्था आणि शब्दसंग्रह

    क) भाषा आणि लिंगभेद

    ड) भाषा आणि सांस्कृतिक परंपरा

  • ब) भाषेची व्याकरणिक व्यवस्था आणि शब्दसंग्रह




  • प्रश्न 8. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखन नियमांनुसार अचूक आहे ? (April 2017)

    अ) पुनर्निमिती

    ब) पुर्नर्निमिती

    क) पुनर्निमिति

    ड) पुनर्निमिर्ती

  • अ) पुनर्निमिती



  • प्रश्न 9. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले |

              नाचत तान्हुले यशोदेचे || ’

    ही रचना कोणत्या संत कवीची आहे ? (April 2017)

    अ) संत नामदेव

    ब) संत तुकाराम

    क) संत एकनाथ

    ड) संत मुक्ताबाई

  • क) संत एकनाथ



  • प्रश्न 10. पुढीलपैकी कोणती सर्वनामे तृतीया विभक्तीत शून्य प्रत्यय घेतात ? (June 2019)

    अ) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी

    ब) प्रथमपुरुषी व तृतीयपुरुषी

    क) द्वितीयपुरुषी व तृतीयपुरुषी

    ड) वरीलपैकी सर्व

  • अ) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी



  • प्रश्न 11. समाजभाषाविज्ञान ही शाखा पुढीलपैकी कशाचा अभ्यास करते ? (June 2019)

    अ) भाषेच्या सामाजिक संदर्भातील आविष्काराचा

    ब) भाषिक आविष्कारातील समाजाचा

    क) भाषेच्या व्यवस्थेचा

    ड) वरिल सर्व विषयांचा

  • अ) भाषेच्या सामाजिक संदर्भातील आविष्काराचा



  • प्रश्न 12. वारकरी कीर्तनात काल्यानंतर सादर केल्या जाणाऱ्या कलाप्रकारास काय म्हणतात ? (June 2019)

    अ) काल्याचे कीर्तन

    ब) भारुड

    क) बोहाडा

    ड) लळीत

  • ड) लळीत



  • प्रश्न 13. “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांना ‘ ब्रम्हा-विष्णू-महेश ’ असे कोणी संबोधले आहे” ? (Sep 2021)

    अ) आचार्य अत्रे

    ब) विंदा करंदीकर

    क) एस. एम. जोशी

    ड) श्रीपाद अमृत डांगे

  • ब) विंदा करंदीकर



  • प्रश्न 14. गौरी देशपांडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले ? (Sep 2021)

    अ) अरेबियन नाईट्स

    ब) गीतांजली

    क) दि बायबल

    ड) गीतगोविंद

  • अ) अरेबियन नाईट्स



  • प्रश्न 15. विश्वसाहित्य’ ही संकल्पना भारतात कोणी प्रथम मांडली ? (June 2019)

    अ) विनयकुमार सरकार

    ब) रवींद्रनाथ ठाकूर

    क) अरविंद घोष

    ड) बुद्धदेव बोस

  • ब) रवींद्रनाथ ठाकूर




  • प्रश्न 16. मराठीमध्ये हायकू ह्या काव्यप्रकाराचा प्रारंभ कोणी केला ? (June 2019)

    अ) ज्ञानेश्वर मुळे

    ब) शिरीष पै

    क) केशवकुमार

    ड) दत्तू बांदेकर

  • ब) शिरीष पै





  • पुढे >>>>>>>                      <<<<<<< मागे

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 9 || SET NET Marathi Paper 2

     

    सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 9
    SET NET Marathi Paper 2

    set net marathi previous year questions || set net pyq



    प्रश्न 1. भाषातज्ञ डॉ. अशोक केळकर यांना त्यांच्या कोणत्या लेखसंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळालेला आहे ?

    अ) रुजुवात

    ब) त्रिवेणी: भाषा साहित्य संस्कृती

    क) प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा

    ड) वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार

  • अ) रुजुवात




  • प्रश्न 2. पुढीलपैकी कोणती कादंबरी गौरी देशपांडे यांची आहे ?

    1)मुक्काम   2)आहे हे अस आहे   3)उत्खनन   4)गोफ   5)विंचुर्णीचे धडे

    अ) 1, 2, 3, आणि 5 फक्त

    ब) 1, 4 आणि 5 फक्त

    क) 1, 3 आणि 4 फक्त

    ड) वरिल सर्व

  • क) 1, 3 आणि 4 फक्त




  • प्रश्न 3. ‘घरजावई’ कथासंग्रह कोणाचा ?

    अ) द. मा. मिरासदार

    ब) ना. घ. देशपांडे

    क) अशोक रानडे

    ड) आनंद यादव

  • ड) आनंद यादव




  • प्रश्न 4. सर्व मराठी बोलींच्या शास्त्रीय अध्ययनाचा पाया कोणी घातला ?

    अ) अ. का. प्रियोळकर

    ब) अशोक केळकर

    क) वि. भा. प्रभुदेसाई

    ड) सु. मं. कत्रे

  • ड) सु. मं. कत्रे




  • प्रश्न 5. ‘शब्द’ या मराठीतील पहिले समजले जाणाऱ्या लघुनियतकालिकाचे संपादक कोण होते ?

    अ) रमेश समर्थ

    ब) दिलीप चित्रे

    क) अशोक शहाणे

    ड) मनोहर ओक

  • अ) रमेश समर्थ




  • प्रश्न 6. चक्रधरांचे अनुयायी एकमेकांना कोणत्या नावाने संबोधतात ?

    अ) बंधू

    ब) माऊली

    क) महात्मा

    ड) आचार्य

  • क) महात्मा




  • प्रश्न 7. ‘जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरु केला जाण |’ ही अभंगरचना कोणाची ?

    अ) संत रामदास

    ब) संत एकनाथ

    क) संत ज्ञानेश्वर

    ड) संत तुकाराम

  • ब) संत एकनाथ




  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे) यांचा आहे ?

    अ) प्रियाळ

    ब) गंधरेखा

    क) दुसरा पक्षी

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व



  • प्रश्न 9. ‘माझी आगगाडी कशी चुकली’, ‘कपड्यांची अदलाबदल’, ‘अलिगड किल्यातील एक रहस्य’, ‘दुधाची धार अथवा गुप्तदान’ चे कथाकार कोण ?

    अ) दिनकर गंगाधर केळकर

    ब) नरसिंह चिंतामण केळकर

    क) इरावती कर्वे

    ड) वा. ल. कुलकर्णी

  • ब) नरसिंह चिंतामण केळकर




  • प्रश्न 10. ‘फिलोसॉफी ऑफ फाइन आर्ट्स’ ग्रंथलेखक कोण ?

    अ) कांट

    ब) हेगेल

    क) रुसो

    ड) प्लेटो

  • ब) हेगेल




  • प्रश्न 11. तत्ववेत्ता ‘इमॅन्युअल कांट’ कोणत्या देशातील होता ?

    अ) जर्मनी

    ब) अमेरिका

    क) इटली

    ड) रशिया

  • अ) जर्मनी



  • प्रश्न 12. भरतमुनीने ‘बीभत्स रसाचा’ सांगितलेला स्थायीभाव कोणता ?

    अ) विस्मय

    ब) भय

    क) क्रोध

    ड) जुगुत्सा

  • ड) जुगुत्सा





  • पुढे >>>>>>>                      <<<<<<< मागे

     

     

     

     


     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 8 || SET NET Marathi Paper 2

     

    सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 8
    SET NET Marathi Paper 2

    set net marathi previous year questions || set net pyq



    प्रश्न 1. सहवास या काव्य संग्रहात इंदिरा संत आणि _______ या कवीच्या कविता समाविष्ट आहेत.

    अ) शांता शेळके

    ब) ना. मा. संत

    क) संजीवनी मराठे

    ड) वा. ना. देशपांडे

  • ब) ना. मा. संत




  • प्रश्न 2. रुद्रवीणा’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत ?

    अ) वामन रामराव कांत (वा. रा. कांत)

    ब) प्र. के. अत्रे

    क) वि. म. कुलकर्णी

    ड) विष्णू वामन शिरवाडकर

  • अ) वामन रामराव कांत (वा. रा. कांत)




  • प्रश्न 3. अभिजित’ किंवा ‘रसाळ वामन’ या टोपणनावाने कोण लेखन करीत असे ?

    अ) म. ना. अदवंत

    ब) ना. घ. देशपांडे

    क) वा. रा. कांत

    ड) पद्मा गोळे

  • क) वा. रा. कांत




  • प्रश्न 4. शाहीर अमर शेख यांचे मूळ नाव काय होते ?

    अ) मेहबूब हसन शेख

    ब) अमर हुसेन शेख

    क) मेहबूब अमर

    ड) मेहबूब हुसेन पटेल

  • ड) मेहबूब हुसेन पटेल



  • प्रश्न 5. ‘परिसे गे सुनेबाई, नको वेचू दुध दही,

             आवा चालिली पंढरपुरा, वेसीपासुनी आली घरा’ 

    अशी अभंगरचना कोणाची ?

    अ) संत एकनाथ

    ब) संत नामदेव

    क) संत बहिणाबाई 

    ड) संत तुकाराम

  • ड) संत तुकाराम



  • प्रश्न 6. 'नवी प्रतीभासृष्टी' हे कोणाच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे ?

    अ) बा. सी. मर्ढेकर

    ब) भा. रा. तांबे

    क) बालकवी

    ड) माधव आचवल

  • अ) बा. सी. मर्ढेकर





  • प्रश्न 7. ‘गांडू बगिचा’ काव्यसंग्रह कोणाचा ? 

    अ) दया पवार

    ब) नामदेव ढसाळ

    क) अर्जुन डांगळे

    ड) आनंद यादव

  • ब) नामदेव ढसाळ




  • प्रश्न 8. ‘निळा पक्षी’ हे अनुवादित नाटक कोणाचे ?

    अ) व्यंकटेश वकील

    ब) विमल घैसास 

    क) वि. ना. कोठीवाले

    ड) साने गुरुजी

  • ड) साने गुरुजी




  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणते नाटक श्याम फडके(दिगंबर त्र्यंबक फडके) यांचे आहे ?

    अ) का असंच का ?

    ब) अर्ध्याच्या शोधात दोन

    क) काका किशाचा

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व




  • प्रश्न 10. ध्वनीचा खालीलपैकी कोणता प्रकार सर्वश्रेष्ठ मानला जातो ? 

    अ) स्थळ ध्वनी

    ब) रसध्वनी

    क) वस्तू ध्वनी

    ड) यापैकी नाही

  • ब) रसध्वनी




  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह विंदा करंदीकर यांचा आहे ?

    अ) स्वेदगंगा

    ब) जिप्सी

    क) कोंडवाडा

    ड) शिशिरागमन

  • अ) स्वेदगंगा




  • प्रश्न 12. 1986 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला ‘खूणगाठी’ कविता संग्रह कोणाचा ?

    अ) वा. ना. देशपांडे

    ब) वि. वा. शिरवाडकर

    क) ना. घ. देशपांडे

    ड) वा. रा. कांत

  • क) ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे)





  •  

     

     

     


    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 9 || MPSC History Questions In Marathi

    इतिहास सराव प्रश्नसंच भाग 9
    MPSC History MCQ In Marathi





    प्रश्न 1. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ? (combine c 2018)

    अ) मुंबई (1889)

    ब) अलाहाबाद (1888)

    क) मद्रास (1887)

    ड) कलकत्ता (1886)

  • ब) अलाहाबाद (1888)





  • प्रश्न 2. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती ? (combine b 2019)

    a)प्रथम 1885      b)पाचवे 1889     c)विसावे 1904     d)एकतिसावे 1915

    अ) a आणि b फक्त

    ब) b आणि क फक्त

    क) b, c आणि d फक्त

    ड) a, b, c, d 

  • ड) a, b, c, d




  • प्रश्न 3. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ICS परीक्षा भारतात व्हावी व वयोमर्यादा ______ वरून _____ एवढी करावी असा ठराव करण्यात आला ?

    अ) 19 वरून 23

    ब) 19 वरून 21

    क) 18 वरून 20

    ड) 21 वरून 25

  • अ) 19 वरून 23






  • प्रश्न 4. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते ?

    अ) 70

    ब) 72

    क) 73

    ड) 101

  • ब) 72





  • प्रश्न 5. भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन ‘फैजपूर कॉंग्रेस’ अध्यक्षपद कोणी भूषविले होते ? (ASI 2013)

    अ) जवाहरलाल नेहरू

    ब) महात्मा गांधी

    क) वल्लभभाई पटेल 

    ड) एम. एन. रॉय

  • अ) जवाहरलाल नेहरू





  • प्रश्न 6. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला ? (ASO 2012)

    अ) लखनौ

    ब) मुंबई

    क) लाहोर

    ड) सूरत

  • ब) रेल्वे





  • प्रश्न 7. अनुशिलन समितीची स्थापना _______ साली कलकत्ता येथे करण्यात आली ? 

    अ) 1901

    ब) 1902

    क) 1875

    ड) 1909

  • ब) 1902





  • प्रश्न 8. बारिसाल येथे स्वदेश बांधव समितीची स्थापना _________ यांनी केली.

    अ) आश्विनकुमार दत्त

    ब) कृष्णकुमार मित्र 

    क) अजित सिंह

    ड) आनंद मोहन बोस

  • अ) आश्विनकुमार दत्त





  • प्रश्न 9. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ? (STI 2012)

    अ) इस्लामाबाद

    ब) ढाका

    क) अलाहाबाद

    ड) अलिगढ

  • ब) ढाका





  • प्रश्न 10. 1 नोव्हेंबर ______ ला ‘गदर पक्षाची’ स्थापना करण्यात आली. 

    अ) 1912

    ब) 1918

    क) 1915

    ड) 1913

  • ड) 1913





  • प्रश्न 11. होमरूळ चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती ? (ASO 2011)

    अ) दक्षिण आफ्रिका

    ब) आयर्लंड

    क) नेदरलँड

    ड) भारत

  • ब) आयर्लंड





  • प्रश्न 12. ________ सत्याग्रह हा सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग मानला जातो.

    अ) बारडोली सत्याग्रह

    ब) खेडा सत्याग्रह

    क) चंपारण्य सत्याग्रह

    ड) असहकार चळवळ

  • क) चंपारण्य सत्याग्रह



  • पुढे >>>>>>                   <<<<<< मागे


    mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq ||

    Popular Posts