SET/NET Marathi Paper 33
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
प्रश्न 1. 'आजोबांना आता जिने चढवत नाहीत.'
- यातील अधोरिखित क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ? (SET 2023)
अ) शक्य
ब) प्रयोजक
क) सिद्ध
ड) अकर्मक
प्रश्न 2. प्रत्येक भाषक समाजाचे भाषाबाह्य सृष्टीचे ज्ञान त्या समाजाच्या भाषेने नियंत्रित केलेले असते, असा विचार कोणी मांडला आहे ? (SET 2023)
अ) मॅलिनोव्हस्की व फर्थ
ब) सपीर आणि व्होर्फ
क) यूल आणि बर्नेल
ड) बॅसिल बर्नस्टाईन
प्रश्न 3. मूळ साहित्यकृतीला न्याय देण्याच्या दृष्टीने भाषांतरकर्त्याकडून मूळ आशयापासून हेतुतः अपसरण घडते, त्याला काय नाव आहे ? (SET 2023)
अ) सांस्कृतिक प्रभाव (Cultural influence)
ब) नवनिर्मिती (Creation)
क) रूपांतर (Adaptation)
ड) मध्यस्थ भाषांतर (Interventionist translation)
प्रश्न 4. 'लिखित साहित्याचा अभ्यास करताना लोकतत्वीय अध्ययनदृष्टीचा अंगीकार केल्यास लिखित साहित्याच्या आकलनाची एक वेगळी दिशा स्पष्ट होऊ शकते' असे मराठीत सर्वप्रथम कोणी सांगितले ? (SET 2023)
अ) गंगाधर मोरजे
ब) शैला लोहिया
क) रा. चिं. ढेरे
ड) प्रभाकर मांडे
प्रश्न 5. 'दैवतकथेत ऐतिहासिक सत्य लपलेले असते.' हि भूमिका कोणत्या अभ्यास संप्रदायाची आहे ? (SET 2023)
अ) निसर्गरूपवादी
ब) भ्रांतकल्पनावादी
क) भाषाशात्रीय
ड) संप्रसारणवादी
प्रश्न 6. 'बन्याची दिंडी' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ? (SET 2023)
अ) शंकरराव खरात
ब) सुखराम हिवराळे
क) केशव मेश्राम
ड) अमिताभ
प्रश्न 7. 'दस्तखत' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ? (SET 2023)
अ) भीमसेन देठे
ब) प्रकाश जाधव
क) बबन चहांदे
ड) मीना गजभिये
प्रश्न 8. शेतकरी संघटनेच्या वैचारिकतेशी आणि कृतिशीलतेशी नाते असणारे लेखक कोण आहेत ? (SET 2023)
अ) बाबा पाटील
ब) शंकर पाटील
क) भास्कर चंदनशिव
ड) वासुदेव मुलाटे
प्रश्न 9. भारतात लोकसाहित्याच्या अभ्यासाला केव्हा गती मिळाली ? (SET 2020)
अ) शिवाजी महाराजांच्या काळात
ब) इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर
क) संत साहित्य प्रसूत झाल्यानंतर
ड) भाषाविचारांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर
प्रश्न 10. 'उद्धव शेळके कथेतून व्यक्तिचित्रे रेखाटताना त्यांच्या बाह्यांगावर भर देण्यापेक्षा अंतर्मनाचे दर्शन घडवतात तथापि त्यांचे हे वैशिष्ट्य कथेला वाङमयीनदृष्ट्या कमकुवत करते." (SET 2020)
अ) पूर्ण विधान बरोबर आहे
ब) पूर्ण विधान चूक आहे
क) विधानाचा फक्त पूर्वार्ध बरोबर
ड) विधानाचा फक्त उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 11. 'कडुनिंबाची सावली' हा कथासंग्रह कोणाचा आहे ? (SET 2020)
अ) शंकर पाटील
ब) उद्धव शेळके
क) रा. रं. बोराडे
ड) प्रतिमा इंगोले
प्रश्न 12. घटना आणि घटनाशोधाची सामग्री म्हणजे इतिहास नव्हे, हि जाणीव कोणी करून दिली ? (SET 2020)
अ) इ. एच. कार
ब) तेन
क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
ड) वि. का. राजवाडे
प्रश्न 13. पुढीलपैकी माणिक वर्मा यांचे आत्मकथन कोणते ? (SET 2020)
अ) स्वरवंदना
ब) स्वरमयी
क) किती रंगला खेळ
ड) माझ्या संगीत जीवनाची वाटचाल
प्रश्न 14. लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, भारतीय लोकसत्ता, इहवादी शासन, महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथांचे लेखक कोण ? (SET 2020)
अ) गं. बा. सरदार
ब) लक्ष्मणशास्त्री जोशी
क) चिं. वि. वैद्य
ड) पु. ग. सहस्रबुद्धे
प्रश्न 15. मराठी - स्त्री लेखकांची सूची (1873 - 1920) कोणी सिद्ध केली ? (SET 2020)
अ) पुष्पा भावे
ब) सरोजिनी वैद्य
क) ग. र. दंडवते
ड) दु. का. संत
प्रश्न 16. वाड्मयेतिहासकाराला यथायोग्य अशी समीक्षादृष्टी असावीच लागते, मात्र समीक्षकांवर इतिहासाचा संदर्भ लक्षात घेणे बंधनकारक नसते. (SET 2023)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 17. साहित्याचा इतिहास म्हणजे साहित्यातील रुपबंधांच्या स्वायत्त विकासाचा इतिहास, अशी भूमिका कोणी मांडली ? (SET 2023)
अ) रेने वेलक
ब) आर. एस. क्रेन
क) टी. एस. इलियट
ड) फ्रीड्रिख नीत्शे
प्रश्न 18. 'नगरातल्या उद्यानातील आम्रवृक्ष फळांनी लगडले होते.' - या वाक्यातील कर्ता पुढीलपैकी कोणता ? (SET 2020)
अ) नगर
ब) उद्यान
क) आम्रवृक्ष
ड) फळे
प्रश्न 19. ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. गगनी धूमकेतू उदेला. उत्कापात आकाशाहून झाला. श्रीशंभूमहादेवीं तळ्याचे उदक रक्तांबर झाले. असे शिवाजी महाराजांच्या मृत्युप्रसंगीचे वर्णन कोठे आले आहे ? (SET 2020)
अ) सभासदाच्या बखरीत
ब) एक्याण्णव कलमी बखरीत
क) सप्तप्रकरणात्मक चरित्रात
ड) भोसले वंश चरित्रात
प्रश्न 20. आधुनिक भारत हा ग्रंथ कोणी लिहीला ? (SET 2020)
अ) शंकर दत्तात्रय जावडेकर
ब) सखाराम जगन्नाथ भागवत
क) श्रीनिवास नारायण बनहट्टी
ड) धनंजय रामचंद्र गाडगीळ
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 25 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 10
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment