Tuesday, April 04, 2023

SET NET PET मराठी

 SET NET PET मराठी सराव प्रश्नसंच १


प्रश्न १. ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा पाया कोणी रचला?

उत्तर >>>     सर विल्यम जोन्स

 

प्रश्न २. "भाषेमध्ये ढवळाढवळ करू नका" या पुस्तकाचे लेखक कोण?

उत्तर >>>     रॉबर्ट हॉल

 

प्रश्न ३. "भाषा ही प्रधान असून, लेखन हे भाषेचे प्रतिबिंब आहे,"हे विधान कोणाचे?

उत्तर >>>     हॉल

 

प्रश्न ४. भाषेच्या आधुनिक पद्धतीचा जनक कोण?

उत्तर >>>     सोस्यूर

 

प्रश्न ५. भाषा आणि भाषण यातील भेद प्रथम कोणी व्यक्त केला?

उत्तर >>>     सोस्यूर

 

प्रश्न ६. आकृतीमूलक वर्गीकरणात भाषांचे दोन गट कोणी पाडले?

उत्तर >>>     श्ल़ेगेल

 

प्रश्न ७. दोन कालखंडातील भाषांचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो?

उत्तर >>>     तौलनिक

 

प्रश्न ८. भाषाभ्यासात प्रथम कोणत्या भाषाकुलाची कल्पना सर्वप्रथम मांडली?

उत्तर >>>     इंडो-युरोपियन

 

प्रश्न ९. "भाषिक चिन्हे 'अवकारी' 'विकारी' असतात." हे मत कोणाचे?

उत्तर >>>     सोस्यूर

 

प्रश्न १०. 'भाषा ही समाजनिर्मित असते,' हे मत कोणाचे ?

उत्तर >>>     रुसो


 

प्रश्न ११. 'भाषिक संकेत यादृच्छिक आहेत' हा विचार कोणाचे ?

उत्तर >>>     सोस्यूर

 

प्रश्न १२. 'अनुकरण' सिद्धांत मांडणारा भाषाशास्त्रज्ञ कोण?

उत्तर >>>     गायगर

 

प्रश्न १३. 'महाभाष्य' ग्रंथाचा कर्ता कोण?

उत्तर >>>     पतंजली

 

प्रश्न १४. युरोपातील व उत्तर भारतातील भाषांचा समावेश कोणत्या भाषाकुलात होतो?

उत्तर >>>     इंडो-युरोपियन

 

प्रश्न १५. 'आर्यन शाखा' कोणत्या शाखेला म्हटले जाते?

उत्तर >>>     इंडो - इरानियन

 

प्रश्न १६. "भाषेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे निर्मितीशीलता" हे मत कोणाचे?

उत्तर >>>     चाँम्स्की


प्रश्न १७. "शब्दशास्त्र म्हणजे भाषाशास्त्र नाही" हे मत कोणाचे?

उत्तर >>>     व्हीट

 

प्रश्न १८. "ज्या ध्वनीसंकेतांचा पद्धतशीर उपयोग करून प्रत्येक व्यक्ती व्यवहारात भाग घेते. ते व्यवहारक्षम संकेत म्हणजे भाषा" हे मत कोणाचे?

उत्तर >>>     ना.गो.कालेलकर

 

प्रश्न १९. भाषेच्या सांकेतिक संप्रेषण प्रणालीतील घटक कोणता?

उत्तर >>>     संप्रेषक, संप्रेष्य, ग्राहक

 

प्रश्न २०. स्वरयंत्रावरण किंवा स्वरयंत्रामुखावरण कोणास म्हणतात?

उत्तर >>>     उपजिव्हा

 

प्रश्न २१. मराठीतील स्वरांचे किती वर्ग आहेत?

उत्तर >>>     तीन

 

प्रश्न २२. उच्चारणाकरिता मुखविवरात हवेचे रोधन करणे, म्हणजे तिची अडवणूक करणे, या प्रक्रियेला काय म्हणतात?

उत्तर >>>     प्रयत्न

 

प्रश्न २३. अवरोध, अवरोधस्थिती व स्फोट या तीन प्रक्रियेतून उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना काय म्हणतात?

उत्तर >>>     स्पर्श

 

प्रश्न २४. ज्यांच्यामध्ये स्वनिक साम्य आहे, ज्यांच्यातील आजूबाजूच्या परिस्थितीमुळे होणारा फरक, होणारे परिवर्तन अंदाजक्षम आहे, अशा ध्वनींच्या समूहाला काय म्हणतात?

उत्तर >>>     स्वनिम

 

प्रश्न २५. भाषेत स्वनिम न वापरले जाता, कोणाचा वापर केला जातो?

उत्तर >>>     स्वनांतरे

 

प्रश्न २६. दोन्ही स्वतंत्रच्या मध्ये जी पोकळी तयार होते, तिला काय म्हणतात?

उत्तर >>>     कंठद्वारीय

 

प्रश्न २७. भाषा वैज्ञानिक लेखनात 'स्वनिम' कोणत्या खुणेने दाखवितात?

उत्तर >>>     तिरप्या रेषेत

 

प्रश्न २८. 'स्वन' आजूबाजूच्या कारणांनी बदलतात त्या वेळी त्यास काय म्हणतात?

उत्तर >>>     सापेक्ष

 

प्रश्न २९. लहरींचा सिद्धांत प्रतिपादन विविध भाषांचा उदय कसा झाला, तसेच भाषाक्षेत्रे व्यापक कशी बनली, हे कोणी स्पष्ट केले?

उत्तर >>>     जोहान्सश्मिट

 

प्रश्न ३०. विघटन होऊ न शकणारी लहानात लहान अर्थवाहक रचना कोणती?

उत्तर >>>     रूपिका

 

प्रश्न ३१. पदे, त्यांचे प्रकार, त्यांच्या पासून होणारे शब्दनिर्मीती इत्यादींचा विचार व्याकरणाच्या ज्या विभागात होतो, त्याला आधुनिक भाषाशास्त्रात काय म्हणतात?

उत्तर >>>     पदविन्यास

 

प्रश्न ३२. निरनिराळ्या पदांच्या संयोगाने त्यांच्यातील ध्वनींच्या एकमेकांवर ज्या क्रिया - प्रतिक्रिया होतात, त्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात?

उत्तर >>>     पदस्वनिमिक

 

प्रश्न ३३. भाषिक व्यवहारात अविष्कृत होणाऱ्या रुपाला काय म्हणतात?

उत्तर >>>     रूपिकांतर    

 

प्रश्न ३४. रुपिमाचा परस्पर संबंध जोडण्याचे कार्य करणाऱ्या रुपिमाला काय म्हणतात?

उत्तर >>>     कार्यकर रुपिम

 

प्रश्न ३५. "पदांपासून शब्द कसे बनतात हे पाहणे कोणत्या, विन्यसाचा एक मुख्य भाग आहे?

उत्तर >>>     पदविन्यास

 

प्रश्न ३६. एक पूर्ण विचारव्यक्त करणारा शब्द किंवा शब्दसमूहास काय म्हणतात?

उत्तर >>>     अर्थ

 

प्रश्न ३७. अन्विती कोणानुसार असावी लागते?

उत्तर >>>     लिंग, वचन, विभक्ती

 

प्रश्न ३८. "उच्चारित, श्राव्य, बुद्धिग्राहय व अर्थबोधक ध्वनी म्हणजे शब्द", हे मत कोणाचे?

उत्तर >>>     पतंजली

 

प्रश्न ३९. भाषेच्या विलासाला प्राधान्य देणारी वृत्ती कोणती?

उत्तर >>>     भारती          

 

प्रश्न ४०. 'अंत:स्तरीय' 'पृष्ठस्तरीय' असा द्विस्तरीय 'रचनासिद्धांत' कोणाचा?

उत्तर >>>     चाँम्स्की

 

प्रश्न ४१. 'अर्थविण्यासा'चा प्रवर्तक कोण?

उत्तर >>>     नोमचाँम्स्की      

 

 

 

 

3 comments:

  1. अतिशय छान व्यवस्थित माहिती.
    पर्याय न दिल्यामुळे सुटसुटीत

    ReplyDelete
  2. अजून अशीच बिनापर्यायांची माहिती द्यावी 🙏🌹🌹

    ReplyDelete
  3. अजून अशीच बिनापर्यायांची माहिती द्यावी 🙏🌹🌹

    ReplyDelete