प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये चेन्नईत आयोजित करण्यात आलेला 'जा माता (Ja Maata)'कोणत्या दोन देशांचा संयुक्त सागरी सराव आहे ? (#2025)
उत्तर➣ भारत आणि जपान
*** Notes -
जपानी भाषेमध्ये 'जा माता'चा अर्थ आहे “पुन्हा भेटू”
संयुक्त सागरी सरावातील जपानी जहाजाचे नाव: JCGS इत्सुकुशिमा
प्रश्न 2. RAW च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#jun2025)
उत्तर➣ IPS पराग जैन
प्रश्न 3. जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) गुंतवणुकीत भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025)
उत्तर➣ 10 वा
*** Notes -
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये ११,९४३ कोटी रुपयांच्या (US$ १.४ अब्ज) खाजगी गुंतवणुकीसह भारत १० व्या क्रमांकावर आहे.
अधिक माहितीसाठी - 👉 लिंक
प्रश्न 4. 'NATO शिखर परिषद 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#jun2025)
उत्तर➣ द हेग, नेदरलँड
*** Notes -
NATO - North Atlantic Treaty Organization
4 एप्रिल 1949 रोजी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील 12 देशांनी मिळून नाटोची स्थापना केली.
प्रश्न 5. भारतातील पहिला Sic सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट _________ मध्ये उभारला जाणार आहे. (#nov2025)
उत्तर➣ भुवनेश्वर, ओडिशा
*** Notes -
नोव्हेंबर २०२५ मध्ये, ओडिशाचे मुख्यमंत्री (मुख्यमंत्री) मोहनचरण माझी यांनी ओडिशातील भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली येथे भारतातील पहिल्या एंड-टू-एंड सिलिकॉन कार्बाइड ( SiC) सेमीकंडक्टरचे उद्घाटन केले
अधिक माहितीसाठी - 👉 लिंक
प्रश्न 6. सातही खंडांवरील सर्वोच्च शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण ठरला आहे ?
उत्तर➣ विश्वनाथ कार्तिकेय पदकांती (वय 16 वर्षे)
*** Notes -
त्यांच्या आधी, काम्या कार्तिकेयन ही वयाच्या 17 व्या वर्षी सात शिखरे सर करणारी सर्वात तरुण भारतीय होती. सर्व सात शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती अमेरिकन गिर्यारोहक जॉर्डन रोमेरो आहे, ज्याने वयाच्या 15 व्या वर्षी हा टप्पा गाठला.
प्रश्न 7. जगातील पहिला मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्तरावरील ई-मिथेनॉल प्लांट कुठे सुरु करण्यात आला आहे? (#2025)
उत्तर➣ कॅसॉ, डेन्मार्क (Kassø, Denmark)
प्रश्न 8. 'हरमनप्रीत सिंग आणि सविता पुनिया' यांना कोणत्या खेळासाठी सर्वोत्त्तम खेळाडू म्हणून 'बलबीर सिंग पुरस्काराने' गौरविण्यात आले आहे ? (#2025)
उत्तर➣ हॉकी
*** Notes -
नवी दिल्ली येथे झालेल्या 'हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024' मध्ये हरमनप्रीत सिंग आणि सविता पुनिया यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा बलबीर सिंग सीनियर पुरस्कार जिंकला.
अधिक माहितीसाठी - 👉 लिंक
प्रश्न 9. A23a हा जगातील सर्वात मोठा हिमखंड सध्या कोणत्या महासागरात आहे ? (#2025)
उत्तर➣ दक्षिण महासागर
प्रश्न 10. 'भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 (Corruption Perceptions Index - CPI)' नुसार 180 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025)
उत्तर➣ 96
*** Notes -
भारताचा क्रमांक 2023 - 93, 2022 - 85
2024 मध्ये भारताचा स्कोअर 38 पर्यंत घसरला, जो 2023 मध्ये 39 आणि 2022 मध्ये 40 होता.
निर्देशांक 0 ते 100 पर्यंतच्या स्केलचा वापर करतो, जिथे: 0 हा अत्यंत भ्रष्ट असल्याचे दर्शवितो, 100 हा भ्रष्टाचारमुक्त दर्शवतो.
शेजाऱ्यांशी तुलना : क्रमांक अनुक्रमे, 76 - चीन, 121 - श्रीलंका, 135 - पाकिस्तान, 149 - बांगलादेश
प्रश्न 11. देशातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ? (#jun2025)
उत्तर➣ मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गोविंदगड येथे
*** Notes -
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA) मध्य प्रदेशातील रेवा येथे देशातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र स्थापन करण्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे .
प्रश्न 12. 'स्पोर्टस्टार एसेस पुरस्कार 2025 (Sportstar Aces Awards 2025)' या सोहळ्यात 'स्पोर्टसस्टार ऑफ द इयर (पुरुष)' ____________ आणि स्पोर्टसस्टार ऑफ द इयर (महिला)' __________ यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. (#2025)
उत्तर➣ स्पोर्ट्सस्टार ऑफ द इयर (पुरुष): पीआर श्रीजेश (हॉकी)
स्पोर्ट्सस्टार ऑफ द इयर (महिला): मनू भाकर (नेमबाजी)
प्रश्न 13. राजस्थानमधील अजमेर येथील कोणत्या तलावाचे नाव बदलून आता 'वरूण सागर' असे ठेवण्यात आले आहे ? (#2025)
उत्तर➣ फॉय सागर (Foy Sagar)
*** Notes -
ब्रिटिश अभियंता श्री. फॉय यांच्या नावावरून या प्रकल्पाचे मूळ नाव ठेवण्यात आले होते. ब्रिटिश काळात 1892 साली दुष्काळ निवारण प्रकल्प म्हणून याची उभारणी करण्यात आली.
प्रश्न 14. राजस्थानमधील अजमेर येथील 113 वर्षे जुन्या 'किंग एडवर्ड मेमोरियल (रेस्ट हाऊस)'चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ? (#2025)
उत्तर➣ महर्षी दयानंद विश्रांत गृह
*** Notes -
ब्रिटिश राजवटीतील 'राजा एडवर्ड सातवा' याच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आले होते. आता आर्य समाजाचे संस्थापक 'महर्षी दयानंद सरस्वती' यांच्या स्मरणार्थ, ज्यांची अजमेर येथे समाधी आहे, या ठिकाणाचे नाव बदलण्यात आले.
प्रश्न 15. भारतातील पहिला स्वदेशी स्वयंचलित 'जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प (Indigenous Automated Bio-Medical Waste Treatment Plant)' कोठे सुरु करण्यात आला आहे ? (#2025)
उत्तर➣ एम्स (AIIMS) नवी दिल्ली
*** Notes -
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतील एम्स येथे भारतातील पहिल्या स्वदेशी स्वयंचलित जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले.
याचे नाव 'सृजनम' (Sṛjanam) असे ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी - 👉 लिंक
प्रश्न 16. 2025 मध्ये झालेल्या 48 व्या 'मिसेस युनिव्हर्स (Mrs. Universe) 2025' स्पर्धेचा खिताब कोणी जिंकला आहे ? (#2025)
उत्तर➣ शेरी सिंग (भारतीय)
*** Notes -
फिलिपीन्सची राजधानी मनिला येथील 'ओकाडा' येथे 'मिसेस युनिव्हर्स'ची 48 वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मिसेस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी शेरी सिंग ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.
प्रश्न 17. 2025 मध्ये झालेली 'मिस युनिवर्स इंडिया (Miss. Universe India) 2025' स्पर्धा कोणी जिंकली आहे ? (#2025)
उत्तर➣ मणिका विश्वकर्मा
*** Notes -
ठिकाण - जयपूर, राजस्थान.
मिस युनिव्हर्स इंडिया 2024 - रिया सिंघा
प्रश्न 18. 78 व्या 'ब्रिटिश अकादमी फिल्म अवार्ड्स (बाफ्टा) 2025 (BAFTA Awards 2025)' मध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ? (#2025)
उत्तर➣ कॉनक्लेव्ह (Conclave)
प्रश्न 19. पहिल्या 'हॉकी इंडिया मास्टर्स चषक 2025'चे विजेतेपद अनुक्रमे महिला व पुरुष गटात कोणी पटकावले आहे ? (#2025)
उत्तर➣ हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा (महिला) आणि हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू (पुरुष)
*** Notes -
ठिकाण - चेन्नई (तामिळनाडू)
उपविजेता संघ महिला गटात - पंजाब व पुरुष गटात - महाराष्ट्र
प्रश्न 20. टेनिस मधील 'ऑस्ट्रेलियन ओपन 2025' चा खिताब अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटात कोणी पटकावला होता ? (#2025)
उत्तर➣ जैनिक सिन्नर (पुरुष) आणि मैडिसन कीज़ (महिला)
*** Notes -
जैनिक सिन्नर (इटली) वि. अलेक्झांडर झ्वेरेवला (जर्मनी)
मैडिसन कीज़ (अमेरिका) वि. अरिना सबालेंका (बेलारूस)
प्रश्न 21. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत देशातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर आधारीत हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे ?
उत्तर➣ इंदोर, मध्यप्रदेश
प्रश्न 22. 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिवस कधी साजरा करण्यात आला होता ? (#2025)
उत्तर➣ 14 ते 28 जानेवारी 2025
📚 आणखी वाचा :
👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3
No comments:
Post a Comment