महानुभावांचे तत्वज्ञान
'सुत्रपाठ' या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातूनच महानुभावांचे
सारे तत्त्वज्ञान विशाल झाले आहे. हा पंथ व्दैती मताचाआहे. महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू
मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते,
या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. देवता या नित्यबद्ध आहेत,जीव बद्धमुक्त
आहेत. म्हणजेच बध्द असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे.
तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात तसा जीव हा "पाच पिशी" नियुक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथा ज्ञान, जीवत्व व आदिमळ या
त्या पाच पिशी होत. यासाठी 'उद्धवगीते'त मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टांत दिला
आहे. या पाच पिशी म्हणजे जणू पाच मडक्यांची
उतरंडच होय. यातील सर्वात तळाचे मडके अविद्या
हे आहे. हे अविद्येचे मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील. परमेश्वर हा नित्यमुक्त
असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे अथवा भक्ती
केली म्हणजे जीवाला मोक्ष मिळतो.
प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. देवतांना
महानुभावांनी गौण मानले आहे. त्यांच्या मते, देवता नित्यबद्ध आहेत, त्या ज्ञान, आनंद, ऐश्वर्य देऊ शकले तरी परमेश्वर होऊ शकणार नाही.मोक्ष परमेश्वराकडूनच
मिळू शकतो. देवतांकडून नाही. म्हणून देवतांची पूजा व उपासना यांना ते कमी लेखतात. देवतांचे
मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे. महानुभावांनी
नऊ देवता समूह कल्पिले आहेत.
महानुभावीय लोक ईश्वरास प्रमुख स्थान देतात
आणि ब्रह्मास त्याचा एक भाग मानतात. त्यांच्या मते ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त,
स्वयंप्रकाशी सर्वव्यापक, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता आहे. जीवाच्या उद्धारासाठी
परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी
किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो म्हणून त्यास व्दैती पंथ
असे म्हणतात.
चक्रधरांनी आत्मज्ञान,
भक्ती आणि कृपा यांना अधिक महत्त्व दिले
आहे. ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान,
अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. संपत्तीचा मोह,
आप्तांचे प्रेम यांचा सर्वसंगपरित्याग करून जीवाचे परमेश्वरात अनुसरले पाहिजे.
वृद्धाने केलेल्या अनुसरनास महानुभाव फारसे महत्त्व देत नाहीत. ज्ञानमार्ग आणि
भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने होत. त्यांच्या मते, प्रेम हें
ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असते.
महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृत
युगात 'हंसावतार', त्रेतायुगात 'दत्तावतार', द्वापारयुगात 'कृष्णावतार', आणि कलियुगात
'श्रीचक्रधर' असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा
केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. महानुभाव गुरू मानतात पण गुरु चे
स्तोम माजवत नाहीत. गुरूवर प्रीती करावी पण
त्याला परमेश्वर समजू नये. महानुभाव संन्यासी अस्पृश्यता पाळत नाही, त्यामुळे या पंथात
स्त्रिया व शुद्ध यांनाही संन्यास दीक्षेचा अधिकार आहे. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा
असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांना प्रमाण मानतात. चक्रधरांची
वचने ही महानुभावत 'श्रती' होय. नागदेवाचार्याच्या वचनास ते 'स्मृती' म्हणून संबोधतात.
या तत्त्वज्ञानाला एक सामाजिक बाजूही आहे. यादवकालीन
महाराष्ट्रात निरनिराळ्या देवदैवता यांचे बंड माजले होते. ते मोडून काढायचे तर देवता
ईश्वर नाहीत असे कोणीतरी ठासून सांगणे आवश्यक होते व ते चक्रधरांनी सांगितले. मोक्षदाता
एकच परमेश्वर आहे, दुसरे कोणीही नाही, हा सिद्धांत म्हणजे तत्वज्ञानाचा गाभा आहे. त्यांचे
एकूण तत्वज्ञान समन्वयात्मक आहे. प्रत्येक मतातील काही भाग घेऊन त्या सर्वांचे मिळून
त्यांनी आपले 'शास्त्र' सिद्ध केले आहे. म्हणून ते म्हणतात "सकळही शास्त्रे या शास्त्राची
मिळती । परी हे कव्हाणाही न मिळे" महानुभव तत्वज्ञानाचे वर्णन चक्रधरांच्या शब्दात
'परशास्त्र' म्हणजे परमेश्र्वराचे शास्त्र, असे केल्यास ते यथार्थ होईल.
●
महानुभावांचा
आचारधर्म
कोणताही धर्म आचारप्रधान असतो. तसाच महानुभाव
पंथाचा धर्म ही आचारप्रधान होता. महानुभव पंथ हा साधकांचा पंथ असल्यामुळे त्या पंथातील
असणारे नियम आणि आचारधर्म याविषयाची कल्पना अतिशय कडक अशा होत्या. पंथामध्ये संन्यस्थ आणि गृहस्थ असे शिष्यांचे दोन
विभाग केले पहावयास मिळतात. तर त्यामध्ये संनास्याने नित्य भ्रमंती, भिक्षाभोजन करावे,
तसेच एकांतवास स्वीकारुन परमेश्वराचे सतत नामस्मरण
करावे अशी अपेक्षा असते. 'कर्म: धर्म: विधी: विखो: परित्यजौनि परमेश्वरा शरण रिगावे:'
जिवेश्वर भेद, भक्तियोग, संन्यास व अंहिसा या चार प्रमुख तत्वांच्या आधारावर महानुभावांचा
आचारधर्म उभा आहे.
साधकाने सर्व गोष्टींचा त्याग करून एकांतवास स्वीकारवा.
तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ घालवू नये. सातत्याने फिरते राहिले पाहिजे. यासाठी त्यांने
कुठल्याही गोष्टींचा, मोहाचा त्याग करावा. आप्तेष्ट,सगेसोयरे यांचा त्याग करावा. ज्याच्याबरोबर
त्याचे संबंध प्रस्थापित होतील ते जास्त काळ टिकवून ठेवू नये. तसेच स्त्रीचे दर्शन
तर त्यांनी घेऊच नये कारण 'स्त्री मणिजे मत्त द्रव्याचा रावोगा : आणिके द्रव्ये सेवेलेया
माजविती : स्त्री दर्शन मात्रेचि माजवी : म्हणून चित्रिची स्त्री न पहावी' म्हणून ज्याच्या
संबंधाने मनामध्ये विकार उत्पन्न होतात, त्या गोष्टीच टाळल्या पाहिजेत, असे महानुभाव
आचारधर्माचे नियम आहेत.
नुसते वैराग्य महानुभावांचा मान्य नाही. त्यांना ज्ञानयुक्त वैराग्य हवे. ज्ञानाविना वैराग्याचा
काय उपयोग? असा ते प्रश्न विचारतात. तसेच ज्या साधकाजवळ वैराग्य
आहे, ज्ञान आहे त्या साधकांने त्याचा
डांगोरा पिटू नये. त्याने विनयशील,
मनुष्यमात्र होऊनी रहावे. त्यांच्या मते,
ज्याला वैराग्य मिरवायला आवडेल तो एक विकारच म्हणावा. ईश्वरभक्तीवर त्यांचा अधिक भर होता. तसेच अहिंसा हे महानुभावीय
चतू:सूत्रीतील महत्त्वाचे तत्त्व.
या अहिंसेचे पालन अशा रीतीने करावे की 'तुमचेनि मुंगी रांड
न होआवी' आपणास 'मारिता पुजिता समानचि'
असावा.
'भिक्षा राज्य बाई' असे चक्रधरांनी सांगितले असले तरी त्या भिक्षेसाठी काही पथ्थेही सांगितली
आहेत. भिक्षा मागताना घर निवडू नये.भिक्षेच्या
आशेने ओळखीच्या घरी आणि तोरण लावलेल्या घरी मुळीच जाऊ नये. दीक्षा चे अन्नग्रहण करताना
त्याची चौक घेऊ नये ते 'नावडतं नावडत' सेवावे. 'रेंदेया चेंदेया दरु भरिजे' असे ते
म्हणतात. हे भोजन केवळ देह उभा ठेवण्यासाठी
आहे. 'प्राणासि आटारु देआवा इंद्रियासी नेदावा' राणा ही त्यामागील भूमिका आहे. झोपतानाही
श्वान कुंडली कीजे' : परनिंदा परवार्ता करू नये. त्यापेक्षा झोप परवडली. काम, क्रोध,
लोभ ही तिन्ही. नरकद्वारे आहेत काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्यात म्हणजे संन्यास,
अहंकार टाकणे आवश्यक. 'अहंतेचे मूळ संकेती उपडावे'.
भ्रमण
करीत असताना एकमेकांस भेटलात श्रमनिवृत्ती करा, एकच खानपान करा, गुरूच्या कथा - वार्ता
करा, पण पाच सात दिवसांपेक्षा अधिक एकत्र राहू नका. जनतेशी बोला पण इतर वेळी गुपचूप
बसावे. अन्य पंथासी संबंध ठेवू नका. कर्मजड होऊ नका.
महानुभावांचा आचारर्धम 'प्रतिक्षणी त्यागु करीत राहून जन्मजिवित परमेश्र्वरा देयावे', असे सांगतो.
● महानुभाव
संप्रदायाच्या पद्य व गद्य परिचय वाङ्मयाचा
परिचय
महानुभावांचे गद्य :
महानुभाव वाङमयाची निर्मिती ही पंथाच्या
स्थापने पासून सुरु झाली व ती पुढे कितीतरी वर्षे अव्याहत चालू राहिली. प्रामुख्याने
प्रारंभीची ग्रंथांची निर्मिती झाली त्याचे स्वरूप जवळजवळ सारखेच आहे श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेय,श्रीचक्रपाणी,
श्रीगोविंदप्रभू, श्रीचक्रधरस्वामी हे पंचकृष्ण वंदनीय म्हणून पाचही अवतारांचे चरित्र
लिहिले गेले. श्रीनागदेवाचार्य हे पंथाचे पहिले आचार्य व असामान्य कर्तृत्वाचे विद्वान
म्हणून त्यांचेही चरित्र लिहिले गेले. स्वामींनी सांगितलेला लीळाचरित्रातील सुत्रे
वेगळी काढून कैशिराज व्यासांनी सुत्रपाठाचे संपादन केले तर ती सुत्रे ऐकणारास सुलभ
व्हावीत म्हणून त्या अनुषंगाने स्वामींनी सांगितले दृष्टांत, तेही केशिराजांनी वेगळे काढून दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार
केला. हे सर्व चरित्रग्रंथ व तत्वज्ञानपर ग्रंथ मराठी वाङमयाच्या इतिहासात अत्यंत
महत्त्वाचे आहेत. हे ग्रंथ केवळ वाङमय म्हणूनच अभ्यासण्यासारखे नाहीत, तर ते ज्या काळात
निर्माण झाले, त्या - त्या काळातील भाषेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. ते सांस्कृतिक
व ऐतिहासिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत.यात लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्रासारखे चरित्र
ग्रंथ आहेत. पूजावसरासारखे स्वामींची दैनंदिनी विशद करणे महत्त्वपूर्ण प्रकरण आहे.
दृष्टांतपाठासारखा तत्कालीन लोकजीवनावर प्रकाश टाकणारा कथांचा
संग्रह आहे. असे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले
हे महानुभाव ग्रंथ आहेत.
महानुभाव तत्वज्ञान :
'सुत्रपाठ' या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले
जाते. त्यातूनच महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशाल झाले आहे. हा पंथ व्दैती मताचाआहे.
महानुभाव पंथ हा बाराव्या शतकात उदयाला आलेला एक विचारप्रवाह
आहे.
● श्रीचक्रधरांनी चार पदार्थाचे प्रतिपादन केले. (जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर)
● पहिला पदार्थ : जीव व त्याचे स्वरूप :
"नित्य: केवळ: अनादी: अविद्यायुक्त
वस्तू एकू आती: ते जीव शब्दे
बोलिजे" यात नित्य म्हणजे कायमची, केवळ म्हणजे फक्त, त्याचे आंतरिक स्वरूप शुद्ध आहे व अनादी म्हणजे मुळातला. तो अविद्येने ग्रस्त आहे. तो स्फटिकासारखा शुभ्र असला तरी त्याचे शुभ्रत्व अनादी अविद्येने
युक्त आहे.
● दुसरा पदार्थ : देवता व त्याचे स्वरूप :
'देवता' हे नाम स्त्री
लिंगी आहे.
● तिसरा पदार्थ : प्रपंच व त्याचे स्वरूप
● चवथा पदार्थ : परमेश्वर व त्याचे स्वरूप
● महानुभाव
चार युगांचे चार अवतार मानतात.
कृत
युगात
'हंसावतार', त्रेतायुगात 'दत्तावतार', द्वापारयुगात
'कृष्णावतार', आणि कलियुगात 'श्रीचक्रधर'
असे हे अवतार होत.
●
महानुभावांचा आचारधर्म :
जिवेश्वर भेद, भक्तियोग, संन्यास व अंहिसा
या चार प्रमुख तत्वांच्या आधारावर महानुभावांचा आचारधर्म उभा आहे.
धर्म कोणताही
असो, त्याची दोन
अंगे असतात. एक विचार व
दुसरा आचार. विचार म्हणजे
तत्व, नियम आणि त्या
तत्वांचे प्रत्यक्ष कृतीत पालन करणे म्हणजे आचार. विचार श्रेष्ठ की आचार श्रेष्ठ असा वाद नेहमीच उपस्थित केला जातो. कोणताही विचार हा आचारा शिवाय महान होऊ शकत नाही.
यावरून आपल्याला त्या माणसाच्या ठिकाणी असलेल्या विचारांचा प्रत्यय येत असतो आणि विचार
श्रेष्ठ असेल तरच तो आचार चांगला करू शकतो. म्हणजे आचार - विचार यात श्रेष्ठ कोण व
कनिष्ठ कोण असा भेद करणे चुकीचे आहे.
साधकाने सर्व गोष्टींचा त्याग करून एकांतवास
स्वीकारवा. तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ घालवू नये. सातत्याने फिरते राहिले पाहिजे.
यासाठी त्यांने कुठल्याही गोष्टींचा, मोहाचा त्याग करावा. आप्तेष्ट, सगेसोयरे यांचा त्याग करावा. ज्याच्याबरोबर
त्याचे संबंध प्रस्थापित होतील ते जास्त काळ टिकवून ठेवू नये. तसेच स्त्रीचे दर्शन
तर त्यांनी घेऊच नये कारण
'स्त्री मणिजे मत्त द्रव्याचा रावोगा : आणिके
द्रव्ये सेवेलेया माजविती : स्त्री दर्शन मात्रेचि माजवी
: म्हणून चित्रिची स्त्री न पहावी' म्हणून ज्याच्या संबंधाने मनामध्ये
विकार उत्पन्न होतात, त्या गोष्टीच टाळल्या पाहिजेत, असे महानुभाव आचारधर्माचे नियम
आहेत.
● महानुभाव
संप्रदायाच्या पद्य व
गद्य परिचय वाङ्मयाचा परिचय
महानुभावांचे गद्य : मराठी गद्य वाङ्म्याची सुरुवात
महानुभाव पंथीयांनीच केली.
★ लीळाचरित्र :
मराठीतील आद्य
चरित्रग्रंथाचा मान लीळाचारित्राला मिळतो.
याचे लेखन महिद्रव्यास
उर्फ म्हाइंभटानी
केले आहे.
त्यांना आद्य चरित्रकाराचा मान मिळतो.
एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध असे त्याचे तीन भाग करण्यात आले.
एकांक मधील
७४, पूर्वार्धतील
३५८, उत्तरार्धातील
४८८ लीळा असा लीळा चरित्राचा लेखन प्रपंच आहे.
या लीळा महादायिसेसारख्या
जिज्ञासू शिष्येकडून
त्या मिळविलेल्या.
★ गोविंदप्रभु चरित्र
इ.स.१२८८ साली लिहिलेल्या
या चरित्रग्रंथाचे खरे नाव 'ऋद्धिपुर - चरित्र' वा 'ऋद्धिपुर लीळा' असे आहे.
अलीकडे 'श्रीगोविंदप्रभूचरित्र' हेच नाव सर्वत्र
रूढ झाले आहे.
श्रीगोविंदप्रभूच्या जीवनातील अनेक
प्रसंगांचे वर्णन यात आहे.
"प्राचीन मराठी गद्याचा नमुना म्हणून तर भाषाभ्यासकांना हा
ग्रंथ मऱ्हाटीचा वाटेल. तत्कालीन व-हाडी भाषेचे स्वरूप समजण्यासाठी
या ग्रंथासारखे दुसरे महत्वाचे साधन नाही." - डॉ. कोलते
★स्मृतिस्थळ
या ग्रंथात
नागदेवचार्यांच्या 'स्मृती' संकलित केल्या आहेत.
महानुभाव पंथात
चक्रधरांच्या वचनांना 'श्रुती' व नागदेवाचार्यांच्या वचनांना 'स्मृती' म्हटले जाते.
या ग्रंथात
२६१ स्मृती आहेत.
महानुभावांचे पद्य : मराठी पद्य वाङ्मयाच
मराठी आद्य
कवयित्री महदंबा आणि तिचे 'धवळे'
● मराठी शारदेच्या दरबारात सर्वप्रथम स्थानापन्न होण्याचा मान
महदंबेनी मिळविला.
● महदंबने इ.स. १२८७ पूर्वी हे धवळे रचिले असावेत.
● धवळे म्हणजे - वराविषयी लग्नात गावयाचे गीत म्हणजे धवळे.
● 'धवळे' पूर्वार्ध व उत्तरार्ध अशी दोन भागांत आहेत.
श्रीप्रभूंच्या वेळी गायिले - तो पूर्वार्ध
व पुढे त्यांच्या देहवसानानंतर म्हाइंभट्ट व लक्ष्मींभट्ट यांच्या
आग्रहाखातर गायिले -
तो उत्तरार्ध.
पूर्वार्धात ८३ धवळे आहेत तर उत्तरार्धात ६३ धवळे आहेत.
महानुभवांच्या "साती पदम ग्रंथ"
● महानुभाव पंथातील कवींनी प्रारंभीच्या काळात लिहिलेल्या पुढील सात
काव्यांना पंथात "सातीग्रंथ' या नावाने संबोधितात.
काव्य कवी रचना काळ
१) रुक्मिणीस्वयंवर नरेंद्र श. १२१४ -१२१५ (इ.स.१२९२-१२९३)
२) शिशुपाल वध भास्करभट्ट बोरीकर श. १२३५ (इ.स.१३१३)
३) उद्धवगीता अथवा
एकादशस्कंध भास्करभट्ट
बोरीकर श. १२३६ (इ.स.१३१४)
४) वछाहरण दामोदर पंडित. श. १२३८ (इ.स. १३१६)
५) ज्ञानप्रबोध पंडित
विश्वनाथ श. १२५३ ( इ.स.१३३१)
६) सह्याद्रीवर्णन खळोव्यास. श.१२५५ (इ.स.१३३३)
७) श्रीऋध्दीपूरवर्णन. नारायण पंडित श. १२८५ (इ.स. १२६३)
वरील साती
ग्रंथाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.
कृष्णचरित्रपर. : रुक्मिणीस्वयंवर, शिशुपाल वध, उध्दवगीता, वच्छहरण
श्रीदत्तवर्णनपर. : सह्याद्रीवर्णन, ज्ञानप्रबोध, श्रीऋध्दीपूरवर्णन
● रुक्मिणी स्वयंवर :-
रुक्मिणी
स्वयंवराचा कर्ता नरेंद्र, नरेंद्राला रामदेवराय यादवाचा राजाश्रय असून त्याला साम व
नृसिंह
हे दोन बंधू होते.
या दोघा भावांनीच नरेंद्रास
श्रीकृष्णकथेवर काव्यलेखन करण्यास सांगितले. रुक्मिणी स्वयंवराचा जन्म इ.स. १२१२
मध्ये झाला. हे काव्य १८०० ओव्यांचे आहे.
● शिशुपाल वध :-
'शिशुपाल वध कर्ता' भास्करभट्ट बोरीकर हा मूळचा राहणारा बोरी गावचा भानुभट.
शिशुपाल वध
हा त्याचा काव्यदृष्ट्या सरस ग्रंथ इ.स. १२१३ मध्ये लिहिला. या ग्रंथात १०८७ ओव्या आहेत.
१०८७ ओव्या
असून शिशुपाल वधासाठी फक्त १०० ओव्याच आहेत. उरलेल्या सर्व ओव्या श्रीकृष्ण - रुक्मिणी यांच्यावर आहेत.
● उद्धवगीता :
व्यासांनी रचलेल्या भागवतातील एकदशस्कंधावर भास्करभट्ट बोरीकरांनी इ.स. १३१४ मध्ये उद्धवगीता लिहिली आहे.
या ग्रंथात
८२७ ओव्यांत उधवगीतेचा संक्षेप केला आहे.
एकादशस्कंधावरील मराठीतील हे पहिले भाष्य आहे. या स्कंधात श्रीकृष्णाने उधवास केलेला उपदेश भास्करभट्ट बोरीकरांनी विस्तारपूर्वक सांगितला आहे.
● वच्छाहरण
:
दामोदर पंडित यांनी इ.स. १३१६ मध्ये वच्छाहरण हे काव्य रचले.
दामोदर पंडितांनी ५०३ ओव्यांचे
काव्य लिहिले.
कृष्णचरित्रातील वत्सहरणाचा अद्भूतरम्य प्रसंग भागवतील कथेच्या
आधारे वर्णिलेला आहे.
● ज्ञानप्रबोध
:
पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांनी ' ज्ञानप्रबोध ' हे१२०४ ओव्याची प्रबंधकाव्य इ.स.
१२३१ मध्ये लिहिले.
गीतेतील तेराव्या अध्यायामधील ज्ञानलक्षणे सांगणाऱ्या श्लोकांवरील हे भाष्य आहे. यातील
पहिल्या १२५ ओव्यात आमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती ही ज्ञानलक्षणे सांगणाऱ्या श्लोकांचे स्पष्टीकरण केलेले
असून उरलेली सर्व रचना अगदी स्वतंत्र असल्याचे
दिसते.
● सह्याद्रीवर्णन :
पंथीय उपासकाच्या
भूमिकेतून खळोव्यास
उर्फ राघोपाध्याय पाथरीकर यांनी इ.स.१३३३ मध्ये 'सह्याद्रिवर्णन' लिहिले.
श्री दत्तात्रेय स्तोत्र असेच
जवळजवळ या ग्रंथाचे स्वरुप आहे.
श्री दत्तात्रेयाचा अवतार जेथे झाला ते स्थान सह्याद्री.
म्हणून 'सह्याद्रिवर्णन' हे नाव या ग्रंथात दिलेले आहे.
५१७ ओव्यांच्या
या काव्यात दत्तात्रयाचे चरित्र फक्त १६०ओव्यात आले आहे.
● श्रीऋध्दिपूरवर्णन
:
नारोव्यास उर्फ नारायण व्यास बहाळीये यांनी इ.स.१३६३ मध्ये हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथांची ओवीसंख्या ६४१ आहे.
भाषेची प्रसादिकता आणि रसाळपणा ही रिधपूरचे खास वैशिष्ट्ये.
महानुभावांची वाङ्मची ठळक
वैशिष्ट्ये:-
महानुभाव पंथ
हे धार्मिक प्रेरणेने निर्माण झालेले हानी वाङ्मय विविधतेने व वैचित्र्याने नटलेले
आहे. त्यात 'लीळाचरित्रा' सारखे चरित्रग्रंथ आहे. 'रुक्मिणीस्वयंवरा' सारखी आख्यान
काव्य आहेत. 'पूजावसरा' सारखे चक्रधर यांचा दिनक्रम सांगणारे प्रकरण आहे, त्यांच्या
सूत्रमय वचनांचा 'सूत्रपाठ' व ती वचने विशद करण्यासाठी दिलेल्या दृष्टांतांचा 'दृष्टांतपाठ'
आहे, त्यावर लिहिलेली भाष्य - महाभाष्य आहेत.
चक्रधरांच्या भ्रमणाचा भूगोल सांगणारी 'स्थानपोथी' आहे. महदंबेच्या 'धवळ्या' सारखी भागवितातून साकार
केलेली स्वयंवर कथा आहे. गीता टीका आहे, 'प्रमेय'
आहे, 'गुढे' आहेत, 'स्थळवर्णने' आहेत, आरत्या, पदे, भारुडे,स्तोत्रे आहेत. हे वाङ्मय
जसे वैचित्र्याने नटलेले आहे.
अशा या वाङ्मयाची वैशिष्ट्य अनेक
आहेत.
१) महानुभावांची
हस्तलिखिते
* महानुभाव पानांच्या मध्यभागी
लिहित असत व अक्षरांच्या डोक्यावर रेषा देत नसत.
* मजकूर
संकेत - लिपीत बद्ध
असे आणि पोथीत काही शब्दांच्या खुणा स्वतंत्र असत.
● मजकुरात विरामचिन्हे
नसतात तर (:) अशी दोन टिंबे
असत.
२) महानुभवांचे लिपीसंकेत :
● महानुभाव यांनी आपले
साहित्य सांकेतिक लिपीत बद्ध करून ठेवले आहे.
● लिपीसंकेत इ.स. १३५३ च्या सुमारास निर्माण झाला.
३) महानुभावीय वाङ्मयाचे भाषिक महत्त्व :
● महानुभावीय साहित्याचा
भाषा अभ्यासात मोठा वाटा आहे आणि तेच महानुभावीय साहित्याचे महत्वाचे वैशिष्टे
आहे.
सातशे वर्षापूर्वीचे
अनेक महानुभावीय ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 'सुत्रपाठ' सारखे ग्रंथ महानुभवांनी पूजनीय मानून त्यातील शब्दन शब्द
जशाचा तसा आजपर्यंत राखण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे महानुभवांच्या ह्या आदी ग्रंथा वरून भाषेचा ऐतिहासिक
अभ्यास करावयास चालना मिळते. तत्कालीन परिस्थिती कशी होती, भाषेमध्ये कोणकोणते प्रवाह होते याचा अभ्यास करावयास यामुळे
मोठे मार्ग सापडतात.
No comments:
Post a Comment