Wednesday, May 03, 2023

Mpsc Polity Questions In Marathi | भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 8

   MPSC Indian Polity
भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 8


प्रश्न १. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा mains 2021)

(a) देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही केंद्राची(Union) भाषा असेल

(b) भारतास राष्ट्रीय भाषा (National Language) नाही.

(c) सध्या आठव्या अनुसूची मध्ये हिंदी – इंग्रजी सह 22 भाषा समाविष्ट आहेत.

(d) 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 3 भाषा म्हणजे (1) हिंदी (2) बंगाली (3) आणि तमिळ.


अ) (a) आणि (b)

ब) (a), (b) आणि (d)

क) (c) आणि (d)

ड) वरिल सर्व 

  • अ) (a) आणि (b)




  • प्रश्न २. खालील बाबींचा योग्य क्रम लावा - (मुलभूत कर्तव्ये) (राज्यसेवा mains 2021)

    (a) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे

    (b) वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावादाचा विकास करणे

    (c) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

    (d) राष्ट्राची सेवा करणे


    अ) (a), (b), (c), (d)

    ब) (a), (d), (b), (c)

    क) (a), (c), (d), (b)

    ड) (a), (d), (c), (b)

  • ड) (a), (d), (c), (b)





  • प्रश्न ३. भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नांव ________ यांनी सुचविले पाहिजे. (राज्यसेवा mains 2021)

    अ) कोणतेही 50 नागरिक

    ब) कोणतेही 10 निर्वाचन मंडळाचे सदस्य

    क) कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य

    ड) कोणतेही 25 संसद सदस्य

  • क) कोणतेही 20 निर्वाचन मंडळाचे सदस्य





  • प्रश्न ४. जोड्या लावा  (राज्यानीतीची मार्गदर्शक तत्वे) (राज्यसेवा mains 2021)

    A) गोहत्या प्रतिबंध                          1) अनुच्छेद 50

    B) ग्राम पंचायतीचे संघटन                2) अनुच्छेद 49

    C) राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण              3) अनुच्छेद 40

    D) कार्यपालिकेपासून न्यायालयाची    4) अनुच्छेद 48

        पृथकता


    अ) A - 1, B - 4, C - 2, D - 3

    ब) A - 4, B - 2, C - 1, D - 3

    क) A - 3, B - 4, C - 2, D – 1

    ड) A - 4, B - 3, C - 2, D – 1

  • ड) A - 4, B - 3, C - 2, D – 1





  • प्रश्न ५. मुलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे ही एकमेकांना पूरक असून एकाला दुसऱ्यासाठी बळी देण्याची आवश्यकता नाही असा दृष्टीकोण सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्विकारला होता ? (राज्यसेवा mains 2021)

    अ) गोलकनाथ खटला

    ब) चंपकम दोराईराजन खटला

    क) केशवानंद भारती खटला

    ड) मिनर्व्हा मिल्स खटला

  • ड) मिनर्व्हा मिल्स खटला





  • प्रश्न ६. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती ________ द्वारे केली जाईल. (राज्यसेवा mains 2021)

    अ) पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    ब) राज्यातील प्रशासकीय प्राधिकरणाच्या प्रमुखांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    क) गृहखात्याचे सचिव यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

    ड) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती

  • ड) भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, राष्ट्रपती






  • प्रश्न ७. 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ? (राज्यसेवा mains 2021)

    a) या कायद्याने भारताच्या संविधानात भाग XI - A जोडला आहे.

    b) या कायद्याने भारताच्या संविधानात बारावे परिशिष्ट जोडले आहे.

    अ) फक्त a

    ब) फक्त b

    क) दोन्ही

    ड) एकही नाही

  • ब) फक्त b





  • प्रश्न ८. जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन _________ . (राज्यसेवा mains 2021)

    अ) केंद्रीय शासनाकडून दिले जाते

    ब) संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते

    क) भारताच्या संचित निधीतून दिले जाते

    ड) राष्ट्रपती सांगतील त्या राज्याद्वारा दिले जाते

  • ब) संबंधित राज्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जाते





  • प्रश्न ९. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (राज्यसेवा mains 2021)

    (a) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात

    (b) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे

    (c) राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात

    (d) राज्यपाल सदस्यांना पदावरून दूर करू शकतात


    अ) (a), (b)

    ब) (a), (b), (d)

    क) (a), (b)

    ड) (b), (c)

  • अ) (a), (b)





  • प्रश्न १०. खालीलपैकी किती सदस्य विधानपरिषदेत राज्यपालांकडून नामनिर्देशित केले जातात ?

    अ) नऊ

    ब) एक - तृतीयांश

    क) एक - बारांश

    ड) एक - षष्ठांश

  • ड) एक - षष्ठांश





  • प्रश्न ११. संविधान सभेने शेवटचे अधिवेशन __________ रोजी घेतले.

    अ) 24 जानेवारी 1950

    ब) 24 जानेवारी 1952

    क) 24 जानेवारी 1949

    ड) 22 जुलै 1947

  • अ) 24 जानेवारी 1950





  • प्रश्न १२. जर लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ? (राज्यसेवा mains 2021)

    अ) राज्यसभेचे सभापती

    ब) राज्यसभेचे उपसभापती

    क) राष्ट्रपती

    ड) लोकसभेचे महासचिव

  • ब) राज्यसभेचे उपसभापती





  • प्रश्न १३. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये.

      अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू करण्यात आले.

      ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद करण्यात आली.


    अ) 2 री घटनादुरुस्ती, 1952

    ब) 7 वी घटनादुरुस्ती, 1956

    क) 85 वी घटनादुरुस्ती, 2001

    ड) 44 वी घटनादुरुस्ती, 1978

  • ब) 7 वी घटनादुरुस्ती, 1956





  • प्रश्न १४. 69 वी घटनादुरुस्ती 1991 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रीमंडळ निर्मितीची तरतूद करण्यात आली ?

    अ) दिल्ली

    ब) लक्षद्वीप

    क) पंजाब

    ड) त्रिपुरा

  • अ) दिल्ली





  • प्रश्न १५. गोवा विधानसभेत 30 पेक्षा कमी सदस्य नसतील, अशी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे ?

    अ) कलम 371 - जी

    ब) कलम 371 - आय

    क) कलम 371 - एच

    ड) कलम 371 - जे

  • ब) कलम 371 - आय




  • प्रश्न १६. संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठविले गेल्यास………… ?

    अ) राष्ट्रपतींना त्यास संमती द्यावी लागते

    ब) राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकता

    क) राष्ट्रपती ते दुरुस्त्या करून संमत करू शकता

    ड) राष्ट्रपती ते फेटाळू शकता

  • ब) राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवू शकता





  • प्रश्न १७. योग्य जोड्या लावा (राज्यघटनेचे स्त्रोत - देश)

    A) समवर्ती सूची               1) ऑस्ट्रेलिया

    B) एकेरी नागरिकत्व          2) ब्रिटीश

    C) मुलभूत कर्तव्य              3) रशिया


    अ) A - 1, B - 3, C - 2

    ब) A - 3, B - 2, C - 1

    क) A - 1, B - 2, C - 3

    ड) A - 2, B - 3, C - 1

  • क) A - 1, B - 2, C - 3




  • प्रश्न १८. राज्यघटनेतील भाग 6 मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही.

      1) सर्वोच्च न्यायालय       2) उच्च न्यायालये        3) दुय्यम न्यायालये      4) राज्य विधिमंडळ       5) सहकारी संस्था

    अ) फक्त 1 व 5

    ब) 1, 2 व 5

    क) 2, 3 व 4

    ड) फक्त 4 व 5

  • अ) फक्त 1 व 5




  • प्रश्न १९. योग्य जोड्या लावा (राज्य व विधानसभेतील जागा)

    A) महाराष्ट्र             1) 288

    B) उत्तरप्रदेश           2) 403

    C) गोवा                 3) 40

    D) दिल्ली               4) 70


    अ) A - 2, B - 3, C - 4, D - 1

    ब) A - 2, B - 1, C - 3, D - 4

    क) A - 1, B - 2, C - 3, D - 4

    ड) A - 2, B - 3, C - 1, D - 4

  • क) A - 1, B - 2, C - 3, D – 4




  • प्रश्न २०. योग्य पर्याय निवडा.

    अ) राज्यपाल -     अनुच्छेद 153

    ब) भारताचा महान्यायवादी -     अनुच्छेद 76

    क) वित्त आयोग -     अनुच्छेद 280

    ड) राज्याचा महाधिवक्ता -     अनुच्छेद 165


    अ) फक्त अ बरोबर

    ब) फक्त क बरोबर

    क) फक्त अ, ब आणि क बरोबर

    ड) सर्व पर्याय बरोबर

  • ड) सर्व पर्याय बरोबर




  • पुढे >>>>>>>                <<<<<<< मागे





    mpsc polity notes ||mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || Indian Polity MCQ Quiz in marathi || mpsc polity pyq || mpsc polity notes in marathi || mpsc polity questions in marathi || mpsc polity mcq in marathi 

    No comments:

    Post a Comment