SET NET PET Marathi Paper 2
अ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
ब) गोविंद सदाशिव टेंबे
क) वसंत कानेटकर
ड) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
प्रश्न २. जोसेफ स्टाइनच्या संगीत नाटक ‘फिडलर ऑन द रूफ’ वरून ‘बिकट वाट वहिवाट’ हे नाटक कोणी रचले आहे ?
अ) गोविंद बल्लाळ देवल
ब) काशिनाथ गोविंद नातू
क) गोविंद सदाशिव टेंबे
ड) व्यंकटेश माडगुळकर
प्रश्न ३. ‘जोहार’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘मुंबईची माणसं’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘उघडलं स्वर्गाचे दार’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘सीमेवरून परत जा’, ‘लहानपण देगा देवा’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘एखाद्याचे नशीब’ इ. नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?
अ) मधुसुधन कालेलकर
ब) श्री.वि. गोरे
क) बाळकृष्ण हरी कोल्हटकर
ड) का.दा. रावत
प्रश्न ४. जैमिनी अश्वमेधातील प्रमिलेच्या आख्यानावर आधारीत नाटककार खाडीलकरांनी _________ हे नाटक लिहिले.
अ) बायकांचे बंड
ब) सत्वपरीक्षा
क) भाऊबंदकी
ड) प्रेमध्वज
प्रश्न ५. ‘वन रूम किचन’, ‘वात्रट मेले’, ‘वस्त्रहरण’, ‘अश्या या दोघी’, ‘वेडी माणसं’, ‘वर भेटू नका’, ‘वर परीक्षा’ इ. नाटके कोणाची ?
अ) अच्युत बर्वे
ब) बापूराव माने
क) गंगाराम गवाणकर
ड) श्रीधर कुलकर्णी
प्रश्न ६. गिरिजाबाई केळकर यांचे ‘पुरुषांचे बंड’ या नाटकाच्या पुस्तकास कोणाची प्रस्तावना आहे ?
अ) य. ना. टिपणीस
ब) चिंतामणराव कोल्हटकर
क) वासुदेवराव आपटे
ड) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
प्रश्न ७. इ. स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अद्यक्ष कोण होते ?
अ) गणेश श्रीकृष्ण खापर्डे
ब) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
क) केशव रामचंद्र छापखाने
ड) अनंत हरि गद्रे
प्रश्न ८. ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘मिकी आणि मेमसाब’, ‘बेगम बर्वे’, ‘अतिरेकी’, ‘शनिवार - रविवार’, ‘दुसरा सामना’ ही नाटके कोणाची ?
अ) चंद्रकांत कुलकर्णी
ब) अतुल पेठे
क) सतीश आळेकर
ड) भक्ती बर्वे
प्रश्न ९. ‘महाराष्ट्र नाट्यकला व नाट्यवाङ्मय’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) गणेश रंगनाथ दंडवते
ब) गोपाळ वामन बापट
क) प्रा. वसंत कानेटकर
ड) गोविंद केशव भट
प्रश्न १०. ‘कुंजविहारी’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सोन्याचा कळस’, ‘तुरुंगाच्या दारात’, ‘कोरडी करामत’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘अपूर्व बंगाल’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘उमलती कळी’, ‘जीवा – शिवाची भेट’ अश्या सामाजिक नाटकांचे लेखन कोणी केले ?
अ) भार्गवराम विठठल वरेरकर
ब) वि.दा. देशपांडे
क) वि.स. खांडेकर
ड) गो.ब. देवल
प्रश्न ११. शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकाचे ‘स्त्री-न्यायचातुर्य’ असे रुपांतर कोणी केले ?
अ) इंदुमती जगताप
ब) आत्माराम वि. पाटकर
क) विष्णू वामन शिरवाडकर
ड) केशव रामचंद्र छापखाने
प्रश्न १२. वि. वा. शिरवाडकर यांच्या कोणत्या नाटकास साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?
अ) कौंतेय
ब) विदुषक
क) नटसम्राट
ड) राजमुकुट
प्रश्न १३. ‘चंद्रहार’, ‘संगीत भिक्षुणी वासवदत्ता’ ‘काळोखाच्या गर्भात’, ‘वैरी झाला कैवारी’, ‘आयोग’ या नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?
अ) भि.शि. शिंदे
ब) गोविंद सदाशिव टेंबे
क) दामोदर नरहर शिखरे
ड) गो.नि. दांडेकर
प्रश्न १४. खालीलपैकी कोणी गिरीश कर्नाड यांची नाटकं मराठीत अनुवादीत करण्याचे काम केलेले आहे ?
अ) उमा कुलकर्णी
ब) सरोज देशपांडे
क) प्रदीप वैद्य
ड) वरील सर्व
प्रश्न १५. ‘तुका म्हणे आता’, ‘अंमलदार’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘राजा ओयदिपौस’ या नाटकांचे कर्ते कोण ?
अ) पु.ल. देशपांडे
ब) विजय तेंडूलकर
क) केशवराव भोळे
ड) राम गणेश गडकरी
प्रश्न १६. ‘मत्स्यगंधा’, ‘राधामाधव’, ‘जरासंध’, ‘कमला’, ‘चंद्रग्रहण’, ‘शहा-शिवाजी’, ‘नारद’, ‘आशा-निराशा’, ‘गुरुचरणी’, ‘राजरंजन’ या नाट्यरचना कोणाच्या ?
अ) यशवंत नारायण टिपणीस
ब) मधुकर आष्टीकर
क) प्र.के. अत्रे
ड) प्रेमानंद गज्वी
प्रश्न १७. ‘संगीत विद्यालंकार’, ‘संगीत सोन्याचा धूर’, ‘छेडलेला छावा’, ‘ग्रामोद्धार’ इ. नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?
अ) विनायक ओक
ब) विठ्ठल नारायण कोठीवाले
क) पांडुरंग चिंतामणी पेठकर
ड) म.मो. कुंटे
प्रश्न १८. ‘घरकुल’, ‘निशिकांताची नवरी’, ‘पतंगाची दोरी’ नाट्यरचना कोणाची ?
अ) माधवराव जोशी
ब) वासुदेवराव भोळे
क) श्री. व्यंकटेश वकील
ड) अनंत काणेकर
प्रश्न १९. मराठी रंगभूमीचा उदय प्रथम _______ येथे झाला असे मानण्यात येते.
अ) कोल्हापूर
ब) सांगली
क) मुंबई
ड) पुणे
प्रश्न २०. नाटककार गो.ब. देवलांचे ‘संगीत शारदा’ नाटक प्रयोगरुपाने प्रथम कोठे अवतरले ?
अ) पुणे
ब) इंदूर
क) मुंबई
ड) बडोदा
प्रश्न २१ . ‘बंडखोर कुमारी’, ‘बेचाळीसचे आंदोलन’, ‘बनावट बायको’, ‘गुंतागुंत’ इ. नाटकांचे लेखन कोणी केले ?
अ) सदाशिव नारायण ठोसर
ब) वीर वामनराव जोशी
क) कॅ. माधवराव कृ. शिंदे
ड) वि. ल. भावे
प्रश्न २२ . ‘बेबंदशाही’, ‘आग्र्याहून सुटका’, ‘महारथी कर्ण’ ही नाटके कोणी लिहिली आहेत.
अ) टेक्सास गायकवाड
ब) गंगाधर गाडगीळ
क) विष्णुपंत औंधकर
ड) राम गणेश गडकरी
प्रश्न २३. ‘दंडार/दंढार’ ही प्रसिद्ध लोकनाट्यकला महाराष्ट्रातील कोणत्या भागातील आहे ?
अ) कोकण
ब) वऱ्हाड
क) खानदेश
ड) प. महाराष्ट्र
प्रश्न २४. ‘वर्तुळाचे दुसरे टोक’, ‘सत्तांध’, ‘सं. वाऱ्यावरचा मुशाफिर’, ‘माझ काय चुकलं’, ‘बिऱ्हाड बाजलं’, ‘आरण्यक’, ‘समोरच्या घरात’, ‘घर तिघांचं हवं’, ‘जावई माझा भला’, ‘खोल खोल पाणी’, ‘दुभंग’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लोककथा’ इ. व अश्या अनेक नाटकांचे लेखन कोणी केले ?
अ) रत्नाकर मतकरी
ब) ताराबाई मोडक
क) वि.स. खांडेकर
ड) सुधा साठे
प्रश्न २५. ‘जुगार’, ‘अवलिया’ ही नाटकं कोणी लिहिली ?
अ) सोनाबाई केळकर
ब) सुषमा देशपांडे
क) मालतीबाई दीक्षित
ड) वि. भि. कोलते
प्रश्न २६. ‘गृहदाह’, ‘परक्याचे धन’ या नाटकांचे लेखक कोण ?
अ) शंकर नारायण नवरे
ब) गोविंद केशव भट
क) सरिता पत्की
ड) विजय तेंडूलकर
प्रश्न २७. म. भि. चिटणीस यांचे नाटक कोणते?
अ) उत्सव
ब) प्रेमपताप
क) एक होता राजा
ड) युगयात्रा
प्रश्न २८. ‘पारध’, ‘हिरा जो भंगला नाही’ ही नाटके कोणी लिहिली आहेत ?
अ) बबन प्रभु
ब) शंकर गोविंद साठे
क) सुरेश खरे
ड) मालतीबाई बेडेकर
प्रश्न २९. आनंदीबाई किर्लोस्कर यांचे नाटक कोणते ?
अ) नव्या वाटा
ब) खून पहावा करून
क) तुझे आहे तुझपाशी
ड) यापैकी नाही
प्रश्न ३०. ‘तू टाक चिरुनी ही मान | नको अनमान’ हे नाट्यपद कोणत्या नाटकातील आहे ?
अ) दुर्गा
ब) मृच्छकटिक
क) शारदा
ड) झुंझारराव
प्रश्न ३१. ‘एक शून्य बाजीराव’, ‘सगेसोयरे’, ‘श्रीमंत पतीची राणी’, ‘अवध्य’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘रखेली’, ‘अभोगी’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाट्यरचना कोणाच्या ?
अ) माधव नारायण जोशी
ब) चि. त्र्यं. खानोलकर
क) आण्णासाहेब किर्लोस्कर
ड) कृष्णाजी लक्ष्मण सोमण
प्रश्न ३२. ‘संगीत श्री’, ‘संगीत सज्जन’, ‘संगीत स्त्री - पुरुष’ ही नाटके कोणाची ?
अ) गोविंद बल्लाळ देवल
ब) नरहर गणेश कमतनुरकर
क) गो. नि. दांडेकर
ड) हिराबाई पेडणेकर
प्रश्न ३३. इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’ चे अनंत काणेकर यांनी केलेले रुपांतर कोणते ?
अ) घरकुल
ब) निशिकांतची नवरी
क) झुंज
ड) पतंगाची दोरी
प्रश्न ३४. ‘रंगात रंगला श्रीरंग’ हे नाटक कोणाचे ?
अ) विमल काळे
ब) कमला प्रभु
क) योगिनी जोगळेकर
ड) वसुधा पाटील
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 3 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 10
No comments:
Post a Comment