16 महाजनपदे
16 Mahajanpadas In Marathi
मगध
(दक्षिण बिहार)
राजधानी
गिरीव्रज/राजगृह
प्रसिद्ध राजे – बिंबिसार, अजातशत्रु, शिशुनाग
बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग. राजगृह(राजगीर) ही राजधानी. पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरीव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते.
महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता.
बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रुने राजगृह या ठिकाणी भरवली होती.
शिशुनाग याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये मगधला जोडली.
अंग
(चंपा-पूर्व बिहार)
राजधानी
चंपा
अंग हे सागरी व्यापाराच्या केंद्रपैकी एक होते.
बिंबिसारने अंग महाजनपदाचा पराभव करून मगध साम्राज्यात विलीन केले.
वृज्जी/वज्जी
(उत्तर बिहार)
राजधानी
वैशाली
वृज्जी हा आठ कुळांचा संघ(महाअठ्ठकुल).
विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इ. कुळांचा समावेश.
एकपण्ण जातककथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते. तसेच नगराला तीन प्रवेशद्वारे आणि बुरूज होते. अजातशत्रु ने कोसल राज्य मगध राज्यात विलीन केले.
गांधार
(पेशावर)
राजधानी
तक्षशिला
विस्तार – काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये.
राजा – पुक्कुसाती किंवा पुष्कसारीन हा बिंबिसारच्या समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्युश पहिला याने जिंकून घेतले. इराणमधील बेहिस्तुन येथील
शिलालेखात (इसवी सनापूर्वी ५१६) गांधाराचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केला आहे.
कुरू
(दिल्ली)
राजधानी
इंद्रप्रस्थ/इंद्रपट्टण
विस्तार – दिल्ली व आसपासचा प्रदेश ,
जातककथांमधील उल्लेखानुसार येथील राजे ‘उदधिठ्ठिल’ गोत्राचे होते.
वंश/वत्स
(अलाहाबाद)
राजधानी
कौशांबी
प्रसिद्ध राजा – उदयन
पांडवांचा वंशज निचक्षु या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलविली होती.
कवी भास लिखित ‘स्वप्नवासवदत्त’ या नाटकाचा नायक, वत्स महाजनपदाचा राजा “उदयन” हा राजा बिंबिसार याच्या समकालीन होता.
या राज्यात तयार होणारे तलम कापड प्रसिद्ध होते.
अवंती
(उज्जैन)
राजधानी
उज्जयिनी/महिष्मती
राजा – प्रद्योत
विस्तार – मध्य प्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश.
दोन भाग उत्तर अवंती – उज्जयिनी (उज्जैन) (राजधानी)
दक्षिण अवंती – महिष्मती (राजधानी) (मांधाता, जिल्हा खांडवा)
अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.
इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात मगध साम्राज्यात विलीन झाले.
मत्स्य
(बैराट, जयपूर)
राजधानी
विराटनगर
विराट नगर ही राजधानी आजच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती.
पुढे जाऊन मगध मध्ये विलीन झाले.
बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत.
अश्मक/अस्सक
(महाराष्ट्र-औरंगाबाद)
राजधानी
पोटली/पोतन/पोदन/पौडण्य
विस्तार – गोदावरी व त्याच्या आसपासचा प्रदेश
एकमेव दक्षिणेकडील महाजनपद.
बाकीची १५ महाजनपदे ही उत्तर भारतात होती. ‘सूत्तनिपात’ या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानुसार दक्षिणापथ हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
‘महागोविंद सूत्तांत’ या बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा ‘ब्रह्मदत्त’ नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव ‘पोतन’ होते, असा उल्लेख आहे. हे पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील ‘नांदुरा’ होय असे मानले जाते.
शूरसेन
(मथुरा)
राजधानी
मथुरा
हे शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले होते.
ग्रीक इतिहासकारांकडून त्याचा उल्लेख ‘शूरसेनॉय’ व मथुरेचा ‘मेथोरा’ असा केलेला आढळतो.
पुढे जाऊन मोर्य साम्राज्यात विलीन झाले.
पांचाल
(रोहिलखंड)
राजधानी
उ.पांचाल- अहिच्छत्र,
द.पांचाल- कांपिल्य
पांचाल राज्याचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते. भागीरथी नदी त्या दोहोंना विभागणारी नैसर्गिक सीमा रेषा होती.
चेदी
(कानपुर)
राजधानी
शुक्तिमती/सोथ्थिवती
विस्तार – आत्ताचे बुंदेलखंड आणि आसपासचा प्रदेश.
मल्ल/मालव
(गोरखपुर)
राजधानी
कुशीनार/कुशीनगर
गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले.
मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर महत्वात्ची नागरे होती.
पुढे जाऊन मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात विलीन झाले.
कोसल
(लखनौ)
राजधानी
श्रावस्ती
प्रमुख शासक – प्रसेनजित (पसेनदी) हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता.
भारतातील उत्तर प्रदेश ते नेपाळ मधील लुंबिनी पर्यंत विस्तार.
अजातशत्रु ने कोसल राज्य मगध राज्यात विलीन केले.
कंबोज
(गांधारजवळ)
राजधानी
राजपूर (राजौरी)
उत्तम घोडे आणि घोडयावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांसाठी येथील योद्धे प्रसिद्ध.
ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले अॅस्पासिओय(अश्वायन) हे कंबोज महाजनपदाचा भाग होत.
सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्यांचा उल्लेख ‘अराज’ म्हणजे राजा नसलेले, म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा केलेला आहे.
काशी
(बनारस)
राजधानी
वाराणसी
सोळा महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळातले अधिक बलशाली महाजनपद.
या महाजनपदाचे राजे अधिक महत्वाकांशी होते. त्यातील अनेकांना सर्व राजांमधील प्रमुख राजा (‘सब्बराजुनाम अग्गराजा‘) बनण्याची इच्छा होती असा उल्लेख जातककथांमध्ये आढळतो.
मगधचा राजा अजातशत्रु याने काशी राज्य मगधमध्ये विलीन केले.
source - ११ वी इतिहास महाराष्ट्र राज्य
No comments:
Post a Comment