भारतीय राज्यघटना
12 परिशिष्टे
भारतीय राज्यघटनेत सुरूवातीला 8 परिशिष्टे होती. 1951 नंतर करण्यात आलेल्या विविध दुरुस्त्यांनी 4 परिशिष्टे (परिशिष्ट 9, परिशिष्ट 10, परिशिष्ट 11, परिशिष्ट 12) समाविष्ट करण्यात आली.
परिशिष्ट 1
- राज्यांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र
- केंद्रशासित प्रदेश व त्यांची क्षेत्र
संबंधित कलमे
कलम 1 ते 4
परिशिष्ट 2
वेतन, भत्ते व विशेषाधिकार
यासंबधित तरतुदी
- राष्ट्रपती
- राज्यपाल
- लोकसभेचा सभापती व उपसभापती
- राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष
- राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती
- राज्यातील विधानपरिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
- भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
संबंधित कलमे
कलम 59, 65, 75, 97, 125, 148, 158, 164, 186 व 221
परिशिष्ट 3
पुढील व्यक्तींनी घ्यावयाच्या शपथ किंवा वचननाम्याची प्रारूपे
- केंद्रीय मंत्री
- संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार
- संसद सदस्य
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
- भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
- राज्यातील मंत्री
- विधिमंडळातील निवडणुकीतील उमेदवार
- राज्य विधिमंडळ सदस्य
संबंधित कलमे
कलम 75, 84, 99, 124, 146, 173, 188 व 219
परिशिष्ट 4
- राज्यसभेतील जागांची राज्याराज्यात व केंद्रशासित प्रदेशात विभागणी
- संबंधित कलमे
कलम 4 व 80
परिशिष्ट 5
- अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी
संबंधित कलमे
कलम 244
(या तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम
ही राज्ये
वगळता उर्वरित राज्यांमधील “अनुसूचीत क्षेत्रे” म्हणून घोषित
केलेल्या प्रदेशांना लागु आहेत.)
परिशिष्ट 6
- आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत.
संबंधित कलमे
कलम 244 व
275
परिशिष्ट 7
केंद्र व राज्य यांच्या अधिकारांच्या विभागणीविषयी तीन
सूची
- संघ सूची
100 विषय (सुरूवातीला 97 विषय)
- राज्य सूची
61 विषय (सुरूवातीला 66 विषय)
- समवर्ती सूची
52 विषय (सुरूवातीला 47 विषय)
संबंधित कलमे
कलम 246
परिशिष्ट 8
घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी
- सुरूवातीला 14 भाषा होत्या, सध्या एकुण 22 भाषा आहेत.
आसामी,
बंगाली, बोडो, डोग्री(डोंगरी), गुजराती, हिन्दी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणीपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलुगू
व उर्दू.
- सिंधी - 21 वी घटनादुरूस्ती अधिनियम 1967
- कोकणी, मणीपुरी, नेपाळी - 71 वी घटनादुरूस्ती अधिनियम 1992
- बोडो, डोग्री, मैथिली, संथाली – 92 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003
संबंधित कलमे
कलम 344 व
351
परिशिष्ट 9
जमीन सुधारणांविषयी आणि
जमीनदरी पद्धत
रद्द करण्याविषयी राज्य सरकारांचे व इतर
बाबींविषयी संसदेचे कायदे व नियमने. (सुरूवातीला 13 सध्या 282)
- हे परिशिष्ट पहिली घटनादुरूस्ती अधिनियम 1951 अन्वये समाविष्ट करण्यात आले.
संबंधित कलमे
कलम 31 बी
परिशिष्ट 10
पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी.- हे परिशिष्ट 52 व्या घटनादुरूस्ती अधिनियम 1985 अन्वये समाविष्ट करण्यात आले.
- या परिशिष्टाची “ पक्षांतर विरोधी कायदा “ म्हणून सुद्धा ओळख.
संबंधित कलमे
कलम 102 व
191
परिशिष्ट 11
- पंचायतींचे अधिकार व जबाबदार्या
- एकूण 29 विषय.
- हे परिशिष्ट 73 व्या घटनादुरूस्ती अधिनियम 1992 अन्वये समाविष्ट करण्यात आले.
संबंधित कलमे
कलम 243 G
परिशिष्ट 12
- नगरपालिकांचे अधिकार व जबाबदार्या
- एकूण 18 विषय.
- हे परिशिष्ट 74 व्या घटनादुरूस्ती अधिनियम 1992 अन्वये समाविष्ट करण्यात आले.
संबंधित कलमे
कलम 243 W
📚 संबंधित लेख :
👉 भारताचा महान्यायवादी 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 8📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
No comments:
Post a Comment