सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 13
SET NET Marathi Paper 2
set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq ||
प्रश्न 1. भाषेची द्विस्तरीय रचना, निर्मितीशीलता, यादृच्छिकता, विनियमपद्धती, विशिष्टता, स्थलकालातीतता व सांस्कृतिक संक्रमण ही भाषेची सात लक्षणे कोणी सांगितली ? (NET Nov 2017)
अ) लेनर्ड ब्लूमफिल्ड
ब) चार्ल्स हॉकेट
क) एडवर्ड सपीर
ड) रॉबर्ट हॉल
- ब) चार्ल्स हॉकेट
प्रश्न 2. प्रतिनिधी या कादंबरीचे लेखक कोण ? (net Jan 2017)
अ) विश्राम बेडेकर
ब) वसंत वरखेडकर
क) जयवंत दळवी
ड) उद्धव शेळके
- ब) वसंत वरखेडकर
प्रश्न 3. पुढीलपैकी कोणता अभ्यासक वर्णनात्मक भाषाभ्यासाशी संबंधित नाही ? (Set 2020)
अ) लबव
ब) ब्लूमफिल्ड
क) सोस्यूर
ड) चॉम्स्की
- अ) लबव
प्रश्न 4. ‘झुंज’ हे गॉल्सवर्दी यांच्या ‘स्ट्राइफ’चे भाषांतर कोणी केले ? (net Jan 2017)
अ) अरुण नाईक
ब) अनंत काणेकर
क) वि. वा. शिरवाडकर
ड) म. ना. लोही
- ब) अनंत काणेकर
प्रश्न 5. “नच सुंदरी करू कोपा | मजवरी धरि अनुकंपा ||” हे नाट्यपद कोणत्या पात्राच्या मुखी आहे ? (net Jan 2017)
अ) धैर्यधर
ब) आश्विन शेठ
क) श्रीकृष्ण
ड) नारद
- क) श्रीकृष्ण
प्रश्न 6. पुणे येथे संपन्न झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष कोण होते ? (SET 2020)
अ) मधु मंगेश कर्णिक
ब) आनंद यादव
क) ग. ल. ठोकळ
ड) प्राचार्य देवदत्त दाभोळकर
- ड) प्राचार्य देवदत्त दाभोळकर
प्रश्न 7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाविना कुठे पार पडले ? (SET 2020)
अ) वर्धा
ब) प्रवरानगर
क) वाई
ड) महाबळेश्वर
- ड) महाबळेश्वर
प्रश्न 8. ‘संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ’ कोणी लिहिला आहे ? (SET 2020)
अ) शाहीर आत्माराम पाटील
ब) शाहीर गोपाळराव सुर्वे
क) शाहीर भिका पाटील
ड) शाहीर करीम शेख
- अ) शाहीर आत्माराम पाटील
प्रश्न 9. पुढीलपैकी अमृता प्रीतम ह्यांच्या कोणत्या कादंबरीचा मराठी अनुवाद हेमा जावडेकर यांनी केला आहे ? (NET Nov 2017)
अ) बंद दरवाजा
ब) ना राधा, ना रुक्मिणी
क) कोरे कागद
ड) तेरावा सूर्य
- ब) ना राधा, ना रुक्मिणी
प्रश्न 10. लौकिक विषय काव्याच्या क्षेत्रात येताच अलौकिक बनतात ते कशाने ? (NET Nov 2017)
अ) अभ्यास
ब) चिकाटी
क) प्रज्ञा
ड) प्रतिभा
- ड) प्रतिभा
प्रश्न 11. समधाततेचा सिद्धांत कोणी मांडला ? (NET Nov 2017)
अ) मॅथ्यू अर्नोल्ड
ब) टी. एस. एलियट
क) आय. ए. रिचर्डस्
ड) मार्टिन हायडेगर
- क) आय. ए. रिचर्डस्
प्रश्न 12. मम्मटाने मानलेल्या साहित्यप्रयोजनात पुढीलपैकी कोणते प्रयोजन आढळत नाही ? (net Jan 2017)
अ) यश
ब) अर्थप्राप्ती
क) आत्माविकार
ड) व्यवहार
- क) आत्माविकार
प्रश्न 13. भाषेत उपलब्द असणारे शब्द पुरेसे न वाटल्याने नवे शब्द घडविणे वा उपलब्द शब्दांना नवे रूप देणे, अशा भाषिक प्रवृत्तीला काय म्हणतात ? (net Jan 2017)
अ) भाषिक व्यवस्था
ब) संकेतोल्लंघन
क) शब्दक्रमघटीत
ड) संरचनावादी
- ब) संकेतोल्लंघन
प्रश्न 14. पासंग हा समीक्षा ग्रंथ कोणाचा ? (NET Nov 2017)
अ) द. ग. गोडसे
ब) माधव आचवल
क) कुसुमावती देशपांडे
ड) पु. शि. रेगे
- क) कुसुमावती देशपांडे
प्रश्न 15. ‘शेक्सपिरीअन सॉनेट’ मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते ? (SET 2020)
अ) नऊ आणि पाच
ब) दहा आणि चार
क) बारा आणि दोन
ड) आठ आणि सहा
- क) बारा आणि दोन
प्रश्न 16. अनुकरणशीलता, पारंपरिकता आणि प्रमाणबद्धता ही साहित्यातील कोणत्या संप्रदायाची वैशिष्ट्ये होत ? (NET Nov 2017)
अ) स्वच्छंदतावाद
ब) अभिजातवाद
क) वास्तववाद
ड) अस्तित्ववाद
- ब) अभिजातवाद
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 SET NET History PYQ 27
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment