★ संपादन कौशल्य : स्वरुप, तंत्र आणि उपयोजन
● संपादन कौशल्य म्हणजे काय ?
व्याख्या :-
'व्यावहारिक स्तरावर प्रसिद्ध व्यक्ती किंवा संस्था यांच्या
कार्याचा परिचय करून देण्यासाठी उपयुक्त ठरणारे कौशल्य म्हणजे संपादन होय'.
मानवी जीवन विविधांगी
आहे. व्यावहारिक स्थरावर प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न संस्था, सहकारी क्षेत्र इ. स्थरांवर वेगवेगळ्या
कारणांनी परस्परांशी संवाद साधत असते.
साहित्याच्या भाषेपेक्षा व्यवहारीक क्षेत्रातील भाषा वेगळी असते.
व्यवहारात भिन्न भिन्न व्यक्ती संस्था
एकमेकांशी त्या त्या भाषेतून संपर्क साधत असतात. सहकारी संस्था,
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्र सर्व आणि सर्व सामान्य व्यक्ती यांचा एकमेकांशी
संवाद साधण्यासाठी छापील स्वरूपात माहितीची देवाण-घेवाण होते.
संबंधित संस्था किंवा व्यक्ति यांच्या विषयीच्या माहितीचे संकलन
करुन माहिती पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. या घटकाशी
संबंधित क्षेत्र म्हणजे 'संपादन कौशल्य' होय.
संपादनाचे प्रकार पुढील प्रमाणे : -
1) वार्षिक अहवाल :- व्यावहारीक जगात, सहकारी संस्था, बँका, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, लोकोपयोगी कार्य करीत असतात. आपल्या कार्याशी संबधीत व्यक्तींनी सभासदांना संस्थेची वाटचाल कशी होत आहे, भविष्य कालीन
योजना कोणत्या या विषयी माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करतात. ती वर्षातून एक वेळेस प्रकाशित करतात तिला वार्षिक अहवाल
असे म्हणतात.
2) स्मरणिका
:- व्यक्ती किंवा संस्था यानु केलेल्या कार्याचा एकत्रिरित्या
परिचय करून देण्यासाठी प्रसागणरूप माहितीचे संपादन करून प्रसिध्द करण्याच्या प्रकाराला
संपादन असे म्हणतात. त्या संस्थेचा तो एक इतिहास असतो. संस्था किंवा व्यक्तीचे कार्य दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासाठी
माहितीचे केलेले संपादन म्हणजे स्मरणिका
होय.
3) गृहप्रत्रिका :- आधुनिक युग औद्योगिक क्रांतीचे आहे. प्रगत आशा जीवनात उपयुक्त अशा साधनांची निर्मिती
करणारे उद्योगधंदे,
कारखाने अस्तित्वात असतात. त्यातील
व्यवस्थापक मंडळ, संचालक मंडळ
आणि कामगार हे एकत्रित येऊन काम करीत असतात. कारखाने किंवा उद्योग व्यवसायातील माणसे एकाच कुटुंबातील आहे, ही जाणीव वाढवण्यासाठी जे संपादन केले जाते, त्याला 'गृहप्रत्रिका' असे म्हणतात. याचे संपादन मर्यादित स्वरूपात असते.
4) भित्तीप्रत्रिका :- शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक क्षेत्र आपल्या उदिष्ठानुरुप कार्य करीत
असतांना आपल्या कक्षेत येणारा विद्यार्थी, सभासद व कामगार यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पाक्षिक किंवा
मासिक स्वरूपात त्यांचे लेखन एकत्रिरित्या प्रसिद्ध करीत असतात. हे लेखन संपादणाशी संबंधित असते. अशा संपदनाला 'भित्तीपत्रिका' असे म्हणतात.
5)
हस्तपत्रिका :- जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पुरवण्यासाठी दोन - चार पानात केलेले छोटेसे संपादन म्हणजे हस्तपत्रिका होय. कमीतकमी शब्दात योग्य ती माहिती आकर्षक पद्धतीने वाचकांपर्यंत
पोहचण्याची कार्य हस्तपत्रिका करतात.
6)
प्रसिध्दी प्रत्रिके
:- दैनंदिन जीवनात शासन नगरपालिका, शिक्षण
संस्था, सहकारी संस्था सर्व नागरिकांना उपयुक्त अशी माहिती पुरवीत असतात. त्यासाठी
केली जाणारी संपादन म्हणजे प्रसिद्धी पत्रके होय. सार्वजनिक स्तळातील उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रसिद्धी पत्रकांचे
संपादन केले जाते.
संपादनाचे
तंत्र
:-
संपादनाचे
सर्वसाधारणपणे वरील प्रकार व्यावहारिक जीवनात प्रचलित आहेत. ही सर्व संपादने हेतुपुर्ण व नियमबद्ध असतात. त्यासाठी विशिष्ट तंत्रांचा आधार घेतला जातो. त्यालाच 'संपादन तंत्र' असे म्हणतात.
संपादनाचे
स्वरूप विविधांगी आहे. विशिष्ट निमित्ताने उपयुक्त मजकूर एकत्र करून त्यांची वैशिष्ट्येपूर्ण
मांडणी करणे ही प्रक्रिया संपदनाशी निगडित आहे. त्याच्याशी निगडित असलेले घटक पुढील प्रमाणे.
1) वैशिष्ट्येपूर्ण रचना :-
ज्या निमित्ताने वेगवेगळे संपादन केले जाते, त्याच्याशी हा घटक निगडित आहे. स्मरणिका सारखे संपादन प्रासंगिक असते. रौप्य, सुवर्ण, हिरक अमृत, शताब्दी इत्यादी निमित्ताने तिचे प्रकाशन होत असते. संपादन हा हेतू पूर्ण असतो. हा हेतूच म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण घटना होय.
2) संपादक :- विशिष्ट निमित्ताने संपादन करणाऱ्या प्रमुख व्यक्तीस संपादक
असे म्हणतात. संपादक हा गुणद्राही व लोकसंग्रह वृत्तीचा असावा. त्यास लेखनाची आवड असावी, भाषेवर प्रभुत्व असावे, मुद्रव्यवहार व ग्रंथ सजावट याची माहिती त्याला असावी. जनमानसात त्याला स्थान असावे. त्याच्या जवळ कलात्मक दृष्टिकोन असावा. हे गुण ज्याच्या जवळ असतील त्याला संपादक म्हणावे.
3) संपादक
मंडळ :- संपादकाला मदत करणाऱ्या
जाणकार ४-५ व्यक्तीचा समूह म्हणजे संपादक मंडळ होय.
* ग्रंथ
संपादनाचे स्वरुप :-
संपादन कौशल्याशी निगडित असलेल्या वाचकांना वैचारिक स्वरूपाचे लेखन एकत्रितपणे
उपलब्ध करून देणारा एक सर्व सामान्य असा घटक म्हणजे ' ग्रंथ संपादन होय' .
प्रकाशक वाचकांना विविध विषयांवरील माहिती एकत्रितपणे उपलब्ध करुन
देण्याच्या हेतूने ' ग्रंथ संपादन' करीत असतात. हे संपादन हेतूपूर्ण असते. ग्रंथ संपादनात विषयांची विविधता असते.
१) प्रतिभावंत लेखकाकडून विशिष्ट विषयावर आधारित लिहून घेतलेल्या
लेखनाचे एकत्रित संपादन म्हणजे 'ग्रंथ संपादन' होय.
२) वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन अभ्यासकाकडून लिहिलेल्या विशिष्ट विषयावर
आधारित लेखनाचे जाणीवपूर्वक केलेले संपादन म्हणजे ग्रंथ संपादन होय.
३) अभ्यासपूर्ण वैचारिक लेखांचे संकलन म्हणजे 'ग्रंथ संपादन' होय.
★ स्मरणिका संपादन : स्वरूप, प्रकार व तंत्र
संपादन शास्त्राशी
सर्वात महत्त्वाचा निगडित असलेला घटक म्हणजे स्मरणिका होय. ग्रंथ
संपादना पेक्षा स्मरणिका संपादन अधिक वैशिष्ट्येपूर्ण असते. वाङ्मयिन व्यवहारात ग्रंथ संपादन, ग्रंथ लेखन
या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रंथलेखन हि प्रक्रिया लेखकाशी संबंधित असते. ग्रंथ संपादन या प्रक्रियेत संपादकांच्या कलागुणांना महत्त्व असते.
इतर संपादना पेक्षा स्मरणिका संपादन हे लोकमानसावर अधिक प्रभाव
टाकते. सामाजिक, शैक्षणिक,
आर्थिक, औद्योगिक व सहकार क्षेत्रातील
विविध संस्था आपले कार्य सभासदांपर्यत पोहचवण्यासाठी जे प्रासंगिक संपादन करते
त्याला 'स्मरणिका' असे म्हणतात.
संस्थेचे अथवा व्यक्तीचे कार्य समाजापुढे कायम राहावे, म्हणुन स्मरणिकेचे संपादन केले जाते. स्मरणिका ही
विशिष्ट प्रसंगानिमित्त काढली जाते.
व्यक्तीच्या जीवनात शताब्दीपूर्ती समारंभ, सेवा निवृत्ती समारंभ किंवा वैशिष्ट्येपूर्ण यश या निमित्ताने
स्मरणिकाचे प्रकाशन होते.
स्मरणिकेचे घटक पुढील प्रमाणे :
● स्मरणिकाचा आकार व पृष्ठे ● मुखपृष्ठ व मलपृष्ठ ● शीर्षक पृष्ठ ● अनुक्रमणिका ● संपादकीय ● शुभेच्छा संदेश
घटक दोन
■ सूची लेखन :- स्वरूप तंत्र आणि उपयोजन
★ सूची म्हणजे काय ?
●
संशोधन कार्यात
उपयुक्त ठरलेल्या लेखन सामुग्रीची शात्रशुद्ध पध्दतीने माहिती देणे, म्हणजे सूची लेखन होय.
● वाचकांना
संदर्भ ग्रंथांची यादी सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून अकारचिन्हे पद्धतीने त्याची मांडणी
करणे म्हणजे सूची लेखन होय.
★ सूची लेखनाचे प्रकार व स्वरूप ( ग्रंथनामसूची, व्यक्तिंनामसूची, विषयसूची ई. )
◆ ग्रंथनामसूची
वेगवेगळ्या माहितीवर आधारित ग्रंथ कोणते. या बद्दलची माहिती एकत्रितपणे देणाऱ्या सूचीला ' ग्रंथनामसूची' म्हणतात.
अ) ग्रंथाचे नाव ब) लेखकाचे नाव क) प्रकाशनाचे नाव ड) पृष्ठ संख्या इ) किंमत
सर्वसाधारणपणे ग्रंथसूचीचा वापर ' प्रकाशन' संस्था करतात. वाचकाला - अभ्यासकाला - संशोधकाला या ग्रंथसूचीतून हवा तो ग्रंथ निवडून सहजतेने उपलब्ध करून घेता येतो. आकारविल्हे पद्धतीने ग्रंथ सूचीची मांडणी केलेली असते. त्यामुळे योग्य ग्रंथ सहजतेने उपलब्ध होतात.
उदा.
१) अग्निपंख २) अमृतवेल ३) फुलराणी ४) एकचप्याला ५) रणांगण
६) माझी जन्मठेप ७) ययाती ८) राधेय ९) राधेय
या प्रमाणे ग्रंथ सूची तयार करावी.
◆ व्यक्तिंनामसूची
पुस्तक लेखन करतांना, समीक्षात्मक
लेखन करतांना विशिष्ट विषयाशी निगडीत असलेल्या
वेगवेगळ्या लेखकांनी, विचारवंतांनी मांडलेल्या वैचारिकतेचा आधार संबंधित लेखक घेत असतो. संशोधनात्मक कार्य असे पूर्णत्वास जाण्यासाठी त्या
विषयातील तज्ञ, जाणकार अभ्यासू विचारवंतांनी
मांडलेल्या मतांचा आधार घ्यावा लागतो. संशोधनात्मक/
समीक्षणात्मक लेखन ' संदर्भ ग्रंथांच्या आधारे'
पूर्णत्वास जाते.
एखाद्या पुस्तकात संदर्भग्रंथ
म्हणून ज्या ग्रंथकाराने मांडलेली मते लगेच
शोधण्यासाठी या ग्रंथकार सूचीचा उपयोग होतो. तसे एखाद्या विषयावर लिहिलेल्या संदर्भ
ग्रंथांचा लेखक कोण ? हे शोधण्यासाठी दुल्हन सकाळ सूची उपयोगात येते.
उदा.
१) अत्रे
प्र. के.
२) अदवंत म. ना. ३) पांगारकर ल. रा. ४) महानोर
ना. धो.
◆ विषयसूची
विविध विषयावर आधारित असते.
विषयांमध्ये विविधता आहे. निसर्ग, पशु - पक्षी, साहित्य, मानवी जीवन,
सांस्कृतिक धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध विषयांवर ग्रंथातून लेखन
केलेले असते. ग्रंथातील विषय/ आशय या
घटकाला महत्त्व देऊन जेव्हा सूची लेखन केले जाते. तेव्हा तिला विषयसूची असे
म्हणतात.
ग्रंथातील माहितीचे विषयानुसार
वर्गीकरण करावे. मिळालेली माहिती सूचित करणारे
शब्द शोधून त्यांची आकारविल्हे पद्धतीने मांडणी करावी. विषय सूची चे दोन प्रकार पडतात.
अ) आशयानुसार वर्गीकरण
ब) विषयानुसार वर्गीकरण
★ सूची लेखनाचे तंत्र
सूची लेखनामागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे. संशोधनाच्या क्षेत्रात
विशिष्ट विषयांवरील माहिती अभ्यासकांना सहजतेने उपलब्ध करून घेण्याचे कार्य सूची कळते. ही सूची लेखनाचे उपयुक्तता मान्य
केल्यावर तिच्या लेखनविषयक निश्चित नियमांचा परिचय करून घ्यावा लागतो. सुशील लेखनात
एक वाक्यता - समानता असावी. या हेतूने जे नियम तयार केले जातात त्याचा संबंध 'तंत्राशी'
आहे.
१) मिळालेल्या माहितीचे प्रथम संकलन करावे.
२) मराठीतील सूची लेखन करताना प्रथम स्वर ( अ, आ, इ,
ई... ) नंतर व्यजंने ( क,
ख, ग... ) या क्रमाने मांडणी करावी.
३) व्यंजनांच्या बाबतीत एकाच व्यंजनातील नावे, विषय एकत्र करून बाराखडी क्रमाने (क, का, की... प्रमाणे)
मांडणी करावी.
४) माहितीच्या प्रकारानुसार वेगवेगळी
सूची तयार करावी. उदा. संदर्भग्रंथाची, विषय, ग्रंथकार, ग्रंथनाम, संदर्भटीपा, वस्तुनाम
इ.
५) पहिला शब्द समान असल्यास दुसऱ्या
शब्दाची आकारविल्हे क्रमाने मांडणी करावी.
उदा. patil या नावाने ग्रंथ लेखन करणाऱ्या लेखकाची सूची
तयार करतांना दुसरा शब्द प्रमान मानून सूची लेखन करावे. उदा. पाटील अशोक, पाटील तुकाराम,
पाटील गणेश इत्यादी.
वरील नियम सूची लेखन तंत्राशी निगडित आहे.
★ सूची लेखन : उपयोजन
No comments:
Post a Comment