Friday, June 16, 2023

SET NET Exam Marathi || PET Exam Marathi || Marathi Paper 2 भाग 4

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 4

SET NET PET Marathi Paper 2




प्रश्न १.  पंचवार्तिक या पहिल्या व्याकरणग्रंथाचा निर्माता कोण ?

अ) भीष्माचार्य

ब) नागदेवाचार्य

क) कविश्वराचार्य

) कृष्णमुनी डिंभ

  • अ) भीष्माचार्य



  • प्रश्न २ . पाईकीचे अभंग कोणी लिहिले ?

    अ) संत तुकाराम

    ब) कान्होबा

    क) वेणाबाई

    ड) जनाबाई

  • अ) संत तुकाराम



  • प्रश्न ३ . भिन्न भिन्न वृत्तांमधील ज्ञानेश्वरविजय आणि चिद्बोध रामायण या ग्रंथांची रचना पुढीलपैकी कोणत्या कवीची आहे ?

    अ) निरंजनमाधव

    ब) अमृतराय

    क) आनंदतनय

    ड) कचेश्वर ब्रह्मे

  • अ) निरंजनमाधव




  • प्रश्न ४. शाहीर सगनभाऊ यांचा साथीदार कोण होता ?

    अ) रामा सुतार

    ब) रामा न्हावी

    क) रामा गोंधळी

    ड) रामा कुंभार

  • क) रामा गोंधळी



  • प्रश्न ५. शिवदिग्विजयाचा कर्ता कोण?

    अ) चित्रगुप्त

    ब) खंडो बल्लाळ चिटणीस

    क) त्रिंबक सदाशिव पुरंदरे

    ड) कृष्णाजी अनंत सभासद

  • ब) खंडो बल्लाळ चिटणीस



  • प्रश्न ६. रविकिरणमंडळात केवळ एकच सूर्य होता; तथापि अन्य सर्व कवी केवळ किरणे होती, अशा आशयाच्या विधानातील सूर्यहे संबोधन कोणाला उद्देशून आहे ?

    अ) यशवंत

    ब) गिरीश

    क) माधव जुलियन

    ड) यशवंत

  • क) माधव जुलियन



  • प्रश्न ७. कादंबर्‍या आणि कादंबरीकार यांच्या जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्याया मधून उचित पर्याय निवडा ?

    1. झेलझपाट                       5. दुर्गा भागवत

    2. हाकुमी                           6. अनिल सहस्त्रबुद्धे

    3. महानदीच्या तीरावर       7. गोदावरी परुळेकर

    4. डांगाणी                          8. सुरेश द्वादशीवार

                                             9. मधुकर वाकोडे


    अ) 1-52-63-74-8

    ब) 1-82-93-74-6

    क) 1-82-73-64-5

    ड) 1-92-83-54-6

  • ड) 1-9, 2-8, 3-5, 4-6



  • प्रश्न ८. आणि बाकीचे सगळेआणि बिनमौजेच्या गोष्टीहे कथासंग्रह कोणाचे ?

    अ) श्याम मनोहर

    ब) नरेश

    क) रंगनाथ पठारे

    ड) श्री.दा. पानवलकर

  • अ) श्याम मनोहर



  • प्रश्न ९. पुढील नाटकांतील कोणती नाट्यकृती ब्लॅक कॉमेडीच्या प्रकारात गणली जाते ?

    अ) शनिवार -रविवार

    ब) बेगम बर्वे

    क) महापूर

    ड) महानिर्वाण

  • ड) महानिर्वाण



  • प्रश्न १०. निंबोणीच्या झाडामागेहे ललितलेखन कोणाचे ?

    अ) मधुकर केचे

    ब) श्रीनिवास कुलकर्णी

    क) मंगेश पाडगावकर

    ड) विजय तेंडुलकर

  • क) मंगेश पाडगावकर



  • प्रश्न ११. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द कन्नड भाषेतून मराठी भाषेत आले आहेत ?

    अ) भीड, गुंड, भांगार

    ब) मुंगी, वारिक, कापडी

    क) अंधार, आरोगण, ओळग

    ड) मेहूण, भाऊ, पाऊस

  • अ) भीड, गुंड, भांगार



  • प्रश्न १२. सांकल्पनिक अर्थ समान असणारा शब्दांचा गट कोणता ?

    अ) डोळा, कान, नाक

    ब) डोके, हात, पाय

    क) डोळा, नेत्र, चक्षू

    ड) हात, पाय, बाहू

  • क) डोळा, नेत्र, चक्षू



  • प्रश्न १३. वैद्य-गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्यांच्या विचारास चालना मिळाली ?

    अ) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण

    ब) शिलालेखांचे पौर्वापर्य

    क) ताम्रपटांची सत्यासत्यता

    ड) शंकराचार्यांचा काळ

  • अ) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण



  • प्रश्न १४. पुढीलपैकी कोणता विशेष बोलीभाषेचा नाही ?

    अ) उस्फूर्तता व स्वाभाविकता

    ब) व्याकरणाची अनुपस्थिती

    क) अनौपचारिक व्यवहारात वापर

    ड) मौखिक व्यवहारात प्राधान्य

  • ब) व्याकरणाची अनुपस्थिती



  • प्रश्न १५. हे मराठीतील स्वर: ?

    अ) थेट संस्कृतमधून आले आहेत

    ब) जवळच्या स्वरांचा संयोग करण्याच्या प्रवृत्तीतून आले आहेत

    क) प्राकृतातून आले आहेत

    ड) अपभ्रंशातून आले आहेत

  • ब) जवळच्या स्वरांचा संयोग करण्याच्या प्रवृत्तीतून आले आहेत




  • प्रश्न १६. तत् अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुन: क्वापि ||ही व्याख्याची व्याख्या कोणी केली आहे ?

    अ) जगन्नाथ

    ब) विश्वनाथ

    क) मम्मट

    ड) वामन

  • क) मम्मट



  • प्रश्न १७. काव्याचे शिरोभूतप्रयोजन कोणते मानले गेले आहे ?

    अ) आनंद

    ब) कीर्ती

    क) प्रचार

    ड) धर्म

  • अ) आनंद



  • प्रश्न १८. गौडीरीतीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते ?

    अ) श्लेष 

    ब) ओज

    क) प्रसाद

    ड) सौकुमार्य

  • ब) ओज



  • प्रश्न १९. वीररसाचा स्थायीभाव कोणता आहे?

    अ) कांती 

    ब) रति

    क) जुगुप्सा

    ड) ओजस्

  • ड) ओजस्



  • प्रश्न २०. जुगुप्साया स्थायीभावापासून कोणत्या रसाची निष्पती होते ?

    अ) करूण 

    ब) बीभत्स

    क) हास्य

    ड) अद्भुत

  • ब) बीभत्स



  • प्रश्न २१ . पाया - इमलासिद्धांत कोणी मांडला आहे?

    अ) ल्युकाच 

    ब) कार्ल मार्क्स

    क) मार्क्युज

    ड) सार्त्र

  • ब) कार्ल मार्क्स



  • प्रश्न २२ . संस्कारनिष्ठताहे कोणत्या समीक्षापद्धतीचे वैशिष्ट्य आहे ?

    अ) आस्वादक 

    ब) मार्क्सवादी

    क) रूपवादी

    ड) समाजशास्त्रीय

  • अ) आस्वादक



  • प्रश्न २३. आहे मनोहर तरीया आत्मचरित्राची शैलीवैज्ञानिक समीक्षा पुढीलपैकी कोणत्या समिक्षकाने केली आहे ?

    अ) द.दि. पुंडे 

    ब) चंद्रशेखर जहागिरदार

    क) रमेश धोंगडे

    ड) रमेश तेंडुलकर

  • क) रमेश धोंगडे



  • प्रश्न २४. सामूहिक नेणीवही संकल्पना कोणी मांडली आहे ?

    अ) एफ.आर.लेविस

    ब) लाकांन

    क) कार्ल युंग

    ड) सिग्मंड फ्राइड

  • क) कार्ल युंग



  • प्रश्न २५. जोड्या जुळवा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून उचित पर्याय निवडा.

    1. कविता आणि प्रतिमा      5. म.सु. पाटील

    2. काव्याची भूषणे             6. सुधीर रसाळ

    3. कवितेचा रूपशोध          7. वसंत आबाजी डहाके

    4. कवितेविषयी                 8. म.वा. धोंड

                                          9. गंगाधर पाटील


    अ) 1 - 82 - 63 - 94 - 7

    ब) 1 - 52 - 93 - 64 - 8

    क) 1 - 62 - 83 - 54 - 7

    ड) 1 - 92 - 63 - 84 - 5

  • क) 1 - 6, 2 - 8, 3 - 5, 4 - 7



  • प्रश्न २६. नाटकाला अभिनेयार्थ काव्यअसे कोणी म्हटले आहे ?

    अ) भामह

    ब) दण्डी

    क) उद्भट

    ड) वामन

  • अ) भामह



  • प्रश्न २७. अॅरिस्टॉटलने साहित्यप्रकारांचे वर्गीकरण करतांना पुढीलपैकी कशाला स्थान दिलेले नाही ?

    अ) विलापिका

    ब) लिरिक

    क) उद्देशिका

    ड) शोकनाट्य

  • ब) लिरिक



  • प्रश्न २८. पुढीलपैकी कोणत्या साहित्यप्रकाराचे स्वरूप संमिश्र आहे ?

    अ) चरित्र

    ब) कादंबरी

    क) नाटक

    ड) कथा

  • क) नाटक



  • प्रश्न २९. कलाप्रकार व साहित्यप्रकार यांच्याविषयीचे सिंद्धांत म्हणजे बौद्धिकतावादी घोडचुकीचा सर्वात मोठा विजय, असे कोणी सांगितले ?

    अ) अॅरिस्टॉटल

    ब) प्लेटो

    क) काण्ट

    ड) क्रोचे

  • ड) क्रोचे



  • प्रश्न ३०. ट्रॅजिडी इज अ सेन्स ऑफ मॅन्स पार्टीसिपेशन इन प्रोसेस बियांड हिमसेल्फही व्याख्या कोणाची ?

    अ) केनेथ ब्रुक

    ब) जॉर्ज लुकाक्स

    क) हिलमन

    ड) लेस्की एल्बिन

  • अ) केनेथ ब्रुक



  • प्रश्न ३१. डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटीह्या संस्थेची स्थापना कोणी केली?

    अ) विठ्ठल रामजी शिंदे

    ब) शाहू महाराज

    क) नारायण मेघाजी लोखंडे

    ड) कृष्णाजी पांडुरंग भालेकर

  • अ) विठ्ठल रामजी शिंदे



  • प्रश्न ३२. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

    अ) 1871

    ब) 1872

    क) 1873

    ड) 1874

  • क) 1873



  • प्रश्न ३३. महात्मा फुले यांनी शेतकर्‍याचा असूडहा ग्रंथ इ.स. 1883 त लिहिला; पण हा ग्रंथ इ.स. 1960 पर्यंत प्रकाशित झालेला नव्हता ?

    अ) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ब) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    क) संपूर्ण विधान बरोबर

    ड) संपूर्ण विधान चूक

  • क) संपूर्ण विधान बरोबर



  • प्रश्न ३४. परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

    अ) दादोबा पांडुरंग तर्खडकर

    ब) आत्माराम पांडुरंग तर्खडकर

    क) भास्कर पांडुरंग तर्खडकर

    ड) वासुदेव बाबाजी नवरंगे

  • अ) दादोबा पांडुरंग तर्खडकर



  • प्रश्न ३५. तुकारामतात्या पडवळ यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?

    अ) जातीभेदविवेकसार

    ब) जातिभेद

    क) विटाळविध्वंसन

    ड) अस्पृश्यतेचा प्रश्न

  • अ) जातीभेदविवेकसार



  • प्रश्न ३६. रा.रं. बोराडे आणि भास्कर चंदनशीव हे लेखक एकाच प्रादेशिक पर्यावरणातील आहेत; तथापि रा.रं. बोराडेंच्या लेखनातून प्रकट होणार्‍या आशयसूत्रांपेक्षा चंदनशीव यांच्या साहित्यातील आशयसूत्रे वेगळी आढळतात ?


    अ) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ब) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    क) संपूर्ण विधान बरोबर

    ड) संपूर्ण विधान चूक

  • क) संपूर्ण विधान बरोबर



  • प्रश्न 37. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदुत्वविषयक लेखांचे हिंदुत्वदर्शनह्या पुस्तकाचे संपादन कोणी केले ?

    अ) विलास खोले

    ब) प्र. न. जोशी

    क) भा. द. खेर

    ड) द. न. गोखले

  • ड) द. न. गोखले




  •  

     

     

     


     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment