प्रश्न १. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण ?
अ) इंद्रायुध
ब) दंतिदुर्ग
क) धर्मपाल
ड) गोपाळ
- ब) दंतिदूर्ग
प्रश्न २. ______ याला भारताचा नेपोलियन म्हटले जाते.
अ) चंद्रगुप्त
ब) समुद्रगुप्त
क) रुद्रसेन
ड) यापैकी नाही
- ब) समुद्रगुप्त
प्रश्न ३. ‘अभिज्ञानशाकुन्तलम, रघुवंशम, विक्रमोर्वशीयम, ऋतुसंहारम’, यांचा कर्ता कोण ?
अ) अश्वघोष
ब) भास
क) वराहमिहिर
ड) कालिदास
- ड) कालिदास
प्रश्न ४. दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध इ.स. ______ मध्ये लावला.
अ) 1922
ब) 1921
क) 1919
ड) 1900
- ब) 1921
प्रश्न ५. जोड्या लावा.
a) महागोविंद 1) वास्तुविशारद
b) जीवक 2) वैद्य
c) प्रसेनजित 3) कोसलचा राजा
4) मगधचा राजा
अ) a - 1, b - 4, c - 3
ब) a - 4, b - 3, c - 2
क) a - 1, b - 2, c - 3
ड) a - 4, b - 1, c - 2
- क) a - 1, b - 2, c - 3
प्रश्न ६. जोड्या लावा. (नाटक/काव्य व लेखक)
a) रघुवंशम 1) शुद्रक
b) रत्नावली 2) कालिदास
c) मृच्छकटीक 3) बाणभट्ट
4) हर्षवर्धन
अ) a - 1, b - 4, c - 3
ब) a - 4, b - 3, c - 2
क) a - 1, b - 2, c - 3
ड) a - 2, b - 4, c - 1
- ड) a - 2, b - 4, c - 1
प्रश्न ७. पाणिनी यांनी लिहिलेला ‘अष्टाध्यायी’ हा ग्रंथ कशावर आधारित होता ?
अ) राजकारण
ब) समाजकारण
क) अर्थशास्त्र
ड) व्याकरण
- ड) व्याकरण
प्रश्न ८. खालीलपैकी कोणत्या राजाच्या काळात ‘फाहियान’ हा बौद्ध भिक्खू चीन मधून भारतात आला होता ?
अ) समुद्रगुप्त
ब) दूसरा चंद्रगुप्त
क) कनिष्क
ड) श्रीगुप्त
- ब) दूसरा चंद्रगुप्त
प्रश्न ९. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव ______ असे होते ?
अ) समुद्रगुप्त
ब) दूसरा चंद्रगुप्त
क) कनिष्क
ड) श्रीगुप्त
- ड) श्रीगुप्त
प्रश्न १०. हडप्पा संस्कृतीतील महत्वाच्या स्थळांपैकी खालीलपैकी कोणते स्थळ हे हडप्पा संस्कृतीचा भाग नाही ?
अ) कुंतासी
ब) कालीबंगन
क) प्रतिष्ठान
ड) रंगपूर
- क) प्रतिष्ठान
प्रश्न ११. वैदिककालीन लोक अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास काय म्हणत असत ?
अ) सत्
ब) स्मृती
क) हवि
ड) यापैकी नाही
- क) हवि
प्रश्न १२. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता ?
अ) धर्मपाल
ब) गोपाळ
क) इंद्रायुध
ड) दंतिदुर्ग
- ड) दंतिदुर्ग
प्रश्न १३. बौद्ध धर्मग्रंथांपैकी असलेले ‘त्रिपिटक’ कोणत्या भाषेत लिहिले गेले ?
अ) अर्धमागधी
ब) प्राकृत
क) संस्कृत
ड) पाली
- ड) पाली
प्रश्न १४. हडप्पा हे स्थळ _____ नदीच्या काठावर आहे. (2015)
अ) झेलम
ब) गंगा
क) रावी
ड) घग्गर
- क) रावी
प्रश्न १५. चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात असलेल्या ग्रीक राजदूताचे नाव काय होते ?
अ) मेगॅस्थनीज
ब) फहीयान
क) टॉलेमी
ड) मीनॅन्डर
- अ) मेगॅस्थनीज
प्रश्न १६. गुरुजवळ बसून मिळवलेल्या ज्ञानापासून या ग्रंथाची निर्मिती केली गेली ?
अ) आरण्यके
ब) सामवेद
क) उपनिषदे
ड) यापैकी नाही
- क) उपनिषदे
प्रश्न १७. गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोठे दिले ?
अ) लुंबिनी
ब) गया
क) कुंडग्राम
ड) सारनाथ
- ड) सारनाथ
प्रश्न १८. वर्धमान महावीरांचे जन्मस्थान कोणते ?
अ) बोधगया
ब) सारनाथ
क) कुंडग्राम
ड) लुंबिनी
- क) कुंडग्राम
प्रश्न १९. चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला ?
अ) राजगृह
ब) श्रवणबेळगोळ
क) पाटलीपुत्र
ड) सारनाथ
- ब) श्रवणबेळगोळ
प्रश्न २०. वेद या संज्ञेचा अर्थ ______ हा होतो.
अ) अध्ययन
ब) ज्ञान
क) अभ्यास
ड) कौशल्य
- ब) ज्ञान
📚 आणखी वाचा :
👉 16 महाजनपदे 👉 चालू घडामोडी / Current Affairs 6 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment