Tuesday, October 14, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 8

प्रश्न 1. 'Ragasa चक्रीवादळ' याला 'Ragasa' हे नाव कोणत्या देशाने दिले होते ?

उत्तर➣ फिलिपिन्स

*** Notes -

हे चक्रीवादळ पॅसिफिक(प्रशांत) महासागरात तयार झाले होते.

याला 'सुपर टायफून' म्हणूनही ओळखले जाते.

फिलीपाईन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन या देशांमध्ये मोठे नुकसान.

शक्ती चक्रीवादळ(Oct 2025) - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाला नाव 'श्रीलंकेने' दिले आहे.

प्रश्न 2. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल ________ धबधब्यावर उभारण्यात आला आहे.

उत्तर➣ नापणे धबधबा (वैभववाडी जि. सिंधुदूर्ग)

*** Notes -

भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळखले जाते. 1997 साली महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले.

प्रश्न 3. भारतातील पहिली AI अंगणवाडी कुठे सुरु करण्यात आली ? (#जुलै 2025)

उत्तर➣ वडधामणा (जि. नागपूर)

प्रश्न 4. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संलग्न असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने _________ ला कर्करोगजन्य विषाणू म्हणून घोषित केले आहे.

उत्तर➣ हेपेटायटीस डी

*** Notes -

यापूर्वी, WHO ने देखील हेपेटायटीस बी आणि सी ला कर्करोगजन्य विषाणू म्हणून घोषित केले आहे.

प्रश्न 5. दाक्षिणात्य अभिनेता विजय यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय आहे ?

उत्तर➣ तमिलागा वेत्री कळघम

प्रश्न 6. 'मिस युनिवर्स इंडिया 2024' चा खिताब कोणी पटकावला ?

उत्तर➣ रिया सिंघा (Miss Universe India 2024)

प्रश्न 7. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी कोणती चळवळ सुरु करण्यात आली आहे ? (#एप्रिल 2025)

उत्तर➣ AI किरण

*** Notes -

भारत सरकार आणि जागतिक संघटनांच्या सहकार्याने कीर्तिगा रेड्डी यांनी सुरू केलेल्या एआय किरणचे उद्दिष्ट भारतातील महिलांना एआयमध्ये सक्षम बनवणे आहे.

प्रश्न 8. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे ?

उत्तर➣ स्म्रिती मंधाना

प्रश्न 9. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

उत्तर➣ भारत आणि श्रीलंका

प्रश्न 10. अलीकडे ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ने कोणत्या देशाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे ? (#sep 2025)

उत्तर➣ अमेरिका

प्रश्न 11. दरवर्षी RBI कडून 'वित्तीय साक्षरता सप्ताह' कधी आयोजित करण्यात येतो ?

उत्तर➣ 24 ते 28 फेब्रुवारी, 2025

*** Notes -

सुरुवात - 2016

या वर्षीच्या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम 'आर्थिक साक्षरता - महिलांची समृद्धी'(‘Financial Literacy - Women’s Prosperity’)

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 12. '38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 (38th National Games 2025)' कुठे पार पडल्या ? (Feb 2025)

उत्तर➣ हल्द्वानी (उत्तराखंड)

*** Notes -

Services Sports Control Board - पहिल्या स्थानी (68 + 26 + 27 = 121)

महाराष्ट्र - दुसऱ्या स्थानी (55 + 70 + 76 = 201)

हरियाणा - तिसऱ्या स्थानी (48 + 47 + 59 = 154)

अधिक माहितीसाठी 👉 Medal Tally Link

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 13. 2027 च्या 39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद कोणत्या राज्याकडे नियोजित आहे ?

उत्तर➣ मेघालय

प्रश्न 14. जानेवारी 2025 नुसार जगातील सर्वात महागडा पासपोर्ट कोणता होता ?

उत्तर➣ ऑस्ट्रेलिया

*** Notes -

2024 - मेक्सिको

प्रश्न 15. 'साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025' मराठी कोणाला मिळाला ?

उत्तर➣ सुरेश सावंत - आभाळमाया (कविता)

*** Notes -

2024 - समशेर आणि भूतबंगला (कादंबरी) - भारत सासणे

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 16. डॉ. सुधीर रसाळ यांच्या कोणत्या समीक्षा ग्रंथाला 'साहित्य अकादमी पुरस्कार 2024' मिळाला आहे ?

उत्तर➣ विंदांचे गद्यरूप (समीक्षा ग्रंथ)

*** Notes -

2023 - रिंगाण (कादंबरी) - कृष्णात खोत

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 17. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा मोहीम काय आहे, ज्याचा उद्देश सूर्याचा अभ्यास करणे असा आहे ?

उत्तर➣ आदित्य L1

*** Notes -

2 सप्टेंबर 2023 रोजी या यानानं श्रीहरीकोटा इथून उड्डाण केलं होतं.

L1 म्हणजे Lagrange Point One

प्रश्न 18. HSRP म्हणजे ______ ?

उत्तर➣ High Security Registration Plate

प्रश्न 19. नाटो संघटनेचा 32 वा सदस्य देश कोणता ? (#2024)

उत्तर➣ स्वीडन

*** Notes -

NATO - North Atlantic Treaty Organization

४ एप्रिल १९४९ रोजी युरोप आणि उत्तर अमेरिकेतील १२ देशांनी मिळून नाटोची स्थापना केली.

तेव्हापासून, आणखी २० देशांनी नाटोमध्ये १० फेऱ्यांच्या विस्ताराद्वारे (१९५२, १९५५, १९८२, १९९९, २००४, २००९, २०१७, २०२०, २०२३ आणि २०२४ मध्ये) सामील झाले आहेत.

उत्तर अटलांटिक कराराच्या कलम १० मध्ये देश युतीमध्ये कसे सामील होऊ शकतात हे स्पष्ट केले आहे. त्यात असे म्हटले आहे की "या कराराची तत्त्वे पुढे नेण्याच्या आणि उत्तर अटलांटिक क्षेत्राच्या सुरक्षेत योगदान देण्याच्या स्थितीत असलेल्या कोणत्याही युरोपियन राज्यासाठी" सदस्यत्व खुले आहे.

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 20. '37 व्या कथक महोत्सव 2025' चे आयोजन _________ येथे 21-26 मार्च, 2025 यादरम्यान करण्यात आले होते ?

उत्तर➣ नवी दिल्ली

प्रश्न 21. राज्य शासनाचा पहिला 'महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार' कोणाला मिळाला आहे ? (#2024)

उत्तर➣ चैत्राम पवार (बारीपाडा, धुळे)

प्रश्न 22. राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2024' कोणाला देण्यात आला आहे ? (#March 2025)

उत्तर➣ राम सुतार

6 7 8 9 10 11

 

 

 



No comments:

Post a Comment