SET/NET Marathi Paper 15
प्रश्न 1. वि. का. राजवाडे यांनी श्रीसमर्थ वाग्देवता मंदीर कोठे स्थापन केले ? (SET Jan 2018)
अ) नागपूर
ब) नांदेड
क) सातारा
ड) धुळे
- ड) धुळे
प्रश्न 2. इंग्रजांच्या धोरणांचा परखड समाचार घेण्यासाठी महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ? (SET Jan 2018)
अ) ख्रिस्ती बंधुजनांस विनंती
ब) इशारा
क) सार्वजनिक सत्यधर्म
ड) तृतीय रत्न
- ब) इशारा
प्रश्न 3. 'पंजाबातील नामदेव' हे पुस्तक कोणी लिहिले ? (SET Jan 2018)
अ) शं. पु. जोशी
ब) अशोक कामत
क) अ. ना. देशपांडे
ड) ल. रा. पांगारकर
- अ) शं. पु. जोशी (शंकर पुरुषोत्तम जोशी)
प्रश्न 4. एका सरकारी अधिकाऱ्याची कैफियत मांडणारी 'शिरस्तेदार' हि कादंबरी कोणी लिहिली ? (SET Jan 2018)
अ) ना. ह. आपटे
ब) ह. ना. आपटे
क) वि. कों. ओक
ड) म. वि. रहाळकर
- क) वि. कों. ओक (विनायक कोंडदेव ओक)
प्रश्न 5. 'ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती' या ग्रंथाचे लेखक कोण ? (SET Jan 2018)
अ) काशिनाथ नारायण मराठे
ब) लोकहितवादी
क) हरी केशवजी
ड) गणेशशास्त्री लेले
- ब) लोकहितवादी
प्रश्न 6. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ? (SET Jan 2018)
अ) इ. स. 1829
ब) इ.स. 1841
क) इ. स. 1857
ड) इ. स. 1948
- अ) इ. स. 1829
प्रश्न 7. संत तुकारामांच्या वैकुंटगमणाच्या प्रसंगाचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीतून आले आहे ? (SET June 2019)
अ) पायी चालणार
ब) भिजकी वही
क) आनंद ओवरी
ड) शोभायात्रा
- क) आनंद ओवरी
प्रश्न 8. 'कॉमिक एपिक पोएम इन प्रोझ' हे वर्णन कोणत्या साहित्यप्रकाराचे आहे ? (SET June 2019)
अ) महाकाव्य
ब) कविता
क) कादंबरी
ड) शोकांतिका
- क) कादंबरी
प्रश्न 9. 'लंपन' हि व्यक्तिरेखा कोणी निर्मिली आहे ? (SET June 2019)
अ) चिं. वि. जोशी
ब) शरच्चंद्र चिरमुळे
क) प्रकाश नारायण संत
ड) भा. रा. भागवत
- क) प्रकाश नारायण संत
प्रश्न 10. 'नाटकी निबंध' या लेखसंग्रहामध्ये कोणत्या समीक्षापद्धतीचे उपयोजन केले आहे ? (SET June 2019)
अ) ऐतिहासिक
ब) मानसशास्त्रीय
क) आस्वादक
ड) मार्क्सवादी
- ड) मार्क्सवादी
प्रश्न 11. द. ग. गोडसे यांनी समीक्षेमध्ये कोणत्या नव्या संकल्पनेचे उपयोजन केले आहे ? (SET June 2019)
अ) मानुषता
ब) पोत
क) सांस्कृतिक वर्चस्व
ड) लय
- ब) पोत
प्रश्न 12. छ. राजाराम यांच्या आज्ञेने जिंजी येथे कोणत्या बखरीचे लेखन केले आहे ? (SET June 2019)
अ) श्री शिवदिग्विजय
ब) सभासदी बखर
क) महिकावतीची बखर
ड) एक्क्याणव कलमी बखर
- ब) सभासदी बखर
- सभासदी बखर - कृष्णाजी अनंत सभासद
प्रश्न 13. फलाहार > फराळ, हे स्वनपरिवर्तन पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे ? (SET 2017 P2)
अ) सदृशीकरण
ब) विसदृशीकरण
क) स्वनव्यत्यास
ड) सदृशस्वनलोप
- क) स्वनव्यत्यास
प्रश्न 14. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची स्थापना शके 1111 मध्ये झाली, असा पुरावा देणारा शिलालेख कोणता ? (SET 2017 P2)
अ) चौऱ्याऐंशीचा शिलालेख
ब) पंढरपूरचा शिलालेख
क) पळसदेव शिलालेख
ड) मंगळवेढ्याचा शिलालेख
- ब) पंढरपूरचा शिलालेख
प्रश्न 15. 'महदंबेचे 'मातृकी रुक्मिणी स्वयंवर' हे दीर्घकाव्य 'धवळ्या'च्या तुलनेत काव्यदृष्ट्या अधिक सरस असले तरी या कथाकाव्याची भक्तिरसाची बैठक मात्र डळमळीत आहे.' (SET 2017 P2)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
- क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
प्रश्न 16. भास्करभट्ट बोरीकरांच्या 'शिशुपाळवध' ह्या काव्याविषयी 'ग्रंथु निका झाला / परि निवृत्ताजोगा नव्हेची :' असा अभिप्राय कोणी व्यक्त केला ? (SET 2017 P2)
अ) नागदेवाचार्य
ब) चक्रधरस्वामी
क) कवीश्वर बांस
ड) बाईदेवी बांस
- ड) बाईदेवी बांस
प्रश्न 17. 'पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी' हि रचना कोणत्या संताची आहे ? (SET 2017 P2)
अ) संत नामदेव
ब) संत एकनाथ
क) संत जनाबाई
ड) संत तुकाराम
- ड) संत तुकाराम
प्रश्न 18. 'तरुणी - शिक्षण नाटिका' या नाटकातून ना. बा. कानिटकर यांनी स्त्रीशिक्षण व स्त्रीस्वातंत्र्य याविषयी 19 व्या शतकातील रुढीप्रिय परंपरावादी वृत्तीच्या मध्यमवर्गीयांची प्रातिनिधिक विचारसरणी मांडली आहे. केसरीचे तत्कालीन संपादक बाळ गंगाधर टिळक याच विचारांचे पुरस्कर्ते होते. (SET 2017 P2)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
- अ) संपूर्ण विधान बरोबर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 25 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 10
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment