चालू घडामोडी / Current Affairs marathi 11

प्रश्न 1. देशातील पहिले 'कृषी हॅकेथॉन 2025' कोठे आयोजित करण्यात आले होते ?

उत्तर➣ पुणे (1 ते 3 जून )

*** Notes -

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने हे 'कृषी हॅकेथॉन 2025' आयोजित करण्यात आले होते.

प्रश्न 2. 72 वी 'मिस वर्ल्ड 2025' स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?

उत्तर➣ हैद्राबाद

*** Notes -

हैदराबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड 'ओपल सुचाता चुआंगश्री' हिला 'मिस वर्ल्ड 2025' चा किताब देण्यात आला.

प्रश्न 3. 2025 मध्ये देशातील किती परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

उत्तर➣ 15

*** Notes -

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 4. भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले होते ? (#2024)

उत्तर➣ हिमाचलप्रदेश

*** Notes -

हिमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये 1,500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले

प्रश्न 5. जून 2025 मध्ये मंगोलियातील उलानबाटार येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय ? (#2025)

उत्तर➣ नोमॅडिक एलिफंट (Nomadic Elephant) 17 वी आवृत्ती

*** Notes -

या सरावात 'अरुणाचल स्काउट्स' द्वारे भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करण्यात आले

2024 - उमरोई (मेघालय)

प्रश्न 6. भारताचा पहिला 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) (AI SEZ)' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?

उत्तर➣ नवा रायपूर (छत्तीसगढ)

*** Notes -

Asia's first 'Export Processing Zone (EPZ)' set up in Kandla, Gujarat in 1965.

प्रश्न 7. 'एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026' चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

उत्तर➣ अहमदाबाद, भारत.

*** Notes -

1982 - Asian Weightlifting Championships - नवी दिल्ली, भारत.

1958 मध्ये टोकियोमध्ये आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशन (Asian Weightlifting Federation (AWF)) ची स्थापना झाली.

हेडक्वार्टर - दोहा (कतार).

प्रश्न 8. कोणत्या राज्याने 'सीमा पर्यटन' उपक्रम सुरु केला आहे ? (#2025)

उत्तर➣ हिमाचलप्रदेश

*** Notes -

हिमाचलप्रदेश राजधानी - शिमला

हिमाचलप्रदेश मुख्यमंत्री - सुखविंदर सिंह सुक्खू

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 9. बहुराष्ट्रीय सैन्य सराव 'KHAAN QUEST 2025' चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते ? (#2025)

उत्तर➣ उलानबातर, मंगोलिया. (22 वी आवृत्ती)

*** Notes -

2024 - मंगोलिया

2003 मध्ये अमेरिका आणि मंगोलिया यांच्यातील द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झालेला, 2006 पासून तो बहुराष्ट्रीय शांतता राखण्याचा सराव बनला.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 10. GI टॅग प्राप्त 'ओजो फेनी (Ozzo Feni)' चा संबंध कोणत्या राज्याशी आहे ? (#2025)

उत्तर➣ गोवा

*** Notes -

ओजो फेनी हे एक काजू आणि सफरचंद पासून बनवलेले पारंपरिक मद्य आहे.

भौगोलिक संकेत (GI) टॅग हा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या (MoC&I) उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) अंतर्गत असलेल्या चेन्नई (TN)-स्थित भौगोलिक संकेत नोंदणी (GIR) कडून प्रदान करण्यात आला आहे.

GI टॅग हे ‘वस्तूंचे भौगोलिक संकेत (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, 1999’ अंतर्गत प्रशासित केले जातात, जो 2003 रोजी लागू झाला.

पश्चिम बंगाल (पश्चिम बंगाल) येथील दार्जिलिंग चहाला २००४ मध्ये जीआय टॅग मिळालेले पहिले भारतीय उत्पादन होण्याचा मान आहे.

GI ची नोंदणी नोंदणीच्या तारखेपासून १० वर्षांच्या कालावधीसाठी वैध असते आणि वेळोवेळी पुढील १० वर्षांसाठी तिचे नूतनीकरण करता येते.

प्रश्न 11. 'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो ? (#2025)

उत्तर➣ 23 जून

प्रश्न 12. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 'हाजी कलीमुल्ला खान' कोणत्या नावाने सुद्धा ओळखले जातात ?

उत्तर➣ मँगो मॅन ऑफ इंडिया

प्रश्न 13. एआय वापरून पिकांचा अभ्यास करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरु केला आहे ? (#2025)

उत्तर➣ CROPIC

*** Notes -

CROPIC (Collection of Real Time Observations & Photo of Crops)

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत पीक देखरेख आणि पीक विम्यात कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे .

प्रश्न 14. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या 'प्रोजेक्ट विष्णु’ अंतर्गत _________ हे एक असे हायपरसोनिक क्षेपणास्त्र (मिसाइल) विकसित करण्यात आले आहे.

उत्तर➣ एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी लॉन्ग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाइल (ET-LDHCM)

प्रश्न 15. भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोच्या 'क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी' (Creative City of Gastronomy) या प्रतिष्ठित जागतिक नेटवर्कमध्ये स्थान मिळाले आहे ? (#2025)

उत्तर➣ लखनऊ

*** Notes -

Creative City of Gastronomy - हैदराबादनंतर (Hyderabad) 2019, नंतर हा मान मिळवणारे लखनौ हे दुसरे भारतीय शहर ठरले आहे.

प्रश्न 16. 2025 नुसार युनेस्कोच्या 'युनेस्को क्रिएटिव सिटीझ नेटवर्क (UCCN)' मध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे ?

उत्तर➣ 9

*** Notes -

जयपुर - हस्तकला आणि लोककला - 2015
वाराणसी - संगीत - 2015
चेन्नई - संगीत - 2017
मुंबई - चित्रपट - 2019
हैदराबाद - गॅस्ट्रोनॉमी/पाक-कला - 2019
श्रीनगर - हस्तकला आणि लोककला - 2021
ग्वालियर - संगीत - 2023
कोझिकोड - साहित्य - 2023
लखनऊ - गॅस्ट्रोनॉमी/पाक-कला - 2025

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 17. कोणत्या भारतीय लेखिकेला त्यांच्या 'हार्ट लॅम्प' या कन्नड लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ बानू मुश्ताक

*** Notes -

भारतीय लेखिका बानू मुश्ताक आणि अनुवादक दीपा भास्ती यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ (Heart Lamp) या लघुकथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार (International Booker Prize 2025) प्रदान करण्यात आला आहे.

‘हार्ट लॅम्प’मधील कथा कन्नड भाषेत मूळतः लिहिल्या गेल्या आहेत.

हा पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच लघुकथा संग्रह आहे. या पुस्तकासाठी पुरस्कार जिंकणाऱ्या दीपा भाष्टी या पहिल्या भारतीय अनुवादक आहेत.

प्रश्न 18. कोणत्या राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'महाविस्तार' मोबाईल ऍप लॉच केलं आहे ? (#2025)

उत्तर➣ महाराष्ट्र

प्रश्न 19. _________ या अभिनेत्रीची मे 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीसाठी भारताकडून कोरिया टुरिझमची मानद राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

उत्तर➣ हिना खान

प्रश्न 20. खेलो इंडियाच्या बॅनरखाली आयोजित होणारे हे पहिलेच 'खेलो इंडिया बीच गेम्स 2025'चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर➣ दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव

प्रश्न 21. IPL मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे ?(#2025)

उत्तर➣ मुंबई इंडियन्स

*** Notes -

मुंबई इंडियन्सने 150 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर जिंकला.

प्रश्न 22. ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर➣ Kriti Sanon (कृती सेनॉन)

प्रश्न 23. कोणत्या भारतीय दिग्दर्शकाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' मिळाला आहे ? (#2025)

उत्तर➣ प्रदीप कुर्बाह

*** Notes -

मेघालयाच्या प्रदीप कुर्बाह यांना 47 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या खासी भाषेतील "हा लिंगखा बेंग" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि कुर्बाह यांना स्वतः सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

2014 - राष्ट्रीय पुरस्कार

हे पुरस्कार नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा (NETPAC) द्वारे प्रदान केले गेले

 

 

 



No comments:

Post a Comment