Wednesday, November 08, 2023

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 9 || SET NET Marathi Paper 2

 

सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 9
SET NET Marathi Paper 2

set net marathi previous year questions || set net pyq



प्रश्न 1. भाषातज्ञ डॉ. अशोक केळकर यांना त्यांच्या कोणत्या लेखसंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळालेला आहे ?

अ) रुजुवात

ब) त्रिवेणी: भाषा साहित्य संस्कृती

क) प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा

ड) वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार

  • अ) रुजुवात




  • प्रश्न 2. पुढीलपैकी कोणती कादंबरी गौरी देशपांडे यांची आहे ?

    1)मुक्काम   2)आहे हे अस आहे   3)उत्खनन   4)गोफ   5)विंचुर्णीचे धडे

    अ) 1, 2, 3, आणि 5 फक्त

    ब) 1, 4 आणि 5 फक्त

    क) 1, 3 आणि 4 फक्त

    ड) वरिल सर्व

  • क) 1, 3 आणि 4 फक्त




  • प्रश्न 3. ‘घरजावई’ कथासंग्रह कोणाचा ?

    अ) द. मा. मिरासदार

    ब) ना. घ. देशपांडे

    क) अशोक रानडे

    ड) आनंद यादव

  • ड) आनंद यादव




  • प्रश्न 4. सर्व मराठी बोलींच्या शास्त्रीय अध्ययनाचा पाया कोणी घातला ?

    अ) अ. का. प्रियोळकर

    ब) अशोक केळकर

    क) वि. भा. प्रभुदेसाई

    ड) सु. मं. कत्रे

  • ड) सु. मं. कत्रे




  • प्रश्न 5. ‘शब्द’ या मराठीतील पहिले समजले जाणाऱ्या लघुनियतकालिकाचे संपादक कोण होते ?

    अ) रमेश समर्थ

    ब) दिलीप चित्रे

    क) अशोक शहाणे

    ड) मनोहर ओक

  • अ) रमेश समर्थ




  • प्रश्न 6. चक्रधरांचे अनुयायी एकमेकांना कोणत्या नावाने संबोधतात ?

    अ) बंधू

    ब) माऊली

    क) महात्मा

    ड) आचार्य

  • क) महात्मा




  • प्रश्न 7. ‘जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरु केला जाण |’ ही अभंगरचना कोणाची ?

    अ) संत रामदास

    ब) संत एकनाथ

    क) संत ज्ञानेश्वर

    ड) संत तुकाराम

  • ब) संत एकनाथ




  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु. शि. रेगे) यांचा आहे ?

    अ) प्रियाळ

    ब) गंधरेखा

    क) दुसरा पक्षी

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व



  • प्रश्न 9. ‘माझी आगगाडी कशी चुकली’, ‘कपड्यांची अदलाबदल’, ‘अलिगड किल्यातील एक रहस्य’, ‘दुधाची धार अथवा गुप्तदान’ चे कथाकार कोण ?

    अ) दिनकर गंगाधर केळकर

    ब) नरसिंह चिंतामण केळकर

    क) इरावती कर्वे

    ड) वा. ल. कुलकर्णी

  • ब) नरसिंह चिंतामण केळकर




  • प्रश्न 10. ‘फिलोसॉफी ऑफ फाइन आर्ट्स’ ग्रंथलेखक कोण ?

    अ) कांट

    ब) हेगेल

    क) रुसो

    ड) प्लेटो

  • ब) हेगेल




  • प्रश्न 11. तत्ववेत्ता ‘इमॅन्युअल कांट’ कोणत्या देशातील होता ?

    अ) जर्मनी

    ब) अमेरिका

    क) इटली

    ड) रशिया

  • अ) जर्मनी



  • प्रश्न 12. भरतमुनीने ‘बीभत्स रसाचा’ सांगितलेला स्थायीभाव कोणता ?

    अ) विस्मय

    ब) भय

    क) क्रोध

    ड) जुगुत्सा

  • ड) जुगुत्सा





  • पुढे >>>>>>>                      <<<<<<< मागे

     

     

     

     


     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment