set net marathi previous year questions || set net pyq || MH set exam
प्रश्न 1. एतिहासिकता, प्रामाण्य, जिवंतपणा व स्वायत्तता ही कोणत्या भाषेची सारतत्वे आहेत ? (April 2017)
अ) संगणकीय भाषा
ब) बोली भाषा
क) प्रमाण भाषा
ड) एस.एम.एस.ची भाषा
प्रश्न 2. संदेशनावर परीणाम करणारा भाषेतर घटक पुढीलपैकी कोणता ? (Sep 2021)
अ) वाक्याची सुरावली
ब) शब्दांचा क्रम
क) संदेशनाचा आशय
ड) संदेशनाचे उद्धिष्ट
प्रश्न 3. ‘महाप्राण मराठीत अर्थनिर्णायक आहे, इंग्रजीत नाही.’ (April 2017)
अ) हे विधान बरोबर आहे
ब) हे विधान चूक आहे
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
प्रश्न 4. मराठी भाषेच्या निर्मितीचा विचार करतांना ‘क्रिओलाइड प्राकृत’ असा मराठीचा निर्देश कोणी केला आहे ? (April 2017)
अ) साउथवर्थ
ब) अ. म. घाटगे
क) चिं. वि. वैद्य
ड) व्हेर्नर
प्रश्न 5. ‘लेखनप्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते.’ हे मत कुणी मांडले आहे ? (Sep 2021)
अ) भालचंद्र नेमाडे
ब) अशोक केळकर
क) रमेश धोंगडे
ड) मिलिंद मालशे
प्रश्न 6. एका भाषाकुलामध्ये कोणत्या भाषा समाविष्ट केल्या जातात ? (Sep 2021)
अ) एका भौगोलिक परिसरातील
ब) परस्परांशी दीर्घकाळ देवाणघेवाण असणाऱ्या
क) 70 % पेक्षा अधिक शब्दसाम्य असणाऱ्या
ड) एका भाषेमधून उद्भवणाऱ्या
प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या विषयाचा अभ्यास समाजभाषाविज्ञानात येत नाही ? (Sep 2021)
अ) भाषा आणि सामाजिक भेद
ब) भाषेची व्याकरणिक व्यवस्था आणि शब्दसंग्रह
क) भाषा आणि लिंगभेद
ड) भाषा आणि सांस्कृतिक परंपरा
प्रश्न 8. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखन नियमांनुसार अचूक आहे ? (April 2017)
अ) पुनर्निमिती
ब) पुर्नर्निमिती
क) पुनर्निमिति
ड) पुनर्निमिर्ती
प्रश्न 9. ‘ भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले |
नाचत तान्हुले यशोदेचे || ’
ही रचना कोणत्या संत कवीची आहे ? (April 2017)
अ) संत नामदेव
ब) संत तुकाराम
क) संत एकनाथ
ड) संत मुक्ताबाई
प्रश्न 10. पुढीलपैकी कोणती सर्वनामे तृतीया विभक्तीत शून्य प्रत्यय घेतात ? (June 2019)
अ) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी
ब) प्रथमपुरुषी व तृतीयपुरुषी
क) द्वितीयपुरुषी व तृतीयपुरुषी
ड) वरीलपैकी सर्व
प्रश्न 11. समाजभाषाविज्ञान ही शाखा पुढीलपैकी कशाचा अभ्यास करते ? (June 2019)
अ) भाषेच्या सामाजिक संदर्भातील आविष्काराचा
ब) भाषिक आविष्कारातील समाजाचा
क) भाषेच्या व्यवस्थेचा
ड) वरिल सर्व विषयांचा
प्रश्न 12. वारकरी कीर्तनात काल्यानंतर सादर केल्या जाणाऱ्या कलाप्रकारास काय म्हणतात ? (June 2019)
अ) काल्याचे कीर्तन
ब) भारुड
क) बोहाडा
ड) लळीत
प्रश्न 13. “संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांना ‘ ब्रम्हा-विष्णू-महेश ’ असे कोणी संबोधले आहे” ? (Sep 2021)
अ) आचार्य अत्रे
ब) विंदा करंदीकर
क) एस. एम. जोशी
ड) श्रीपाद अमृत डांगे
प्रश्न 14. गौरी देशपांडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले ? (Sep 2021)
अ) अरेबियन नाईट्स
ब) गीतांजली
क) दि बायबल
ड) गीतगोविंद
प्रश्न 15. ‘विश्वसाहित्य’ ही संकल्पना भारतात कोणी प्रथम मांडली ? (June 2019)
अ) विनयकुमार सरकार
ब) रवींद्रनाथ ठाकूर
क) अरविंद घोष
ड) बुद्धदेव बोस
प्रश्न 16. मराठीमध्ये हायकू ह्या काव्यप्रकाराचा प्रारंभ कोणी केला ? (June 2019)
अ) ज्ञानेश्वर मुळे
ब) शिरीष पै
क) केशवकुमार
ड) दत्तू बांदेकर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 9 👉 SET NET History PYQ 2 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 6
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment