भाषेच्या उत्पत्तीसंबंधी भाषाशास्त्रज्ञांनी मांडलेले विविध उपपत्ती/सिद्धांत......
१. अनुकरण सिद्धांत -
- डॉ. गायगर यांनी भाषेची उत्पत्ती अनुकरणाच्या प्रवृत्तीतून झाली असा सिद्धांत मांडला. भोवताली असलेल्या वस्तूंच्या, प्राण्यांच्या ध्वनींचे अनुकरण मानवाने केले त्यामुळे भाषेतील शब्द तयार झाले असे डॉ. गायगर यांचे मत आहे.
- या सिद्धांताला भो - भो सिद्धांत असेही म्हटले जाते.
- कुत्र्याचे bow - bow असे ओरडणे पाहून मॅक्समूलरने या सिद्धांताची Bow Bow Theory असे म्हणून थट्टा केली.
- या सिद्धांताला अनुकरणमुलकतावाद, प्राणिशब्दानुकरण, Echoic Theory, Onomotopoetic Theory इ. नावे दिली जातात.
२.भावनाभिव्यक्ती सिद्धांत -
- हा सिद्धांत काँडीलॅक यांनी मांडला.
- Pooh - Pooh Theory म्हणून सुद्धा ओळखले जाते.
- सुख, दुःख, आशा, निराशा, पसंती, तिरस्कार, घृणा, विस्मय इ. विकार व भावना दर्शवण्यासाठी मानवाने जे भावनादर्शक उदगार काढले त्यातून भाषा निर्माण झाली असे काँडीलॅक मत होते.
- या सिद्धांताला आवेग सिद्धांत, मनोभावाभिव्यक्तिवाद, मनोरागव्यक्तवाद, Ineterjectional Theory अशी विविध नावे आहेत.
३. रणन सिद्धांत -
- या सिद्धांताचा निर्देश प्रथम प्रथम प्लेटोने केला. परंतु जर्मन प्रोफेसर हेस यांनी या सिद्धांताचे व्यवस्थितरीत्या प्रतिपादन केले. अनुकरण सिद्धांताची चेष्टा करून मॅक्समूललने भाषेची उत्पत्ती व भाषेची वाढ याबाबत मान्य केलेला हा सिद्धांत होय.
- या सिद्धांतानुसार प्रत्येक शब्दाला त्याचा म्हणून एक नाद असतो व तो नाद, त्या शब्दांनी दाखलेल्या पदार्थाकडून जी क्रिया होते त्या क्रियेचा दर्शक असतो. शब्दाचा नाद व त्याचा अर्थ ह्या दोहोत एक तऱ्हेचा समत्वाचा संबंध असतो, दोन्ही एकमेकांना पूरक असतात या सिद्धांताला रणन सिद्धांत किंवा वस्तुनादानुकरण सिद्धांत म्हणतात.
- या सिद्धांताला धातू सिद्धांत, नादानुकरण सिद्धांत, Nativistic Theory अशीही इतर नवे आहेत.
- यालाच Ding - Dong Theory असे म्हणतात.
४. श्रमपरिहार सिद्धांत -
- हा सिद्धांत लुडविगन्वार या भाषाशास्त्रज्ञाने याने मांडला.
- या सिद्धांताला Yo - He - Yo Theory असे देखील म्हणतात.
- सुरुवातीच्या काळातील माणसाने सामूहिकरीतीने काम करतांना परिश्रम होऊ नयेत म्हणून श्रमविनोदपर गाणी म्हटली असावीत व श्रमपरिहार्थ म्हटलेल्या गाण्यातून भाषा जन्माला आली असावी असा हा सिद्धांत आहे.
- या सिद्धांताला श्रमध्वनी सिद्धांत, निश्वासमुलक उपपत्ती, श्रमपरिहरण मूलकतावाद अशीही नावे आहेत.
५. प्रेमगाणमूलक सिद्धांत -
- हा सिद्धांत ऑटो जेस्परसन याने मांडला. जेस्परसन च्या मते प्रेममय पद्य हेच भाषेचे मूळ होय.
- प्रेमाशी संगीताचा संबंध असल्याने या सिद्धांताला Sing - Song Theory, Woo -Woo Theory म्हणतात.
६. इंगित सिद्धांत -
- हावभावातून भाषा निर्माण झाली असा सिद्धांत डॉ. राये यांनी मांडला. आणि सहा असंबद्ध भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाने त्याचा पुरस्कार डार्विनने केला.
- या सिद्धांताला Gestural Theory असेही म्हणतात.
७. संपर्क सिद्धांत -
- जी. रेवेज किंवा रेव्हज या मानसशास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला. याला Contact Theory सुद्धा म्हणतात.
- रेव्ह्ज यांची हि उपपत्ती बालमानसशास्त्र, पशु मानसशास्त्र, अविकसित मानवाचे मानसशास्त्र यांच्या अभ्यासावर आधारित आहे.
८. समन्वय सिद्धांत -
- भाषेच्या उत्पत्तीविषयी बरेच सिद्धांत मांडले गेले. प्रत्येक सिद्धांतात काहीतरी उणीव जाणवल्याने त्यावर आक्षेप घेतले गेले. त्यामुळे एकही सिद्धान्त सर्वमान्य ठरला नाही. स्वीट ह्या भाषाशास्त्रज्ञाने प्रचलित सर्व उपपत्तींचा समन्वय घालण्याचा प्रयत्न करून हा सिद्धांत मांडला.
- स्वीटच्या मते शारिरीक हावभाव आणि ध्वनिसंहितेवर आधारित 'आदिभाषा' ध्वनिसंहितांमुळे विकसित झाली. प्रथम अनुकरणवाचक शब्द, नंतर भावनाविकारवाचक शब्द आणि मग प्रतीकात्मक शब्दातून भाषा निर्माण झाली. सातत्याने केलेल्या वापरातून शब्दांचा अर्थ विकसित होऊन नवे शब्द निर्माण झाले असे स्वीट याचे म्हणणे आहे.
९. मुखाभिनय सिद्धांत -
- नका तोंडातून कोंडलेली हवा बाहेर सोडतांना ज्या हालचाली होतात त्यातून ध्वनी बाहेर पडतात. त्या ध्वनीचा उपयोग करून मानवाने भाषा निर्माण केली असावी असा सिद्धांत सर रिचर्ड पॅगेट यांनी मांडला. यालाच मुखाभिनय सिद्धांत म्हणतात.
- याला Old Gesture असेही म्हणतात.
१०. क्रिडासक्ती सिद्धांत -
- यालाच Play - Way Theory असे सुद्धा म्हणतात.
👉 Source
No comments:
Post a Comment