Monday, April 08, 2024

SET/NET Histroy 1

  

SET/NET Histroy 1

Share करायला विसरू नका.......................

Prvious Year Questions................



प्रश्न 1. ------------------ हा महापाषाणीय प्रकार नाही. (SET 2023)

अ) मेनहीर

ब) डोलमेन

क) टोपी - कुंड

ड) शिळावर्तुळ

  • क) टोपी - कुंड







  • प्रश्न 2. प्राचीन स्थळाचा सांस्कृतिक कालक्रम जाणून घेण्यासाठी ----------- उत्खनन पद्धतीचा अवलंब करणे क्रम प्राप्त ठरते. (SET 2023)

    अ) चाचणी उत्खनन

    ब) उत्सेध उत्खनन

    क) चतुर्थक उत्खनन

    ड) पुरातत्वीय नमुना - चाचणी

  • ब) उत्सेध उत्खनन






  • प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरून तलावासहित अद्वितीय जलव्यवस्थापन पद्धतीचे अवशेष सापडले आहेत ? (SET 2023)

    अ) बनावली

    ब) धोलावीरा

    क) सुरकोटदा

    ड) कुंतासी

  • ब) धोलावीरा






  • प्रश्न 4. हडप्पाकालीन ताम्र वस्तूंच्या उत्पादनाच्या कार्यशाळेचे अवशेष -------------- या स्थळावरून सापडले आहेत.  (SET 2023)

    अ) लोथल

    ब) कुंतासी

    क) सुरकोटदा

    ड) मदिना

  • अ) लोथल






  • प्रश्न 5. -------------- पूर्वेकडे सिंधू संस्कृतीची सीमा होती. (SET 2023)

    अ) बनावली

    ब) आलमगीरपूर

    क) रोपड

    ड) चिरंड

  • ब) आलमगीरपूर





  • प्रश्न 6. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सीचा लेखक पुढीलपैकी कोणत्या बंदरास पोदुके म्हणतो? (SET 2023)

    अ) अरिकमेडू

    ब) पातला

    क) बारबारीकाम

    ड) सोपारा

  • अ) अरिकमेडू






  • प्रश्न 7. मुझरीस हे एक ------------- होय. (SET 2023)

    अ) कापड उत्पादनाचे प्राचीन तंत्रज्ञान

    ब) प्राचीन तंतुवाद्य

    क) प्राचीन बंदर

    ड) मिश्र धातूचे प्राचीन नाव

  • क) प्राचीन बंदर





  • प्रश्न 8. खालीलपैकी कोणत्या वैदिक अभ्यासकाने ॠग्वेदाची तारीख १५०० इ.स. पूर्व ते १००० इ. स. पूर्व निश्चित केली ? (SET 2023)

    अ) ओल्डेनबर्ग

    ब) मॅक्स म्युलर

    क) जॅकोबी

    ड) विंटर्निट्झ

  • ब) मॅक्स म्युलर






  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणती कालमापन पद्धती निरपेक्ष कालमापन पद्धती नाही ? (SET 2020)

    अ) पुराचुंबकीय पद्धती

    ब) कार्बन - १४ पद्धती

    क) तप्तदीपन पद्धती

    ड) स्तरविज्ञान

  • ड) स्तरविज्ञान






  • प्रश्न 10. 'पॅलिओबॉटनी -------------- चा अभ्यास आहे. (SET 2020)

    अ) प्राचीन स्मारकांचा

    ब) प्राचीन वनस्पतीचे अवशेष

    क) प्राचीन नाणे

    ड) प्राचीन लिखाण

  • ब) प्राचीन वनस्पतीचे अवशेष






  • प्रश्न 11. --------------- हे स्थळ महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या महत्वपूर्ण पुरातत्वीय स्थळांपैकी एक स्थळ आहे. (SET 2020)

    अ) पाटणे

    ब) इनामगाव

    क) मोरगाव

    ड) नगरधन

  • ब) इनामगाव






  • प्रश्न 12. --------------- या हडप्पाकालीन स्थळावर सापडलेल्या अग्निकुंडाचे सामुदायिक कार्यक्रमांशी निगडित विशेष महत्व आहे. (SET 2020)

    अ) कुंतासी

    ब) कालीबंगन

    क) सुरकोटडा

    ड) मदिना

  • ब) कालीबंगन 






  • प्रश्न 13.ॠग्वेद संहितामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यवसायाचा उल्लेख केलेला नाही. (SET 2020)

    अ) विणकाम

    ब) कुंभार

    क) सोनार

    ड) लोहार

  • ड) लोहार






  • प्रश्न 14. -------------- हे दोन महत्वाचे हडप्पन पीक होते. (SET 2020)

    अ) गहू आणि जव

    ब) तीळ आणि मोहरी

    क) तांदूळ आणि मटर

    ड) कापूस आणि ऊस

  • अ) गहू आणि जव






  • प्रश्न 15. उत्तरवैदिक काळात ज्या राजाचे साम्राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत विस्तार पावलेले होते त्यास ------------- असे संबोधले जात होते. (SET 2020)

    अ) राजा

    ब) महाराजा

    क) एकरात

    ड) एकराज

  • ड) एकराज







  • पुढे>>>>>>            

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    No comments:

    Post a Comment