SET/NET Marathi Paper 31
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
प्रश्न 1. ध्वनीचे दोन प्रकार कोणते ? (SET 2018)
अ) सहजगम्य ध्वनी आणि गुढार्थध्वनी
ब) काव्यगत ध्वनी आणि व्यवहारांतर्गत ध्वनी
क) तीव्र आणि सौम्य ध्वनी
ड) लौकिक आणि अलौकिक ध्वनी
प्रश्न 2. 'पुरुषार्थ' या शब्दातील 'पुरुष' या पदाचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीमुळे निश्चित होतो ? (SET 2018)
अ) लक्षणा
ब) अभिधा
क) व्यंजना
ड) तात्पर्य
प्रश्न 3. सर्व गुणांचा समतोल समावेश असलेली, वामनाने प्रशंसिलेली रीती कोणती ? (SET 2018)
अ) गौडी
ब) आरभटी
क) वैदर्भी
ड) कौशिकी
प्रश्न 4. व्यंजना हि शब्दशक्ती कोठे कार्यरत होते असा मम्मटाचा आग्रह आहे : (SET 2018)
अ) सर्व संभाषण व्यवहारात
ब) सर्व कलांच्या आविष्कारात
क) फक्त काव्यात
ड) काही विशिष्ट कलांमध्ये
प्रश्न 5. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुढीलपैकी कोणता अनुवाद प्रकाशित केलेला नाही ? (SET 2018)
अ) होमरचे 'ईलियड' हे महाकाव्य
ब) टॉलस्टॉयची 'वॉर अँड पीस' हि कादंबरी
क) न्या. रानडे लिखित 'राईज ऑफ द मराठा पॉवर'
ड) स्टीफन हॉकिन्स यांचा 'हिस्टरी ऑफ टाइम' हा ग्रंथ
प्रश्न 6. पुढील ग्रंथ आणि त्यांचे अनुवादक यांच्या जोड्या लावा : (SET 2018)
1. गॉन विथ द विंग 5. प्रल्हाद वडेर
2. द अल्केमिस्ट 6. विजय पाडळकर
3. पिएर अँड जॉन 7. नितीन कोत्तापल्ले
4. उमरावजान 8. वर्षा गजेंद्रगडकर
9. अपर्णा वेलणकर
अ) 1-6, 2-8, 3-7, 4-9
ब) 1-9, 2- 5, 3-8, 4-7
क) 1-7, 2-6, 3-9, 4-5
ड) 1-8, 2-7, 3-5, 4-6
प्रश्न 7. चारुता सागर या टोपणनावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे मूळ नाव सांगा. (SET 2018)
अ) मा. ना. पाटील
ब) म. भा. भोसले
क) दिनकर दत्तात्रय भोसले
ड) रामचंद्र बाबर
प्रश्न 8. आ, ई, ऊ हे स्वर कोणत्या प्रकारचे आहेत ? (SET 2018)
अ) ऱ्हस्व
ब) दीर्घ
क) संयुक्त
ड) अर्धस्वर
प्रश्न 9. सर्जनशीलता हा भाषेचा महत्वाचा गुणधर्म आहे; मात्र त्याचे विशेषत्वाने प्रत्यंतर साहित्याविष्कारातून येते ? (SET 2023)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 10. 'तू कुसुमला पुस्तके दिलीस.' - या वाक्यातील प्रयोग कोणता ? (SET 2023)
अ) कर्तरी
ब) कर्मणी
क) कर्मभावसंकर
ड) कर्तृकर्मसंकर
प्रश्न 11. केशवसुतांची पुढीलपैकी कोणती कविता सुनीत नाही ? (SET 2023)
अ) 'पण लक्ष्यात कोण घेतो ?' च्या कर्त्यास
ब) मयूरासन आणि ताजमहाल
क) आम्ही कोण ?
ड) चिरवियुक्ताचा उदगार
प्रश्न 12. मध्यमवर्गीय विधवांच्या परिस्थितींच्या दृष्टीकोनातून हरी नारायण आपटे, शरच्चंद्र चट्टोपाध्याय आणि इंदिरा गोस्वामी यांच्या कादंबऱ्यांची तुलना केल्यास त्या तुलनेचा आधारतळ कोणता म्हणता येईल ? (SET 2023)
अ) समान तत्त्वप्रणाली
ब) वाड्मयीन सृजनाला कारणीभूत होणारी समान परिस्थिती
क) समान प्रेरणास्थान
ड) प्रभाव
प्रश्न 13. का. बा. मराठे यांच्या 'नावल आणि नाटक' या निबंधाला पुढीलपैकी कोणते विधान लागू पडते ? (SET 2023)
अ) लोकसाहित्याचा आढावा
ब) भरताच्या नाट्यशास्त्रावर आधारित
क) इंग्लिश कादंबरी व नाटक यांचा सूक्ष्म अभ्यास
ड) समकालीन कादंबऱ्या व नाटके यांचे विश्लेषण इंग्रजी संकल्पना वापरून
प्रश्न 14. कादंबरीसदृश कथनात्मक रचनेंचा पुढीलपैकी कोणता गद्य वाड्मयप्रकार लिखित भारतीय साहित्यात प्रचलित नव्हता ? (SET 2023)
अ) रूपककथा
ब) गोष्ट
क) किस्सा
ड) तात्पर्यकथा
प्रश्न 15. 'मिथ्स, प्रिमिटिव्ह सायकॉलॉजी' हा ग्रंथ कोणाचा ? (SET 2023)
अ) अॅलन डंडेस
ब) लेवी स्ट्रास
क) अँटी अर्ने
ड) ब्रॉनिस्लो मॅलिनॉस्की
प्रश्न 16. 'कडबू' हा शब्द मराठीने पुढीलपैकी कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ?. (SET 2018 P2)
अ) कन्नड
ब) बंगाली
क) तेलगू
ड) गुजराती
प्रश्न 17. 'स्वनिम', 'स्वनिकांतर', 'रुपिम' यासारखे पारिभाषिक शब्द फक्त प्रमाणभाषेत वापरले जातात ; बोली भाषेच्या संदर्भात वापरले जात नाही. हे विधान................ (SET 2018 P2)
अ) बरोबर आहे
ब) चुकीचे आहे
क) पूर्वार्ध बरोबर आहे
ड) उत्तरार्ध बरोबर आहे
प्रश्न 18. '।। वाछि तो विजेया होईवा - ।।' असा उल्लेख : (SET 2018 P2)
अ) दिवे आगरातील शके 982 मधील ताम्रपटावर आढळतो
ब) दक्षिण सोलापूरातील कुडल येथे शके 940 मधील संगमेश्वर मंदिरातील सभामंडपाच्या तुळईवर कोरलेला आहे
क) अक्षी येथील शके 934 मधील संस्कृत मिश्रित पहिल्या शिलालेखात आढळतो
ड) पंढरपूर येथील शके 1195 मधील मराठीच्या पहिल्या शिलालेखात आढळतो
प्रश्न 19. इतिहास वाचण्यापूर्वी तो इतिहास लिहिणारा इतिहासकार वाचायला शिका, असे कोणी म्हटले ? (SET 2023)
अ) हेगेल
ब) हिरॉडोटस
क) इ. एच. कार
ड) शोपेन हॉर
प्रश्न 20. "महाराष्ट्र सात्विक : तेथचे जडचेतन पदार्थ तेही सात्विक : तेथ असतां कव्हणीची शरीर मानसिक उपद्रव नुपजति :"
हा महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ? (SET 2023)
अ) गोविंदप्रभू
ब) विश्वनाथबास बीडकर
क) नागदेवाचार्य
ड) महदंबा
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 1 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 10 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment