प्रश्न १. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत. (asst. 2011)
अ) गडचिरोली
ब) चंद्रपूर
क) नंदुरबार
ड) ठाणे
गडचिरोली
प्रश्न २ . जोड्या लावा (भारतातील थंड हवेची ठिकाणे).
अ) डलहौसी 1) हिमाचल प्रदेश
ब) दार्जिलिंग 2) प.बंगाल
क) पाचगणी 3) महाराष्ट्र
ड) मसुरी 4) उत्तराखंड
अ) अ-4, ब-2, क-1, ड-3
ब) अ-1, ब-2, क-3, ड-4
क) अ-2, ब-1, क-4, ड-3
ड) अ-3, ब-4, क-2, ड-1
अ-1, ब-2, क-3, ड-4
प्रश्न ३ . खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवुत्त जात नाही.
अ) महाराष्ट्र
ब) राजस्थान
क) त्रिपुरा
ड) झारखंड
महाराष्ट्र
प्रश्न ४. खालील पर्वत शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा.
1)कळसूबाई 2)तोरणा 3)तौला 4)साल्हेर
अ) 1, 4, 2, 3
ब) 2, 3, 4, 1
क) 1, 3, 4, 2
ड) 3, 2, 4, 1
3, 2, 4, 1
प्रश्न ५. भाक्रा नानगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
अ) गंगा
ब) ब्रह्मपुत्रा
क) सतलज
ड) झेलम
सतलज
प्रश्न ६. नाशिक जिल्ह्यातून _______ जिल्ह्यात प्रवेश करतांना चंदनपुरी घाट लागतो.
अ) मुंबई
ब) पालघर
क) धुळे
ड) पुणे
पुणे
प्रश्न ७. खालीलपैकी कोणती एक कृष्णाची उपनदी नाही.
अ) पंचगंगा
ब) वेण्णा
क) मांजरा
ड) वारणा
मांजरा
प्रश्न ८. महाराष्ट्रात एकूण किती ______प्रादेशिक विभाग व _____ प्रशासकीय विभाग आहेत?
अ) 6 व 5
ब) 4 व 6
क) 5 व 6
ड) 5 व 5
5 व 6
प्रश्न 9. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात _______ क्रमांक लागतो.
अ) पाचवा
ब) सातवा
क) तिसरा
ड) नववा
सातवा
प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘वर्धा’ नदीचा उगम होतो ?
अ) मध्यप्रदेश
ब) महाराष्ट्र
क) छत्तिसगढ
ड) उत्तरप्रदेश
मध्यप्रदेश
प्रश्न 11. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते ?
अ) गुजरात
ब) हिमाचल प्रदेश
क) दिल्ली
ड) ओडिशा
हिमाचल प्रदेश
प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
अ) भीमा खोरे
ब) कृष्णा खोरे
क) गोदावरी खोरे
ड) तापी-पूर्णा खोरे
गोदावरी खोरे
No comments:
Post a Comment