SET/NET Marathi Paper 30
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
प्रश्न 1. "अनुकरण हे वरवरचे असते. ते बाह्य वाड्मय घटकांपुरतेच सीमित असते." (SET 2020)
अ) वरील विधान संपूर्णतः सत्य आहे
ब) वरील विधानातील पूर्वार्ध सत्य असला तरी उत्तरार्ध सत्य नाही
क) वरील विधानाचा पूर्वार्ध सत्य नाही परंतु उत्तरार्ध मात्र सत्य नाही
ड) वरील विधान पूर्णतः असत्य आहे
प्रश्न 2. 'यमुना पर्यटन' या कादंबरीचा अपवाद वगळता प्रारंभीच्या काळातील मराठी कादंबऱ्या कोणत्या प्रकारच्या होत्या ? (SET 2020)
अ) आत्मनिवेदनात्मक
ब) संवादप्रचुरता
क) सामाजिक विश्लेषण
ड) रंजनवादी
प्रश्न 3. लोकसहित्याभ्यासात वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा वापर करून कोडी, उखाणे यांचा अभ्यास कोणी केला ? (SET 2020)
अ) कार्ल अब्राहीम
ब) ज्युलियस क्रोन
क) रॉल्फ कॉक्स
ड) आर्चर टायलर
प्रश्न 4. जोड्या लावा : (SET 2020)
1. वैजनाथ कळसे 5. दगडफोड्या
2. वसंत मुन 6. ढोर
3. गौतम कावळे 7. वस्ती
4. भगवान इंगळे 8. बावळट
9. आयरनीच्या घना
अ) 1-8, 2-5, 3-7, 4-6
ब) 1-9, 2- 7, 3-5, 4-6
क) 1-9, 2-5, 3-8, 4-7
ड) 1-9, 2-7, 3-8, 4-6
प्रश्न 5. पुढीलपैकी कोणाचे लेखन सर्वप्रथम 'अस्मिता' मधून प्रकाशित झाले ? (SET 2020)
अ) गंगाधर पानतावणे
ब) बाबुराव बागुल
क) प्र. ई. सोनकांबळे
ड) लक्ष्मण गायकवाड
प्रश्न 6. 'अंतःस्थ' हा कविता संग्रह कोणाचा आहे ? (SET 2020)
अ) उषा अंभोरे
ब) हिरा बनसोड
क) प्रज्ञा लोखंडे
ड) ज्योती लांजेवार
प्रश्न 7. 'घुंगरू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत ? (SET 2020)
अ) शंकर खंडू पाटील
ब) उद्धव शेळके
क) ग. ल. ठोकळ
ड) द. मा. मिरासदार
प्रश्न 8. मध्ययुगीन वाड्मयेतिहासाच्या व्यवस्थापनासाठी आधार म्हणून पुढीलपैकी कोणत्या घटकाचा विचार करता येत नाही ? (SET 2020)
अ) लोकसंस्कृतीचे घटक
ब) सांप्रदायिक प्रेरणा
क) राजव्यवहाराशी संबंधित लेखन
ड) आत्मानुभूती
प्रश्न 9. पौराणिक आख्याने, जोहार, भारूड, गौळणी, अर्जदास्त इ. वाड्मयप्रकारांतून पुढीलपैकी कोणत्या संतानी लेखन केले आहे ? (SET 2017)
अ) ज्ञानेश्वर
ब) एकनाथ
क) तुकाराम
ड) रामदास
प्रश्न 10. 'गजेंद्रमोक्ष' हे काव्य रचणारे कवी कोण ? (SET 2017)
अ) नागेश
ब) आनंदतनय
क) रघुनाथ पंडित
ड) विठ्ठल बिडकर
प्रश्न 11. निजामकालीन मराठवाड्यातील सरंजामी व्यवस्थेचे, हिंदू - मुस्लिम संबंधाचे व त्यातून आकाराला आलेल्या सामाजिक जीवनवास्तवाचे चित्रण करणारे लेखक कोण ? (SET 2017)
अ) वि. सी. गुर्जर
ब) दि. बा. मोकाशी
क) बी. रघुनाथ
ड) पु. भा. भावे
प्रश्न 12. खंडयुक्त स्वनिमाच्या उच्चारण प्रक्रियेतच आणखी एखादा औच्चारीक गुणधर्म आरूढ होऊ शकतो, या सहोच्चारी गुणधर्मांना खंडाधिष्ठित स्वनिम म्हणतात. पुढीलपैकी कोणता एक सहोच्चारी गुणधर्म नाही ? (SET 2017)
अ) नासिक्यरंजन
ब) बलाघात
क) घर्षक
ड) सुरवली
प्रश्न 13. वारली बोलीच्या क्षेत्रमर्यादेत पुढील कोणता भौगोलिक परिसर येत नाही ? (SET 2017)
अ) ठाणे
ब) डहाणू
क) छत्तीसगढ
ड) नाशिक
प्रश्न 14. कोणत्याही काव्यशास्त्रज्ञाने काव्यलक्षणात समाविष्ट केलेले नसले तरी महत्वपूर्ण असलेले एक काव्यलक्षण पुढीलपैकी कोणते ? (SET 2017)
अ) औचित्य
ब) चमत्कृती
क) प्रतिभा
ड) अलंकार
प्रश्न 15. 'साहित्य' हा शब्द कोणत्या साहित्यशास्त्रकाराने सांगितलेल्या काव्यलक्षणावरून आलेला आहे ? (SET 2017)
अ) भामह
ब) दंडी
क) वामन
ड) आनंदवर्धन
प्रश्न 16. संगीतातील घराणी या ग्रंथाचे लेखक कोण ? (SET 2020)
अ) गोपालकृष्ण बोभे
ब) बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी
क) नी. म. केळकर
ड) ना. र. मारुलकर
प्रश्न 17. पुढील कथासंग्रह प्रकाशनकालानुसार लिहा : (SET 2020)
अज्ञात झऱ्यावर, पश्चिमकडा, विदेही, जमुनाके तीर
अ) पश्चिमकडा, जमुनाके तीर, विदेही, अज्ञात झऱ्यावर
ब) जमुनाके तीर, विदेही, पश्चिमकडा, अज्ञात झऱ्यावर
क) अज्ञात झऱ्यावर, विदेही, जमुनाके तीर, पश्चिमकडा
ड) विदेही, अज्ञात झऱ्यावर, पश्चिमकडा, जमुनाके तीर
प्रश्न 18. प्रतिभाशक्तीचे कोणते दोन प्रकार अभिनवगुप्ताने मानलेले आहेत ? (SET 2017 P2)
अ) चल प्रतिभा व अचल प्रतिभा
ब) कारयित्री प्रतिभा व भावयित्री प्रतिभा
क) नवनिर्माणक्षमा प्रतिभा व पुनर्निर्मितीक्षमता प्रतिभा
ड) कलाधिष्ठित प्रतिभा व शास्त्राधिष्ठित प्रतिभा
प्रश्न 19. 'अपूर्ववस्तूनिर्माणक्षमा प्रज्ञा प्रतिभा' या वचनातील 'वस्तु' या शब्दाचा अर्थ काय ? (SET 2017 P2)
अ) पदार्थ
ब) नवनिर्मिती
क) व्यक्तिरेखा
ड) काव्याचे आशयसूत्र
प्रश्न 20. श्रीशंकुकाच्या उपपत्तीनुसार रसाभिव्यक्तीचा मुख्य घटक कोणता ? (SET 2017 P2)
अ) अनुकरण
ब) साधारणीकरण
क) स्थायीभाव जागृती
ड) कल्पना
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 9 👉 SET NET History PYQ 11 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment