SET Paper 1 भाग 1
Previous Year Questions............
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये -------------- चा अंतर्भाव होतो. (SET 2021)
(i) स्मरण (ii) अभियोग्यता (iii) मर्मदृष्टी (iv) सर्जनशीलता
अ) (i) आणि (ii)
ब) (ii) आणि (iii)
क) (i) आणि (iii)
ड) (ii) आणि (iv)
प्रश्न 2. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ ............... हा होय. (SET 2021)
अ) बालपण
ब) कुमारावस्था
क) प्रौढावस्था
ड) वृद्धत्व
प्रश्न 3. SWAYAM चा 'ऑनलाईन डिस्कशन फोरम' ................... असतो. (SET 2021)
अ) शंकासमाधान करण्यासाठी
ब) स्वयं - मूल्यांकनासाठी
क) व्हिडीओ लेक्चर्स पाहण्यासाठी
ड) वाचनसाहित्य डाऊनलोड करण्यासाठी
प्रश्न 4. ................... चा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. (SET 2021)
अ) डिजिटल तक्ते
ब) नकाशे
क) दिग्दर्शन पद्धती
ड) भूमिकापालन पद्धती
प्रश्न 5. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे ................. श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. (SET 2021)
अ) अप्रत्यक्ष
ब) प्रत्यक्ष
क) विशेष
ड) प्रमाणित
प्रश्न 6. गुणात्मक संशोधनात 'चिंतनशील टिपा'च्या नोंदी करणे यास ................. असे म्हणतात. (SET 2021)
अ) सांकेतिकीकरण (Coding)
ब) टिपण काढणे (Memoing)
क) नि:सांकेतिकीकरण (Decoding)
ड) सूचना करणे (Instructing)
प्रश्न 7. संशोधन लेख (Research Paper) .................... वर आधारित असतो. (SET 2021)
(i) प्राथमिक माहिती (data) (ii) दुय्यम माहिती (iii) वर्णनात्मक माहिती
अ) केवळ (i)
ब) केवळ (ii)
क) (i) आणि (ii)
ड) (ii) आणि (iii)
प्रश्न 8. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो ? (SET 2021)
अ) माध्यम
ब) संदेश
क) प्रेषक
ड) त्वरीत प्रत्याभरण
प्रश्न 9. विमर्शी अध्यापन म्हणजे .............. होय. (SET 2020)
अ) अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया
ब) अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया
क) अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया
ड) अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया
प्रश्न 10. शिक्षकाने .............. ओळखून अध्यापन केले पाहिजे. (SET 2020)
अ) विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती
ब) विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद
क) पालकांची आर्थिक स्थिती
ड) पालकांमधील व्यक्तिभेद
प्रश्न 11. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये ............... चा समावेश होतो. (SET 2020)
अ) व्हाईट बोर्ड
ब) स्मार्ट बोर्ड
क) डिजिटल बोर्ड
ड) त्रिमितीय प्रतिकृती
प्रश्न 12. शिक्षक विध्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात. याला ........... म्हणतात. (SET 2020)
अ) नोंदवही तपासणी
ब) दैनंदिन शेरे
क) मूल्यमापन
ड) मूल्यांकन
प्रश्न 13. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची ............... पद्धती दिली. (SET 2020)
अ) प्रायोगिक
ब) निरीक्षण
क) चिकित्सा
ड) संवाद
प्रश्न 14. प्रायोगिक संशोधनांचा हेतू ................... हा असतो. (SET 2020)
अ) चलांमधील संबंध प्रस्तापित करणे
ब) चलांचे वर्णन करणे
क) सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे
ड) प्रघात (trend) विश्लेषणाचा अभ्यास करणे
प्रश्न 15. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना ................ असे म्हणतात. (SET 2020)
अ) उद्दिष्टे
ब) परिमर्यादा
क) गृहितके
ड) परिकल्पना
पुढे>>>>>> <<<<<<मागे
No comments:
Post a Comment