SET/NET Marathi Paper 25
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. संधी आणि समास यांचा विचार व्याकरणात वेगवेगळा केला जातो, परंतु वास्तविक दोन्ही एकाच प्रकारचे असतात. (SET 2021)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 2. 'आमच्या वर्गातील मुले गणिते सोडविण्यात अतिशय पटाईत होती.' - या वाक्यातील प्रयोग कोणता ? (SET 2021)
अ) कर्तरी
ब) कर्मणी
क) भावे
ड) संकरप्रयोग
प्रश्न 3. माहिती तंत्रज्ञानामुळे नव्याने आलेले साहित्यप्रसाराचे माध्यम पुढीलपैकी कोणते ? (SET 2021)
अ) ध्वनिफिती
ब) ध्वनिचित्रफिती
क) ई - बुक
ड) माहिती जाल
प्रश्न 4. 'भारूड' या संज्ञेचा संबंध 'भारुंड' या संस्कृत शब्दाशी कोणी जोडला आहे ? (SET 2021)
अ) आचार्य विनोबा भावे
ब) प्रभाकर मांडे
क) रा. चिं. ढेरे
ड) ना. गो. नांदापूरकर
प्रश्न 5. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य - महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालविले जाते ? (SET 2021)
अ) युगवाणी
ब) विशाखा
क) अक्षरपेरणी
ड) मुक्तशब्द
प्रश्न 6. बोहाडा हे नुत्यनाट्य असून ते खानदेश, विदर्भ, मराठवाडा या प्रदेशात सादर होते ? (SET 2021)
अ) संपूर्ण विधान चूक आहे
ब) संपूर्ण विधान बरोबर आहे
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध बरोबर
प्रश्न 7. 'रॉयल एशियाटिक सोसायटी'चे मूळ नाव काय होते ? (SET 2021)
अ) लिटलरी सोसायटी ऑफ बॉम्बे
ब) सोसायटी ऑफ बॉम्बे
क) टाऊन हॉल
ड) रॉयल सोसायटी
प्रश्न 8. सामाजिक दबावामुळे विद्यापीठीय अभ्यासक्रमात कोणती कविता वादविषय ठरली ? (SET 2021)
अ) घोडा
ब) पाणी
क) पृथ्वीचे प्रेमगीत
ड) परी
प्रश्न 9. भाषेच्या लिखित रूपापेक्षा मौखिक भाषा चल, परिवर्तनशील असतात; त्यामुळे मौखिक रूपात दर्जेदार साहित्य निर्माण होऊ शकत नाही. (SET 2020)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 10. एका भाषाकुलामधील भाषांमध्ये कोणत्या प्रकारचे साम्य असते ? (SET 2020)
i) मूलभूत शब्दसंग्रह व रुपव्यवस्था यातील साम्य
ii) देवाणघेवाणीने न आलेले व यादृच्छिक नसलेले साम्य
अ) i व ii
ब) i फक्त
क) ii फक्त
ड) i व ii दोन्हीही नाही
प्रश्न 11. विविध भाषिक पर्यायांचा सामाजिक संदर्भानुसार योग्य वापर करण्याच्या क्षमतेला काय म्हटले जाते ? (SET 2020)
अ) भाषिक क्षमता
ब) व्याकरणिक क्षमता
क) संज्ञापन क्षमता
ड) वक्तृत्व क्षमता
प्रश्न 12. पुढीलपैकी कोणते अविष्कार माध्यम वाचकालाही तात्काळ प्रतिसादाची संधी देणारे आहे? (SET 2020)
अ) मुद्रित ग्रंथ
ब) नियतकालिक
क) ब्लॉग
ड) ई - बुक
प्रश्न 13. वाङमय प्रसाराच्या कार्यात सर्वाधिक वाटा पुढीलपैकी कोणत्या घटकाचा असतो ? (SET 2020)
अ) संपादक
ब) लेखक
क) प्रकाशक
ड) वितरक
प्रश्न 14. "रे. बाबा पदमनजी म्हणजे मराठी ख्रिस्ती सारस्वताचे जनक होत. त्यांच्या हातून बनलेली मराठी पुस्तके वजा केली तर आज मराठी ख्रिस्ती वाङमय असून नसल्यासारखेच होईल" हे उदगार कोणाचे आहेत ? (SET 2020)
अ) भास्कर दामोदर पाळंदे
ब) ना. वा. टिळक
क) फादर फ्रान्सिस दिब्रोटो
ड) विश्वनाथ नारायण मंडलिक
प्रश्न 15. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोण अध्यक्ष असतांना, ते उधळले गेले होते ? (SET 2020)
अ) गंगाधर गाडगीळ
ब) प्रभाकर पाध्ये
क) पु. भा. भावे
ड) व्यंकटेश माडगूळकर
प्रश्न 16. सूर्य पाहिलेला माणूस, सापत्नेकराचे मूल, चारशे कोटी विसरभोळे, ठोंब्या या नाटकांचे लेखक कोण ? (SET 2021)
अ) अतुल पेठे
ब) अभिराम भडकमकर
क) मकरंद साठे
ड) श्याम मनोहर
प्रश्न 17. पुढील ग्रंथ कालानुक्रमे लिहा - (SET 2021)
मानसपूजा, उखाहरण, चांगदेवयासष्टी, गीतार्णव
अ) चांगदेवयासष्टी, उखाहरण, गीतार्णव, मानसपूजा
ब) उखाहरण, गीतार्णव, चांगदेवयासष्टी, मानसपूजा
क) गीतार्णव, चांगदेवयासष्टी, मानसपूजा, उखाहरण
ड) मानसपूजा, चांगदेवयासष्टी, गीतार्णव, उखाहरण
प्रश्न 18. "कृषी संस्कृतीतील समाजजीवनाचे चित्रण ही ग्रामीण साहित्य चळवळीची पूर्वअट असली तरी गावगाड्यातील इतर समाजघटकांचे चित्रण त्यात वर्ज्य नव्हते." (SET 2021)
अ) संपूर्ण विधान चूक
ब) संपूर्ण विधान बरोबर
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 19. 'फुले - आंबेडकरी संशोधनातील प्रदूषणे' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? (SET 2020)
अ) चां. भ. खैरमोडे
ब) शंकरराव खरात
क) राजा ढाले
ड) वसंत मून
प्रश्न 20. दलित समाजाची अवहेलना करणाऱ्या उच्चभ्रू वर्गाची मानसिकता चित्रित करणारी 'जागर' ही कादंबरी कोणी लिहिली आहे ? (SET 2020)
अ) केशव मेश्राम
ब) सुधाकर गायकवाड
क) मुरलीधर जाधव
ड) प्रेमानंद गज्वी
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 SET NET History PYQ 14 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment