SET/NET Marathi Paper 28
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
प्रश्न 1. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' हि रचना पुढीलपैकी कोणत्या वृत्तात आहे ? (SET 2020)
अ) शार्दूलविक्रीडित
ब) भुजंगप्रयात
क) आर्या
ड) अनुष्टुभ
प्रश्न 2. एखादी बोली प्रमाणभाषा म्हणून मान्यता पावण्यास ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती कारणीभूत असते; एरवी भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अन्य बोलींपेक्षा ती वेगळी नसते ? (SET 2020)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 3. जगातल्या महत्वाच्या ग्रंथालयांपैकी एक असणारे आणि मराठी भाषेतील विपुल ग्रंथांनी सजलेले 'सरस्वती महाल' ह्या नावाचे ग्रंथालय कोठे आहे ? (SET 2020)
अ) कलकत्ता
ब) मुंबई
क) तंजावर
ड) नवी दिल्ली
प्रश्न 4. गो. ब. देवल यांच्या 'शारदा' नाटकाच्या शेवटी शंकराचार्याच्या आगमनाचा आणि निवाडा करण्याचा प्रसंग घालण्यातून लेखकाचा कोणता हेतू दिसतो ? (SET 2020)
अ) ती नाटकाची गरज होती
ब) नाट्यसंकेताचा अनुसरणाचा हेतू
क) प्रेक्षकानुन याचा हेतू
ड) तत्कालीन सांस्कृतिक दडपणाचा परिणाम
प्रश्न 5. "सत्यशोधकी जलशांचीच एक विकसित अवस्था आंबेडकरी जलशांच्या रूपाने कार्यान्वित झाली आणि त्यामुळे नवे तरुण आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले." (SET 2020)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
प्रश्न 6. संपूर्ण भारतीय साहित्याच्या इतिहासात प्रथमपुरुषी निवेदनपद्धती पहिल्यांदा मोरोपंतांनी तीन रामायणांमध्ये समर्पक रीतीने वापरली, ती तीन रामायणे कोणती ? (SET 2020)
अ) 'सीता रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'
ब) 'सीता रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'मंत्र रामायण'
क) 'दाम रामायण', 'हनुमंत रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'
ड) 'सीता रामायण', 'निरोष्ठ रामायण' आणि 'सद्गुरु रामायण'
प्रश्न 7. नॅशनल बुक ट्रस्टने भारतीय भाषांमधील साहित्य कृतींची भाषांतरे प्रकाशित करण्याच्या उपक्रमास काय नाव दिले आहे ? (SET 2020)
अ) भाषांतरमाला
ब) आदानप्रदान
क) रुपांतरमाला
ड) आंतरभारती
प्रश्न 8. तौलनिक साहित्य या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक कोणते ? (SET 2020)
अ) वसंत बापट : 'तौलनिक साहित्याभ्यास'
ब) चंद्रशेखर जहागीरदार : 'तौलनिक साहित्याभ्यास तत्वे आणि दिशा'
क) आनंद पाटील : 'मराठी नाटकावरील इंग्रजी प्रभाव'
ड) आनंद पाटील : 'तौलनिक साहित्य : नवे सिद्धांत आणि उपयोजन'
प्रश्न 9. वागींद्रियाद्वारे निर्माण झालेले व भाषेत वापरलेले ध्वनी म्हणजे काय ? (SET 2018)
अ) पद
ब) रुपिका
क) स्वन
ड) रुपिम
प्रश्न 10. भाषिक संज्ञापन प्रक्रियेतील पुढील घटकांचा योग्य क्रम लावा : (SET 2018)
1. संकेतीकरण 2. आशय 3. ध्वनिग्रहण 4. ध्वनिनिर्मिती 5. विसंकेतीकरण
अ) 2, 1, 4, 3, 5
ब) 1, 2, 3, 4, 5
क) 2, 4, 1, 3, 5
ड) 1, 3, 5, 4, 2
प्रश्न 11. पुढीलपैकी कोणती मराठीची बोली नाही ? (SET 2018)
अ) अहिराणी
ब) वऱ्हाडी
क) माळवी
ड) हळबी
प्रश्न 12. 'मानवी वागिंद्रियाद्वारे स्वनांची निर्मिती कशी होते' याचा विचार पुढीलपैकी कोणत्या अभ्यासशाखेत होतो ? (SET 2018)
अ) श्रव्य स्वनविज्ञान
ब) औच्चरिक स्वनविज्ञान
क) व्याकरण
ड) सांचारिक स्वनविज्ञान
प्रश्न 13. 'पोटासाठी जरी करी हरिकथा । जन रंजविता फिरतसे ।। तेणे घात केला एकोत्तरशतकुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ।।'
हि रचना पुढीलपैकी कोणत्या संताची आहे ? (SET 2018)
अ) संत तुकाराम
ब) संत नामदेव
क) संत चोखामेळा
ड) संत कर्ममेळा
प्रश्न 14. 'महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण' हा ग्रंथ कोणी लिहिला ? (SET 2018)
अ) वि. का. राजवाडे
ब) व. दि. कुलकर्णी
क) वि. ल. भावे
ड) श्रीधर व्यंकटेश केतकर
प्रश्न 15. भाऊसाहेब, गोविंदपंत बुंदेले, बळवंतराव मेहंदळे, जनकोजी शिंदे, समशेरबहादूर, इब्राहिमखान, विश्वासराव या सर्वांचा निर्देश असणारा पानपतावरील अतिशय विश्वसनीय पोवाडा कोणत्या शाहिराचा आहे ? (SET 2018)
अ) अनंत फंदी
ब) रामा सटवा
क) प्रभाकर
ड) सगनभाऊ
प्रश्न 16. पुढीलपैकी कोणती नाटके अजित दळवी यांनी लिहिली आहेत ? (SET 2020)
अ) प्रतिबिंब, वासांसि जीर्णानी, क्षितिजापर्यंत समुद्र, आत्मकथा
ब) मामका : पांडवाश्चैव, अंधारयात्रा, विष्णूगुप्त चाणक्य, रस्ते
क) पाहुणा, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, स्थळ : स्नेहमंदिर
ड) मुक्तिधाम, शतखंड, संघर्ष, देहधून
प्रश्न 17. 'सानिया' यांचे खरे नाव कोणते आहे ? (SET 2020)
अ) सुनंदा कुलकर्णी
ब) आशालता कुलकर्णी
क) पूजा कुलकर्णी
ड) स्नेहल कुलकर्णी
प्रश्न 18. साहित्य प्रकाराविषयीची एकसत्ववादी भूमिका पाश्चात्य साहित्य परंपरेतील कोणत्या वैचारिक संकल्पनेत स्पष्टपणे दिसून येते ? (SET 2018 P3)
अ) लेखनातील अस्थिरता व परिवर्तनीयता
ब) लेखनातील विशुद्धता व श्रेणिबद्धता
क) लेखनविषयक क्षमता
ड) लेखनातील अनुभवाची जात
प्रश्न 19. साहित्य प्रकारांविषयीच्या एकसत्ववादी भूमिकेचा एक विशेष म्हणजे : (SET 2018 P3)
अ) साहित्य प्रकारांची तरतमव्यवस्था (श्रेणिव्यवस्था) असते
ब) कलासाहित्याच्या क्षेत्रात वर्गीकरण, प्रकारव्यवस्था संभवत नाही
क) साहित्यकृतीतील निवेदनात जो काळ वापरला जातो, तो त्या त्या प्रकारचे स्वरूप निश्चित करतो
ड) मानवी जीवनचित्रणातील जन्म - तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व व मरण या चार जीवनव्यवस्था अनुक्रमे वसंतकाल, ग्रीष्मकाल, शरद व हिवाळा या चार ऋतूंच्या मिथ्समधून व्यक्त झालेल्या दिसून येतात
प्रश्न 20. ताराबाई शिंदे यांचा 'स्त्रीपुरुष तुलना' हा ग्रंथ कोणत्या समाजस्तरांमधील स्त्रियांच्या दुर्दशेसंबंधी लिहिलेला आहे ? (SET 2018 P3)
अ) सर्व समाजस्तरांमधील
ब) उच्च्वर्णीय
क) दलित
ड) गोरगरीब
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 20 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment