Sunday, March 31, 2024

SET/NET Marathi 29

  

SET/NET Marathi Paper 29

Share करायला विसरू नका.......................

Prvious Year Questions................



प्रश्न 1. भाषिक नियमोल्लंघन हे साहित्याच्या भाषेचे एक वैशिष्ट्य मानले जाते; मात्र त्यामुळे अभिव्यक्तीत अडथळा येण्याऐवजी सूक्ष्मता व वेगळेपणाच येतो. (SET 2019)

अ) संपूर्ण विधान बरोबर

ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 2. ऐतिहासिक भाषाभ्यासपद्धतीचे उद्दिष्ट काय असते (SET 2019)

    अ) भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना

    ब) मानवी भाषेच्या उगमाविषयीचे सिद्धांतन

    क) भाषांच्या इतिहासाच्या आधारे भविष्याबाबतचा अंदाज बांधणे

    ड) भाषेच्या माध्यमातून समाजाचा इतिहास शोधणे

  • अ) भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना






  • प्रश्न 3. विविध प्रादेशिक बोलींमध्ये भौगोलिक अंतरामुळे परस्पर आकलनक्षमता नसली, तरी एक स्थानिक बोली आणि प्रमाणभाषा यांच्यात परस्परांमध्ये आकलनक्षमता असते(SET 2019)

    अ) संपूर्ण विधान बरोबर

    ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    क)पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

    ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • अ) संपूर्ण विधान बरोबर






  • प्रश्न 4. "ज्यात भारलेले गूढ व्यक्त झाले आहे ते भारूड." अशी भारूडाची व्याख्या कोणी केली (SET 2019)

    अ) ल. रा. पांगारकर

    ब) विनोबा भावे

    क) वि. ल. भावे

    ड) ल. रा. नसिराबादकर

  • ब) विनोबा भावे






  • प्रश्न 5. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवले जाते (SET 2019)

    अ) दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका

    ब) मुक्तशब्द

    क) पंचधारा

    ड) अक्षरवाङमय

  • क) पंचधारा




  • प्रश्न 6.  कोणत्या कीर्तन प्रकारांत आख्यान नसते (SET 2019)

    अ) कोणत्याच कीर्तनात आख्यान नसते

    ब) वारकरी कीर्तन

    क) समर्थ कीर्तन

    ड) नारदीय कीर्तन

  • ब) वारकरी कीर्तन






  • प्रश्न 7. "व्हा, व्हा सावध, उठा बंधुनो, सूर्य उदय झाला । सुधारणेची प्रभा फाकली भारत खंडाला ।।"

    - हि रचना कोणाची आहे (SET 2019)

    अ) हरिभाऊ तोरणे

    ब) भीमराव कर्डक

    क) किसन फागूजी बनसोडे

    ड) गणेश आकाजी गवई

  • अ) हरिभाऊ तोरणे





  • प्रश्न 8. "भारतीय साहित्य एकच आहे. परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते" हे कोणाचे वचन आहे (SET 2019)

    अ) बुद्धदेव भट्टाचार्य

    ब) शिशिरकुमार दास

    क) अमिय देव

    ड) डॉ. राधाकृष्णन

  • ड) डॉ. राधाकृष्णन






  • प्रश्न 9. एकोणिसाव्या शतकात 'भारतीय साहित्य' या संकल्पनेची अर्थव्याप्ती किती होती ? (SET 2021) 

    अ) केवळ तत्वचिंतनात्मक व धार्मिक साहित्य

    ब) भारतातील सर्व भाषांमधील सर्व साहित्य

    क) बहुभाषिक भारतीयांचे साहित्य

    ड) संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांतील साहित्य

  • ड) संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांतील साहित्य






  • प्रश्न 10.  उडिया साहित्यावरील मराठीचा प्रभाव हे पुढीलपैकी कोणत्या प्रभावघटकाचे उदाहरण मानता येईल ? (SET 2021) 

    अ) सामाजिक व राजकीय घटिते

    ब) भाषांतर

    क) आदर्श सर्जनशीलता

    ड) नावीन्याचे आकर्षण

  • अ) सामाजिक व राजकीय घटीते






  • प्रश्न 11. वाड्मयीन आदान - प्रदानाचा सर्वात प्रमुख आविष्कार कोणता ? (SET 2021) 

    अ) वाड्मयचौर्य

    ब) वाङमयीन प्रभाव

    क) भाषांतर

    ड) रूपांतर

  • ड) रूपांतर






  • प्रश्न 12. केशवसुतांच्या काव्यावर पुढीलपैकी कशाचा प्रभाव असल्याचे जाणवते ? (SET 2021) 

    अ) शेक्सपिअरची कविता

    ब) 'गोल्डन ट्रेझरी' या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमँटिक कवी

    क) संत नामदेवांचे अभंग

    ड) कोंकणी लोकगीते

  • ब) 'गोल्डन ट्रेझरी' या काव्यसंग्रहातील इंग्लिश रोमँटिक कवी






  • प्रश्न 13.  'ऑथेल्लो' ह्या शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठीमधील रूपांतर कोणते ? (SET 2021) 

    अ) 'ऐन वसंतात अर्ध्या रात्री'

    ब) 'विकारविलसित'

    क) 'झुंझारराव'

    ड) 'राजमुकुट'

  • क) 'झुंझारराव'






  • प्रश्न 14.  'थोर (ग्रेट) सांस्कृतिक परंपरेचे समर्थन मठ मंदिरे यांच्या आश्रयाने होते, तर लहान (लिटल) सांस्कृतिक परंपरेचे भरणपोषण ग्रामीण समुदायात होते' असे कोणी म्हटले आहे ? (SET 2021) 

    अ) सी. जी. युंग

    ब) वॉन फ्रान्स

    क) आर. आर. मेरट 

    ड) रॉबर्ट रेडफिल्ड

  • ड) रॉबर्ट रेडफिल्ड






  • प्रश्न 15. हात नको पायाजवळ 

    खांद्याबरोबर उभी राहा 

    समतेसाठी लढू आपण 

    होऊन गेलो 

    जरी स्वाहा"

    या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ? (SET 2021) 

    अ) शरणकुमार लिंबाळे

    ब) अरुण काळे

    क) भुजंग मेश्राम

    ड) राम  दोतोंडे

  • ड) राम दोतोंडे






  • प्रश्न 16. "दलित आत्मकथने सामाजिक - सांस्कृतिक संघर्षाचे दस्तावेज होत तथापि रूढ मराठी आत्मचरित्राचे आवर्तन भेदण्याचे कार्य दलित आत्मकथनांनी केले आहे." (SET 2019)

    अ) संपूर्ण विधान चूक आहे

    ब) संपूर्ण विधान बरोबर आहे

    क) विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

    ड) विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक

  • ब) संपूर्ण विधान बरोबर आहे






  • प्रश्न 17. "विचारांचं वावडं नसलं तरी माझा पिंड वैचारिक नाही. सृजनशील लेखनाला वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे असं मला कधीच वाटलं नाही" हे विधान कोणाचे ? (SET 2019)

    अ) व्यंकटेश माडगूळकर

    ब) रा. रं. बोराडे

    क) उद्धव शेळके

    ड) प्रतिभा इंगोले

  • ब) रा. रं. बोराडे






  • प्रश्न 18. पुढीलपैकी कोणी 'संतकवी - काव्य - सूची' सिद्ध केली ? (SET 2021)

    अ) ज. र. आजगावकर

    ब) ल. रा. पांगारकर

    क) गो. का. चांदोरकर

    ड) ल. रा. नसिराबादकर

  • क) गो. का. चांदोरकर (गोविंद काशिनाथ चांदोरकर)






  • प्रश्न 19. मराठीतून रशियाची माहिती पुरवणारे 'रशियाचे संक्षिप्त दर्शन' हे पुस्तक कोणी लिहिले ? (SET 2021)

    अ) अनंत काणेकर

    ब) श्री. अ. डांगे

    क) लालजी पेंडसे

    ड) न. र. फाटक

  • ड) न. र. फाटक (नरहर रघुनाथ फाटक)






  • प्रश्न 20. पुढीलपैकी कोणती कादंबरी चिं. त्र्यं. खानोलकर यांची नाही ? (SET 2021)

    अ) स्वगत

    ब) अज्ञात कबुतरे

    क) त्रिशंकू

    ड) भागधेय

  • अ) स्वगत







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे


     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 


    SET/NET मराठी


    ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result |

    No comments:

    Post a Comment