SET/NET Marathi Paper 24
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. वि. का. राजवाडे यांनी 'महाराष्ट्राचे सर टॉमस मोर' हे बिरुद कोणास बहाल केले आहे ? (SET 2023)
अ) रामचंद्रपंत अमात्य
ब) म्हाइंभट
क) कृष्णाजी अनंत सभासद
ड) म. फुले
प्रश्न 2. 'कचाचे मिथक' कोणत्या साहित्यकृतीत योजले आहे ? (SET 2023)
अ) कोण म्हणतंय टक्का दिला
ब) तुही यत्ता कंची
क) भिजकी वही
ड) शोभायात्रा
प्रश्न 3. मानवी मनातील क्रौर्य आणि हिंसा यांचे प्रत्ययकारी दर्शन पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीत आढळते ? (SET 2023)
अ) गिधाडे
ब) वळीव
क) माणूस
ड) बनगरवाडी
प्रश्न 4. 'आयबू' हि व्यक्तिरेखा कोणत्या साहित्यकृतीत आढळते ? (SET 2023)
अ) शोभायात्रा
ब) बनगरवाडी
क) वळीव
ड) हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ
प्रश्न 5. 'मुलगी झाली हो' या पथनाट्याची संहिता कोणी लिहिली आहे ? (SET 2023)
अ) छाया दातार
ब) ज्योती म्हापसेकर
क) मुक्ता मनोहर
ड) समर खडस
प्रश्न 6. 'आस्वादक समीक्षा पद्धती' चे अस्तित्व कोणी नाकारले आहे ? (SET 2023)
अ) गंगाधर गाडगीळ
ब) रा. ग. जाधव
क) रा. भा. पाटणकर
ड) के. रं. शिरवाडकर
प्रश्न 7. 'अनेक आवाजीपणा' हि संकल्पना कोणत्या साहित्यप्रकाराच्या संदर्भात योजलेली आहे ? (SET 2023)
अ) दीर्घकथा
ब) कादंबरी
क) नाटक
ड) दीर्घ कविता
प्रश्न 8. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त सांप्रदायिकांचा वेदग्रंथ मानला जातो. तो पुढील कोणी लिहिला आहे ? (SET 2023)
अ) सरस्वती गंगाधर
ब) नृसिंह सरस्वती
क) निरंजन रघुनाथ
ड) दासोपंत
प्रश्न 9. 'माझ्या गं दारावरनं, कोणा राजाचा हत्ती गेला' या गीतातील लक्ष्यार्थाचे प्रयोजन कोणते ? (SET 2023)
अ) अंगांगीभाव
ब) आधाराधेय
क) अतिनिकटत्व
ड) कार्यकारणभाव
प्रश्न 10. 'लेखनप्रक्रिया बोलण्याच्या प्रक्रियेपेक्षा अर्थाच्या गाभ्याशी संलग्न राहून अधिक सूक्ष्मतर शैलीरूपे प्रकट करीत राहते.' हे मत कुणी मांडले आहे ? (SET 2021)
अ) भालचंद्र नेमाडे
ब) अशोक केळकर
क) रमेश धोंगडे
ड) मिलिंद मालशे
प्रश्न 11. स्वनांची पुढीलपैकी कोणती जोडी घोष - अघोष यातील भेद दर्शवणारी आहे ? (SET 2021)
अ) / प् - फ् /
ब) / ट् - त् /
क) / क् - ग् /
ड) / य् - व् /
प्रश्न 12. अक्षरसंख्या, अक्षरांचा लगक्रम आणि असल्यास यतिस्थान निश्चित असलेला पद्यरचनाप्रकार पुढीलपैकी कोणता ? (SET 2021)
अ) अक्षरगणवृत्त
ब) मात्रावृत्त
क) छंद
ड) जाती
प्रश्न 13. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालविले जाते ? (SET 2021)
अ) युगवाणी
ब) विशाखा
क) अक्षरपेरणी
ड) मुक्तशब्द
प्रश्न 14. पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पूर्वीपासून वाङमयेतिहास लिहिला जात होता ? (SET 2021)
अ) स्त्रीवादी
ब) व्यक्तिकेंद्री
क) मार्क्सवादी
ड) विद्रोही
प्रश्न 15. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन पुढीलपैकी कोणाकडून केले जाते ? (SET 2021)
अ) महाराष्ट्र साहित्य परिषद
ब) महाराष्ट्र शासन
क) साहित्य महामंडळ
ड) स्थानिक आयोजक संस्था
प्रश्न 16. स्त्रीवादी दृष्टीकोनातून वाङ्मयकृतीचे पुनर्वाचन व पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक ठरते, कारण त्यातून उपलब्ध इतिहासातील घटितांचे अर्थ व त्यांची संगती बदलू शकते ? (SET 2021)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 17. साहित्येतिहासाचे समुचित ज्ञान का उपकारक ठरते ? (SET 2021)
अ) साहित्याच्या मूल्यमापनासाठी
ब) साहित्याच्या आकलन - आस्वादनासाठी
क) साहित्याची निर्मिती प्रक्रिया उमजण्यासाठी
ड) साहित्यकार व वाचकवर्ग यांच्यातील परस्पर संबंध जाणण्यासाठी
प्रश्न 18. "महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रांसि राजे । जयाच्या भये व्यापिले देव लाजे" असे महाराष्ट्र विषयीच्या अभिमानाचे उदगार कोणी काढले आहेत ? (SET 2021)
अ) रामदास
ब) वामन पंडीत
क) रघुनाथ पंडित
ड) मुक्तेश्वर
प्रश्न 19. नागदेवाचार्यांच्या संमतीने व मार्गदर्शनाने 'लीलाचरित्रा'तील चक्रधरांची वचने निवडून केशिराजांनी सिद्ध केलेला ग्रंथ कोणता ? (SET 2021)
अ) दृष्टांतपाठ
ब) सूत्रपाठ
क) मूर्तिप्रकाश
ड) पंचवार्षिक
प्रश्न 20. आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । ।
सेविती साधुसंत । मनू वेधला माझा । ।
हि आरती कोणी लिहिली ? (SET 2021)
अ) नामदेव
ब) रामा जनार्दन
क) विठा रेणुकानंदन
ड) जनी जनार्दन
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 8 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 16 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 9
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment