Monday, March 04, 2024

set/net paper 1 भाग 2

SET Paper 1 भाग 2

Previous Year Questions............

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. शिक्षक, ................. स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या - निराकरण पद्धती वापरतात. (SET 2023)

अ) स्मरण

ब) आकलन

क) विमर्शी 

ड) मूलभूत

  • क) विमर्शी 






  • प्रश्न 2. .................. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण, शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते. (SET 2023)

    अ) विद्यार्थी आणि ग्रंथपाल

    ब) शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल

    क) विद्यार्थी आणि पालक

    ड) विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी

  • क) विद्यार्थी आणि पालक






  • प्रश्न 3. SWAYAM म्हणजे .................. . (SET 2023)

    अ) स्कुल वेब्ज ऑफ अॅक्शन - लर्नींग फॉर युथ अस्पायरिंग मॅप्स 

    ब) स्टडी वेबसाईट्स ऑफ अॅक्शन - लर्नींग फॉर यंग अस्पायरिंग माईंड्स

    क) स्कुल वेबसाईट्स ऑफ अॅक्टीव्ह - लर्नींग फॉर युथ अस्पायरिंग मॅप्स 

    ड) स्टडी वेब्ज ऑफ अॅक्टीव्ह - लर्नींग फॉर यंग अस्पायरिंग माईंड्स

  • ड) स्टडी वेब्ज ऑफ अॅक्टीव्ह - लर्नींग फॉर यंग अस्पायरिंग माईंड्स






  • प्रश्न 4. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ................... हि जास्त योग्य पद्धती आहे. (SET 2023)

    अ) भूमिकापालन पद्धती 

    ब) दिग्दर्शन पद्धती

    क) प्रायोगिक पद्धती

    ड) अवगामी पद्धती

  • अ) भूमिकापालन पद्धती





  • प्रश्न 5. अध्यापन प्रक्रियेचे नियमन .................... मूल्यमापनाद्वारे केले जाते. (SET 2023)

    अ) नैदानिक

    ब) स्थाननिश्चिती

    क) आकारिक

    ड) साकारिक

  • क) आकारिक





  • प्रश्न 6. संशोधकाच्या ठायी ................. असलीच/असलेच पाहिजे. (SET 2023)

    अ) संशोधन अभिवृत्ती

    ब) संशोधन अभियोग्यता

    क) संशोधनाबाबतची माहिती

    ड) स्वत:च्या विषायावरील प्रभुत्व

  • ब) संशोधन अभियोग्यता






  • प्रश्न 7. गुणात्मक संशोधनातील ................... च्या नोंदी करणे यास टिपण काढणे (memoing ) असे म्हणतात.  (SET 2023)

    अ) चिंतनशील टिपा

    ब) स्मरण टिपा

    क) आकलन टिपा

    ड) संशोधन टिपा

  • अ) चिंतनशील टिपा





  • प्रश्न 8. अध्ययन - अध्यापनप्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन ................. हे असेल. (SET 2023)

    अ) संपादन कसोटी

    ब) नैदानिक कसोटी

    क) प्रमाणित कसोटी

    ड) उत्तर - कसोटी (Post - test)

  • ब) नैदानिक कसोटी






  • प्रश्न 9. प्रौढ अध्ययनार्थीं .................. .       (SET 2019)

    अ) सहाध्यायी - प्रेरित असतो

    ब) स्वयंप्रेरित असतो

    क) कुटुंब - प्रेरित असतो

    ड) समाजप्रेरित असतो

  • ब) स्वयंप्रेरित असतो






  • प्रश्न 10. अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ................ चा समावेश होतो. (SET 2019)

    अ) स्मार्ट बोर्ड्स

    ब) ग्रीन बोर्ड्स

    क) तक्ते

    ड) नकाशे

  • अ) स्मार्ट बोर्ड्स






  • प्रश्न 11. अंतर्गत मूल्यमापनाला, खालीलपैकी काय लागू पडत नाही ? (SET 2019)

    अ) अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण

    ब) कौशल्ये आणि क्षमता यांची तपासणी

    क) समयकालिक (periodic) आणि निरंतर (continuous)

    ड) केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग

  • ड) केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग






  • प्रश्न 12. सत्यशोधनासाठीची संवादपद्धती ................. यांनी दिली. (SET 2019)

    अ) प्लेटो

    ब) सॉक्रेटिस

    क) फ्रोबेल

    ड) हरबार्ट

  • ब) सॉक्रेटिस






  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे (hypothesis) वैशिष्ट्य नाही. (SET 2019)

    अ) तपासणी क्षमता

    ब) वस्तुनिष्ठता

    क) गुंतागुंत

    ड) संबोधस्पष्टता

  • क) गुंतागुंत






  • प्रश्न 14. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे, यास .................. म्हणतात. (SET 2019)

    अ) कॉपीराईट

    ब) वाङमयचौर्य

    क) प्रकाशन

    ड) स्वामित्व हक्क

  • ब) वाङमयचौर्य






  • प्रश्न 15. डॉ. देवल यांच्या मते, संप्रेषण म्हणजे :      (SET 2019)

    अ) कल्पनांचे सामायिकीकरण

    ब) अनुभवांचे सामायिकीकरण

    क) अवबोधन

    ड) भावनांचे सामायिकीकरण

  • क) अवबोधन







  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे





    No comments:

    Post a Comment