Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष, लिंग, वचन याबाबतीतील अन्वय किंवा अनन्वय म्हणजे काय ? (SET 2021)
अ) विभक्ती
ब) प्रयोग
क) अव्यय
ड) प्रत्यय
प्रश्न 2. तौलनिक भाषाभ्यासपद्धती हि ऐतिहासिक भाषाभ्यासपद्धतीच्या बरोबरच विकसित झाली आणि ती एकाच भाषेच्या चौकटीत अभ्यास करण्यास उपयुक्त आहे ? (SET 2021)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 3. बोली या प्रमाणभाषेपेक्षा शब्दसंग्रहाच्या स्तरावर वेगळ्या असतात, व्याकरणिक स्तरावर त्यांच्यात भेद दिसत नाही. (SET 2021)
अ) संपूर्ण विधान बरोबर
ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
क) पूर्वार्ध चूकिचा, उत्तरार्ध बरोबर
ड) संपूर्ण विधान चुकीचे
प्रश्न 4. "जागा मराठा आम जमाना बदलेगा ।। उठा है तुफ़ान, आखिर बम्बई लेकर दम लेगा ।।" हि रचना कोणाची आहे ? (SET 2021)
अ) शाहीर आणाभाऊ साठे
ब) शाहीर अमर शेख
क) शाहीर आत्माराम पाटील
ड) शाहीर द. ना. गव्हाणकर
प्रश्न 5. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? (SET 2021)
अ) दुर्गा भागवत
ब) विजया राजाध्यक्ष
क) कुसुमावती देशपांडे
ड) शांता शेळके
प्रश्न 6. केवळ लिखित/मुद्रित संहितेपेक्षा प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये कोणत्या घटकामुळे अर्थामध्ये वेगळेपणा येतो ? (SET 2019)
अ) वाचिक अभिनय
ब) शब्दयोजना
क) वाक्यरचना
ड) लक्षणेचा वापर
प्रश्न 7. पुढीलपैकी कोणता प्रकार सर्वनामाचा नाही ? (SET 2019)
अ) पुरुषवाचक
ब) दर्शक
क) समुदायवाचक
ड) संबंधी
प्रश्न 8. पुढीलपैकी कोणता शब्दालंकार नाही ? (SET 2019)
अ) यमक
ब) अनुप्रास
क) अतिशयोक्ती
ड) चित्र
प्रश्न 9. भाषाकुलाची संकल्पना पुढे येण्यास कोणत्या अधिवेशनातील निबंधवाचन कारणीभूत झाले ? (SET 2019)
अ) इ. स. १९०० चे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडियाचे अधिवेशन
ब) इ. स. १८७६ चे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे अधिवेशन
क) इ. स. १७८६ चे एशियाटिक सोसायटीचे अधिवेशन
ड) इ. स. १७८६ चे लिंग्विस्टिक सोसायटीचे अधिवेशन
प्रश्न 10. 'आईने दिवाळीसाठी करंज्या केल्या.'
- या वाक्यात किती पदिम आले आहेत ? (SET 2019)
अ) चार
ब) पाच
क) सहा
ड) नऊ
प्रश्न 11. बाईदेवबासांनी 'ग्रंथुनिका जाला असे : परी निवृत्ताजोगा नव्हेची' हे उद्गार कोणत्या ग्रंथासंदर्भात काढले आहेत ? (SET 2018)
अ) ऋद्धिपुरवर्णन
ब) शिशुपालवध
क) वछाहरण
ड) ज्ञानप्रबोध
प्रश्न 12. "सकाळी उठोनि ऐकतो कीर्तन । तेणे समाधान मज होय" हे उदगार कोणाचे ? (SET 2018)
अ) तुकाराम
ब) नामदेव
क) रामदास
ड) सावता माळी
प्रश्न 13. टळटळीत दुपारी जन्मला रामराणा,
म्हणूनि सकळगाती ठाउके हे पुराणा ।
दशरथगृहमायां सूर्य आला अहो तो
कुलतिलक पहाया तोंचि माध्यान्ह होतो ।।
किर्तनप्रसंगी हटकून वापरला जाणारा उपरोक्त श्लोक कोणत्या पंडित कवीचा आहे ? (SET 2018)
अ) नरेंद्र
ब) जयरामस्वामी वडगावकर
क) वरद नागेश
ड) वामन पंडित
प्रश्न 14. काळाच्या ओघात संस्कृतपेक्षा मराठीत बदल झाले व नव्या भाषिक रचना निर्माण झाल्या. पुढीलपैकी एक घटक मात्र मराठीचे वैशिष्ट्य नव्हे ? (SET 2018)
अ) भूतकाळवाचक धातुसाधिते
ब) नामांची प्रत्ययपूर्व सामान्यरूपे
क) अंत:श्वसित स्वन
ड) प्रत्ययी विभक्तीरूपे
प्रश्न 15. पुढीलपैकी कोणता स्वन कंठद्वारीय आहे ? (SET 2018)
अ) ख
ब) ह
क) य
ड) ढ
प्रश्न 16. कोणत्या कादंबरीला गांधीहत्येची पार्श्वभूमी आहे ? (SET 2019)
अ) धग
ब) वावटळ
क) टारफुला
ड) बनगरवाडी
प्रश्न 17. पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पूर्वीपासून वाड्मयेतिहास लिहिला जात होता ? (SET 2019)
अ) स्त्रीवादी
ब) व्यक्तिकेंद्री
क) मार्क्सवादी
ड) विद्रोही
प्रश्न 18. मुसलमानी राजवटीच्या काळात ब्राह्मण - क्षत्रियांना स्वधर्माची महती पटवून देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना झाली असावी ? (SET 2017 P3)
अ) विवेकसिंधू
ब) भैरवीटीका
क) गुरुचरित्र
ड) तत्वचार
प्रश्न 19. राजा राम मोहन रॉय यांनी 'ब्राह्मोसमाजा'ची स्थापना केली, पण त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रुढींविरोधात कोणतेही कार्य केले नाही ? (SET 2017 P3)
अ) उत्तरार्ध चूक पूर्वार्ध बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) संपूर्ण विधान बरोबर
ड) उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक
प्रश्न 20. "मनुष्य व्यक्तिशः व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवनसाफल्याचे स्वतःवर व बाह्यविश्वावर संस्कार करून अविष्कार करतो, ती पद्धती वा तो आविष्कार म्हणजे संस्कृती."
हि संस्कृतीची व्याख्या कोणाची आहे ? (SET 2017 P3)
अ) प्रा. द. के. केळकर
ब) लक्ष्मणशास्त्री जोशी
क) इरावती कर्वे
ड) दुर्गा भागवत
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 1 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 SET NET History PYQ 13 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 1
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment