SET/NET Marathi Paper 27
Share करायला विसरू नका.......................
Prvious Year Questions................
प्रश्न 1. ज्या समासातील कोणतेही पद प्रधान नसून तो समास भिन्न अशा नामाचे विशेषण असतो, त्यास पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे ? (SET 2023)
अ) मध्यमपदलोपी
ब) बहुब्रीही
क) द्वंद्व
ड) तत्पुरुष
प्रश्न 2. पुढीलपैकी कोणता अलंकार उपमा अलंकारातून रचनाभेदाने उत्पन्न झालेला नाही ? (SET 2023)
अ) उत्प्रेक्षा
ब) रूपक
क) भ्रांतीमान
ड) श्लेष
प्रश्न 3. भाषाविज्ञानाच्या वर्णनात्मक अभ्यासाच्या पद्धतीमध्ये कशाचे वर्णन अपेक्षित असते ? (SET 2023)
अ) भाषेतील ध्वनी व शब्दांचे
ब) विविध स्तरांवरील भाषिक संरचनेचे
क) भाषेतील शब्दसंग्रहाचे
ड) भाषिक वर्तनाचे
प्रश्न 4. 'भवाडा' हा बोहाडा या शब्दाचा अपभ्रंश असून, तो जव्हार वाडा, मोखाडा या आदिवासी बहुल भागात सादर होतो. (SET 2023)
अ) संपुर्ण विधान बरोबर
ब) संपूर्ण विधान चूक
क) पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक
ड) उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक
प्रश्न 5. धार्मिक वाङमयाकडे लोकांचा ओढा वाढला आहे, कारण : ? (SET 2023)
अ) सुलभ व अद्ययावत मुद्रणव्यवस्थेमुळे
ब) अर्थव्यवहार सुलभ झाल्यामुळे
क) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे
ड) शिक्षणसंस्थांच्या वाढत्या प्रसारामुळे
प्रश्न 6. कोणतीही चळवळ दीर्घकाळ टिकून राहायची असेल तर आवश्यक असणारा महत्वाचा घटक कोणता ? (SET 2023)
अ) आर्थिक स्थैर्य
ब) वैचारिक भूमिका मांडणारे मुखपत्र
क) जनतेचा पाठिंबा
ड) संस्थेचे कार्यालय
प्रश्न 7. 'टोवर्डस ए लिटररी हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण ? (SET 2023)
अ) नगेंद्र
ब) शिशिरकुमार दास
क) सुजित मुखर्जी
ड) निरंजन रे
प्रश्न 8. "वाङमय प्रकाराभ्यास हा तौलनिक साहित्याचाच विषय आहे. त्याला सर्वसाधारण साहित्याच्या प्रमेयात समाविष्ट करणे म्हणजे शास्त्रच नाकारणे होय." असे मत कोणी मांडले ? (SET 2023)
अ) शिशिरकुमार दास
ब) स्वपन मजुमदार
क) अमिय देव
ड) नगेंद्र
प्रश्न 9. ग्रिअर्सनच्या भारतीय भाषांच्या सर्वेक्षणाच्या कोणत्या खंडात मराठीच्या बोलींसंबंधी माहिती ग्रथित केली आहे ? (SET 2017)
अ) तिसऱ्या
ब) पाचव्या
क) सहाव्या
ड) सातव्या
प्रश्न 10. संयुक्त क्रियापदे अपभ्रंशात नाहीत, मराठीने ती स्वतंत्रपणे बनवलेली आहेत. (SET 2017)
अ) हे विधान बरोबर आहे
ब) हे विधान चूक आहे
क) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ड) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
प्रश्न 11. 'संस्कृत, ग्रीक व लॅटीन या भाषांमध्ये खोलवर रुजलेले व घनिष्ठ साम्य आहे' असे म्हणून त्याचा खुलासा सर विल्यम जोन्स यांनी कोणत्या वर्षी केला ? (SET 2017)
अ) 1786
ब) 1876
क) 1768
ड) 1678
प्रश्न 12. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द लेखननियमांनुसार अचूक आहे. (SET 2017)
अ) नि:सर्गतच
ब) निसर्गताच
क) निसर्गतःच
ड) निर्सगत:च
प्रश्न 13. 'पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी' हि रचना कोणत्या संताची आहे ? (SET 2017)
अ) संत नामदेव
ब) संत एकनाथ
क) संत जनाबाई
ड) संत तुकाराम
प्रश्न 14. 'बदलत्या काळाप्रमाणे शास्त्रालाही चालत राहिले पाहिजे' हे मत कोणी मांडले ? (SET 2017)
अ) लोकहितवादी
ब) विष्णुशास्त्री पंडित
क) गोपाळ गणेश आगरकर
ड) न्यायमूर्ती रानडे
प्रश्न 15. ह. ना. आपटे यांच्या कोणत्या कादंबरीत इंग्रजी चालीरीतींचे मध्यमवर्गीयांवर झालेल्या परिणामांचे चित्रण झालेले आहे ? (SET 2017)
अ) ' मी '
ब) ' मधली स्थिती '
क) ' सूर्योदय '
ड) ' पण लक्षात कोण घेतो ? '
प्रश्न 16. पुढील ग्रंथ कालानुक्रमे लिहा : (SET 2023)
परमामृत, श्रीसमर्थप्रताप, नित्यानंदैक्यदीपिका, भावार्थरामायन
अ) श्रीसमर्थप्रताप, परमामृत, नित्यानंदैक्यदीपिका, भावार्थरामायन
ब) भावार्थरामायन, परमामृत, नित्यानंदैक्यदीपिका, श्रीसमर्थप्रताप
क) परमामृत, भावार्थरामायन, नित्यानंदैक्यदीपिका, श्रीसमर्थप्रताप
ड) नित्यानंदैक्यदीपिका, परमामृत, श्रीसमर्थप्रताप, भावार्थरामायन,
प्रश्न 17. नसता कवीचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार ।
म्हणोनि कवी हे आधार । सकल सृष्टीसी ।।
हा कविगौरव कोणी केला ? (SET 2023)
अ) ज्ञानेश्वर
ब) नामदेव
क) तुकाराम
ड) रामदास
प्रश्न 18. मिलिंद मालशे यांनी पुढीलपैकी कोणते मत मांडले ? (SET 2017 P3)
अ) प्रत्येक साहित्यिकाचे एक सत्व असून ते सार्वत्रिक व अपरिवर्तनीय स्वरूपाचे असते
ब) एक साहित्यिक करार दुसऱ्या साहित्यिक करारापेक्षा श्रेष्ठ असतो असे मानता येत नाही
क) निर्मितीप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया यांमध्ये साहित्यप्रकार नसतात
ड) प्रत्येक संस्कृतीचे उणे - अधिक स्वरूपातील वेगळे साहित्यप्रकार असतात
प्रश्न 19. आधुनिक काळात पुढीलपैकी कोणते साहित्यप्रकार मराठीत नव्याने निर्माण झाले आहेत ? (SET 2017 P3)
अ) विषण्ण सुखात्मिका (black comedy) आणि निरर्थवादी नाट्य (absured play)
ब) रोमँटिक शोकांतिका आणि कादंबरी
क) सुनित आणि विलापिका
ड) चरित्र आणि आत्मचरित्र
प्रश्न 20. पाटउं साउला नसली असे : पाटाउं चोळी : कांकणें : कळाविया : सोनयांची तानवडें : भवंरिया भांगु : टीळ : नाकी मोती : जी : जी : ऐसी देखिली : जी :
हे लीळेतील वर्णन कोणाचे आहे ? (SET 2017 P3)
अ) रुक्मिणी
ब) म्हाळसा
क) साधे
ड) बाईइसा
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 SET NET History PYQ 12 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment