Thursday, April 04, 2024

SET/NET Marathi 32

  

SET/NET Marathi Paper 32

Share करायला विसरू नका.......................

Prvious Year Questions................



प्रश्न 1. "महाराष्ट्रातील केवळ सगुणप्रेमी 'भक्त' नामदेव उत्तर हिंदुस्थानात जाऊन आपल्या आध्यात्मिक साधनेत आणखी विकसित झाले आणि 'संत' नामदेव बनून निर्गुणाची अनुभूती घेऊ लागले." (SET 2021)

अ) वरील विधान पूर्णतः बरोबर आहे

ब) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे; परंतु उत्तरार्ध चूक आहे.

क) वरील विधानातील पूर्वार्ध चुकीचा असला तरी उत्तरार्ध बरोबर आहे.

ड) वरील विधान पूर्णतः चुकीचे आहे

  • अ) वरील विधान पूर्णतः बरोबर आहे






  • प्रश्न 2. 'रूप पाहता लोचनी', 'सुंदर ते ध्यान' हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे ? (SET 2021)

    अ) राष्ट्रीय कीर्तन

    ब) नारदीय कीर्तन

    क) वारकरी कीर्तन

    ड) रामदासी कीर्तन

  • क) वारकरी कीर्तन






  • प्रश्न 3. 'महासंगर' या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत ? (SET 2021)

    अ) योगीराज वाघमारे

    ब) अर्जुन डांगळे

    क) अविनाश डोळस

    ड) योगेंद्र मेश्राम

  • क) अविनाश डोळस






  • प्रश्न 4. "दलित आत्मकथन म्हणजे दलित आत्म्याचे कथन नव्हे, ती स्वतः च्या जीवनाची कहाणी होय म्हणूनच आत्मकथनात आत्मा आहे अशी मांडणी करणे संभ्रमाचेच ठरेल." (SET 2021)

    अ) संपूर्ण विधान चूक आहे

    ब) संपूर्ण विधान बरोबर आहे

    क) विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक आहे

    ड) विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक आहे

  • ब) संपूर्ण विधान बरोबर आहे.







  • प्रश्न 5. "ग्रामीण कथेचा सगळा जिवंतपणा तिच्या बोलीशी निगडित असतो" हे विधान कोणाचे आहे ? (SET 2021)

    अ) नरहर कुरुंदकर

    ब) वा. ल. कुलकर्णी

    क) रा. रं. बोराडे

    ड) ग. ल. ठोकळ

  • अ) नरहर कुरुंदकर






  • प्रश्न 6. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर 'साहेबराव पाटील' हि कविता कोणत्या कवीने लिहिली आहे ? (SET 2021)

    अ) इंद्रजित भालेराव

    ब) विठ्ठ्ल वाघ

    क) प्रकाश होळकर

    ड) उत्तम कोळगावकर








    प्रश्न 7. साहित्याचा इतिहास म्हणजे सौंदर्यनिर्मिती, सौंदर्यग्रहण व अर्थग्रहण यांची एक प्रवाही प्रक्रिया असते, हा विचार कोणी मांडला ? (SET 2021)

    अ) गो. म. कुलकर्णी

    ब) अशोक केळकर

    क) गंगाधर पाटील

    ड) दि. के. बेडेकर

  • क) गंगाधर पाटील






  • प्रश्न 8. "वाराणसी भागीरथी । पांडुरंगीं भीमरथी" या काव्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरीक्षेत्र या अर्थाने कोणी वापरला आहे ? (SET 2021)

    अ) निळोबा

    ब) सावता माळी

    क) तुकाराम

    ड) नामदेव

  • ड) नामदेव







  • प्रश्न 9. 'वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान पुरस्कार दिला.' 

    - या वाक्यातील अधोरेखित काय आहे ? (SET 2019)

    अ) कर्ता

    ब) प्रत्यक्ष कर्म

    क) अप्रत्यक्ष कर्म

    ड) विशेषण

  • क) अप्रत्यक्ष कर्म







  • प्रश्न 10. "भोळ्या भाबड्या, श्रद्धाळू, गतानुगतिक व अज्ञ सामान्य जनांना ज्ञानाचा नवा प्रकाश देण्याऐवजी त्यांची पारंपरिक श्रध्दास्थानेच बळकट करण्याचा प्रयत्न श्रीधर कवीने केला." हे मत कोणाचे आहे ? (SET 2019)

    अ) यु. म. पठाण

    ब) गं. बा. सरदार

    क) भगवंतराव देशमुख

    ड) श्री. ना. बनहट्टी

  • क) भगवंतराव देशमुख






  • प्रश्न 11. भक्तिप्रधान साहित्याची लोकप्रियता का वाढते आहे ? (SET 2019)

    अ) शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे

    ब) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे

    क) तंत्रज्ञानाचे लोकमानसावर झालेले आक्रमण

    ड) सुलभ व जलद मुद्रणव्यवस्थेमुळे

  • ब) लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे







  • प्रश्न 12. "एस. एम. जोशींसारखा साऱ्या देशावर प्रेम करणारा, लोकशाहीवर शंभर टक्के विश्वास असणारा, अहिंसा आणि सत्याग्रह ह्याविषयी आग्रही असणारा नेता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला मिळाला, हे मराठी व भारतीय लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे." 

    - हे विधान कोणाचे आहे ? (SET 2019)


    अ) शाहीर लीलाधर हेगडे

    ब) शाहीर इमाम शेख

    क) शाहीर कृष्णकांत जाधव

    ड) शाहीर किसनराव हिंगे

  • अ) शाहीर लीलाधर हेगडे






  • प्रश्न 13. 'यमुनापर्यटन' या पहिल्या भारतीय कादंबरीचा गौरव करतांना भालचंद्र नेमाडे यांनी तिच्या कोणत्या गुणवैशिष्ट्यावर भर दिला आहे ? (SET 2019)

    अ) समकालीन समाजचित्रण

    ब) नायिकेची कृतिशीलता

    क) संवादांतील भाषा

    ड) चित्रमय वर्णन

  • ब) नायिकेची कृतिशीलता







  • प्रश्न 14. भाषांतर करतांना प्रादेशिक संदर्भ कसे अडचणीचे ठरतात याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते ? (SET 2019)

    अ) केशवसुतांची 'नैॠत्येकडील वारा' हि कविता

    ब) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक 'किचकवध'

    क) हरी नारायण आपटे यांची कथा 'काळ तर मोठा कठीण आला'

    ड) बाबा पदमनजी यांची कादंबरी 'यमुना पर्यटन'

  • अ) केशवसुतांची 'नैॠत्येकडील वारा' हि कविता 






  • प्रश्न 15. कार्ल मार्क्स यांची तत्त्वप्रणाली हि पुढीलपैकी कोणत्या साहित्याचे प्रेरणास्थान नाही ? (SET 2019)

    अ) ग्रेसची कविता

    ब) विंदा करंदीकर यांची कविता

    क) डोटोव्हस्कीच्या कादंबऱ्या

    ड) अरुंधती रॉय यांची कादंबरी 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज'

  • अ) ग्रेसची कविता






  • प्रश्न 16. पुढीलपैकी कोणती रचना मोरोपंतांची नाही ? (SET 2021)

    अ) सुभद्राचंपू

    ब) सावित्रीगीत

    क) सीतागीत

    ड) रुक्मिणीगीत

  • अ) सुभद्राचंपू






  • प्रश्न 17. 'कुंजकूजन' या कवितासंग्रहाचे कवी कोण ? (SET 2021)

    अ) कुंजबिहारी

    ब) काव्यबिहारी

    क) दत्त

    ड) चंद्रशेखर

  • ड) चंद्रशेखर






  • प्रश्न 18. ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा : (SET 2019)

    सूची I 

    i) लोकसाहित्य कि भूमिका
    ii) लोकसाहित्य का अध्ययन
    iii) लोकसाहित्य
    iv) लोकसाहित्यविज्ञान

    सूची II

    1) विद्या चव्हाण
    2) सत्येंद्र
    3) कृष्णदेव उपाध्याय
    4) त्रिलोचन पांडे
    5) तोरू दत्त

    अ) (i) - (4), (ii) - (2), (iii) - (5), (iv) - (5)

    ब) (i) - (5), (ii) - (1), (iii) - (2), (iv) - (3)

    क) (i) - (3), (ii) - (4), (iii) - (1), (iv) - (2)

    ड) (i) - (5), (ii) - (3), (iii) - (2), (iv) - (1)

  • क) (i) - (3), (ii) - (4), (iii) - (1), (iv) - (2)






  • प्रश्न 19. 'Mythology is the disease of language' असा लोकसाहित्याच्या अभ्यासातील विचार कोणी मांडला ? (SET 2019)

    अ) जेकब ग्रिम

    ब) विल्हेम ग्रिम

    क) फ्रिडरिक मॅक्सम्यूलर

    ड) रॉबर्ट ब्राऊन

  • क) फ्रिडरिक मॅक्सम्यूलर






  • प्रश्न 20. "चातुर्वण्याचे स्वागत असो

    धर्मांधतेचे स्वागत असो

    विषमतेचे स्वागत असो

    पण हे पशूपक्ष्यांनो

    तुमचे मात्र स्वागत करता येत नाही

    कारण तुमचा पाणवठा अलग अलग नाही."

    - या ओळी कोणत्या कवीच्या आहेत ? (SET 2019)

    अ) प्रल्हाद चेंदवणकर

    ब) लोकनाथ यशवंत

    क) त्र्यंबक सपकाळे

    ड) अरुण काळे

  • क) त्र्यंबक सपकाळे









  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे


     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

    1 comment: