SET/NET History 9
Share करायला विसरू नका.......................
प्रश्न 1. नालंदा विद्यापीठाची स्थापना ________ ने केली, असे मानले जाते. (SET 2017 P2)
अ) दुसऱ्या चंद्रगुप्त
ब) कुमारगुप्त पहिला
क) समुद्रगुप्त
ड) अशोक
प्रश्न 2. बौद्धधर्म ग्रंथांनुसार मौर्य राजा अशोकाला बौद्ध धर्मात दिक्षित करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ? (SET 2017 P2)
अ) उपगुप्त
ब) कुमारगुप्त
क) भद्रबाहू
ड) पतंजली
प्रश्न 3. यादी I व यादी II यांच्या जोड्या लावा आणि खाली दिलेल्या सांकेतांकामधून योग्य पर्यायाची निवड करा : (SET 2017 P2)
(राजवंश) (संस्थापक)
(i) सातवाहन (a) वसुदेव
(ii) काण्व (b) पुष्यमित्र
(iii) शुंग (c) कुजल कडफायसीस
(iv) कुषाण (c) सिमुक
अ) (i) - (d), (ii) - (a), (iii) - (b), (iv) - (c)
ब) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (c)
क) (i) - (c), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (d)
ड) (i) - (a), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (d)
प्रश्न 4. वासिष्ठीपुत्र पुलुमावी याच्या नाशिक शिलालेखानुसार, पश्चिमी क्षत्रपांच्या क्षहारात शाखेचे _______ ने पूर्णपणे निर्मूलन केले. (SET 2017 P2)
अ) यज्ञश्री सातकर्णी
ब) गौतमीपुत्र सातकर्णी
क) वासिष्ठीपुत्र पुलुमावी
ड) कुंभ सातकर्णी
प्रश्न 5. खालीलपैकी कोणती संज्ञा गुप्त काळात महसूल व्यवस्थेमध्ये वापरली जात नव्हती ? (SET 2017 P2)
अ) आर्ष
ब) उद्रंग
क) भाग
ड) उपरीकर
प्रश्न 6. महाबलीपूरम येथील एकाश्म मंदिरे _______ या पल्लव राजाच्या कारकिर्दीत कोरण्यात आली. (SET 2017 P2)
अ) सिंहविष्णू
ब) विष्णूगोप
क) अपराजितवर्मन
ड) नरसिंहवर्मन पहिला
प्रश्न 7. सती प्रथेचा प्राचीनतम अभिलेखीय पुरावा _________ कालखंडात आढळून येतो. (SET 2017 P2)
अ) सातवाहन
ब) शुंग
क) गुप्त
ड) राष्ट्रकूट
प्रश्न 8. खालील प्रश्नांच्या उत्तरामध्ये एक जोडीची चुकीची आहे. ती निवडणे : (SET 2017 P2)
अ) गुलाम वंश - इ. स. 1206 - 1290
ब) खिलजी घराणे - इ. स. 1290 - 1320
क) तुघलक घराणे - इ. स. 1320 - 1398
ड) विजयनगर साम्राज्य - इ. स. 1346 - 1518
प्रश्न 9. बहामनी राज्याच्या दरबारातील प्रसिद्ध संत गेसू दारज हे सुफी संप्रदायाच्या कोणत्या सिलसिंल्याशी संबंधित होते ? (SET 2017 P2)
अ) चिस्ती
ब) कादिरी
क) शटटारी
ड) सुहरावर्दी
प्रश्न 10. 'तारिखे - ई - अलाई' कोणी लिहिला आहे ? (SET 2017 P2)
अ) अमीन खान
ब) अमीर खुसरो
क) बलबन
ड) आमिर खान
प्रश्न 11. यादी I व यादी II मध्ये जोड्या लावा व खाली दिलेल्या संकेतांकामधून योग्य तो पर्याय निवडा: (SET 2018 P3)
यादी I (महाजनपदे)
(ii) अंग
(iii) गांधार
यादी II (राजधानी)
(b) तक्षशिला
(c) चंपा
अ) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (c), (iv) - (a)
ब) (i) - (d), (ii) - (b), (iii) - (a), (iv) - (c)
क) (i) - (c), (ii) - (d), (iii) - (a), (iv) - (b)
ड) (i) - (d), (ii) - (c), (iii) - (b), (iv) - (a)
प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या चोल राजाने चीन मध्ये दूत पाठविला होता ? (SET 2018 P3)
अ) विजयालय
ब) प्रथम राजेंद्र
क) राजादित्य
ड) अरिंजय
प्रश्न 13. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्यातील संघर्षाच्या साठी खालीलपैकी कोणता पुरावा नाही ? (SET 2018 P3)
अ) जोगलठेंबी नाणेनिधी
ब) वासिष्ठीपुत्र पुळुमावी याचा नाशिक लेणी शिलालेख
क) खारवेलचा हाथीगुंफा शिलालेख
ड) गौतमीपुत्र सातकर्णीची नाणी
प्रश्न 14. हाथीगुंफा शिलालेखानुसार खारवेल हा _______ या प्रदेशाचा राजा होता. (SET 2018 P3)
अ) मगध
ब) कलिंग
क) अवंती
ड) कोसल
प्रश्न 15. गुप्त राजा द्वितीय चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती गुप्ताचा विवाह _______ यांच्या सोबत झाला होता. (SET 2018 P3)
अ) प्रथम रुद्रसेन
ब) दामोदरसेन
क) द्वितीय रुद्रसेन
ड) दिवाकरसेन
प्रश्न 16. खालीलपैकी कोणता अभिलेख गुप्त राजा रामगुप्ताच्या ऐतिहासिकतेवर प्रकाश टाकतो ? (SET 2018 P3)
अ) दुर्जनपूर शिलालेख
ब) अलाहाबाद स्तंभलेख
क) मेहरौली स्तंभलेख
ड) भितरी स्तंभलेख
प्रश्न 17. खालीलपैकी कोणती जोडी चुकलेली आहे ? (SET 2018 P3)
अ) खारवेल - हाथीगुंफा शिलालेख
ब) रुद्रदामन - जुनागढ शिलालेख
क) समुद्रगुप्त - अलाहाबाद स्तंभालेख
ड) नहपान - भाजे शैलगृह शिलालेख
प्रश्न 18. बादामी चालुक्यवंशी राजा द्वितीय पुलकेशीच्या ऐहोळे शिलालेखाची रचना कोणी केली ? (SET 2018 P3)
अ) रविकीर्ती
ब) भारवी
क) हरिषेण
ड) तिलभट्ट
प्रश्न 19. पाशुपत संप्रदायाचा संस्थापक कोणाला मानले जाते ? (SET 2018 P3)
अ) माधवाचार्य
ब) लकुलीश
क) शंकराचार्य
ड) वल्लभाचार्य
प्रश्न 20. राजकीय भूमीसाठी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कोणता शब्द वापरलेला आहे ? (SET 2018 P3)
अ) सीता
ब) व्रज
क) विनीत
ड) क्षेत्र
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 SET NET PET मराठी सर्व सराव प्रश्नसंच 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 SET NET Paper 1 PYQ 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 10
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment