Saturday, October 11, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 7

प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये 17 वी ब्रिक्स परिषद (17th BRICS SUMMIT) कोठे आयोजित करण्यात आली होती ?

उत्तर➣ रियो डी जानेरियो ( Rio de Janeiro ब्राझील)

*** Notes -

थीम - Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance

सुरुवातीला 5 सदस्य होते ब्राझील, रुस, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 2024 मध्ये ईरान, संयुक्त अरब अमीरात(UAE), इजिप्त(मिस्र) आणि इथियोपिया सहभागी झाले, इंडोनेशिया 2025 मध्ये सहभागी झाला.

बेलारूस, बोलीविया, क्यूबा, कजाकिस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, वियतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान यांना 2025 मध्ये ‘पार्टनर देश’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे देश मतदान करू शकत नाहीत, पण परिषदांमध्ये सहभागी होऊन BRICS च्या धोरणात्मक निर्णयांवर आपली मते मांडू शकतात.

स्थापनेच्या वेळेस ब्राझील, रुस, भारत, चीन हे चार सदस्य होते, तेव्हा BRIC असे नाव होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यावर 5 सदस्य व BRICS असे नामांतर.

पाहिलं संमेलन - रुस(2009)

14 वे संमेलन - चीन(2022)

15 वे संमेलन - दक्षिण आफ्रिका(2023)

16 वे संमेलन - रुस(2024)

18 वे संमेलन - भारत(2026 निजोजित)

अधिक माहितीसाठी 👉 Source Link

प्रश्न 2. 'आदी महोत्सव 2025' कोठे आयोजित करण्यात आला होता ?

उत्तर➣ नवी दिल्ली (मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम मध्ये 16 से 24 फरवरी 2025)

प्रश्न 3. भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day [NSpD]) साजरा केला जातो ?

उत्तर➣ 23 ऑगस्ट

*** Notes -

सुरुवात - 23 ऑगस्ट 2024 रोजी आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर, 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली

23 ऑगस्ट 2023 रोजी, भारताने चंद्रावर चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी लँडिंग करून अवकाश इतिहासात आपले नाव कोरले. प्रज्ञान रोव्हरसह विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले, ज्यामुळे भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरणारा पहिला देश बनला. लँडिंग साइटला 'शिवशक्ती' पॉइंट (स्टेटिओ शिवशक्ती) असे नाव देण्यात आले

August 23, 2024 [NSpD-2024] theme - "Touching Lives while Touching the Moon: India's Space Saga.

August 23, 2025 [NSpD-2025] theme - Aryabhatta to Gaganyaan: Ancient Wisdom to Infinite Possibilities

प्रश्न 4. SAAB ने भारतात इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर लेजर वॉर्निंग सिस्टम - 310 (LWS-310) तयार करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे ? (#2025)

उत्तर➣HAL

*** Notes -

Swedish Aerospace and Defense Company (SAAB)

Hindustan Aeronautics Limited (HAL)

प्रश्न 5. UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ भुवनेश कुमार

प्रश्न 6. 2025-26 साठी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर➣ सीए चरणजोत सिंग नंदा (73 वे अध्यक्ष)

*** Notes -

स्थापना - 1 जुलै 1949

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ही भारतातील चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसायाचे नियमन करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 अंतर्गत स्थापन झालेली एक वैधानिक संस्था आहे.

2024-25 साठी 72 वे अध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल

प्रश्न 7. AI धोरण ठरवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? (#2025)

उत्तर➣ महाराष्ट्र

प्रश्न 8. भारताचा पहिला खाजगी (सैटेलाइट कन्स्टेलेशन (Satellite Constellation)) उपग्रह 'फायरफ्लाय' (Firefly) ________ या कंपनीने लॉन्च केला आहे.

उत्तर➣ Pixel (बेंगलुरु)

प्रश्न 9. भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कुठे स्थापन करण्यात आली आहे ?

उत्तर➣ चेन्नई

*** Notes -

ही बायोबँक इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन (MDRF) यांच्या संयुक्त सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे.

प्रश्न 10. _______ येथे देशातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले.

उत्तर➣ नागपूर

*** Notes -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन

या ट्रेनचे डिझाइन व्होल्वो ट्रक्सने केले आहे

प्रश्न 11. भारतात व्याघ्र जनगणना दर किती वर्षांनी होते ?

उत्तर➣ चार

*** Notes -

देशात पहिली व्याघ्रगणना 2006 मध्ये झाली

2022 च्या गणनेनुसार भारतात सुमारे 3167 वाघ आहेत ज्याचा उच्च अंदाज सुमारे 3682 आहे

प्रश्न 21. 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला भारताचा 58 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

अधिक माहितीसाठी 👉 Link

प्रश्न 12. जागतिक पाणथळ दिवस(World Wetlands Day) दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो ?

उत्तर➣ 2 फेब्रुवारी

*** Notes -

2025 थीम - Protecting Wetlands for Our Common Future

प्रश्न 13. जानेवारी 2025 मध्ये BCCI च्या लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर➣ न्यायमूर्ती अरुण मिश्रा (सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश)

प्रश्न 14. महिला क्रिकेट IPL 2025 चा विजेता संघ कोणता ?

उत्तर➣ मुंबई इंडियन्स(कॅ. हरमनप्रीत कौर) (वि. दिल्ली कॅपिटल्स)

*** Notes -

2023 - मुंबई इंडियन्स (वि. दिल्ली कॅपिटल्स)

2024 - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू(वि. दिल्ली कॅपिटल्स)

प्रश्न 15. ________ येथे भारतातील पहिले भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) भूविज्ञान संग्रहालय उदघाटन करण्यात आले आहे.

उत्तर➣ ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)

GSI - Geological Survey of India

डिसेंबर 2024 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उदघाटन केले.

प्रश्न 16. पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टीव्हल 2025 (KIWSF) कुठे आयोजित करण्यात आला होता ?

उत्तर➣ श्रीनगर

*** Notes -

21 ते 23 अगस्त 2025 दल सरोवर, श्रीनगर

शुभंकर: हिमालयन किंगफिशर

स्पर्धा प्रकार - रोइंग, कैनोइंग आणि कयाकिंग

प्रश्न 17. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन कोणती कलाकृती भेट म्हणून दिली ? (#2025)

उत्तर➣ डोकरा (धातूचे शिल्प)

*** Notes -

Dokra Art -- A renowned metal-casting tradition from Chhattisgarh.

प्रश्न 18. दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो ?

उत्तर➣ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात (01 ते 07)

प्रश्न 19. सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या वस्तूवरील 11% आयात शुल्क तात्पुरते माफ केले होते ?

उत्तर➣ कच्चा कापूस

प्रश्न 20. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोणत्या देशाला रुबेला मुक्त म्हणून घोषित केले ?

उत्तर➣ नेपाळ

*** Notes -

World Health Organization (WHO)

प्रश्न 21. पश्चिम बंगाल सरकारने बंगाली स्थलांतरीत कामगारांसाठी कोणती योजना सुरु केली ? (#2025)

उत्तर➣ श्रमश्री

प्रश्न 22. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल विधानसभेत किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात ?

उत्तर➣ 5

*** Notes -

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश असून त्याचे उपराज्यपाल - मनोज सिन्हा

5 6 7 8 9 10

 

 

 

 

 



No comments:

Post a Comment